Ad code

Latest

6/recent/ticker-posts

हे whatsapp चॅनल काय आहे New Whatsapp Update

हे Whats app चॅनल नेमक आहे तरी काय 

WhatsApp हे जगभरातील संवादाचे एक अतिशय शक्तिशाली साधन बनले आहे यात शंका नाही. whatsapp channel हे नवीन फीचर सादर केल्यामुळे ते आणखी लोकप्रिय होत आहे. WhatsApp ने आपल्या नवीन अपडेट मध्ये whatsapp चॅनल हे नवीन feature अपडेट केल आहे. ज्यांच्या whatsapp वर हे feature दिसत नाहीये त्यांनी whatsapp update करून याचा वापर करू शकतात. Whats app चॅनेल हे whats app च्या broadcast ची उपडेटेड  आवृत्ती आहे.


तुम्हाला What is WhatsApp channel? हे जाणून घ्यायचे आहे का? जर होय तर आजचा लेख तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे.

टेलीग्राम चॅनेलप्रमाणेच, WhatsApp चॅनेल देखील तुम्हाला तुमच्या आवडत्या निर्माते, सेलिब्रिटी, व्यवसाय यांच्याकडील सर्व नवीनतम अपडेट जाणून घेण्यास मदत करतात. आजच्या लेखात आपण नवीन “WhatsApp channel kaay aahe”, तसेच WhatsApp channel कसे कार्य करते, व्हाट्सएप चॅनेलची वैशिष्ट्ये काय आहेत याबदल जाणून घेणार आहोत.

WhatsApp चॅनल म्हणजे काय?

जर तुम्हाला telegram channel बद्दल माहीत असेल तर तुमच्यासाठी whatsapp चॅनल बद्दल जाणून घेणे खूपच सोपे आहे. whatsapp channel हे telegram channel प्रमाणेच काम करते. ज्याप्रमाणे telegram चॅनल वरती प्रसारक माहिती शेअर करत राहतात त्याचप्रमाणे तुम्ही WhatsApp channel चा एक-मार्गी प्रसारण साधन म्हणून वापर करू शकता, whatsapp चॅनल हे विशेषत प्रशासकांसाठी खूपच फायदेमंद ठरणार आहे करना याचा वापर करून ते त्यांच्या सदस्यांना मजकूर, फोटो, व्हिडिओ इतर लिंक्स सहजपणे पाठवू शकतात. 

तुम्ही WhatsApp वर अपडेट्स नावाच्या नवीन टॅबमध्ये हे चॅनेल पाहू शकता, आपण निवडलेल्या आणि फॉलो केलेल्या चॅनेलची यादी तुम्हाला येथे पाहायला मिळेल यात सेलेब्रिटी, न्यूज चॅनल, निर्माते यांचे चॅनल  तुम्ही येथे पाहू शकता.

टेलीग्राम चॅनल प्रमाणेच व्हॉट्सअॅप चॅनेलवर देखील तुम्ही तुमचा संदेश तुमच्या सर्व सदस्यांना किंवा फॉलोअर्सपर्यंत एकाच वेळी पोहोचवू शकता. यामध्ये तुमचे फॉलोअर्स फक्त तुमच्या मेसेजवर प्रतिक्रिया देऊ शकतात, तर ते तुम्हाला तुमच्या चॅनेलमध्ये मेसेज पाठवू शकत नाहीत.

Whatsapp चॅनेल कसे तयार करावे संपूर्ण मार्गदर्शक

जर तुम्हाला ही whataspp channel तयार करायचे असेल ते तुम्ही अगदी फ्री मध्ये व सोप्या पद्धतीने करू शकता. whatsapp चॅनल तयार करणे हे एकदम फ्री आहे, तुम्ही या द्वारे एकाच वेळी असंख्य लोकांशी एकाच वेळी कनेक्ट राहू शकता. 

whatsapp channel तयार करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा. 

व्हॉट्सअॅप चॅनेल तयार करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला आपले whatsapp app अपडेट करावे लागेल.

अॅप अपडेट केल्यानंतर आपल्याला whatsapp ओपन करून अपडेट बटणावर जाऊन status च्या खाली तुम्हाला व्हॉट्सअॅप चॅनेलचा पर्याय दिसेल.

येथे तुम्हाला चॅनल च्या समोर अधिक चे चिन्ह दिसेल त्यावरती क्लिक करून तुम्ही create channel वर क्लिक करून चॅनल तयार करू शकता.

येथे  तुम्हाला व्हॉट्सअॅप चॅनलचे नाव टाकावे लागेल.तुम्ही तुमच्या व्हॉट्सअॅप चॅनेलचे नाव तुमच्या इच्छेनुसार टाकू शकता.

त्यानंतर तुम्हाला तुमच्या WhatsApp चॅनेलसाठी इमेज निवडावी लागेल. जो तुमचा लोगो असू शकतो आणि त्याद्वारे तुम्ही whatsapp चॅनल सहज ओळखू शकता.

या नंतर तुम्हाला व्हॉट्सअॅप चॅनेलचे discription सेट करावे लागेल, यात तुम्ही हा चॅनल का बनवलात तुमच्या व्हॉट्सअॅप चॅनेलचा हेतू आहे आणि व्हॉट्सअॅप चॅनल कशासाठी तयार केले गेले आहे याची थोडक्यात माहिती यात भरा, ही माहिती तुमच्या फॉलोअर्स आणि सदस्यांना व्हॉट्सअॅप चॅनेलमध्ये सामील होण्यासाठी खूप मदत करेल.

WhatsApp Channel ची प्रमुख वैशिष्ट्ये

आता व्हॉट्सअॅप चॅनलची प्रमुख वैशिष्ट्ये कोणती आहेत ते जाणून घेऊया.

अधिक सुरक्षित आहे 

whatsapp channel मध्ये कोणत्याही चॅनेलच्या अॅडमिनसाठी ही चांगली गोष्ट आहे की तुमचा फोन नंबर, पत्ता यासारखा वैयक्तिक डेटा कोणत्याही प्रकारे इतरांकडे जाणार नाही. अॅडमिन आणि फॉलोअर्स या दोघांच्याही तुमच्या गोपनीयतेची विशेष काळजी घेतली गेली आहे.

Advanced channel update

whatsapp channel वर तुम्हाला तुमच्या पसंतीनुसार फिल्टर केलेल्या चॅनेलची सूची दिसेल. सोबतच नवीनतम किंवा लोकप्रिय channels जे त्यांची सूची देखील तुम्हाला येथे बघायला मिळते.

Reaction

तुम्ही निवडलेल्या व पाहत असणाऱ्या कोणत्याही चॅनल वरील पोस्टवर  तुमचा अभिप्राय देण्यासाठी तुम्ही थेट स्टिकर्स आणि इमोजीसह प्रतिक्रिया देऊ शकता.

Forward access

कोणीही कोणत्याही चॅनेलच्या पोस्टची लिंक त्यांच्या मित्रांसह सहज शेअर करू शकतो. परस्परसंवाद वाढवण्यासाठी समान डोमेनमधील इतर चॅनेलसह अतिरिक्त दुवा देखील असेल.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Menu Site