Ad code

Latest

6/recent/ticker-posts

गरबा-दांडिया हा खेळ फक्त नवरात्रीतच का खेळला जातो, जाणून घ्या त्याचे वर्णन शास्त्रात कुठे आढळते - Garba ka kheltat

गरबा-दांडिया हा खेळ फक्त नवरात्रीतच का खेळला जातो, जाणून घ्या त्याचे वर्णन शास्त्रात कुठे आढळते.


शारदीय नवरात्रोत्सवाचे आगमन होताच दांडिया आणि गरबा खेळण्यासाठी सर्वांचाच उत्साह पाहायला मिळतो. या उत्सवात लोक एकत्र येतात आणि दांडिया आणि गरबा खेळतात. संपूर्ण भारतात नवरात्रोत्सवात ठिकठिकाणी दांडिया, गरब्याचे आयोजन केले जाते व तेथे गरबा व दांडिया नृत्य केले जाते.


भारतात खासकरून गुजरात आणि महाराष्ट्रात याला विशेष महत्त्व आहे. पण नवरात्रीत दांडिया किंवा गरबा का खेळला जातो हे तुम्हाला माहीत आहे का? इतर कोणत्याही उत्सवात का खेळला जात नाही? नवरात्रीत दांडिया व गरबा खेळायला का सुरुवात झाली? कशी झाली? आजच्या लेखात आम्ही तुम्हाला याबद्दल सविस्तर माहिती देणार आहोत. navratrit garba ka khelatat या बद्दल या लेखात तपशीलवार माहिती घेऊया.

नवरात्रीत गरबा आणि दांडिया खेळण्याची परंपरा अनेक वर्ष जुनी आहे. पूर्वी हा भारतातील गुजरात आणि राजस्थान सारख्या ठिकाणी खेळला जायचा, पण हळूहळू त्याची लोकप्रियता वाढू लागली आहे. गरबा या शब्दाकडे लक्ष दिले तर हा शब्द कर्म आणि दीप यांनी बनलेला आहे.

नवरात्रीत गरबा आणि दांडिया का खेळतो?

गरबा आणि दांडिया या दोन खेळांचा इतिहास गुजरातशी जोडलेला आहे. त्याचा उगम इथूनच झाला होता. ही नृत्ये फक्त नवरात्रीतच केली जातात. कारण हे नृत्य देवी दुर्गा आणि राक्षस महिषासुर यांच्यातील नऊ दिवसांच्या युद्धाच्या विजयाचे प्रतिनिधित्व आणि प्रतीक मानले जाते, ज्यामध्ये देवी दुर्गा विजयी झाली होती.

गरबा नृत्य

गरबा हे मातीचे भांद्यामद्धे भांड्याला छिद्र पडून त्यात दिवा लावला जातो, ज्याला गुजरातमध्ये 'गरबी' असे म्हणतात. या मातीच्या मडक्यांभोवती गरबा नृत्य केले जाते, ज्याला 'गर्भा दीप' म्हणतात.

या खेळाचा अर्थ असा आहे की स्त्री-पुरुष देवी दुर्गा आणि राक्षस-राजा महिषासुराप्रमाणे लढत आहेत. गरबा मध्ये वेशभूषा करून स्त्री पुरुष नाचत असतात. स्त्रिया चोली किंवा ब्लाउज, चनिया किंवा लांब स्कर्ट आणि चमकदार दुपट्टा घालतात आणि पुरुष चमकदार कपडे घालून डोक्यावर पगडी घालतात व त्या एका रिंगणार नाचतात.

दांडिया नृत्य

यामध्ये महिला आणि पुरुष दोघेही रंगीबेरंगी आणि सजवलेल्या बांबूच्या काठ्यांसह ( दांडिया) ढोलक आणि तबला यांसारख्या वाद्यांवर नृत्य करतात. देव आणि दानवांमधील युद्ध सादर करण्याचा हा एक सुंदर मार्ग मानला जातो.

दांडिया दरम्यान वापरल्या जाणार्‍या रंगीबेरंगी शेड्स दुर्गा देवीच्या तलवारीचे प्रतिनिधित्व करतात.

दांडिया आणि गरबा यातील फरक

दांडिया आणि गरबा हे दोन भिन्न प्रकारचे नृत्य असले तरी. पण दोन्ही माता दुर्गा आणि नवरात्रीशी संबंधित आहेत. मात्र दांडिया आणि गरबा यात फरक आहे. माँ दुर्गेच्या आरतीपूर्वी गरबा केला जातो, तर आरतीनंतर दांडिया खेळला जातो.

दांडियासाठी रंगीबेरंगी दांडियाच्या काठ्या लागतात त्या काट्या एकमेकांवर मारून नाचत राहतात, तर गरब्यासाठी कशाचीही गरज नसते. लोक टाळ्या वाजवून गरबा ज्योतीभोवती नाचत गरबा करतात.

नवरात्रीचा गरबा का साजरा केला जातो?

असे मानले जाते की खूप खूप वर्षापूर्वी गुजरातमध्ये महिषासुर या राक्षसाच्या दहशतीमुळे लोक प्रचंड त्रस्त झाले होते, त्यानंतर लोकांच्या समस्या पाहून ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांनी दुर्गा मातेला मदतीसाठी आवाहन केले.

देवांच्या विनंती ने मग देवी जगदंबा प्रकट झाली आणि त्यांनी राक्षसाचा वध केला. त्यानंतर दरवर्षी नवरात्रीचा उत्सव साजरा केला जाऊ लागला आणि लोक उत्सव म्हणून नऊ दिवस उपवास करतात आणि देवी मातेला प्रसन्न करण्यासाठी गरबा दांडिया खेळतात.


जर तुम्हाला आमच्या कथेशी संबंधित काही प्रश्न असतील तर लेखाच्या खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये आम्हाला सांगा. आम्ही तुम्हाला योग्य माहिती देण्याचा प्रयत्न करत राहू. तसेच, जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कृपया आपल्या प्रियजणांशी शेअर करा.


image credit :- freepik.com

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Menu Site