Ad code

Latest

6/recent/ticker-posts

सरसेनापती हंबीरराव मोहिते Hambirrao Mohite information in marathi

अष्टप्रधान मंडळाचे पहिले सरसेनापती हंबीरराव मोहिते


मराठा साम्राज्याचे संस्थापक आणि एक आदर्श शासनकर्ता  म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजीराजे भोसले, एक सर्व समावेशक आणि सहिष्णू राजा म्हणून महाराष्ट्रात आणि जगभरात सगळीकडेच वंदिले जातात. शत्रू विरोधात लढ्या करतात महाराष्ट्रातल्या डोंगर दऱ्यामद्धे  अनुकूल असलेली गनिमी काव्याची पद्धत वापरून, त्यांनी तत्कालीन विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही आणि बलाढ्य मुघल साम्राज्यशाही यांच्याशी लढा दिला आणि मराठा साम्राज्याचे बीजारोपण केलं.


आदिलशाही, निजामशाही आणि मुघल साम्राज्य बलाढ्य जरी असली, तरी महाराष्ट्रामध्ये त्यांची सगळी वित्त ही इथल्या स्थानिक सरदार आणि किल्लेदारांवर होती. हे सरदार आणि किल्लेदार जनतेवर अन्याय आणि अत्याचार करत असत. शिवाजी महाराजांनी या अन्याय अत्याचारांतून जनतेची सुटका केली आणि उत्तम शासनाचं एक उदाहरण भावी राज्यकर्त्यांसमोर ठेवला. या स्वराज्य निर्मितीच्या काळामध्ये त्यांना अनेक पराक्रमी मावळ्यांची आणि शूर सरदारांचीही मदत लाभली, अशाच शूर पराक्रमी सरदारांपैकी एक हिंदवी स्वराज्याचे चौथे सरसेनानी हंबीरराव मोहिते. आजच्या या पोस्ट मध्ये आपण शूरवीर सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्याबद्दल माहिती घेवूयात. 

हंबीररावांची सेनापति म्हणून नियुक्ती :- 


बहलोल खान शिरजोर झालेला होता त्या बहलोल खानला अंगावरती घेवून, परत विजापूरच्या हद्दीन ढकलण्याचं काम हंबीररावांनी मोठ्या शर्थीने केले.या पराक्रमावरती खूश होऊन  १६७४ मध्ये महाराजांनी चिपळूणला हंबीररावांची सेनापती म्हणून नियुक्ती केली, आणि त्यांना हंबीरराव असा किताब देण्यात आला  त्याच्यानंतर मराठ्यांच्या इतिहासात हंबीरराव मोहिते म्हणून ओळखले गेले, हंबीर रावांनी त्यांच्या छोट्याशा कारकीर्दीत असामान्य असा पराक्रम गाजवला. 

हंबीरराव यांचा इतिहास आणि भोसले घराण्याशी संबंध :-

हंबीर रावांचे पंजोबा रतोजी मोहिते यांनी निजामशाहीत मोठा पराक्रम गाजवला होता आणि म्हणूनच निजामशाहीन त्यांना बाजी हा किताबही दिला होता. मोहिते घराण्यातील पराक्रमी पुरुष तुकोजी मोहिते हे तळबीड या गावची पाटीलकी सांभाळत होते, या घराण्याने घाडगे आणि घोरपडे घराण्याची सोयरीक जुळवून आणली, याच दरम्यान शहाजीराजे यांच्याशी या घराण्यातले संभाजी आणि धारोजी मोहिते यांचा संबंध येऊन धारोजी शहाजीराजांच्या लष्करात सामीलही झाले. संभाजी मोहिते आणि धारोजी मोहिते त्या काळातले अतिशय पराक्रमी असे सेनानी होते, त्यांच्या शौर्याची गाथा थेट आदिलशाहीच्या फर्मानामध्ये देखील बघायला मिळते.

स्वराज्याच्या स्थापनेच्या वेळेला संभाजी मोहिते हे शहाजीराजांच्या लष्करात सह हवालदार होते, ते पुढे कर्नाटकला गेले मात्र त्यांनी आपली मुलगी सोयराबाई हिचा विवाह छत्रपती शिवाजी महाराजांशी लावून दिला आणि भोसले घराण्याची पुन्हा एकदा नातं निर्माण केल. पुढे संभाजी मोहिते यांचा मुलगा हंसाजी मोहिते उर्फ हंबीरराव मोहिते यांनी आपली मुलगी ताराबाई हिचा विवाह छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुत्र राजाराम महाराजांशी लावून दिला. त्यामुळे मोहिते घराणं हे छत्रपती शिवाजी महाराजांचे अगदी जवळचं घराणं झालं. 

हिंदवी स्वराज्याचे पहिले सरसेनापती हंबीरराव मोहीते :- 

हंबीरराव मोहिते यांना आपल्या कर्तबगार घराण्याचा वारसा लाभल्याने आपल्या पूर्वजांप्रमाणे ते अतिशय शूर होते. कोणतही संकट का असेना त्याला निधड्या छातीने सामोरे  जाणं ते आपला धर्म मानत असत.  प्रथम हंबीरराव मोहिते हे शिवाजी महाराजांच्या सेनेत सेनानी म्हणून कार्यरत होते. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकापूर्वी बहलोल खाना विरुद्धच्या लढाईत  प्रतापराव गुजर धारातीर्थी पडले, त्याच लढाईत हंबीरराव मोहिते यांनी स्वतःहून पुढाकार घेत जबरदस्त शौर्य गाजवत शत्रु सैन्याचा पराभव केला. त्यांचा हा पराक्रम बघत प्रतापराव गुजर यांच्या नंतर रिकाम्या झालेल्या सेनापती पदाच्या जागी प्रतापरावांच्या  सारखाच त्यांच्या शौर्याचा वारसा पुढे नेणारा निधड्या छातीचा वीर असावा म्हणून शिवाजी महाराजांनी हंबीरराव मोहिते यांची निवड केली. सोबत त्यांना हंबीरराव हा किताबही बहाल केला आणि हंबीरराव मोहिते झाले अष्टप्रधान मंडळातल्या हिंदवी स्वराज्याचे पहिले सरसेनापती.

हंबीरराव यांची दिग्विजय मोहीम:- 

शिवरायांच्या राज्याभिषेकानंतर सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या नेतृत्वाखाली मराठा सैन्याने मूगली आणि आदिलशाही प्रदेशात अक्षरशः धुमाकूळ घातला. खानदेश, अहमदाबाद, औरंगाबाद, बुऱ्हानपूर, वराड, माहूर, जालना अशी नर्मदेपर्यंत हंबीररावांची घोडदौड सुरू होती. या सगळ्या मोहिमांमधून स्वराज्याच्या खंजिन्यामद्धे अतिशय मोलाची भर पडत गेली, यानंतर हंबीरराव महाराजांसोबत दक्षिण दिग्विजयाच्या मोहिमेवर निघाले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अतिशय महत्त्वाकांक्षी अशा या दक्षिण दिग्विजय मोहिमेत हंबीरराव हे आघाडीवर होते. या मोहिमेत त्यांनी जिंजी किल्ल्याच्या उत्तरेला आदिलशहाकडे असलेल्या अतिशय बळकट आणि बुलंद अशा वेल्लोरच्या किल्ल्याला वेढा घातला. अब्दुल्ला खान या किल्लेदाराने या किल्ल्याचा केलेला बंदोबस्त हा अतिशय कडक होता, या किल्ल्याचा तटही अतिशय मजबूर होता. गोटाच्या बाहेरील असलेल्या खंडकांमध्ये असंख्य सुसरी सोडलेल्या होत्या, पण इतका मजबूत असलेल्या या गडावरही हंबीररावांच्या पक्क्या वेढ्यामुळे उपासमार होऊ लागली  आणि वेल्लोर चा हा किल्ला 22 जुलै 1678 ला मराठ्यांच्या ताब्यात आला. हंबीररावाने दक्षिणेकडची दिग्विजय मोहीम यशस्वी करून दाखवली. 

त्याच वेळी महाराज जिंजीकडे गेले आणि जिंजीचा किल्ला ताब्यात घेतला. या दोन्ही किल्ल्याने पुढे मराठी शाहीच्या अत्यंत कठीण प्रसंगी साथ दिली.

हंबीररावयांची  संभाजीराजे यांना साथ :-

छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूमुळे स्वराज्यामध्ये एक प्रकारची पोकळी तयार झाली होती. नेमकं याचवेळी अष्टप्रधानांपैकी अण्णाजी दत्तो, प्रल्हादजी तसंच हिरोजी फर्जंद यांनी संभाजी राजांचा गादीवरचा हक्क नाकारत शंभूराजांचे सावत्र भाऊ राजाराम राजे उर्फ रामराजे यांचे 21 मे 1680 ला मंचकारोहन केल यावेळी शंभूराजे हे पन्हाळगडावर होते. या मंडळींना वाटलं की सरसेनापती हंबीरराव देखील या कटामध्ये सामील होते, कारण रामराजे हे हंबीर रावांचे सख्खे भाचे होते, आणि म्हणूनच या मंडळींनी हंबीर रावांना शंभूराजे यांना कैद करायला सांगितल, या महत्त्वाच्या प्रसंगी हंबीर रावांची भूमिका अतिशय महत्त्वाची आणि मोलाची ठरली. हंबीर रावांनी संभाजी महाराजांना साथ देत हा डाव हाणून पडला, या कठीण प्रसंगी हंबीररावांनी जी स्वामीनिष्ठ दाखवली त्याला मराठ्यांच्या इतिहासात तोडत नाही. 

हंबीरराव हे पुरते जाणून होते की अशावेळी शत्रूच्या प्रचंड सेनेशी संभाजीराजांसारखाच छावा लढू शकतो. आणि म्हणूनच त्यांनी फक्त आणि फक्त स्वराज्याच्या हीताचा विचार करत शंभूराजांना साथ देण्याचा निश्चय केला, आणि या कटामध्ये सामील असणाऱ्या मंडळींना हंबीर रावांनी कैद करून पन्हाळगडावर शंभूराजांच्या समोर सादर केल. या कैद्यांना किल्लेदार मळोजी बाबांच्या ताब्यात देऊन शंभूराजे हंबीररावांसोबत रायगडावर आले. शंभूराजांचा खंबीर असा आधार म्हणजेच हंबीरराव मोहिते त्यांच्या पाठीशी नसते तर आजचा इतिहास काही वेगळाच असता. 

हंबीरराव यांचा बुऱ्हानपुरावर हल्ला

16 जानेवारी 1681 ला रायगडावर शंभूराजांचा राज्याभिषेक झाला आणि मराठ्यांचं स्वातंत्र्यसमर सुरू झाल. कारण 1681 मध्ये नोव्हेंबर महिन्यात दख्खन काबिज करण्यासाठी निघालेला आलमगीर औरंगजेब त्याच्या प्रचंड अशा मोगली सैन्यासह बुरानपुरात पोचला देखील होता. हे तेच बुऱ्हानपूर जे हंबीर रावांनी अक्षरशः उद्ध्वस्त केलेल होत. आता मराठा मुघल हा संघर्ष सुरू झाला तो किल्ले रामशेजच्या लढाई ने, हंबीररावांच्या अतिशय महत्त्वाच्या मोहिमेपैकी बुऱ्हानपूरची स्वारी महत्त्वाची मानली जाते.

30 जानेवारी 1681 ला आपल्या 2000 सैन्यासह हंबीररावांनी बुऱ्हानपुरावर हल्ला केला, या हल्ल्याला घाबरून मुगली अधिकारी काकरखान हा कोटात दडून बसला. कोटाच्या बाहेर हसनपुरा,  शहागंजपुरा, शहाजहानपुरा, खुर्रमपुरा, नवापुरा आणि बहादुरपुरा असे एकूण 18 पुरा होती. जड जवाहे, सोने-चांदी, रत्न असा लाखो रुपयांचा ऐवज  यामध्ये मराठ्यांना सापडला. हंबीरराव आधी बुरानपुर साफ लुटलं आणि पेटवून दिला. 

तब्बल तीन दिवस ही लूट सुरू होते कोटाच्या आत दडलेल्या काकर खानाला सोडून, सगळे सोनं रत्न आणि जड जवाहर घेत  हंबीरराव स्वराज्याकडे निघाले, हा विजय हंबीररावांच्या पराक्रमाचे प्रतीक ठरला. 

हंबीरराव यांचा शेवटच सर्जाखानाशी युद्ध


औरंगजेब महाराष्ट्रात येऊन तब्बल सात वर्ष पूर्ण झालेली होती, पण महाराष्ट्र काबीज करायला त्याच्या सैन्याला बिलकुल ही यश मिळाल नव्हत. उलट मराठा सैन्य त्याच्या सैन्यावर भारी पडत होत अशातच 1687 साली औरंगजेबाने आपल्या अतिशय विश्वासू सरदार असलेल्या सर्जा खान याला प्रचंड अशी सेना व दारुगोळा देवून वाई भाग आणि  त्या नजीकचे सगळे किल्ले काबीज करायला पाठवलं. 

या वेळेला हंबीररावांचं सैन्य कोयना नदी ओलांडत तळभीडला वाड्यावर पोहोचल होत. हंबीरराव हे बऱ्याच दिवसांनी घरी परतले होते त्यामुळे त्यांच्या काही अव्वल साथीदारांसह वाड्यावर पंचपक्वान्न भोजनाची पान वाढली होती, इतक्यातच जेवणात खडा सापडावा अशी हेरानकडून बातमी त्यांच्या कानावर पडली, की औरंगजेबाने सर्जा खान त्याला स्वराज्य काबीज करायला पाठवलाय आता तो प्रतापगडाच्या दिशेने निघालेला आहे आणि काही तासातच तो प्रतापगडा पाशी पोहोचतोय. ही बातमी ऐकताच हंबीररावांची तळपायाची आग  मस्तकात गेली, हंबीररावांनी पुढ्यातल्या ताटाला हात जोडले आणि ताट पुढे केलं, त्याचप्रमाणे मराठा सैन्यानं ताटाच्या पाया पडून हर हर महादेव या  जयघोषाने लढाईच्या तयारीला सुरुवातही केली, शस्त्र साठ्यासह हंबीररावांसोबत सार सैन्य घोड्याला टापा मारत वाड्या बाहेर पडल.

रात्रीच्या अंधारात मराठा सैन्याचे घोडे सरजा खानाचा काळ बणून  वेगात पळत होते, हंबीररावांना अंधारात दुरून काही आपल्या  हेरांच्या मशाली सैन्याच्या दिशेने येताना दिसल्या, हंबीररावांना हेरांकडून खबर मिळाली की सर्जा खानाची 25 हजारांची फौज सातारा सोडून आता वाईच्या दिशेने सरकतेय आणि उद्या ही फौज वाई सोडून पसरणी घाटाची खिंड काबीज करेल, आणि खिंड जर गेली तर सर्जा खानाला स्वराज्य उद्ध्वस्त करण्यासाठी दहा पट बळ मिळणार होत. ही बातमी  समजताच सारे मराठा द्वेषाने उसळले, हंबीर रावांनी आपल्या घोड्याचा लगाम खेचला तसं सारा सैन्य थांबलं, हंबीरराव सैन्याला म्हणाले सर्जा खान पसरणी घाटाच्या खिंडीकडे पोहोचण्या अगोदर आपण कोयनेच्या काठाकाठाने वासोटा किल्ल्याच्या पायथ्याने जंगलाची वाट धरू, वैरी समजा वाऱ्याच्या वेगाने जरी गेला तरी त्याला तेथे गाठू शकतो.

हंबीरराव यांच्या नेतृत्वाखाली मराठा सैन्याने कोयनेच्या नदीकाठची वाट धरली जंगलातून कमरे इतक्या गवतातून घोडे सुसाट धावू लागले, हंबीररावाच्या पाठीपुढे दहा हजार घोडे जंगल तुडवत पळत होते.  हंबीरराव मावळ्यांना म्हणाले "चला नेट्याने, जरा पासरणीच नाक वैराच्या हातात गेलं तर खूप मोठा घोटाळा होऊ शकतो" एवढं प्रचंड अंतर मराठा सैन्याने अवघ्या आठ ते दहा तासात गाठल. तिथं त्यांनी दुपारची थोडी विश्रांती घेतली होती, त्यावेळेला सर्जा खानचा निम्म लष्कर पासरणीचा घाट ओलांडत वरही आलेला होता सर्जा खानच्या सैन्याने रात्रीचा मुक्काम तिथेच ठोकला, आणि पहाटेच्या पाचगणीच्या थंडीत हर हर महादेव चा एकच गजर झाला, हंबीररावांची घोडी सर्जा खानावर धावली लुटालूट आणि कापाकापी सुरू झाली. 

सर्जाखानाचा सैन्य साखर झोपेत असतानाच मराठा सैन्य त्यांच्यावर तुटून पडल, मोगली सैन्याची हंबेरी उडाली पाचगणीच्या घाट रस्त्यातून मुघल सैन्याला पळताही येत नव्हतं इतकं मराठा सैन्यानं मुघलांना हैराण करून सोडलं. मराठा सैन्याने आता किमान दोन हजार मोघलांचा तरी खातमा केला असावा, मराठा सैन्याच्या भयंकर अशा रेट्याने जीव मुठीत धरून मोघली सैन्य वाईच्या दिशेने पळत होत. सूर्य उगवण्याआधीच हंबीर रावांनी खिंड आणि घाट दोन्ही ताब्यात घेतलं, मराठ्यांच्या दहशतीखाली आलेले हे मोगली सैन्य परत मागे आलेल्या दिशेने नदी ओलांडून जंगलाच्या दिशेने पळत सुटल. सर्जा खानानं माघार घेतली होती पण आज मात्र हंबीररावांमध्ये वीरश्री संचारली होती. आपल्या घोड्याला लगाम लावत ते उपस्थित मावळ्यांना उद्गारले "आज सर्जा खानाचा एकही सैनिक स्वराज्यात न परत गेला नाही पाहिजे आपला एक मावळा दहा मुगली सैन्याला भारी आहे सर्जा खानाला आज मुळासकट संपून टाका चढवा हमला मुघलांवर". हंबीरराव मोहिते यांचे प्रेरक शब्द मराठा सैन्याच्या कानात गुंजू लागले, तलवारीवर तलवारीची पातक खणाणू लागले संख्येने कमी असलेलं मराठा सैन्य दुश्मनाच्या सैन्यावर अक्षरशः तुटून पडल.  हाणाहाणी आणि कापाकापीला जोर चढला रक्ताच्या चिळकांड्या उडू लागल्या, पश्चिमेकडे हलेपर्यंत सर्जा खानाने खूप नेट धरला होता, पण खळीला आलेल्या मराठा सैन्याने मोगली सैन्याचे आणखी तीन ते चार हजार सैन्य संपवलं. 

हंबीरराव घोड्यावर बसून दोन्ही हातांनी तलवार फिरवत मोघली सैन्य कापत सुटले होते, मराठ्यांचं हे रौद्ररूप पाहत सर्जा खानाचा सैन्य आता रण सोडून पळू लागले होते. सर्जा खान पळणारे हे मोगली सैन्य पाहून गडबडला त्याने त्याच्या सैन्याला त्याला संरक्षण द्यायला सांगितलं आणि खुद्द पळणारा सैन्याच्या मध्यभागी जाऊन तो सुद्धा पळू लागला. मराठ्यांनी खानाचा पूर्ण गोठ लुटला पंधराशे हत्ती आणि अठराशे घोडे मराठ्यांच्या हाती लागले. खानाच्या लष्कराने बांधा बांधा न पेरलेले जम्बुर्गे आणि छोट्या तोफा सोडून पळ काढलेला होता, मराठ्यांच्या विजयाचे ढोल आणि नगारे वाजू लागले मंगलवाद्य वाजत होते इतक्यात बाजूच्या झाडीमध्ये काहीतरी खसखसल्यासारखं झालं, तिथ  एक मोगली सैनिक जखमी अवस्थेत पडला होता त्याच्या पायाला खूप मोठी दुखापत झाली होती.

 त्या सैनिकांना त्याच्या समोर असलेल्या जम्बुर्गेला बत्ती शिर्कावली तोफेच्या काळ्या धुरांच्या दाटीने हंबीररावांना काही कळायच्या आतच प्रचंड आवाज करत गोळा तोफेतून हंबीररावांच्या दिशेने उडाला, साऱ्यांचा काळीज चरकल, हंबीररावांना वाचवण्यासाठी मराठा सैनिकांनी त्यांच्याकडे धावही घेतली होती पण कठोर काळाचा घाव  कोसळला होता, समोर हंबीररावांचा अर्धा भाजलेला बलवान देह घोड्यावरून खाली कोसळला, मराठा सैनिकांनी जांभूरक्यावर उडी मारत मोगली सैनिकाचे शिर धडा पासून वेगळं केलं, पण तिथे रायगडाच्या बलशाली पायरीचा पाचा केंद्राच्या जंगलात धारातीर्थी पडला आणि एका जिद्दी परवाचा अंत झाला. संभाजीराजांच्या पडत्या काळामध्ये खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे राहणारे हंबीरराव मोहिते संभाजीरावांना पोरके करून गेले. शिवाजी महाराजांच्या काळापासून अगदी एकनिष्ठ येणार रणांगणात राहत शौर्य गाजवणारे हंबीरराव अखेरच्या क्षणापर्यंत हिंदवी स्वराज्याची सेवा करीत राहिले. हंबीर रावांच्या मृत्यून निस्तृह प्रामाणिक कर्तव्यदक्ष निष्ठावान आणि शूर असा सर सेनापती स्वराज्याने गमावला, असा नायक खंबीर हंबीर गेला. 

आणि म्हणून मला असं वाटतं असा ना कधी पुरुषार्थ शिवशाहीत झाला रणांगण यालाच आपलं घर मानणाऱ्या आणि अखेरच्या श्वासापर्यंत आपल्या पराक्रमाची समशेर चौफेर फिरवणाऱ्या हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांना मानाचा मुजरा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Menu Site