Ad code

Latest

6/recent/ticker-posts

sarkari lottery 2023 - सरकारी लॉटरी म्हणजे काय लॉटरी भारतात वैध आहे की नाही?

sarkari lottery 2023 - सरकारी लॉटरी म्हणजे काय लॉटरी भारतात वैध आहे की नाही?

आपण असे ऐकलेच असेल की अमुक अमुक माणसाचे नशीब फळफळले किंवा या या माणसाची लॉटरी लागली. लॉटरी लागून कोणताही व्यक्ति झटक्यात करोडपती होतो हे आपल्याला माहीतच आहे. यात शंका नाही की प्रत्येक व्यक्तीला कमी वेळातच पटकन श्रीमंत व्हायचे आहे जेणेकरून ते त्यांचे जीवन आरामदायी आनंदात जगू शकेल, बहुतेक लोक श्रीमंत होण्यासाठी shortcut चा वापर करतात. त्यात लॉटरी काढणे हा ही एक पर्याय येतो, लॉटरी जिंकणे हे काही आपल्या हातात नसते. जर आपले नशीब व आपल्या भाग्याचे तारे झळकत असतील तर आपण देखील लॉटरी जिंकून एका दिवसात रंक पासून राजा होऊ शकतो यात काही शंका नाही. परंतु हे केवळ काही लोकांसाठीच शक्य आहे, लॉटरी काढणाऱ्यानपैकी बहुतेक लोक लॉटरी जिंकतात त्यात लाखात एक जन असू शकतो किंवा हजारातही असू शकतात. चित्रपटात किंवा इतर कुठल्यातरी व्यासपीठावर तुम्ही लॉटरी हा शब्द नक्कीच ऐकला असेल.


लॉटरी ही अशी गोष्ट आहे ज्यामध्ये बरेच लोक दररोज त्यांचे पैसे गुंतवतात आणि त्यांच्यापैकी ज्याचे नशीब चांगले असते त्याचे संपूर्ण आयुष्य बदलते. जरी लॉटरी खूप लोकप्रिय असली तरीही आज बर्याच लोकांना लॉटरी काय आहे आणि लॉटरी कशी काम करते हे माहित नाही आणि जर तुम्ही अशा लोकांपैकी एक असाल तर हा लेख पूर्ण वाचा कारण या लेखात आम्ही तुम्हाला लॉटरीची संपूर्ण माहिती देणार आहोत.

लॉटरी म्हणजे काय? What is the Lottery?

लॉटरी हा शब्द ऐकताच लोकांच्या मनात नशीब बदलण्याचे विचार येऊ लागतात, परंतु आजपर्यंत अनेक लोक असे आहेत की ज्यांना लॉटरीबद्दल संपूर्ण माहिती नाही.

जर तुम्हाला देखील लॉटरीबद्दल पुरेशी माहिती नसेल आणि तुम्हाला लॉटरी म्हणजे काय हे माहित नसेल, तर माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की लॉटरी हा एक प्रकारचा जुगार आहे ज्यामध्ये काही रुपये देऊन लॉटरीचे तिकीट खरेदी केले जाते. आणि याचा प्रकारची हजारो लाखों तिकिटे एकाच दिवशी विकली जाते, तिकिटे विकत घेणाऱ्यापैकी   एक किंवा अधिक लोकांचे नशीब चमकते आणि त्यांचा नंबर लागतो. ज्यांचा नंबर लागतो त्या व्यक्तीला मोठे बक्षीस किंवा मोठी रक्कम दिली जाते.

भारतीय लॉटरी कशा काम करतात?

बघायचे झाले तर लॉटरीचे स्वरूप हे एक अचूक आणि फायदेशीर स्वरूप आहे ज्यामध्ये हजारो आणि लाखो लोक मोठी रक्कम जिंकावी म्हणून मोठ्या प्रमाणात लॉटरीची  तिकिटे खरेदी करतात, ज्यामुळे ऑपरेटर कडे मोठी मोठी रक्कम जमा होते आणि नंतर तीच मोठी रक्कम थोड्या प्रमाणात काही निवडक लोकांना बक्षीस म्हणून दिली जाते. ज्यामुळे त्यांचे पुढचे जीवन बदलुन जाते ही रक्कम लॉटरी तिकिटावर अवलंबून असते की आपण किती रकमेची लॉटरी घेतलेली असते. त्यामुळे अशा परिस्थितीत तुम्ही योग्य लॉटरी निवडली जी दीर्घकाळापासून या क्षेत्रात कार्यरत आहे आणि लोकांना निकाल देत आहे, तर या लॉटरींवर विश्वास ठेवता येईल.

भारतात लॉटरी खेळणे कायदेशीर आहे का?

भारतात असा प्रत्येक खेळ बेकायदेशीर आहे ज्यात नशीबाच्या जोरावर पैसे गुंतवले जातात. त्यात जुगार, कॅसिनो, लॉटरी, सट्टा-मटका याप्रमाणे लॉटरी नियमन कायदा 1998 स्पष्टपणे सांगतो की भारतात लॉटरी बेकायदेशीर आहे. मात्र या कायद्यात राज्य सरकारांना त्यांच्या राज्यात अधिकृत लॉटरी चालवण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे. मात्र यासाठी काही अटींचे पालन करावे लागेल, ते नियम खालील प्रमाणे आहेत.

लॉटरी नियम

  • भारतात लॉटरी विकण्याचा पहिलं नियम असा आहे की लॉटरीचे बक्षीस कोणत्याही पूर्व-घोषित संख्येच्या आधारे किंवा कोणत्याही एका अंकाच्या आधारे दिले जाणार नाही.
  • एका वर्षात कोणत्याही लॉटरीचे सहा पेक्षा जास्त बंपर ड्रॉ होऊ शकत नाहीत.
  • राज्य सरकार स्वतः किंवा नोंदणीकृत डिस्ट्रीब्यूटर विक्री एजेंट्स मार्फत तिकीटांची विक्री करेल.
  • राज्य सरकारलाच सर्व लॉटरीचे ड्रॉ काढावे लागतील.
  • लॉटरीच्या तिकिटावर राज्य सरकारचा लोगो असणे आवश्यक आहे, व हा लोगो अश्या प्रकारे लावला गेला पाहिजे की त्याची वैधता सिद्ध करता येईल.
  • जर राज्य सरकारने घोषित केलेल्या टाइम लिमिट च्या आत जिंकलेल्या  बक्षिसाच्या रकमेवर दावा केला नाही किंवा सर्वात मोठा बक्षीस कोणालाही दिला गेला नाही, तर ती रक्कम व बक्षीस राज्य सरकारची मालमत्ता होईल.
  • लॉटरीच्या तिकिटांच्या विक्रीतून मिळालेले पैसे राज्याच्या सार्वजनिक खात्यात हस्तांतरित केले जातील.
  • लकी ड्रॉ काढण्याचे ठिकाण ज्या राज्याच्या हद्दीत लॉटरी काढली जाईल तेथेच ठरवले जाईल.
  • केंद्र सरकारने याबाबत काही सूचना दिल्यास त्याचे पालन केले जाईल.
  • या संदर्भात राज्य सरकारांना निर्देश देण्याचे पूर्ण अधिकार सरकारला आहेत.

लॉटरीच्या पैशावर किती टॅक्स आकारला जातो? 

लॉटरी जिंकणारी रक्कम ही तुमची मिळकत मानली जाते आणि उत्पन्नावर आयकर आकारला जातो. यावर कोणतीही मूलभूत सूट नाही, सरळ 30% कर आकारला जातो. 10 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम असल्यास अधिभार देखील लागू होतो. जर तुम्ही 1 कोटी रुपयांची लॉटरी जिंकली तर त्यावर 30% कर कापला जाईल, त्यानंतर 10% अधिभार आणि त्यानंतर CESS आणि उच्च शिक्षण CESS सारखे कर कापले जातील. हे सर्व टॅक्स कंपल्यानंतर जी रक्कम राहील टी आपल्याला दिली जाते. कोणत्याही लोटरीत आपण जिंकलेली संपूर्ण रक्कम आपल्याला मिळत नाही त्यावर टॅक्स कापुनच टी रक्कम आपल्याला दिली जते. 

कोणत्या राज्यांमध्ये लॉटरी कायदेशीर आहे?

लॉटरी रेग्युलेशन ऍक्ट 1998 म्हणते की कोणत्याही राज्य सरकारला आपल्या राज्यात लॉटरी सुरू करता येते. असे असूनही  भारतात फक्त केरळ, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, पंजाब, मेघालय, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, मणिपूर, नागालँड आणि मिझोराममध्ये लॉटरी खेळणे कायदेशीर आणि वैध आहे.

पण समजा तुम्ही अशा राज्यात राहत असाल जिथे लॉटरी खेळण्यावर बंदी आहे, तर तुम्ही दुसर्‍या राज्यातून लॉटरीचे तिकीट खरेदी करू शकता आणि लॉटरी उघडल्यावर तुमची कागदपत्रे दाखवून लॉटरीचे बक्षीस मिळवू शकता. पण लक्षात ठेवा की तुम्हाला तिकीट देणारी व्यक्ती तुमच्या राज्यात तिकीट देऊ शकत नाही. तुम्हाला स्वतः त्या राज्यात जाऊन तिकीट काढावे लागेल.टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Menu Site