Ad code

Latest

6/recent/ticker-posts

12 वि नंतर हे 5 कोर्स तुम्हाला खूप करीयर च्या संधि देतील Career Option After 12

 12 वि नंतर हे 5 कोर्स तुम्हाला खूप करीयर च्या संधि देतील Career Option After 12

खूप विद्यार्थ्यांना हा प्रश्न पडतोच की 12 वि चा निकाल लागला आता पुढे काय करावे, कोणता कोर्से घ्यावा ज्याने आपले पुढचे करियर खूप चांगले होईल. बहुतेक विद्यार्थी 12 वि नंतर BA, BCom, BSC, Engineering, Computer courses etc. असे विविध कोर्स घेवून आपल्या करियर ची सुरुवात करतात. किंवा आपल्या मोठ्या भावा बहिणीचं नातेवाईकाचा एकूण वेगवेगळे कोर्स करतात.जर तुम्हाला 12 वि नंतर कोणता कोर्स करावा किंवा भविष्यात असे कोणते शिक्षण आपल्यासाठी फायद्याचे ठरेल याचा विचार करून डोकं काम करत नाहीये, व तुम्हाला करिअर ओरिएंटेड कोर्सेस ची माहिती पाहिजे असेल तर आम्ही आजच्या या लेखात तुमच्यासाठी  Career Option After 12 व स्किल डेव्हलपमेंट आणि तातडीने जॉब मिळवून देणाऱ्या काही courses ची माहिती देणार आहोत तर हा लेख तुमच्यासाठी खूपच फायदेशीर ठरणार आहे.

 

यात सांगितलेली माहिती ही वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या मार्गदर्शक व्यक्तींचे अनुभव आणि नॉलेज यांच्याद्वारे कलेक्ट करण्यात आलेली आहे. त्यामुळे तुमच्या पालकांशी किंवा अन्य तज्ञ व्यक्तीशी चर्चा करूनच कोर्स करायचा की नाही याचा निर्णय घ्या.

विद्यार्थ्यांनो आतापासूनच करा या courses ची तयारी 

Cyber Security

या मधला पहिला कोर्स आहे सायबर सिक्युरिटी. मित्रांनो तुम्हाला माहिती आहेच सध्या टेक्नॉलॉजी अतिशय वेगाने वाढत आहे, आणि त्या क्षेत्रात सध्या हजारो नवीन संधी निर्माण होत आहेत. आयटी कंपण्यापासून मोठमोट्या carporate कंपन्या,  नवीन स्टार्टर्स, लॉ फॉर्म, पब्लिक किंवा प्रायव्हेट बँका, टेलिकॉम कंपन्या, सरकारी संस्था किंवा अगदी शैक्षणिक संस्था सगळ डिजिटल व्हायला लागले आहे. आणि त्यांना सायबर सिक्युरिटीची मोठ्या प्रमाणात गरज वाटू लागली आहे. त्यासाठी ते मार्केट मधल्या नामांकित कंपन्यांना Online Security कॉन्ट्रॅक्ट देऊन टाकतात, अगदी सरकारी संस्था सुद्धा. 

हल्ली ऑनलाईन फ्रॉडचे प्रमाण किती वाढले हे तुम्हाला वेगळे सांगायला नको. त्यामुळे बँक किंवा payment App च्या सुविधा पुरवणाऱ्या कंपन्या Startup सगळेच त्यांच्या ग्राहकांच्या सुरक्षेबद्दल जागरूक असतात. त्यामुळे सायबर सिक्युरिटी तज्ञांची रिक्वायरमेंट दिवसांदिवस वाढत आहे. त्या वाढत्या मागणी मुळे IT  क्षेत्रात काम करू वाटणाऱ्या मुलांसाठी आता बारावीनंतरच इटिकल हॅकिंग सायबर सिक्युरिटी सारखे अनेक कोर्सेस मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. एखाद्या चांगल्या इंस्टीट्यूट मध्ये जी इन्स्टिट्यूट तुम्हाला कोर्स नंतर जॉबची हमी देते तिथे जाऊन तुम्ही कोर्स करू शकता. सध्या पुणे, मुंबई, दिल्ली, वडोदरा, अहमदाबाद, बेंगलोर, हैदराबाद, चेन्नई आणि विशाखापट्टणम इथ तशा कोर्सेस या नामांकित इन्स्टिट्यूट आहेत. इंटरनेटवर तुम्हाला त्यांची नावे व माहिती सहजपणे मिळू शकते. या कोर्स चा कालावधी सहा महिन्यांपासून दोन वर्षांपर्यंत इतका असतो, आणि या कोर्स साठी लागणारी फी पंधरा हजार रुपयांपासून दीड लाख रुपये पर्यंत असू शकते. काही ठिकाणी हॅकिंग मधल्या मास्टर डिग्री साठी तीन वर्षांचा काळ आणि साडेचार लाखांची फी आकारली जाते. कोर्स पूर्ण केल्यानंतर तुमच्या मार्क्स व तुम्ही निवडलेल्या कोर्स नुसार महिना 25000 ते दीड लाख रुपयांपर्यंत तुम्हाला पेमेंट मिळू शकतो. 

Digital Marketing:- career option after 12

दुसरा कोर्स आहे डिजिटल मार्केटिंग. आता जय लोकांना याची माहिती नसते किंवा जाणून घ्यायची इच्छा असते त्यांच्यापर्यंत खूप चुकीच्या पद्धतीने काही लोकल संस्था डिजिटल मार्केटिंग प्रेसेंट करतात. आणि त्यामुळे सध्या डिजिटल मार्केटिंग खूप बदनाम झाले आहे, पण खरंतर जे लोक इंटरनेटवरून बिझनेस करतात पैसे कमवतात त्यांना एक डिजिटल मार्केटिंग चे महत्व काय हे पक्क माहीत आहे. इंटरनेटवरच्या बिझनेस ची अतिशय बेसिक गरज आहे. आणि त्यासाठी अनेक बिजनेस ओनर डिजिटल मार्केटिंग शिकलेल्या मुलांचा शोध घेत असतात. डिजिटल मार्केटिंग मध्ये सोशल मीडिया हँडलिंग, PR, कस्टमर रिलेशनशिप, कंटेंट मॅनेजमेंट अशा अनेक गोष्टी आहेत. 

जगातला 80 टक्के ग्राहक आता इंटरनेटवर आहे. त्यामुळे कंपन्या त्यांच्या प्रॉडक्ट डिजिटल मार्केटिंग करण्यासाठी इच्छुक असतात, त्यामुळे प्रोफेशनल डिजिटल मार्केटिंग एक्सपर्टची सध्या खूप गरज आहे. मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक यांसारखे ठिकाणी तुम्हाला जॉबची गॅरंटी देणारे डिजिटल मार्केटिंग इन्स्टिट्यूट पाहायला मिळतील. त्यासाठी तुम्ही इंटरनेटचा आधार घ्या किंवा चर्चा करा, कोर्स कालावधी तीन महिन्यांपासून एक वर्षांपर्यंत असतो, कोर्सची फी दहा हजार रुपयांपासून पन्नास हजार रुपयांपर्यंत इतके असते, आणि जॉब मध्ये तुम्हाला पंधरा हजार रुपयांपासून तीस हजार रुपयांपर्यंत पेमेंट मिळू शकत. एवढेच काय कोर्स करून तुम्ही स्वतःची डिजिटल मार्केटिंगची फर्म ही सुरू करू शकता.

Nursing after 12

कोरोना नंतर देशात मोठ्या संख्येने मेडिकल प्रोफेशनल ची गरज भासू लागली, मागच्या एका वर्षात हजारो नवीन मुलं मुली मेडिकल क्षेत्रात जॉबला लागले. 12 वी  नंतर तुम्ही nursing कोर्स शी संबंधित कोर्स करू शकता. त्यात सायन्स बॅकग्राऊंड असेल तर उत्तम, यात digree आणि diploma असे कोर्सेस उपलब्ध आहेत, आणि बऱ्याच ठिकाणी ऍडमिशन मिळवण्यासाठी तुम्हाला परीक्षा द्यावी लागू शकते. 

नर्सिंग कोर्स केल्यानंतर तुम्ही सरकारी हॉस्पिटल, प्रायव्हेट हॉस्पिटल, मेडिकल रक्त, लघवी तपासणी केंद्र, एक्स-रे सेंटर मध्ये जॉब मिळवू शकता. कोर्स ची फी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रमाणात आकारले जाते, साधारण या कोर्स ची फी पन्नास हजार रुपयांपासून एक लाखांपर्यंत असू शकते. नोकरीत तुम्हाला तुमच्या कोर्सच्या पात्रतेनुसार 15000 पासून 50000 पर्यंत पेमेंट मिळू शकत.

Graffic Designer for Best Career


हा कोर्स डिजिटल मार्केटिंग इतकाच महत्त्वाचा आहे. हल्ली वेगवेगळ्या न्यूज मीडिया पोर्टल, इंटरटेनमेंट हाऊसेस, फोटो स्टुडिओ, PR Studio, मोठमोठे यूट्यूब चैनल अशा ठिकाणी अशा ग्राफिक डिझायनर एक्सपोर्टची खूप गरज असते. पण मित्रांनो लक्षात घ्या ग्राफिक डिझाईन म्हणजे निव्वळ फोटो एडिटिंग नाही, त्यासाठी तुमच्याकडे खास क्रिएटिव्ह आयडिया असणे गरजेचे आहे. यात तुम्हाला अनेक फोटो एडिटिंग सॉफ्टवेअरचे डीप नॉलेज घेण्याची तयारी आणि त्या जोडीला उत्तम क्रिएटिव्हिटी चा ज्ञान असेल तर या क्षेत्रावर तुम्ही राज करू शकता. तुमच्या स्क्रीनुसार सुरुवातीला किमान 20000 पासून ते पन्नास हजारांपर्यंत तुम्ही पेमेंट मिळू शकता. जवळच्या इन्स्टिट्यूट म्हणाल तर मुंबई, पुणे, नाशिक, लातूर या ठिकाणी जाऊ शकता. तुम्ही तुमच्या आवडी नुसार तुमच्या जवळच्या इंस्टीट्यूट मध्ये प्रवेश घेऊन या कोर्स ची सुरुवात करू शकता.

Video Editing 


आज काल नवनवीन यूट्यूब channels, न्यूज मीडिया स्टुडिओ, सिनेमा होउसेस, फोटो स्टुडिओ आशा कितीतरी ठिकाणी profetional video Editor ची गरज आहे. लग्नातले विडियो edit करण्यासाठी तर फोटोस्टुडिओ च्या मालकाला विडियो एडिटर लागतोच, तुम्ही अश्या ठिकाणी काम करून पर ऑर्डर प्रमाणे 5 हजार ते 20 हजार पर्यन्त फी आकारु शकता.  पण त्यासाठी तुमच्याकडे ॲनिमेशन, ग्राफिक्स, म्युझिक, इमेजेस, याचं उत्तम ज्ञान असणं आवश्यक असतं जे की तुम्हाला कोर्स करून मिळू शकत. पण महत्त्वाचं म्हणजे त्यासाठी तुमचं मन क्रिएटिव्ह असलं पाहिजे. 

या कोर्स च्या माध्यमातून तुम्ही मोठमोठ्या सिनेमा होउसेस मध्ये पण विडियो एडिटिंग चे काम मिळवू शकता. त्यासाठी तुम्ही मुंबई किंवा पुण्याच्या उत्तम इन्स्टिट्यूट मधून व्हिडिओ एडिटिंगचं ज्ञान घेणे गरजेचे आहे. पण या कोर्स ची फी सुद्धा खूप तगडी असल्यामुळे सुरुवातीच्या काळात तुम्ही जॉब मिळून देणारे इन्स्टिट्यूट ला प्रेफर करू शकता. महत्त्वाचं म्हणजे ग्राफिक्स डिझाईन आणि व्हिडिओ एडिटिंग तुम्ही घरी बसूनही करू शकता. यामध्ये तुम्हाला 25 हजारापासून एक लाखापर्यंत पेमेंट मिळू शकतो, त्यासाठी योग्य कोर्स आणि इन्स्टिट्यूट साठी इंटरनेटची मदत घ्या.

तर ही होती काही थोडक्यात माहिती जे तुम्हाला 12 vi nanatar che career option बद्दल सांगितलेली आहे. बाकी या लेखात दिलेल्या कोर्स बद्दल तुमची जी काही मते असतील ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जरा माहिती आवडली  असेल तर तुमच्या सोशल मीडिया साइट व आपल्या प्रियजनांसोबत नक्की शेअर करा. तसेच अशाच प्रकारची नवनवीन माहिती आम्ही नेहमीच येथे टाकत असतो त्यामुळे नेहमीच विजिट करा www.naadmarathi.in ला.

 धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Menu Site