Ad code

Latest

6/recent/ticker-posts

घटस्थापना करण्याची पारंपरिक पद्धत, घटस्थापनेचा शुभ मुहूर्त आणि महत्त्व : सर्व काही जाणून घ्या

घटस्थापना म्हणजे काय, घटस्थापनेचा शुभ मुहूर्त आणि महत्त्व सर्व काही जाणून घ्या

आजपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे. या नऊ दिवसांत देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते.  यावेळीही नवरात्री सर्वांसाठी आनंद सुख समृद्धी घेऊन येणार आहे. नवरात्रीचे हे नऊ दिवस पूर्ण उत्साहात साजरे केले जातात भक्त व आपले हिंदू बांधव या सणाची आतुरतेने वाट पाहत असतात. घटस्थापणे दिवशी दुर्गा मातेची पूजा मोठ्या विधीपूर्वक करावी. 


नवरात्रीच्या नऊ दिवसांत जो कोणी देवीची खऱ्या मनाने भक्तिभावाने पूजा करतो, त्याला देवी आपल्या दोन्ही हातांनी भरभरून आशीर्वाद देते, अशी श्रद्धा आहे. नवरात्रीच्या काळात दुर्गा देवीची पूजा मोठ्या थाटामाटात करावी आणि श्रृंगार करावा, असे सांगितले जाते. आईसोबतच भक्ताने स्वतःलाही खूप सजवावे कारण यातून भक्ताचा आनंद दिसून येतो.

घटस्थापना म्हणजे काय :- Ghatasthapana in marathi 

घटस्थापना हा नवरात्रीचा पहिला दिवस म्हणजेच नवरात्रीच्या नऊ दिवसांच्या उत्सवांची सुरुवात आहे. घटस्थापना हा नवरात्रीच्या पहिल्या दिवशी केला जाणारा एक अत्यंत महत्वाचा विधी आहे. घटस्थापणेला कलश स्थापना असे देखील म्हटले जाते. घटस्थापना हा एक विधी आहे ज्यामध्ये कलश ला  "पवित्र पाण्याने" भरले जाते. भांड्यात मातीभारून त्यात सात प्रकारचे धान्य टाकून ते वाढवले जाते  हिंदूंचा असा विश्वास आहे की उत्सवादरम्यान देवी त्यात निवास करते. हिंदू धर्मग्रंथांमध्ये नवरात्रीच्या सुरुवातीला विशिष्ट वेळेत घटस्थापना विधी करण्यासाठी चांगले नियम आणि मार्गदर्शक तत्त्वे आहेत.

घटस्थापनेसाठी शुभ मुहूर्त कोणता? Ghatsthapana 2023

नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापनेला विशेष महत्त्व आहे. या वर्षी घटस्थापनेचा शुभ मुहूर्त १५ ऑक्टोबरला सायंकाळी ६.१३ पर्यंत असेल. या काळात चित्रा नक्षत्र असेल जे घटस्थापनासाठी अत्यंत शुभ आहे.

घटस्थापना साठी महत्वाचे साहित्य Navratri Ghatsthapana 

सर्व प्रथम, घटस्थापना योग्य प्रकारे करण्यासाठी आपल्याला कोणती सामग्री आवश्यक आहे ते जाणून घेऊया.

हळद, कुंकू, गुलाल, रांगोळी, कापुर, धूप, आंब्याची पाने, पूजेसाठी हर व फुले, पंचामृत, सात प्रकारचे धान्य, 

रुंद मातीचे भांडे, थोडे गंगाजल किंवा साधे पाणी, सुपारी, एक नारळ, शक्यतो गुंडाळलेला अखंड, लाल स्वच्छ कापड, पाच प्रकारची फळे, पाट, तांब्याचा तांब्या ई. 

घटाची स्थापना कशी करावी Shardeey Navratri

जर तुम्हाला तुमच्या घरात कलश बसवायचा असेल तर सर्व प्रथम जेथे घटस्थापना करायची आहे ती जागा स्वच्छ करून घ्या. त्या जागी रांगोळी काढून ती जागा सजवा.

यानंतर एका पाठवर मातीचे भांडे घेऊन (किंवा आपल्याकडे मातीचे भांडे नसेल तर तुम्ही ताट घेवू शकता त्यात माती भरून घ्या) त्यात स्वच्छ माती टाका व नंतर त्यात सात प्रकारचे धान्य पेरून पाणी शिंपडावे. 

आता पूजेच्या ठिकाणी कलश स्थापित करा कलशात स्वच्छ पानी घेवून त्यात आंब्याची पाने ठेवून अक्षता व नाणी टाकून आणलेला नारळ त्यात शेंडा वर करून ठेवा. त्यावर हळद व कुकवाच स्वस्तिक काढा. तुम्ही हा कलश त्या धान्य पेरलेल्या भांड्यात किंवा त्याचे शेजारी ठेवू शकता.

आता माँ दुर्गेच्या फोटोला किंवा मूर्तीला हळद कुंकू लावून, मातेची सोळा अलंकार करा आणि तिला फळे, मिठाई आणि फुले अर्पण करा.

जर तुम्ही अखंड दिवा लावत असाल तर कलशाजवळ मोठा दिवा लावा आणि वेळोवेळी तूप टाकत रहा.

मातेची पारंपरिक पद्धतीने पूजा अर्चना करा तिला नैवेद दाखवा. सकाळ संध्याकाळ मातेची आरती करायला विसरू नका.

नवरात्रीमध्ये उपवास करताना या गोष्टी लक्षात ठेवा

नवरात्रीच्या काळात नऊ दिवस अन्न न खाता आणि फक्त फळे खाण्याचा नियम आहे, परंतु असे कठोर नियम पाळता येत नसतील तर दूध आणि फळांचा रस पिऊनही उपवास करता येतो. जर हे देखील करता येत नसेल तर तुम्ही एक वेळ खाऊन उपवास करू शकता किंवा संपूर्ण नऊ दिवस मीठाशिवाय अन्न खाण्याचा नियम देखील घेऊ शकता.

नवरात्रीच्या उपवासात लसूण, कांदा, तंबाखू, सिगारेट, पान मसाला आणि कोणत्याही प्रकारचे मादक पदार्थाचे सेवन करू नये. या दिवसात रागावणे आणि खोटे बोलणे टाळावे. हे नियम लक्षात घेऊन उपवास केला पाहिजे. आजारी, लहान मुले व वृद्धांनी उपवास करू नये. तसेच, ज्यांना रात्री उशिरापर्यंत जागरण करावे लागते किंवा दिनचर्या बिघडलेली असते त्यांनीही उपवास टाळावा.

काही ठिकाणी यात बार्ली च्या बिया किंवा गहू देखील पेरतात. तर काही ठिकाणी घटस्थापणे दिवशी फक्त घरातील देवांची पारंपरिक पद्धतीने पूजा केली जाते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Menu Site