Ad code

Latest

6/recent/ticker-posts

आयुष्यमान कार्ड आता घरी काढता येईल‌ 1000 + आजारांवर 5 लाखापर्यंत मोफत उपचार AYUSHYMAN BHARAT YOJANA 2023

आयुष्यमान कार्ड आता घरी काढता येईल‌! १000 + आजारांवर 5 लाखापर्यंत मोफत उपचार

भारत सरकार ने आरोग्य मंत्रालयाकडून देशातिल नागरिकांसाठी आयुष्मान कार्ड जारी केले आहे. आयुष्यमान कार्ड हे  देशाच्या नागरिकांसाठी देण्यात आलेले एक हेल्थ कार्ड आहे, या कार्डच्या माध्यमातून यासाठी पात्र लाभार्थी सरकारी किंवा प्राइवेट हॉस्पिटलमध्ये प्रति वर्ष ₹५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार करू शकणार आहेत.


ज्यांची परिस्थिति आर्थिक दृष्ट्या कमकुवत आहे व ज्यांचे वय 16 ते 60 वर्षांच्या दरम्यान असेल तर हे कार्ड या समस्त लोकांसाठी एक वरदान म्हणून सिद्ध होईल.

तर या पोस्ट मध्ये आम्ही तुम्हाला आयुष्मान कार्ड काय आहे? आयुष्मान कार्ड कसे बनवावे? आयुष्मान कार्डचे फायदे काय आहेत? आयुष्मान कार्ड बनवन्यासाठी पात्रता काय आहे हे जाणून घेण्यासाठी हा लेख पूर्ण वाचा.

आयुष्मान कार्ड काय आहे? Aayushyaman Card 2023

भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2018 साली आयुष्मान भारत योजना (Ayushman Bharat Yojana-ABY) याचा शुभारंभ केला. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय (Ministry of Health and Family Welfare) द्वारे ही योजना राबवण्यात येत आहे. या योजने अंतर्गत बीपीएल कार्ड धारकाणा आयुष्मान कार्ड देन्यात येत आहे. आयुष्मान कार्ड धारकांना देशाच्या कोणत्याही हॉस्पिटलमध्ये 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार देण्यात येणार आहेत सोबतच फूड सर्व्हिस, प्री हास्पिटलायझेशन, पोस्ट हास्पिटलाइजेशन म्हणजे हॉस्पिटल मध्ये भरती होण्याअगोदर जो खर्च लागतो व हॉस्पिटल मधून डिस्चार्ज झाल्यावरच खर्च देखील सरकार कडून मिळणार आहे,  या सारखे सुविधा दिल्या जानार आहेत.

देशातील नागरिकांचे आरोग्य सुधारण्यासाठी ही योजना प्रभावी ठरेल. देशातील 40 कोटींहून अधिक नागरिकांना सरकार या योजनेत समाविष्ट करून घेणार आहे व या योजनेचा त्यांना फायदा देणार आहे. आयुष्मान भारत योजनेचे लाभार्थी ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही मार्गांनी या कार्ड साठी अर्ज करू शकतात. ही योजना कार्यान्वित झाल्याने देशातील एकही नागरिक आर्थिक अडचणींमुळे उपचारापासून वंचित राहणार नाही. याशिवाय या योजनेच्या अंमलबजावणीमुळे देशातील नागरिकांचे जीवनमानही उंचावेल.

आयुष्मान कार्डचे फायदे काय आहेत. 

आयुष्मान भारत योजना किंवा आयुष्यमान कार्ड तुम्ही काढला असेल किंवा नसेल पण आयुष्मान कार्डच्या फायद्यांविषयी जाणून घेणे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. तर आता आम्ही तुम्हाला आयुष्मान कार्डच्या फायद्यांबद्दल सांगणार आहोत. जे खालील प्रमाणे आहे.

आयुष्मान कार्ड अंतर्गत देशातील प्रत्येक पात्र नागरिकाला 5 लाख रुपयांपर्यंतचा आरोग्य विमा दिला जाईल. यात जवळजवळ सर्व प्रकारचे रोग आणि शस्त्रक्रिया समाविष्ट आहेत.

या योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्ही ही योजना देशांतर्गत कोणत्याही राज्यात, कोणीही हॉस्पिटल मध्ये तुमचा उपचार करू शकतो.

आयुष्मान कार्डद्वारे, लाभार्थीला प्रवेशापूर्वी 7 दिवसांपर्यंत मोफत तपासणी, प्रवेशादरम्यान उपचार आणि जेवण आणि डिस्चार्ज झाल्यानंतर 10 दिवसांपर्यंत औषधे दिली जातात.

आयुष्मान भारत योजना यामध्ये जवळजवळ १,३५० आजारांवर उपचार  समाविष्ट आहेत. ( हे उपचार भविष्यात वधू किंवा कमी होऊ शकतात )

आयुष्मान कार्ड लाभार्थींना रुग्णालयात आरोग्य सेवांसाठी कॅशलेस प्रवेश प्रदान करते.

आयुष्मान कार्ड लाभार्थींचा खर्च जसे की, हॉस्पिटलायझेशनच्या 3 दिवस आधी आणि हॉस्पिटलमध्ये भरती झाल्यानंतर 15 दिवसांचे निदान आणि औषधे समाविष्ट करते.

आयुष्मान कार्डमध्ये औषधे पुरवठा, निदान सेवा, डॉक्टरांचे शुल्क, खोलीचे शुल्क, सर्जनचे शुल्क, OT आणि ICU शुल्क इत्यादी खर्च समाविष्ट आहेत.

आयुष्मान कार्ड वैद्यकीय उपचारावरील आपत्तीजनक खर्च कमी करण्यास मदत करते.

आयुष्मान भारत योजना चा लाभ कसा घ्यावा?

जर तुम्हाला आयुष्मान भारत योजना चा फायदा घ्यायचा असेल भविष्यात येणाऱ्या कोणत्याही स्वास्थ संबंधित अडचणींवर मोफत उपचार करून घ्यायचा असेल तर तुमच्याकडे आयुष्यमान कार्ड असायला हवे. आयुष्यमान कार्ड काढण्यासाठी तुम्ही ऑनलाइन व ऑफलाइन अर्ज करू शकता. आयुष्यमान कार्ड चा लाभ देशतील जवळजवळ 10 करोड कुटुंब ला मिळत आहे. खूप जणांनी आयुष्यमान कार्ड काढले आहे पण त्यांना त्याचा फायदा कसं करून घ्यायचा हेच माहीत नाही. तर येथे याची सर्व माहिती दिलेली आहे.

आयुष्मान भारत योजनेचा लाभ घेण्यासाठी, सर्वप्रथम तुमचे नाव आयुष्मान भारत योजना यादीमध्ये असणे आवश्यक आहे. तुम्ही अद्याप आयुष्मान भारत योजनेच्या यादीत तुमचे नाव तपासले नसेल. तर सर्वप्रथम तुम्हाला आयुष्मान भारत योजनेच्या यादीत तुमचे नाव तपासावे लागेल. 

जर तुमचे नाव आयुष्यमान यादीत असेल तर तुम्ही कोणत्याही जवळच्या हॉस्पिटल मध्ये जाऊन ज्या हॉस्पिटल मध्ये ही सुविधा आहे अश्या हॉस्पिटल मध्ये जाऊन यात मिळणाऱ्या सेवांचा फायदा घेऊ शकता.

आयुष्मान भारत कार्ड पात्रतेसाठी आवश्यक कागदपत्र 

आयुष्मान भारत योजनांचा लाभ घेण्यासाठी आणि अर्ज करण्यासाठी काही दस्तऐवजांची आवश्यकता असेल आयुष्मान भारत कार्ड नोंदणी करण्यासाठी तुमच्याकडे खालील दस्तऐवज असणे आवश्यक आहे.

आधार कार्ड

राशन कार्ड

मोबाईल नंबर

पत्त्याचा पुरावा

पासपोर्ट आकाराचा फोटो

मतदार कार्ड, पॅन कार्ड किंवा इतर

आयुष्मान भारत अंतर्गत कवर केल्या जाणाऱ्या उपचारांची सूची-

मित्रांनो, या योजने अंतर्गत सुमारे 1300 आजारांवर उपचार करण्यात येतात. त्यात 

किडनीरोग

कॅन्सर

हृदयरोग

मधुमेह आदी आजारांवर उपचार केले जाणार आहेत.

आयुष्मान भारत योजनेसाठी नोंदणी कशी करावी?

तुम्ही भारताचे रहिवासी असाल आणि गरीब वर्गातील असाल किंवा या योजनेचा लाभ घेण्यास पात्र असाल, तर तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन अर्ज करू शकता. प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजनेसाठी ऑफलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे.

ज्या व्यक्तीला आयुष्मान भारत योजनेचा लाभ घ्यायचा आहे, त्यांनी प्रथम स्वतःची नोंदणी करावी लागेल.

यासाठी, सर्व प्रथम अर्जदाराला त्याच्या जवळच्या लोकसेवा केंद्र (CSC) किंवा अटल सेवा केंद्रात जाऊन त्याच्या सर्व महत्त्वाच्या कागदपत्रांच्या (आधार कार्ड, कुटुंबातील सर्व सदस्यांचे रेशनकार्ड, पुरावे) फोटो प्रती घ्याव्या लागतील.

यानंतर, लोकसेवा केंद्र (CSC) एजंट मूळ कागदपत्रांसह त्या फोटोकॉपींची पडताळणी करेल.

यानंतर तुमची नोंदणी होईल आणि तुम्हाला तुमचा नोंदणी क्रमांक मिळेल.

आयुष्मान भारत योजनेच्या नोंदणीनंतर सुमारे 15 ते 20 दिवसांनंतर, तुम्हाला जनसेवा केंद्रातून आयुष्मान भारत योजनेचे कार्ड मिळेल.

आयुष्मान भारत योजनेचे कार्ड मिळाल्यानंतर तुमची नोंदणी यशस्वी होईल. यानंतर तुम्ही प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ घेऊ शकता.

प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया येथे आहे:

प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी https://beneficiary.nha.gov.in या वेबसाइटला भेट देऊन  तुम्हला यात लॉगिन पेज वर login as Beneficiary हा पर्यायावर क्लिक करून आपल्या आधार कार्ड शी जो मोबाइल नंबर लिंक आहे तो टाकावा लागेल.

यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल. ते येथे एंटर करा आणि येथेच दिलेला captcha code टाकून 'लॉगिन' वर क्लिक करा. 


यशस्वी रित्या येथे लॉगिन झाल्यावर आपले आयुष्यमान कार्ड बनवण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला येथे फॉर्म वरती आपले राज्य निवडायचे आहे, त्यानंतर scheme तुमच्या जिल्ह्याचे नाव लास्ट ला आधार कार्ड चा ऑप्शन सिलेक्ट करुण सर्च करायचे आहे. 


येथे तुम्हाला तुमचे व तुमच्या कुटुंबियांची नावे दिसतील त्याच्याच समोर दिसणाऱ्या केवायसी च्या option वरती क्लिक करून आपली kyc साठी अर्ज करायचं आहे. 


पुढे तुम्हाला kyc पूर्ण करण्यासाठी वेगवेगळे ऑप्शन दिसतील येथे आधार otp या ऑप्शन वर क्लिक करून आपली kyc पूर्ण करू शकतो. 


त्यानंतर आपल्या आधार कार्ड शी जो मोबईल नंबर लिंक आहे त्यावर  otp येईल तो otp सबमिट केल्यावर आपले कार्ड व सर्व माहिती येथे शो होईल. 


येथे तुमचा फोटो तुम्हाला अपलोड करायचं आहे. सोबतच तुमचा मोबईल नंबर व इतर मागितलेली माहिती येथे भरायची आहे. 


जर तुमचा मोबईल नंबर आधार कार्ड शी लिंक नसेल तर तुम्ही लोकसेवा केंद्रत जाऊन biometric पद्धतीने तुमचे आयुष्यमानकार्ड काढू शकता.

आयुष्मान कार्ड कसे डाउनलोड करायचे ?

आयुष्मान कार्ड कसे डाउनलोड करायचे त्यासाठी खाली आम्ही तुम्हाला स्टेप बाय स्टेप प्रोसेस सांगितली आहे  ज्याची मदत घेवून तुम्ही सहजपणे आयुष्मान कार्ड डाउनलोड करू शकता. आयुष्यमान कार्ड generate होण्यासाठी कमीत कमी 4 तास किंवा 1 आठवडा इतका कालावधी लागू शकतो.

आपले आयुष्मान कार्ड डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला याची वेबसाइट उघडावि लागेल.

आता येथे तुमचा तुमच्या मोबाइल नंबरल टाकून ओटीपी ने वेरीफाई करावे लागेल.

आता तुम्ही तुमचे राज्य जिल्हा तहसील ग्राम आणि शहर निवडा आणि वर क्लिक करा.


आता तुमच्या समोर तुमच्या आयुष्मान कार्डची माहिती येणार आहे, जकर तुमचा आयुष्यमान कार्ड अप्रूव झाले असेल तर तुम्हाला इथे शो होईल. 


इथे तुमचा आयुष्मान कार्ड डाउनलोड करू शकता.

आयुष्मान भारत योजना अंतर्गत उपचार करण्यासाठी हॉस्पिटल ची लिस्ट 

आयुष्यमान कार्ड अंतर्गत मिळणारे  फायदे  देशाच्‍या सर्व सरकारी व प्राइवेट हॉस्पिटलमध्‍ये आपल्‍या उपचार मोफत करू शकता. तुम्ही तुमचा उपचार हा काही ठराविक अश्या प्रायवेट हॉस्पिटल मध्ये करू शकता जे या साठी पात्र आहेत.

जर तुम्हाला तुमच्या शहरामध्ये त्या हॉस्पिटलच्या बद्दल माहिती हवी असेल तर आयुष्मान भारत योजना च्या अंतर्गत येत आहेत व सुविधा मिळत  आहेत अश्या हॉस्पिटल ची नवे खाली दिलेल्या लिंक करून तुम्ही मीळवू शकता. 

https://hospitals.pmjay.gov.in/Search/empnlWorkFlow.htm?actionFlag=ViewRegisteredHosptlsNew

तर लिंक वर क्लिक करून तुम्ही तुमच्या शहराची व गावाची माहिती भरून तुमची तुमच्या जवळच्या हॉस्पिटल ची माहिती घेऊ शकता. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Menu Site