Ad code

Latest

6/recent/ticker-posts

परीक्षेची तयारी कशी करावी? 10 महत्वाच्या टिप्स

परीक्षेची तयारी कशी करावी? 10 महत्वाच्या टिप्स

आजच्या काळात विद्यार्थ्यांसाठी सर्वात कठीण काम म्हणजे येणाऱ्या परीक्षेची तयारी करणे कारण जेव्हा परीक्षा येते तेव्हा विद्यार्थ्यांच्या डोक्यात खूप टेंशन येते, वर्षभर शिकवल्या जाणाऱ्या सर्व अभ्यासक्रमाची येथे चाचणी घेतली जाते.


 परीक्षेची तयारी करण्यासाठी तुम्हाला खूप अभ्यास करावा लागतो पुस्तके वाचावी लागतात, शिक्षकांनी दिलेल्या नोट्स वाचाव्या लागतात. पुस्तके वाचून नोट्स तयार कराव्या लागतात. जेणेकरून तुम्ही तुमच्या परीक्षेची चांगली तयारी करू शकाल. परंतु अशी सर्व कामे करून करून विद्यार्थ्याने परीक्षेची तयारी पूर्ण केल्याचे फारच क्वचित घडते.

कारण अनेकांना अभ्यास करावासा वाटत नाही, कारण अभ्यास ही अशी गोष्ट आहे जी अनेक विद्यार्थ्यांना आज पासून नव्हे तर उद्या पासून अभ्यास करू असा विचार करत राहतात आणि असे करून केव्हा परीक्षा तोंडावर येते हे त्यांनाच कळत नाही.  त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना तोंडावर आलेल्या परीक्षेची तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. ते विद्यार्थी कमी वेळेत रट्टा मारून परीक्षेला जातात व परीक्षेत आलेले प्रश्न पाहून त्यांना काही आठवत नाही व त्यांची बोंब उडते.

आज या लेखात आम्ही तुम्हाला परीक्षेत येणाऱ्या समस्या टाळण्यासाठी आणि कमी वेळेत तुमच्या परीक्षेची चांगली तयारी कशी करता येईल यासाठी काही टिप्स सांगणार आहोत. जेणेकरून तुम्ही तुमच्या परीक्षेची तयारी वेळेत करू शकता व उत्तम गुण प्राप्त करू शकता.

तुम्ही तुमच्या आगामी परीक्षेची तयारी करण्यासाठी किंवा कोणत्याही स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करत असाल, तुमच्या शालेय किंवा महाविद्यालयीन परीक्षेची तयारी करत असाल, तरीही तुम्ही या लेखात दिलेल्या टिप्स फॉलो करू शकता.

परीक्षेची तयारी कशी करावी? How to prepare for exam in Marathi

आज प्रत्येक विद्यार्थी त्यांच्या शैक्षणिक जीवनात यश मिळवुन उत्तम करिअर घडवण्यासाठी खूप मेहनत घेत आहेत, मात्र शैक्षणिक क्षेत्रातील वाढत्या स्पर्धे मुळे कोणतीही परीक्षा उत्तीर्ण होणे फार कठीण झाले आहे. परीक्षेच्या पूर्वतयारीत थोडीशीही चूक झाली तर परीक्षा उत्तीर्ण होणे सोपे नाही.

त्यामुळे या वाढत्या स्पर्धेच्या युगात कोणतीही परीक्षा सहजरित्या उत्तीर्ण होण्यासाठी अगोदर पासूनच परीक्षेची तयारी करणे अत्यंत गरजेचे झाले आहे, अनेकवेळा परीक्षा जवळ आल्यावर त्याची तयारी कशी करावी कोणकोणत्या टिप्स वापराव्यात हा प्रश्न विद्यार्थ्यांच्या व त्यांच्या पालकांच्या मनात येत राहतो.

म्हणूनच, या पडलेल्या प्रश्नांचा व तुमच्या समस्यांचा सामना करण्यासाठी, आज आम्ही परीक्षेच्या तयारीसाठी काही सर्वोत्तम टिप्स दिल्या आहेत, ज्याचे अनुसरण करून तुम्ही तुमची परीक्षा तयारी सुलभ करू शकता आणि परीक्षेत चांगले यश मिळवू शकता.


1 टाइम टेबल तयार करा

परीक्षा कोणतीही असो जर तुम्ही टाइम टेबल बनवून परीक्षेची तयारी कराल, तर तुम्ही परीक्षेची तयारी अधिक चांगल्या पद्धतीने करू शकाल. तुम्ही कोणत्याही कामासाठी टाईम टेबल बनवलेत तर तुम्ही ते जास्त चांगल्या प्रकारे करू शकाल कारण टाइम टेबल खूप महत्वाचे आहे. जर तुम्हाला परीक्षेची तयारी कमी वेळात करायची असेल, तर हा एक चांगला मार्ग आहे ज्याद्वारे तुम्ही वेळापत्रक बनवू शकता आणि त्या प्रमाणे आपला अभ्यास पूर्ण करू शकता. टाईम टेबल बनवण्याचा तुम्हाला हा फायदा होतो की कोणते काम कोणत्या वेळी करायचे आहे. कोणत्या विषयाचा अभ्यास कधी आणि किती करायचा आहे हे सर्व तुम्ही टाईम टेबल द्वारे ठरवू शकता.

2 संपूर्ण अभ्यासक्रमाची माहिती ठेवा

अभ्यास सुरू करण्यापूर्वी परीक्षेचा अभ्यासक्रम नक्कीच ठेवा. याद्वारे तुम्ही तुमच्या मजबूत आणि कमकुवत विषयांमध्ये किती वेळ द्यावा ते ठरवू शकता.
म्हणजेच जो विषय तुम्हाला सोपा वाटतो तो विषय तुम्ही किती दिवसांत पूर्ण कराल आणि ज्या विषयात तुम्ही कमकुवत आहात तो पूर्ण करायला तुम्हाला किती दिवस लागतील हे तुम्हाला कळेल. अशाप्रकारे, विषयानुसार, तुम्ही प्रत्येक विषयातील सर्व विषय वेळेत कव्हर कराल.

3 मॉडेल पेपरसह सराव करा

मॉडेल पेपर हा अतिशय महत्त्वाचा व उपयुक्त पेपर आहे. जर तुम्हाला तुमचे येनाऱ्याऱ्या परीक्षेची तयारी करायची असेल तर मॉडेल पेपरमधून नक्कीच तयारी करा आणि शक्य असल्यास मॉडेल पेपरमधून तुमच्या शिक्षकांना तुम्हाला कठीण वाटत असणाऱ्या प्रश्नांसंबंधी माहिती विचारा कठीण वाटणाऱ्या प्रश्नांवर जास्त जोर द्या, परीक्षेच्या तयारीसाठी मॉडेल पेपर खूप महत्त्वाचा असतो.

4 मागील वर्षाचे परीक्षेचे पेपर तपासा

कोणत्याही प्रकारच्या परीक्षेची तयारी करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे मागील परीक्षेचे पेपर तपासणे,  मागील वर्षांच्या पेपर्सवरून तुम्हाला त्याविषयी माहिती मिळेल. त्यावरून तुम्ही अंदाजा लावू शकता की कोण कोणते प्रश्न जास्त विचारले जातात, कोणत्या विषयाचा जास्त अभ्यास केला पाहिजे हे जाणून घेऊ शकता.
जर तुमच्या परीक्षेला खूप कमी वेळ शिल्लक असेल आणि तुम्हाला चांगली तयारी करायची असेल तर तुम्ही ही पद्धत अवलंबली पाहिजे, यामुळे तुमची परीक्षा नक्कीच चांगली होईल आणि तुम्हाला नक्कीच चांगले गुण मिळू शकतात.

5 एकाच विषयाचा सतत अभ्यास करू नका

अभ्यास करताना दिवसभर एकाच विषयाचा अभ्यास केल्याने आपल्याला कंटाळा येतो, त्यामुळे दिवसभरात एक ते दीड तास सतत एकाच विषयाचा अभ्यास करावा हे लक्षात ठेवा. याशिवाय तुम्हाला कठीण वाटणाऱ्या विषयानंतर सोप्या विषयाचा अभ्यास करा आणि नंतर कठीण विषयाचा अभ्यास करा. असे केल्याने तुमची अभ्यासातील आवड वाढेल   आणि विषय बदलून तुम्हाला वाचण्याचा कंटाळा येणार नाही. या पद्धतीचा अवलंब करा आणि तुमच्या अभ्यासात सुधारणा होत आहे की नाही ते पहा.

6 पुरेशी झोप घ्या-

अनेकदा परीक्षा आणि अभ्यासाच्या दडपणामुळे विद्यार्थ्यांना पुरेशी झोप लागत नाही, ते रात्री उशिरापर्यंत अभ्यास तर करतातच, शिवाय सकाळी लवकर उठूनही अभ्यास करतात, त्यामुळे त्यांना पुरेशी झोप लागत नाही. मानवाला पुरेशी झोप न मिळाल्याने मेंदू निस्तेज होऊन त्याची कार्यक्षमता कमी होते. जेव्हा पुरेशी विश्रांती मिळते तेव्हाच मेंदू योग्यरित्या कार्य करेल.
पुरेशी झोप घेतल्याने आपले शरीर टवटवीत राहतेच शिवाय मेंदूही फ्रेश राहतो त्याची कार्यक्षमता वाढते. त्यामुळे आपण जे काही वाचतो, ज्या गोष्टींचा अभ्यास करतो ते आपल्या अधिक चांगल्या प्रकारे लक्षात राहते.

7 महत्त्वाच्या विषयांवर मित्रांचा सल्ला घ्या

मित्रांमध्ये नेहमी महत्त्वाच्या विषयांवर किंवा प्रश्नांवर चर्चा करा. असे केल्याने तुम्हाला त्या विषयाची चांगली माहिती मिळेल. वारंवार होणाऱ्या चर्चेमुळे तो प्रश्न तुमच्या मनात राहतो आणि दीर्घकाळ स्मरणातही राहतो.

एखादा विषय पुन्हा पुन्हा वाचूनही तुम्हाला समजत नसेल, तुम्हाला कठीण जात असेल तर तो विषय तुमच्या वर्गात तुमच्या मित्रांसोबत शेअर करा त्यावर चर्चा करा त्यांच्या कडून याची माहिती घ्या.

8 कमकुवत विषयांवर अधिक लक्ष द्या

ज्या विषयात तुम्ही थोडे कमकुवत आहात त्या विषयाकडे जास्त लक्ष द्या, उदाहरणार्थ तुमचे गणित कमकुवत असेल तर अश्या विषयावर जास्त लक्ष द्या. तसेच तुम्हाला ज्या विषयात काही अडचण येत असेल किंवा काही समजत नसेल तर शिक्षकांना त्या विषयी विचारा. जेणेकरून तुम्ही कमी वेळेत चांगल्या पद्धतीने परीक्षेची तयारी करू शकाल.

प्रत्येक परीक्षेचा पेपर वेगळा असतो, त्यामुळे त्या परीक्षेत तुमचा कोणता पेपर सर्वात कमकुवत आहे ते पहा, त्याकडे अधिक लक्ष द्या आणि शक्य तितकी तयारी करण्याचा प्रयत्न करा.

9 परीक्षेसाठी नोट्स बनवा

कोणत्याही परीक्षेची तयारी करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे नोट्स बनवून अभ्यास करणे. जेव्हा तुम्ही कोणत्याही परीक्षेसाठी नोट्स बनवता तेव्हा तुम्ही त्या विषयाचे महत्त्वाचे मुद्दे लिहून ठेवता, त्यामुळे तुम्हाला अनेक गोष्टी कळतात.

जेव्हा तुम्ही या नोट्स पुन्हा वाचता तेव्हा तुम्हाला हे सर्व मुद्दे आठवतात. त्यामुळे कोणत्याही परीक्षेची तयारी करायची असेल तर नोट्स बनवून अभ्यास केला पाहिजे.

10 शांत वातावरणात बसून अभ्यास करा

अभ्यासासाठी शांत वातावरण निवडा. जर तुम्ही शांत ठिकाणी अभ्यास केला तर तुमची स्मरण प्रक्रिया जलद कार्य करते. शांत ठिकाणी बसून तुम्ही एकाग्रता आणि चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकता.

जेव्हाही तुम्ही अभ्यासाला सुरुवात कराल तेव्हा लक्षात ठेवा की तुमच्या आजूबाजूला गोंगाटाचे वातावरण असू नये जेणेकरून तुम्हाला अभ्यास करताना कोणतीही अडचण येऊ नये.

कोणत्याही व्यक्तीच्या यशासाठी शिक्षण हे सर्वात महत्त्वाचे असते. विद्यार्थी जीवनात चांगले शिक्षण घेऊन परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालात तर नक्कीच यश मिळेल. पण परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी परीक्षेचे वेळापत्रक बनवणे आणि अभ्यास करणे सर्वात महत्त्वाचे आहे जेणेकरून तुम्हाला चांगला अभ्यास करता येईल आणि तुम्ही तुमच्या परीक्षेत चांगले गुण मिळवण्यात यशस्वी व्हाल.

परीक्षेच्या तयारीसाठी काही हॅक्स आणि टिपा

परीक्षेच्या तयारीसाठी काही महत्त्वाच्या हॅक्स आणि जलद टिप्स खाली दिल्या आहेत:

 • दररोज अभ्यास करताना एक ध्येय निवडा
 • सराव परीक्षा दररोज, दर 7 दिवसांनी, 15 दिवसांनी, 30 दिवसांनी द्याव्यात.
 • परीक्षेपूर्वी अभ्यासावर अवलंबून राहू नये, नियमित अभ्यास करा.
 • तुमचे मन नेहमी शांत ठेवा.
 • परीक्षेच्या शेवटच्या दिवसांमध्ये उजळणीसाठी तुमचा वेळ वाचवा.
 • एक वेळापत्रक बनवा.
 • तुमच्या वर्गातील गटचर्चेत भाग घ्या.
 • अभ्यास करताना मधे थोडी विश्रांती घ्या.
 • अवघड प्रश्नाला परिक्षेपूर्वी मदतीसाठी विचारताना लाजू नका.
 • अभ्यास करण्यापूर्वी एक वेळापत्रक बनवा.
 • गटात सराव करण्याचा प्रयत्न करा.
 • तुमच्या पुस्तकातील प्रत्येक विषय ते वाचताना नीट समजून घ्या आणि जर तुम्हाला समजत नसेल तर त्या वेळी तुमच्या शंकांचे अवश्य निरसन करा.
 • महत्वाची माहिती लक्षात घेणे किंवा अधोरेखित करणे विसरू नका.
 • तुमचे पुस्तक वेळोवेळी अपडेट करत राहा, असे केल्याने तुम्हाला शेवटी उजळणी करणे सोपे जाईल.

निष्कर्ष

या लेखाद्वारे आम्ही तुम्हाला सांगितले की परीक्षेची तयारी कशी करावी? (How To Prepare For The Exam in Marathi), परीक्षेची तयारी करण्यासाठी काही महत्त्वाचे मुद्दे सांगीतले आहेत, ज्याचे पालन करून तुम्ही परीक्षेची चांगली तयारी करू शकता आणि चांगले गुण मिळवू शकता.

आम्हाला आशा आहे की या पोस्टमधील परीक्षेच्या तयारीच्या टिप्स तुमच्यासाठी उपयुक्त ठरतील आणि तुम्ही तुमच्या आगामी परीक्षेसाठी चांगली तयारी करू शकाल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Menu Site