Ad code

Latest

6/recent/ticker-posts

गाथा कोंडाजी फर्जद यांच्या पराक्रमाची Kondaji Farjad

 इतिहास हा शब्दच उज्वल भविष्य घडवण्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. आणि या इतिहासातूनच प्रेरणा घेत लहानांपासून तरुणांपर्यंत प्रत्येकान देशाचं भवितव्य उज्वल करावं हा हेतु घेवून NAADMARATHI.IN हे प्लॅटफॉर्म इतिहासातल्या वीरांची माहिती आपल्या समोर घेवून येत आहे. आजची ही यशोगाथा आहे स्वराज्यासाठी लढलेल्या वीर मावळ्याची, ही गोष्ट आहे मराठ्यांच्या गौरवशाली इतिहासाची. ही गोष्ट आहे 1673 सालची. ही गोष्ट आहे कोंडाजी फर्जंद या वीर मावळ्याच्या सामर्थ्याची. ही गोष्ट आहे कोंडाजींच्या रांगडया हिम्मतीची, जिद्दीची, शौर्याची आणि ही गोष्ट आहे सामान्यांनी घडवलेल्या असामान्य पराक्रमाची. 

पन्हाळा स्वराज्यात नसल्याची खंत सतत शिवाजी महाराजांना बोचत होती, आदिलशाहीवर वचक ठेवण्यासाठी आणि कोकणच्या वाटा सुरक्षित करण्यासाठी पन्हाळा स्वराज्यात असण अतिशय महत्त्वाचं होतं. पण पन्हाळा जिंकणं हे काही सोपी गोष्ट नव्हती. १६६० साली सिद्धी जोहरने तब्बल चाळीस हजार फौजेसह पन्हाळ्याला सहा ते सात महिने पूर्णपणे वेढा दिला होता. परंतु इतक मोठ अस्मानी संकट असतानाही वज्रासारखा पन्हाळा शत्रूशी झुंजतच होता. भक्कम तटबंद आणि मजबूत दरवाजे यांच्या जोरावर स्वतः शिवाजी महाराजांनी सहा ते सात महिने पन्हाळा नेटाने लढवत ठेवला होता. पण सिद्धी सोबत झालेल्या तहामुळं किल्ला आदिलशाहीला द्यावा लागला. 

पन्हाळा स्वराज्यातन सिद्धीकडे गेल्याची खोल जखम महाराजांच्या मनावर झाली होती, त्यामुळेच पन्हाळा पुन्हा एकदा स्वराज्यात सामील करून घेण्यासाठी १६६६ साली स्वतः छत्रपती शिवाजी महाराज चक्क 2000 मावळ्यांची फौज घेत पन्हाळ्यावर चालून गेले, पण या मोहिमेमध्ये महाराजांना माघार घ्यावी लागली. खुद्द आदिलशहाचं पन्हाळ्यावर अतिशय बारकाईने लक्ष होतं, पन्हाळा आदिलशाहीच्या ताब्यात गेल्यावर त्यांनी दारूगोळा आणि शस्त्रांचा प्रचंड मोठा साठा गडावर करून ठेवलेला होता. इतकच काय तर तीन ते चार हजार हत्यार बंद फौज पन्हाळ्याच्या रक्षणासाठी तैनात करून ठेवलेली होती, पण काहीही करून पन्हाळा पुन्हा एकदा स्वराज्यात सामील करून घ्यायचा हे महाराजांनी ठरवून ठेवलेल होत.


पन्हाळगड परत स्वराज्यात घेणे खूपच कठीन काम होते, मुघलांचे सैन्य दिवस रात्र पन्हाळगडावर पहारा देत होते. पण अश्या कठीण प्रसंगी पन्हाळा काबीज करायला जाणार तरी कोण? असा प्रश्न जेव्हा दरबारात उभा राहिला तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोळ्यासमोर एकच नाव आल  ते म्हणजे कोंडाजी फर्जंद यांचं. महाराजांनी कोंडाजींना बोलावण धाडल, धिप्पाड देह यष्टीचा कोंडाजी फर्जंद महाराजांच्या आज्ञेनुसार दरबारात हजरही झाला. आल्या आल्या मनोभावे  शिवाजी राजांना वाकून मुजराही केला, मुजरा झाल्यावर महाराज कोंडाजी कडे पाहून उद्गारले

 "कोंडाजी पन्हाळा स्वराज्यात नाही कोकणच्या वाटा सुरक्षित नाहीत, पन्हाळ्याच्या आजूबाजूची गाव ही सुरक्षित नाहीत, रयतेचे हे हाल आम्हास बघवत नाहीत कोंडाजी काहीही करा पन्हाळा स्वराज्याच्या ताब्यात आला पाहिजे"

 छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुखातून आदेश येतात क्षणाचाही विलंब न करता कोंडाजी उद्गारले,

"व्हय की राजे एका रात्री पन्हाळा ताब्यात घेतो"

 शिवाजीराजांना कोंडाजींचा धाडसी आत्मविश्वास बघून अतिशय आनंद झाला. त्यावर महाराज उद्धारले "कोंडाजी या मोहिमेसाठी किती मावळे देव तुमच्या सोबतीला 3000 की 5000"  

कोंडाजींनी महाराजांकडे पाहून किंचित नकारार्थी मान हलवणे महाराजांना कोंडाजींचा रोख कळला नाही म्हणून महाराजांनी पुन्हा एकदा कोंडाजींना विचारलं "मग किती सैन्य हवय दहा हजार"

कोंडाजी बोलले "नग महाराज" आता मात्र शिवाजी राजे चिंतेत झाले होते महाराजांनी कोंडाजींना पुन्हा विचारलं "मग किती मावळे पाहिजे ते तरी सांग" त्यावर कोंडाजी फर्जंद उद्गारले "महाराज द्या की फकस्त 50 60 मावळे सोबत" कोंडाजींचा हे उत्तर ऐकून महाराजांना प्रचंड आश्चर्य वाटले.  पन्हाळा काबिज करण्यासाठी 40 हजारांचा सैनिक घेऊन आलेल्या सिद्धीला मराठा सैन्याने सहा ते सात महिने झुंजत ठेवलं, तोच पन्हाळा पुन्हा स्वराज्यात सामील करून घेण्यासाठी कोंडाजी फक्त साठ मावळे मागत होते. कोंडाजींचा हा आत्मविश्वास बघून शिवाजी महाराजांचा उर अभिमानाने भरून गेला, माझ्या स्वराज्याचा एक एक मावळा लाखो शत्रूंना भारी आहे याची त्यांना पुन्हा एकदा प्रचिती आली होती. 

अखेर पन्हाळ्यावरच्या मोहिमेचा दिवसही ठरला. ठरल्याप्रमाणे साठ शूर मावळे सोबत घेत महाराजांना मुजरा करत कोंडाजी मोहिमेवर निघाले. पण तितक्यातच शिवाजी राजांनी त्यांना थांबवलं, मोहिमेवर निघालेल्या सैनिकाला महाराजांनी अचानक का थांबवलं असा सगळ्या दरबाराला प्रश्न पडला, महाराजांनी कोंडाजींचा हात समोर घेतला आणि बक्षीस म्हणून स्वतःच्या हातातलं सोन्याचं कड कोंडाजींच्या हातात घातल. सैन्याने पराक्रम गाजवल्यानंतर त्यांना बक्षीस देणारे शेकडो राजे होऊन गेले पण मोहिमेवर जाण्या अगोदरच माझा मावळा ही मोहीम पत्ते करणारच हा विश्वास ठेवत मावळ्यांच्या हातावर बक्षीसाची आणि पाठीवर कौतुकाची थाप टाकणारे एकच राजे झाले ते म्हणजे 'छत्रपती शिवाजी महाराज'. 

 कोंडाजींनी फक्त साठ मावळे मागितले होते पण महाराजांनी 300 शूर मावळे कोंडाजीन सोबत दिले, पण कोंडाजींनी ते तीनशे मावळे पन्हाळगडाच्या पायथ्याशीच ठेवले, त्यापैकी मोजून 60 मावळे सोबत घेतले आणि उरलेल्या सैन्याला कोंडाजींनी सांगितलं. 

"आम्ही 60 जण तटबंदी ओलांडून किल्ल्यावर जाऊ आणि आमची तलवार गाजवून किल्ला ताब्यात घेऊ, पण जर चुकून यदाकदाचित आम्हाला किल्ला घेण्यात अपयश आल तर तुम्ही शत्रूला शरण जायचं नाही हत्यार टाकून पळायचं नाही, कारण रणांगणातन माघारी फिरणं हे मराठ्यांच्या रक्तातच नाही एक वेळ मरण आलं तरी चालेल पण शरण बिलकुल जायचं नाही." 

कोंडाजींच्या या प्रेरणादायी शब्दांनी मावळ्यांचा आणखी उत्साह वाढला त्यावेळेला पन्हाळ्याचा किल्लेदार होता आदिलशहाचा विश्वासू सरदार बाबू खान. 

अमावस्येची रात्र असल्याने भर मध्यरात्री डोळ्यात बोट घातलं तरी दिसणार नाही इतका काळा कुट्ट आधार होता. याच अंधाराचा फायदा घेत वाऱ्याच्या वेगाने प्रचंड चपळ असणारा एक मावळा किल्ल्याच्या पश्चिम बाजूंना किल्ल्यावर चढून गेला, आणि किल्ल्यावरून त्यांना दोर खाली सोडला त्या दोराच्या सहाय्याने कोंडाजीराव अवघ्या साठ मावळ्यांसह सर सर किल्ल्यावर चढले. त्या 60 मावळ्यांपैकी 40 जणांच्या पाठीवर करणे ढेरी ढोल तुताऱ्या आणि विविध प्रकारची रणवाद्य अडकवलेली होती, आणि कमरेला समशेरी देखील लावलेल्या होत्या. ठरलेल्या योजनेप्रमाणे 60 ही मावळे गडावर विविध ठिकाणी पसरले कोंडाजींनी इशारा करतात त्या सगळ्यांनी आपापली रणवाद्य वाजवायला सुरुवात केली. त्याच वेळेला 60 पैकी पाच दहा मावळे जोरजोरात ओरडत इकडे तिकडे धावू लागले. आणि जीवाच्या आकांताने बोलू लागले   "भागो भागो शिवाजी आया हजारो की फौज लेकर आया"   पन्हाळ्यावर मराठा सैनिकांनी एकच गोंधळ आणि गोंगाट केला. गाढ झोपेत असलेल्या शत्रू सैन्य खडबडून जाग झाल सैरावैरा पळू लागल या सगळ्या गोंधळातच अर्धवट झोपलेल्या सैनिकांवर मावळ्यांनी जोरदार हल्ला चढवला. त्या वाद्यांचा गोंगाट ईतका मोठा होता की खरोखरच जणू हजारोंच्या संख्येने मराठा सैन्याची फौज गडावर चालून आली की काय असाच सर्वांचा समज झाला. ही गडबड ऐकत किल्लेदार बाबू खान जागा झाला आणि हातात तलवार घेऊन धावतच खालीही आला अंधाराचा फायदा घेत आदिलशाही सैन्याला सपासप कापणारे मावळे त्याखानाने पाहिले, आणि तितक्यात त्याची नजर गेली ती कोंडाजीरावांवर. बाबू खानानं तलवार उपसली आणि पाठीमागून कोंडाजींच्या पाठीवर जोरदार वार केला कोंडाजींच्या रक्ताची टिळकांडी उडाली पण कोंडाजी डगमगले नाहीत सरऱ् देशी मागे फिरले आणि हातातली तरवार वाऱ्यासारखी फिरवली. घणघोर लढाई झाली हर हर महादेव चा गजर झाला आणि कोंडाजीच्या तलवारीच्या वाराने बाबू खाण्याचा मस्तक धडा वेगळं झालं खासा किल्लेदारच मारला गेला हे पाहून आदिलशाही सैन्याचं मनोधैर्यच खचल बरेच शत्रू सैन्य मिळेल त्या वाटेने पळू लागळे. अनेकांनी हत्यारे खाली टाकली आणि शरणागती पत्करली आणि फार मध्यरात्री गडावर फडकणारी आदिलशाही पताका उतरवून अवघ्या साठ मावळ्यांच्या पराक्रमाच्या जोरावर बुलंद आणि बलाढ्य अशा पन्हाळ्यावर हिंदवी स्वराज्याचा भगवा डौलाने फडकू लागला. 


हा इतिहास होता मावळ्यांच्या अतुलनीय अतुलनीय पराक्रमाचा अवघ्या काही जणांनीशी शत्रूला चितपट करण्याचा आणि कोंडाजींनी शिवछत्रपतींना दिलेल्या वचनाचा अशा आपल्या शौर्याने मराठ्यांची विजय पताका अभिमानाने फडकवणाऱ्या कोंडाजी फर्जंदांच्या असामान्य शौर्या मराठे तथा हिंदवी स्वराज्यातली जनता कधीच विसरणार नाही 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Menu Site