Ad code

Latest

6/recent/ticker-posts

बहुतेक लोक जीवनात श्रीमंत का होत नाहीत?

 बहुतेक लोक जीवनात श्रीमंत का होत नाहीत?


आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक आहेत जे बर्याच काळापासून काम करत आहेत मेहनत करत आहेत पण तरीही त्यांची आर्थिक स्थिती सुधारू शकलेली नाही. असे का? ते लोक श्रीमंत का होऊ शकले  नाहीत, त्यांच्या गरिबीला जबाबदार कोण? आजच्या लेखात आपण याच विषयावर माहिती घेणार आहोत यात तुम्हाला सांगणार आहोत की बहुतेक लोक आयुष्यात कधीच श्रीमंत का होत नाहीत?


आपण पहिलेच असेल की आपल्या आजूबाजूला राहणारे काही लोक होते ज्यांनी गेल्या काही वर्षांत खूप प्रगती केली आहे. ज्यांची परिस्थिति गेल्या 2-3 वर्षांपूर्वी गरीब होती पण आता मेहनत करून त्या लोकांनी आपली राहणीमान बदलून परिस्तिती बदलून श्रीमंत झाले आहेत. आपल्या भारतात दारिद्र्यरेषा ओलांडून श्रीमंत होणारे लोक फार कमी आहेत.

अशी कारणे आहेत की गरीब लोक श्रीमंत का होऊ शकत नाहीत, कोणत्या सवयी आहेत जी त्यांना श्रीमंत होऊ देत नाहीत.


गरीब माणूस श्रीमंत का होत नाही?


बहुतेक लोक खूप मेहनत करून चांगला पैसा देखील कमवतात पण त्यांच्या सवयी अश्या असतात की ते लोक आयुष्यात कधीच श्रीमंत का होत नाहीत. चला तर मग जाणून घेवूयात लोकांच्या गरिबीची मुख्य कारणे काय आहेत.


9-5 कामावर विश्वास

माणसाच्या आयुष्यातील श्रीमंत न होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे गरीब लोक 9-5 नोकऱ्यांवर खूप विश्वास ठेवतात. नोकरी करणे हे आपल्या उपजीविकेचे एक साधन आहे, पण ते तुम्हाला कधीच श्रीमंत बनवू शकत नाही.


ज्यांना फक्त पोट भरायचे आहे ते लोक अशी कामे करतात. ज्या लोकांना श्रीमंत व्हायचे आहे ते लोक कधीच  9-5 च्या नोकरी मध्ये अजिबात अडकत नाहीत. श्रीमंत लोक ते काम करतात ज्यात वेळ आणि पैशाची मर्यादा नसते. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात श्रीमंत व्हायचे असेल तर स्वतःचा व्यवसाय सुरू करा. तुमचा व्यवसाय सुरुवातील भलेही छोटा असुदेत पण तुम्ही केलेल्या मेहनीतीने तो तुम्हाला नक्कीच श्रीमंत बनवेल. पण ठरलेल्या वेळेत नोकरी करून  ज्या नोकरीमध्ये तुमची कमाई आणि कामाचा वेळ अमर्यादित आहे ज्याद्वारे तुमचा महिना खर्च फक्त निघून जाईल व महिन्याच्या अखेरी पैशयची कमतरता येईल अशी नोकरी तुम्हाला कसे काय श्रीमंत बनवू शकते.


समाज आणि पालकांच्या दबावामुळे करिअरची निवड


बहुतेक लोक त्यांच्या परिस्थितीनुसार आवडत नसतानाही दुसऱ्याने केल म्हणून आपल्या करिअरची निवड करतात. तसेच शिक्षण पूर्ण झाल्यावर जेव्हा त्यांच्याकडे कमाईचे कोणतेही साधन नसते तेव्हा त्यांच्यावर त्यांच्या पालकांचा आणि समाजाचा इतका दबाव असतो की ते 10 ते 12 हजार रुपये कमविण्यासाठी कोणतेही काम निवडतात.

हळूहळू कुटुंबाची जबाबदारी वाढल्याने हे काम त्यांच्यासाठी आवश्यक बनते आणि ते त्यातच ते अडकून राहतात. त्यांच्याकडे करिअरचे भरपूर पर्याय असले तरी ते आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्यातून बाहेर पडण्याचा विचारही करत नाहीत.


जे लोक कोणत्याही दबावाखाली करिअर ची निवड न करता स्वतचे स्वप्न पूर्ण करण्याच्या उद्देशाने करियर ची निवड करतात ज्यामध्ये त्यांना ज्ञान आणि स्वारस्य असते. व त्यातून ते यशस्वी होऊन श्रीमंत होण्याच्या पायऱ्या चढतात.


आत्म-शिस्तीचा अभाव

स्वयंशिस्तीचा अभाव हे गरिबीचे सर्वात मोठे कारण आहे. जे लोक स्वयंशिस्तीचा अभाव करतात ते नेहमीच गरीब राहतात. म्हणूनच बहुतेक लोक त्यांच्या आयुष्यात श्रीमंत होऊ शकत नाहीत.


ज्या लोकांमध्ये आत्म-शिस्तीचा अभाव असतो ते त्यांचे सर्व काम उद्यासाठी सोडून देतात. ते त्यांची कामे पूर्ण न करता सोडून देतात. त्यांनी सुरू केलेले काम पूर्ण न करता ते काम थांबवतात.


त्यामुळे ते कोणत्याही कामात यशस्वी होऊ शकत नाहीत. असे लोक त्यांच्या आयुष्यात नेहमीच गरीब राहतात आणि कधीही श्रीमंत होऊ शकत नाहीत.


कोणतेही काम सुरू करण्यापूर्वीच अपयशाची भीती


अनेक असे लोक आहेत जे कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी मला हे जमणार नाही, या कामात माझे लक्ष विचलित होईल, असे म्हणायला लागतात. खरे तर त्यांना कामात अपयश यायची भीती वाटते. त्यांना धोका पत्करण्याची भीती वाटते.


ही अशी काम सुरू करण्यापूर्वीची अपयशाची भीतीच त्यांना श्रीमंत होऊ देत नाही. जे लोक फार कमी वेळात श्रीमंत होतात किंवा कोणत्याही कामात यशस्वी होतात त्यांना माहित असते की अपयशच यशाचा मार्ग दाखवते. लोक त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी धैर्य मिळवू शकत नाहीत  आधीच हार मानतात ते लोक आयुष्यात कधीच श्रीमंत होऊ शकत नाहीत.


अयशस्वी लोकांकडून सल्ला घेणे


सल्ला हा त्याकडून घेतला जातो ज्याला त्या बाबतीतील ज्ञान असते आणि यातच लोक चुकी करतात. बहुतेक लोक त्यांच्या आयुष्यात श्रीमंत होऊ शकत नाहीत कारण ते अयशस्वी लोकांकडून सल्ला घेतात.


अयशस्वी लोकांचा सल्ला घेणे चुकीचे नाही पण यशस्वी कसे व्हावे हे त्यांना विचारू नका, तर त्यांच्या कडून याची माहिती घ्या की त्यांनी कोणती चूक केली ज्यामुळे ते यशस्वी होऊ शकले नाहीत. अयशस्वी लोकांकडून सल्ला घेवून त्यांनी जय चुका केल्या त्या तुम्ही करू नका.

जे लोक श्रीमंत होतात ते अयशस्वी लोकांच्या चुकांमधून शिकतात.


पैसे गुंतवणूक करण्याऐवजी बचत करणे


पैशाने पैसा कमावता येतो ही म्हण तुम्ही ऐकली असेल, पण गरीब लोकांना हे समजत नाही. बहुतेक लोक कमाईपेक्षा बचतीवर त्यांचा भर असतो. आपले पैसे कुठेतरी गुंतवणूक करण्यापेक्षा आपल्या बँकेच्या saving account मध्ये ठेवणे पसंत करतात. 


आपले पैसे बचत व्हावे हे काही चुकीचे नाही आपण आपल्या बचत केलेल्या पैशाचे नियोजन न करणे हे चुकीचे आहे. लोक बचत करण्यासाठी कमी खर्च करतात पण उत्पन्न वाढवण्यासाठी जास्त कष्ट करण्याचा विचारही करत नाहीत. कमाई आणि बचत करण्यापेक्षा गुंतवणूक महत्त्वाची आहे आणि श्रीमंत लोकांना हे चांगलेच माहीत आहे.


श्रीमंत लोकांना भाग्यवान समजने 


तुम्ही असे अनेक लोक पाहिले असतील जे सहसा श्रीमंत लोकांबद्दल म्हणतात की ते भाग्यवान होते आणि म्हणून ते श्रीमंत झाले. मात्र, यशाचा नशिबाशी काहीही संबंध नसतो. यश नशिबाने नव्हे तर मेहनतीने मिळते मेहनत आणि नशीब यात फरक नाही ते एकमेकांना पूरक आहेत.


जे लोक नेहमी गरीब राहतात ते कष्टाऐवजी नशिबावर अवलंबून असतात आणि जीवनाच्या शर्यतीत मागे राहतात.


आर्थिक उद्दिष्टे न ठरवने 


काही लोकांच्या जीवनात कोणताही उद्देश नसतो. त्यांना त्यांच्या भविष्याची आणि भूतकाळाची पर्वा नसते. त्यांच्याकडे कोणतेही ध्येय नाही. त्यामुळे ते नेहमी गरीबच राहतात कारण ते श्रीमंत होण्याचा विचारही करत नाहीत.


ज्या लोकांना श्रीमंत व्हायचे आहे त्यांनी त्यांच्या जीवनात अशी ध्येये निश्चित केली आहेत जी ते सध्या साध्य करू शकत नाहीत. यातूनच त्यांना आयुष्यात कठोर परिश्रम करण्याची प्रेरणा मिळते. जेव्हा ते कठोर परिश्रम करतात तेव्हा त्यांचे उत्पन्न वाढते आणि जेव्हा उत्पन्न वाढते तेव्हा पैसा येतो. 


कमाई पेक्षा जास्त खर्च करने


कमाईपेक्षा जास्त खर्च करणारे अनेक लोक तुम्ही पाहिले असतील. मित्रांसोबत पार्टी करणे, पैसे उधार घेणे इ. जे लोक कमावण्यापेक्षा जास्त खर्च करतात ते कधीही पैसे वाचवू शकत नाहीत, म्हणूनच ते नेहमीच गरीब राहतात. काही लोकांची कमाई कमी असते आणि त्यांना दीखाव्याची सवय असते अशी लोक कधीही श्रीमंत होत नाहीत.


नवीन गोष्टी न शिकणे


काही लोक त्यांच्या जीवनातील बदल स्वीकारत नाहीत. त्यांना त्यांचे जीवन जसे आहे तसे जगायचे आहे. आज कमावने आणि उद्या खर्च करने ही त्यांची परंपरा आहे. त्यांना नवीन शिकायला अजिबात आवडत नाही. त्यामुळे त्यांना जगाविषयी आणि जीवनाबद्दल काहीच माहिती नसते.


ही सवय त्यांना पैसे कमावण्याचे कौशल्य शिकू देत नाही. श्रीमंत लोक नेहमी आपले ज्ञान वाढवत असतात.सारांश,

तर मित्रांनो, या लेखात आम्ही तुम्हाला सांगितले आहे की बहुतेक लोक त्यांच्या आयुष्यात श्रीमंत का होत नाहीत? जर तुम्ही हा लेख काळजीपूर्वक वाचला असेल तर तुम्हाला कळले असेलच की अश्या कोणत्या चुका आहेत ज्या लोकांना श्रीमंत बनू देत नाहीत .


काही लोक श्रीमंत होण्याचा विचार करतात पण त्यांच्यात आत्मविश्वास नसल्यामुळे ते सोडून देतात. आत्मविश्वासाचा अभाव हे गरीब माणसाला श्रीमंत होण्यापासून रोखणारे कारण आहे.


सर्वप्रथम तुम्हाला तुमचा आत्मविश्वास वाढवावा लागेल, त्यानंतर तुम्हाला प्रत्येक काम सोपे वाटेल आणि एक दिवस तुम्हीही श्रीमंत व्हाल.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Menu Site