Ad code

Latest

6/recent/ticker-posts

झुंजार सेनापती संताजी घोरपडे Senapati Santaji Ghorpade information in Marathi

 झुंजार सेनापती संताजी घोरपडे Senapati Santaji Ghorpade information in Marathi

संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती राजाराम महाराजांनी मराठ्यांच राज्य आपल्या हातात घेतले, आणि याच काळामध्ये संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांच्या असामान्य पराक्रमाने दीर्घकाळ म्हणजेच तब्बल सतरा वर्ष औरंगजेबाच्या फौजेचा सामना केला. मोगल सैनिकांमध्ये संताजी आणि धनाजी यांची प्रचंड दहशत निर्माण झालेली होती. संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांनी अत्यंत नाजूक आणि पडत्या काळामध्ये मराठ्यांचं स्वराज्य नष्ट होण्यापासून वाचवलं, आणि जसजसा औरंगजेबाचा प्रतिकार क्षीण होत गेला, तस तस या दोघांनी स्वराज्याच्या सीमा अतिशय लांबवर पसरवण्याचं धोरण अवलंबलं. मोगल छावण्यांवर गनिमी हल्ले हा त्यांच्या युद्धनीतीचा अतिशय महत्त्वाचा भाग होता.


1707 मध्ये औरंगजेबाच्या मृत्यू समयी मराठ्यांनी मध्य भारतापर्यंतचा भूभाग स्वराज्यामध्ये आणलेला होता. शिवाजी महाराजांनी स्थापलेल्या स्वराज्याला संताजी आणि धनाजी यांनी खऱ्या अर्थाने वाचवलं आणि पसरवलं. पुढे इतर मराठी सरदार आणि पेशव्यांनी मिळून 18 व्या शतकाच्या जवळपास संपूर्ण भारतावर आपला दरारा आणि आपली दहशत निर्माण केली. संताजी घोरपडे मराठ्यांच्या सैन्यात अव्वल सरदार होते, आणि ते अश्या वेळेला सेनापति पदी विराजमान झाले ज्या  वेळेला मराठ्यांचा अत्यंत काठीन काळ सुरू होता. छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज्यांच्या मृत्यूनंतर संपूर्ण महाराष्ट्रात मुघलांची सेना पसरली होती, त्यावेळेला स्वराज्य राहत की संपत अस सगळ्यांनाच वाटत होत, अश्या कठीन प्रसंगी संताजी घोरपडेंनी मोलाची भूमिका निभावली. आपल्या पराक्रमाणे मुघलांना सळो की पळो करून सोडणाऱ्या संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांच्यापैकी संताजी घोरपडे यांची शौर्यगाथा आज आपण जाणून घेणार आहोत.

झुंजार सरसेनापती संताजी घोरपडे Senapati Santaji Ghorpade Information In Marathi

महाराजांना एकापेक्षा एक असे सेनापती लाभले, आणि तीच परंपरा पुढे शंभूराजांच्या काळामध्ये हंबीरराव मोहिते यांनी कायम राखली. शंभूराजांना आणि कवी कलाश यांना संगमेश्वरी शेख निजाम यांनी पकडलं आणि त्यावेळेला भालोजी घोरपडे मारले गेले, यानंतर मोघलांनी रायगड ताब्यात घेतला. रायगड मोंघलांच्या ताब्यात गेल्यानंतर जणू मराठ्यांचे हे राज्य म्हणजे महाराजांचं हे दिव्य स्वप्नच नष्ट होतं की काय अशी स्थिती निर्माण झाली. पण याच वेळेला महाराजांच्या आणि शंभूराजांच्या तालमीमध्ये तयार झालेले काही रणझुंजार पुढे सरसावले आणि याच मराठी भूमीमध्ये त्या मस्तावलेल्या मोगल बादशहाला त्यांनी गाडलं. या यूध्यात एक आघाडीचा वीर म्हणजे सरसेनापती संताजी घोरपडे. मराठ्यांचा इतिहास सेनापती संताजी घोरपडे यांचं नाव न घेता पूर्ण होऊ शकत नाही.

छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाने दगा फटका करून पकडलं आणि ठार केलं. स्वराज्याचा कणा गेला, स्वराज्याचा आत्मा तर आधीच गेला होता. आता शरीराने देखील साथ सोडलेली होती, छत्रपती शिवाजी महाराज गेले संभाजी महाराज गेले आणि या स्वराज्याला आता वाली कोण असा प्रश्न सगळ्यांच्याच मनात निर्माण झाला होता. शैतानाच दुसर रूप म्हणजे औरंगजेब जेवढा क्रूर होता तेवढाच तो धूर्त देखील होता, पक्का हाडाचा आणि जातीचा लढवय्या आणि राजकारणी होता, अशा या क्रूर, दिग्गज, अति धूर्त आणि शैतानाची सावली मराठ्यांच्या स्वराज्यात पडत होती.

सावली पडेल तिथला भाग उजाड होत होता. शहाजी महाराजांनी दाखवलेलं शिवरायांनी प्रत्यक्षात उतरवलेलं, आणि शंभूराजांनी टिकवलेल तेच ते स्वराज्य त्या स्वराज्यात सगळीकडे अंधकार पसरत चालवता होता. आणि आता एकच आशेचा किरण होता तो म्हणजे छत्रपती राजाराम महाराज. महादुर्त औरंगजेब मराठ्यांची सत्ता पूर्णपणे नेस्तनाबूत करू इच्छित होता, तशी सुरुवातही त्याने केली होती. आजूबाजूची राज्य औरंगजेबानं आपल्या खिशात कधीच घातली होती, स्वराज्यातले अनेक किल्लेदार आणि ठाणेदार यांनी लढायच्या आधीच शरणागती पत्करली होती, तर काहीजण अवसान गळाल्यासारखं लढत होते काही जण हिंमतीने लढत होते पण यश मात्र मिळत नव्हत. सगळीकडे स्वराज्याची नाश धोस सुरू होती . याच वेळेला औरंगजेबाचा डेरा तुळापुरी पडला होता तिथेच त्याने संभाजी राजांनाही मारला होता. 

अशा वातावरणात शंभू महादेव डोंगराच्या पायथ्याशी कसली तरी कुजबूज सुरू झाली वातावरण चिंतेच होत सल्ला मसलत मात्र सुरू होती. जेमतेम पाच ते सहा हजारांवरचे सैन्य आणि बैठकीत स्वराज्याचे उरले सूरले काही सरदार म्हणजेच संताजी घोरपडे, धनाजी जाधव, बहिर्जी घोरपडे, मालोजी घोरपडे, विठोजी चव्हाण इत्यादी निवडक पण शूरवीर निर्भीड सेनानी बैठकीमध्ये चर्चा मसलत झाली. औरंगजेबाने स्वराज्याची लावलेली नासधोस कशी रोखायची यावर तोडगा शोधण्याचा प्रयत्न सुरू होता. तेवढ्यात संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांना एक धाडसी कल्पना सुचली सगळीकडे नासधूत करणाऱ्या औरंगजेबाच्या मूळ छावणीतच आपण नासधूस केली तर अशी कल्पना त्यांनी बैठीकीमद्धे मांडली. औरंगजेबाची मूळ छावणी तुळापूर ते वडू कोरेगाव पर्यंत पसरलेली होती. लाखोंची फौज औरंगजेबाच्या गिनतीला होती, त्यात अनेक मराठी सरदारहि सामील होते. एवढ्या मोठ्या छावणीची नासधूस करायचा विचार करणे हे देखील खूप मोठं धाडसाचं काम म्हणायला हवं, त्यात ती छावणी होती साक्षात क्रूर औरंगजेबाची. संताजी आणि धनाजी यांना ही कल्पना आली कुठून, नक्कीच संभाजी महाराजांचा छळ कपटाने आणि दगा फटक्यानं केलेल्या खुनाचा रोष संताजी आणि धनाजी यांच्या मनात होता, आणि या सगळ्याचाच वचपा काढायचा असेल तर तिथेच या सर्व जालीम सत्तेच्या मुळावरच घात घालायला हवा असा विचार त्यांच्या मनात आला. 

संताजी घोरपडे यांचे शौर्य Senapati Santaji Ghorpade 

क्रूर औरंगजेबाने मराठ्यांच्या छत्रपती संभाजी राजांना मारलं पण मराठ्यांनी त्यावर काय केलं, मराठी शंड झालेत की काय असा सवाल शत्रूच्या मनात निर्माण होण्याआधी त्याचं उत्तर देणे गरजेचे होतं. मराठ्यांचा रक्त काय आहे हे त्या औरंग्याला दाखवून द्यायला हवं असं संताजी आणि धनाजी यांना वाटत होतं. औरंगजेबाच्या छावणीची नासधूस आपले सरदार करू शकतात तर आपणही औरंगजेबाशी दोन हात नक्कीच करू शकतो, अशा प्रकारचा आत्मविश्वास आपल्या सैन्यामध्ये निर्माण करण्यासाठी अशाच प्रकारच्या धाडसी बेताची नितांत आवश्यकता होती, पण हा बेत निव्वळ धाडसी नव्हता तर तो सगळ्यांना अशक्यप्राय देखील वाटत होता. शेवटी संताजी गंभीरपणे म्हणाले

"फलटणच्या खानाचा समाचार धनाजी आपण घ्यावा, पाठीवर डोंगर असावा. माझ्याबरोबर 2000 स्वार निवडक द्यावेत, शिवाय माझे पथकांनीशी तुळापुराचे मुक्कामी जाऊन बरायखुद पादशहा याजवर मी छापा घालतो. मराठी आहोत असे औरंगजेबास कळवून येतो".

धनाजीरावांनी संताजींचे हे बोल ऐकल्यावर लगेचच त्यांना शाबासकी दिलीआणि म्हणाले, " फार चांगले, शाबास..... सोबत विठोजी चव्हाण असावेत. छत्रपतींच्या नावे कारवाई चोख व्हावी. खुद्द आम्ही रनमस्त खानाचा अन शहाबुद्दीन खानाचा समाचार घेतो. कामगिरी फत्ते करूनच येतो."

विठोजी चव्हाणही लगेचच तयार झाले, मनोमणी संताजीही खुश झाले, मोठी जबाबदारी संताजींवर येऊन पडली होती. या जबाबदारीमध्ये कुठेही छोटीशी चूक होऊ नये यासाठी संताजी मनोमनी छाप्याची आखणी करत होते. धनाजींनी आपल्याकडच्या मावळ्यांपैकी दोन हजार सडसळीत मावळे निवडले, त्यांना संताजींच्या खास पथकासोबत जोडले. विठोजी चव्हाणही तयार झाले, सर्वांनी मिळून जय भवानी जय शिवाजी असा जयघोष केला, संताजी अन जाधवराव आपापल्या वाटेला निघाले, धनाजीराव फलटण कडे निघाले तसेच संताजींनी जेजुरी कडे कुच केला संताजी सैन्य घेऊन थेट जेजुरीच्या खंडोबाच्या दर्शनासाठी गेले. जय मल्हारच्या घोषणा झाल्या सैन्याचं मनोबल उंचावलं, कालभैरवान जसा ब्रम्हाचा गर्वहरण केलं त्याचप्रमाणे संताजीच सैन्य जणू काही औरंगजेबाची मस्ती जिरवायला आज सज्ज होऊन पुढे निघाले होते. गुप्तहेर यांनी दिलेल्या माहितीमुळे योजना आखायला भरपूर मदत झालेली होती, संताजींनी सगळ्यांना त्यांची नियोजित काम सांगितली आणि त्यानुसार तुळापूरच्या दिशेने कूच करायला संताजींनी आदेश दिले. 

पहाटे सुरुवात करून दुपारपर्यंत तूळापुराच्या जवळच्या भागांमध्ये विश्रांतीला आले, विश्रांतीही घेतली अंधार पडल्यावर सर्व तयारी करून संताजींनी तुळापूर कडे प्रवास सुरू केला परीक्षेची घटका जवळ आलेली होती. जे काही ठरवलं होतं ते त्या त्या प्रमाणे पार पाडण्यासाठी सगळ्यांचेच कौशल्य, शूरवीरता, चातुर्य आणि प्रसंगावधानही पणाला लागणार होते. अग्नी परीक्षेचीच ती वेळ होती, औरंगजेबाचा तुळापूर डेरा तीन कोसांवर आला होता तेवढ्यात मोगली सैन्य दिसू लागलं होत, संताजींनी अंदाज घेतला ती  तुकडी  रात्रीच्या पहाऱ्याची होती. संताजींनी पहाऱ्यावर असलेल्या सैन्याला निरोपही धाडला.

"बादशहाच्या लष्करात सामील झालेल्या मराठा सरदार शिर्के व मोहिते  यांचं सैन्य आहे. मोहिमेवर गेलो होतो. बदली स्वार आले म्हणून परत लष्करास येत आहोत". 

यावरून औरंगजेबाच्या छावणीची संताजींना किती खडाण खडा माहिती होती त्याचा अंदाजही बांधता येतो, बादशहाच्या चाकरीतील मराठा सैन्याची आत बाहेर येण्या जाण्यासाठी ची खून देखील संताजींनी आपल्या गुप्तहेर तर्फे मिळवून ठेवलेली होती. मोगली सैन्याला खून पटली आणि त्यांनी या सैन्याला वाट मोकळी करून दिली. मध्यरात्रीची वेळ असल्याने पहारा देणार पथक सोडून बहुतांश सैन्यात झोपी गेलेल होते, याच वेळेचा फायदा घेत संताजींनी सरळ बादशहाच्या डेऱ्याकडे कुच केला. बादशहाचा तो भव्य डेरा त्यांच्या डोळ्यासमोर आला, त्या भोवताली सैन्याचं सुरक्षा बंदोबस्त होता. संताजींनी आपल्या सैन्याला गटागटांमध्ये विभागलं आणि एकाच वेळी बऱ्याच ठिकाणी धुमाकूळ घालण्याचा इशारा केला, आणि अचानक मराठा सैन्याने बादशहाच्या छावणीवर हल्ला केला. "हर हर महादेव" म्हणून जयघोष सुरू झाला. साखर झोपेत असलेले बादशहाचे सैनिक काही कळायच्या आतच अतिशय भामावून गेले. कारण एवढ्या मोठ्या बादशहाच्या छावणीमध्ये येऊन कोणी हल्ला करेल याचा विचारही त्यांनी केलेला नव्हता. संताजी घोरपडे हे एक वादळ होते, कारण लाखाच्या पटीत असलेल्या सैन्यात 2000 सैनिक घेऊन घुसण्यासाठी काळीज फक्त मराठी माणूसच बाळगू शकतो.

इतक्या मोठ्या बादशहाच्या छावणीत येऊन सुद्धा कोणी हल्ला करेल याचा विचार कुणीही केलेला नव्हता. आणि म्हणूनच सगळे बेसावध होते, "हर हर महादेव" चा जयघोष करत मराठा सैन्यानं बादशहाच्या मुख्य ढेऱ्यावरही आक्रमण केलं, त्यावेळेला शुद्ध संताजी सैन्याला मार्गदर्शन करत होते मिळाला तर बादशहालाचा आडवा पाडू असाच काहीसा निर्धार संताजींनी केलेला होता, पण बादशहाला बादशाही सुरक्षा रक्षकांनी सुखरूप पळवलं. रागाच्या भरात संताजी आणि मराठा सैन्यानं औरंगजेबाच्या ढेऱ्याची नासधूस करायला सुरुवात केली, डेरा कोसळला डेरा अक्षरशः जमीन दोस्त झाला. डेऱ्याचा कळस हा सोन्याचा होता ही विजयाची निशाणी म्हणून संताजींनी सोबत घेतली. मिळेल त्या मोगली सैन्याला कापलं, जेवढी शक्य होईल तेवढ्या गोष्टींच नुकसान केल. "जय भवानी जय शिवाजी" अशा घोषणा आसमंतात   दुमदुमत होत्या, बादशाही सैन्यांमध्ये सतर्कता पसरत आहे आणि परत सैन्य लढाईसाठी तयार होत आहे हे बघून संताजींनी आपल्या सैन्याला परतण्याचा इशारा दिला. गटागटात बादशाही सैन्याचीच दुपडी करून उडालेल्या गोंधळाचा फायदा घेत संताजींचा सैन्य गटागटाणे औरंगजेबाच्या छावणीतून बाहेर पडू लागल. 

सुरुवातीला बादशाही सैन्याला काही कळायला वावच नव्हता, कारण ते आपापसातच लढू लागले त्यामुळे त्यांच्यातच पोफळी निर्माण झाली नेमकं शिवाजीच मराठा सैन्य आहे की आपल्यातल्याच मराठी सरदारांचा सैन्य आहे हेच त्यांना उमगत नव्हतं, तोवर संताजी आपल्या सैन्यासह सुखरूप बाहेर निसटले होते बाहेर पडल्यावर संताजी आणि इतर सेनानी त्यांच्या सैन्यासह सुसाट वेगाने सिंहगडाकडे रवाना झाले आणि मागे टाकून गेले की फक्त भीतीची लाट जय भवानी जय शिवाजीच्या जय घोषाने मोघलांमध्ये उमटलेली भीतीची लाट. हे शिवाजीचे संभाजीचे सैन्य काहीही करू शकत अशा प्रकारचा भीतीचा सुळसुळाट संताजींनी औरंगजेबाच्या छावणीमध्ये मागे सोडून पुढे कुच केलेला होता. बऱ्याच कालावधीमध्ये मोगलांनी दहशत नावाचा प्रकार पाहिला नव्हता तो त्यांना संताजींच्या रूपाने अनुभवायला मिळाला होता. औरंगजेबाच्या छावणीतला सैन्य आणि त्याचे सरदार सुन्न झाले होते. नेमकं हे वादळ कसलं होतं त्याचा अंदाज त्यांना लागत नव्हता. एक प्रकारची धास्ती सर्वांनी घेतली होती एवढ्या मोठ्या छावणीत कोणी येऊन धुमाकूळ घातला यांच्याकडे नेमकी कोणती अद्भुत शक्ती तर नाही ना अशा प्रकारची पाल या सर्वांच्याच मनात चुकचुकली होती, भुतांची टोळी होती की काय असाही भास त्यापैकी काही जणांना झाला.

संताजी आणि मराठा सेनानींनी टाकलेला छापाबांधा हे कुठल्यातरी अद्भुत शक्तीने  असलेल्या भूतांनीच केलेल्या असं वाटणं साहजिक होत. हो ही भूतच होती स्वराज्याचीच उठवते मरणानंतर ही ज्यांच्या हृदयातनं स्वराज्याला कोणी काढून टाकू शकणार नाहीत अशी भूत होती. स्वराज्यासाठी काहीही करू शकतील अशी ही भूत होती. या पराक्रमाची तोडत नाही एवढ्या मोठ्या सैन्याच्या छावणीत अगदी तुरळक सैन्य घेऊन जान आणि औरंगजेबाला अक्षरशः आसमान दाखवून येणं म्हणजे खरंच पराकोटीचा शौर्य आहे.

पुढे हाच स्वातंत्र्य लढा संताजी धनाजींनी बेळगाव धारवाड करत कर्नाटक प्रांतात नेला, नंतर यांनी जिंजीकडे आपला मोर्चा वाढवला. जिंजी किल्ल्याला  जुल्फी कारखान त्याचा बाप असत खान आणि शहजादा काम भक्ष वेडा घालून बसले होते. संताजी साधारणपणे 15000 घोडदळ घेऊन  तर धनाजी साधारणपणे दहा हजारांच घोडदळ घेवून जिंजीला धडकले. प्रथम धनाजी आपली फौज घेऊन सामोरे आले आणि मोगली सैन्यावर हल्ला केला मागून येणाऱ्या संताजींना अलीम अर्धाखान आडवाला आला,आलीम अर्धाखान हा जिंजीच्या मोगली फौजेला रसत पूर्वत होता. त्याची रसत मारत संताजी पुढे निघून गेले ( त्या लढाईची फ्रेंच गव्हर्नर मार्टिन यांनी आपल्या डायरीमध्ये नोंद केलेली आढळून येते ) संताजी आणि धनाजी यांच्या समोर मोगल सैन्याची अक्षरशः दाणादाण उडाली त्यांची रसत तोडली गेली, आणि अफवांचं पीक उठवलं जाऊ लागला त्यात किल्ल्यातून मोगली फौजेवर हल्लेही होऊ लागले. स्वतः जुल्फी कारखान रसत आणण्यास बाहेर पडला असता त्याचा सामना संताजीन बरोबर झाला, खान कसा बसा आपला जीव वाचवत परत छावणीत आला. संताजी जिंजी सोडून कांचीपुरमला निघून गेले, वाटेत त्यांना कासिम खान जिंजीकडे चालून येत असल्याची बातमी मिळाली.


कासिम खानाला बादशहाणं जुल्फी कारखानाला मदत करण्यासाठी पाठवलं होतं कांचीपुरम नजीक कावेरी पार्क या ठिकाणी खान असताना संताजीने अचानक हल्ला चढवला आणि अगदी थोड्याच वेळात खानाच्या फौजेचा धुव्वा उडविला. खान स्वतःचा जीव वाचवत कांचीपुरमला पळून गेला आणि धोका मिटेपर्यंत तिथेच लपूनही बसला याच दरम्यान बहिर्जी घोरपडे यांनी राजाराम महाराज विरोधात बंडखोरी केली आणि याच पानायका संगे मोगलान विरोधात लढू लागले. राजाराम महाराजांनी संताजीला सुद्धा सेनापतीपदावरनं दूर केल, आता सेनापती पद धनाजी जाधवांकडे  देण्यात आलेला होता. तिथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी म्हणजे सेनापतीपद गेलं तरी संताजींनी मोगलान विरोधातला आपला घडा सुरूच ठेवलेला होता ते मोघलांना वतनासाठी किंवा कुठच्या पदासाठी जाऊन मिळाले नाहीत, आणि हाच खरा मराठ्यांचा स्वातंत्र्यलढा जो 1857 च्या क्रांती इतकाच महत्त्वाचा आहे. संताजींच्या कारकिर्दीत दोन मोठे विजय म्हणजे दुर्दैरीची लढाई आणि दुसरी बसवा पट्टणशी लढाई या दोन लढाया यांची तुलना साल्हेर किंवा कांचन बारीच्या लढायांची होऊ शकते.


संताजींना निस्तनाबूत करण्यासाठी औरंगजेबाने कासिम खान सोबत अनेक नामवंत सरदार त्यांच्या मागे पाठवले होते, संताजी मोगल सैन्याच्या हालचालीवर अतिशय बारीक लक्ष ठेवून होते. त्यांनी आपल्या गुप्तहेर कडून माहिती मिळवली होती, त्या बातम्यांच्या आधारावर आपले रणनीती ठरवत त्यांनी मोगली सैन्याची पूर्णपणे वाताहात करून टाकली. मोगली सैन्य रणांगण सोडून पळत सुटलं आणि जोडेरीच्या घडीचा आश्रय घेतला, संताजींनी या घडीला वेढा घातला आणि मोघलांची रसद मारली. दोंडेरीच्या मोगल किल्लेदाराने किल्ल्याचे दरवाजे बंद केले आणि बाहेर असलेल्या कासिमखानाच्या सैन्याला संताजीच्या तावडीत मोकळं सोडलं. जसजसे दिवस जाऊ लागले तस तशी किल्ल्यातली रसत सुद्धा संपत आली. खानाचा सैन्य तर उपाशी मरू लागल्या शेवटी मुघलांनी संताजी कडे जीवदानाची याचना केली संताजींनी मुघलांचे अनेक हत्ती घोडे तोफा नगद आणि सोबत दोन लाख होणाची खंडणी घेतली आणि त्यांना जीवदान दिल. पुढेही नामशकी सहन होऊन कासिम खानं विष घेत आत्महत्या केली. या लढाईचे दाखले ही मोगल इतिहासकार देतात पण आपल्या इतिहासकारांनी या एका मोठ्या लढायचे साधं वृत्त सुद्धा दिलेले नाही. 


राष्ट्रपरचक्राचा सामना करत असताना संभाजीराजेंसारखा मोहरा कालपटावरून अचानक नाहीसा होणं ही मराठा सत्तेच्या दृष्टीने फार हानिकारक बाब होती. शंभूराजांच्या बलिदानानंतर अवघ्या सहा महिन्यातच मराठ्यांचा राज्य मोडल, औरंगजेबाला वाटलं आता मराठी संपले तो दिल्लीकडे परतायच्या तयारीलाही लागला आणि अचानक संताजी धनाजी एक वादळ होऊन जाऊ लागले या वादळाने मुघल साम्राज्य रुपी जहाजाची छत्र चामरत चिरफाली, ढोल काठ्या मोडल्या आणि त्याला परत अपयशाच्या सागराच्या मध्यभागी नेऊन ठेवलं, आणि यशाचा किनारा कधीही दिसू दिला नाही. संताजी नावाच्या या वादळासमोर भले भले उध्वस्त झाले या वादळाला कशाचीही तमा नसायची.


संगमेश्वरी शंभूराजांनी संताजींचा हात हाती घेत सांगितले की "ज्या ध्येयासाठी मनुष्य जगतो किंवा मरतो ते ध्येय अति भव्य असायला हवं जन मनुष्याचे जीवन अनमोल ठरत" या वचनाला संताजी अखेरपर्यंत जागले सामान्य स्वार रावता पासनं कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या संताजींनी आपल्या पराक्रमाच्या जोरावर सेनापती पद मिळवल. मुघलांच्या शक्तीचा विभाजन, वेगवान मोहिमा ही त्यांच्या लढ्याची खासियत होती. निम्म्याहुन अधिक शत्रू सैन्य यांनी स्वतःभोवतीच गुंतवून ठेवल होत दिनडोरेची लढाई आणि बसवा पट्ट्यांची लढाई त्यांच्या असामान्य नेतृत्वाचा कळस होता, आणि म्हणूनच मुगल सैन्याने संताजी नावाची अशी काही दहशत खाल्ली होती की कोणीही मोगल सेनानी स्वतःहून संताजींचा सामना करायला धजावतच नसे. शिवाजीराजांच्या गनिमी काव्याचं तंत्र संताजींनी आणखीन विकसित केल आणि शत्रूच्या रणखाजी सेनानींना धूळ चारली.


राष्ट्राच्या आपत्काली उभ्या देहाची तलवार करून ज्या कडोविकडीन संताजी शत्रूवर कोसळले तो प्रवास थक्क करणारा होता. संताजींनी शत्रूच्या मनात असा काही खोप पैदा केला होता की मोगली सैन्याचे घोडे पाणी पिताना सुद्धा भीतीने दतकत होते. प्रत्येक मराठ्यांना अभिमानाने छाती बडवून सांगावं असं हे संताजी घोरपडे यांचा शौर्य आहे. संताजी म्हणजे स्वराज्याच्या शत्रूसाठी साक्षात मृत्यू होता. 


पुन्हा भेटूया अश्याच शूर वीरांची माहिती घेवून तो पर्यन्त हा लेख तुमच्या प्रिय जणांना पाठवा व तुमच्या सोशल मीडिया साईट वर शेअर करा.


जय शिवराय जय शंभुराजे


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Menu Site