Ad code

Latest

6/recent/ticker-posts

तुमचा फोन हँग होत आहे का मग या गोष्टी नक्की करा

तुमचा फोन हँग होत आहे का मग या गोष्टी नक्की करा

मोबाइल स्लो होण्याची अनेक कारणे आहेत आजकाल आपण मोबाईल किंवा स्मार्टफोनच्या माध्यमातून बहुतांश काम घरी बसून पूर्ण करतो, पण कधी-कधी असं होतं की महत्त्वाचं काम करत असताना फोन हँग होऊ लागतो. त्यामुळे महत्त्वाची कामे करताना अनेकदा फोन मध्येच अडकून पडतो, त्यामुळे  बहुतेक वेळा आपले थोडक्यात होत आलेले काम अडकून बसते किंवा नष्ट होते यामुळे काही वेळा तोटाही आपल्याला होतो.

या लेखात, आम्ही तुम्हाला स्मार्टफोनच्या काही टिप्सबद्दल माहिती देणार आहोत ज्यामुळे फोन हँग होण्याची समस्या दूर करण्यात मदत होईल. फोनवरून हँगिंगची समस्या दूर केल्याने, तुम्हाला तुमच्या फोनच्या प्रोसेसिंग स्पीडवरही याचा परिणाम दिसेल.

Mobile Hang Problem Solution in marathi

फोन का हँग होतो - फोन हँग होण्याचे कारण

ही कारणे लक्षात ठेवून तुम्ही तुमचा फोन पुन्हा पुन्हा हँग होण्यापासून वाचवू शकता. तसेच तूम्ही या समस्येचे कायमचे निराकरण करण्यात सक्षम होऊ शकता.

सर्वप्रथम मोबाईल का हँग होतो हे जाणून घेऊ.

  • मोबईल RAM कमी असल्यावर 
  • आपल्या मोबईल चे Internal Storage फूल झाले असेल तर.
  • मोबाईलमध्ये Heavy Apps व अनावश्यक Apps ला इन्स्टॉल करून ठेवले असेल तर. 
  • Cache Memory सतत साफ न केल्यामुळे
  • मोबाईल Restart न करणे
  • Unknown Source कडून Game आणि App Download करणे इ.


तुमचा मोबाईल नवीन असो की जुना याने काही फरक पडत नाही. तुम्ही घेतलेल्या निष्काळजीपणामुळे फोन हँग होण्यासारख्या गंभीर समस्या उद्भवतात.

मित्रांनो, मोबाईल हँग होण्याची इतरही अनेक कारणे असू शकतात, परंतु ही काही खास कारणे होती ज्यांमुळे मोबाईल हँग होण्याची समस्या उद्भवते. आता आपल्या फोनचा स्पीड कसा वाढवायचा म्हणजे या कारणांपासून आपण कसे सुटका करू शकतो ते जाणून घेऊ.


How to Solve Phone Hang Problem in Marathi


मित्रांनो, आता मी तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहे ज्याचा वापर करून तुम्ही तुमचा मोबाईल हँग होण्यापासून वाचवू शकता. चला तर मग मोबाईल हँग प्रॉब्लेम सोल्युशन जाणून घेऊ.

Unwanted Apps डिलीट करून मोबाइल चा स्पीड वाढवा

मोबाइल हांग होण्यापासून वाचवण्याची ही सर्वात सोपी पद्धत आहे, जर तुमच्या मोबाईलमध्ये अनेक अॅप्स असतील जे तुम्ही वापरत नसाल तर ते अनइंस्टॉल करा किंवा डिलीट करा. कारण हे अॅप्स तुमच्या मोबाइलच्या बॅकग्राउंडमध्ये चालतात, त्यामुळे आधीच कमी असलेल्या मोबाइल रॅमचा वापर होतो.


मोबाईलमध्ये अनेक असे अॅप्स आहेत जे डिफॉल्टसह येतात, जे तुम्ही डिलीट करू शकत नाही, पण यावरती तुम्ही एक काम करू शकता ते अप्प force stop करून त्यांना थांबवू शकता त्यासाठी तुम्हाला सेटिंगमध्ये जाऊन त्यांना जबरदस्तीने थांबवावे लागेल. हे असे अप्प असतात जे आपल्या नकळत RAM चा वापर करत असतात. 

अनावश्यक फाइल्स हटवा

आपल्या मोबाईलचे इंटरनल स्टोरेज पूर्णपणे फूल झाले असेल तरी  देखील मोबाईल हँग होण्याची समस्या निर्माण करते. कारण आपल्या  मोबाईलला व्यवस्थित काम करण्यासाठी मोकळी जागा हवी असते. मोबाईलच्या चांगल्या परफॉर्मन्ससाठी, कमीत कमी मोबाइल स्टोरेजचे   20-30% अंतर्गत जागा मोकळी असावी.

अॅप्सची  Lite Version वापरा व मोबाइल हँग होण्यापासून वाचवा

मित्रांनो, जर तुमच्या मोबाईलची रॅम कमी असेल, ज्यामुळे तुमचा मोबाईल स्लो व हँग होत असेल, तर तुम्ही बहुतेक अश्या app ची लाईट आवृत्ती वापरणे हाच उत्तम उपाय आहे.


कोणत्याही app चे lite वर्जण हे मूळ अॅपपेक्षा आकाराने खूपच लहान आहेत, परंतु त्यामध्ये मूळ अॅपप्रमाणेच सर्व वैशिष्ट्ये आहेत. लाइट अॅप्स ब्राउझर-आधारित UI प्रदान करतात, म्हणून ते खूप लहान आकाराचे आहेत. आणि आजकाल सर्वाधिक वापरलेले अॅप्स लाइट व्हर्जनच्या स्वरूपात उपलब्ध आहेत. जसे- फेसबुक, इंस्टाग्राम इ.

मल्टीटास्क करू नका

जर तुमचा मोबाइल हाय-एंड/फ्लॅगशिप/टॉप क्लास नसल्यास! तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये एकाच वेळी एकापेक्षा जास्त अॅप वापरू नका!


एकाच वेळी अनेक अॅप्स मॅनेज करणं म्हणजे हाय रॅम + हाय प्रोसेसर स्पीडचं काम! तुमच्या मोबाईलची रॅम आणि प्रोसेसर कमी असेल तर! त्यामुळे साहजिकच तुमचा मोबाइल एकाच वेळी इतके अॅप्स मॅनेज करू शकणार नाही! व तो स्लो व हँग होत राहील. म्हणूनच एकाच वेळी जास्त अप्प्स वापरुन मोबईल चालवू नका. 

वेळोवेळी मोबाईल Reboot/Restart करा

मोबाईल रीस्टार्ट केल्याने काय होईल असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल, त्यामुळे तुमच्या माहितीसाठी मी तुम्हाला सांगतो की जर आपण मोबाईल फोन रिस्टार्ट केला तर तो त्याच्या आधीच्या क्षमतेइतके सतत काम करू शकतात.

असे आपल्याला काम करण्यासाठी विश्रांती आवश्यक आहे. त्याचप्रमाणे मोबाइल प्रोसेसरलाही विश्रांतीची गरज असते. जेणेकरून ते व्यवस्थित काम करू शकेल, 3-4 दिवसांतून एकदा तुमचा मोबाइल रीस्टार्ट करा. अनेक अॅप्स मोबाईलमध्ये बॅकग्राउंडमध्ये चालतात, असे केल्याने ते बंदही होतील. यानंतर मोबाईल पूर्वीपेक्षा अधिक वेगवान होईल.

unknown source वरुण  अॅप्स डाउनलोड करू नका

लोकांना वाटते की इंटरनेटवरील सर्व काही सुरक्षित आहे परंतु तसे नाही. जेव्हा आवश्यक असेल तेव्हा, फक्त Google Playstore वरून अॅप्स स्थापित करा कारण येथे उपलब्ध अॅप्स वापरणे सुरक्षित आहे.

तुम्ही गुगल किंवा कोणत्याही unknown source वरून तुमच्या मोबाईलमधील अॅप्स किंवा कोणतीही फाईल डाउनलोड केल्यास तुमच्या मोबाइलमध्ये व्हायरस आणि मालवेअर येण्याचा धोका असतो.

त्यामुळे तुमच्या मोबाईलमधील डेटा लीक होण्याची आणि मोबाईल हँग होण्याची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे unknown source कडून कोणतेही अॅप किंवा फाइल कधीही डाउनलोड करू नका.

मोबाईल सॉफ्टवेअर अपडेट करत रहा

इंटरनेट संपेल या मुळे देखील अनेकजण सॉफ्टवेअर अपडेट नोटिफिकेशन मिळाल्यानंतरही मोबाईल अपडेट करत नाहीत. तुम्ही हे कधीही करू नये, जेव्हाही नवीन अपडेट उपलब्ध असेल तेव्हा फोन अपडेट करा. यामुळे तुमच्या मोबाईलचा परफॉर्मन्स पूर्वीपेक्षा खूपच चांगला होईल. आजकाल जवळपास सर्वच मोठे ब्रँड वेळोवेळी सॉफ्टवेअर अपडेट्स देत असतात. तुम्हाला फक्त ते अपडेट करावे लागतील.

निष्कर्ष

आज या पोस्टमध्ये मी तुम्हाला त्या सर्व गोष्टी सांगितल्या आहेत, ज्याचे अनुसरण करून तुम्ही तुमच्या मोबाईलच्या हँग होण्याच्या समस्येपासून मुक्त होऊ शकता. कारण ते तुमच्या मोबाईलच्या आयुष्यासाठीही खूप महत्वाचे आहे.

आज आपण शिकलो मोबाईल हँग का होतो आणि मोबाईल हँग होण्याची समस्या कशी दूर करावी?

जर तुम्ही पण या टिप्स चा  वापर करून तुमचा मोबईल फोन हांग होण्यापासून वाचवत असाल तर व  या टिप्स तुमच्या मोबईल मध्ये काम करत आहेत काम करत आहेत की नाही हे कमेंट करून सांगा.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Menu Site