Ad code

Latest

6/recent/ticker-posts

बाल आधार कार्ड: लहान मुलांचे आधार कार्ड कसे बनवायचे, सर्व माहिती जाणून घ्या

Baal Aadhar Card : लहान मुलांसाठी आधार कार्ड कसे बनवायचे, सविस्तर माहिती जाणून घ्या 


प्रत्येक भारतीय नागरिकाकडे स्वताचे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे. नवीन बदलानुसार ५ वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या मुलांसाठीही सरकारने आधार कार्ड अनिवार्य केले आहे. हे लक्षात घेऊन UIDAI ने बाल आधार कार्ड जाहीर केले आहे. 

आज आम्ही तुम्हाला या लेखाद्वारे बाल आधार कार्डशी संबंधित सर्व महत्त्वाची माहिती देणार आहोत. जसे की बाल आधार कार्ड म्हणजे काय?, बाल आधार कार्ड चा उद्देश, बाल आधार कार्ड चे फायदे, बाल आधार कार्ड ची वैशिष्ट्ये, बाल आधार कार्ड काढण्यासाठी  लागणारी पात्रता, अर्ज प्रक्रिया कशी करावी इ. सर्व माहिती आजच्या या लेखात देणार आहोत  तर मित्रांनो, जर तुम्हाला बाल आधार कार्डशी संबंधित संपूर्ण माहिती मिळवायची असेल, तर आमचा लेख शेवटपर्यंत वाचा.

Baal Aadhaar Card : लहान मुलांसाठी आधारकार्ड बनवायचे असेल तर अर्ज ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही प्रकारे करता येतो. शाळेत प्रवेश घेण्यासाठी असो किंवा एखादे सरकारी काम करायचे असो तसेच  इतर कामांसाठी मुलांचे आधार कार्ड विचारले जाते. जर तुम्ही अजूनही तुमच्या मुलाचे आधार कार्ड बनवले नसेल, तर तुम्ही आजच त्यासाठी सहज अर्ज करू शकता. या पोस्टमध्ये तुम्हाला त्याबद्दल संपूर्ण माहिती मिळेल.

बाल आधार म्हणजे काय?


बाल आधार कार्ड हे नवजात बालक ते ५ वर्षे वयोगटातील लहान मुलांसाठी बनवले जाते. देशातभरात  सुरू असलेल्या बाल आधार मोहिमेअंतर्गत बाल आधार कार्ड बनवली जातात. बाल आधारकार्डच्या माध्यमातून मुलांना व त्यांच्या पालकांना अनेक सुविधांचा लाभ दिला जातो. मुलांसाठी बनवलेल्या बाल आधार कार्ड पालकांच्या आधार कार्ड शी लिंक केले जाते. बाल आधार कार्ड बनवण्यासाठी biometrik घेतले जात आही जेव्हा मुलाचे वय 5 वर्षांपेक्षा जास्त असते, तेव्हा त्याचे बायोमेट्रिक्स प्रथमच अपडेट केले जातात. तसेच मुल १८ वर्षाची  झाल्यानंतर  दुसऱ्यांदा बायोमेट्रिक्स घेतले जातात. बाल आधार कार्ड हे सामान्य सामान्य आधारकार्ड पेक्षा वेगळा असतो. बाल आधार कार्डचा रंग निळा आहे तसंच बाल आधार कार्डवर 'त्याची वैधता मुलाच्या वयाच्या ५ वर्षांपर्यंत आहे' असे लिहिलेले असते.


मुलांसाठी आधार कार्ड कसे बनवायचे –How to Apply for Bal Aadhaar Card


ऑनलाइन किंवा ऑफलाइन बाल आधार कार्ड बनवण्यासाठी, पालकांपैकी एकाकडे आधार क्रमांक असणे आवश्यक आहे. बाल आधारसाठी तुम्ही ऑनलाइन अर्ज कसा करू शकता ते येथे जाणून घ्या.

पण त्याआधी, बाल आधार कार्ड बनवण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत हे जाणून घेणे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे.

आवश्यक कागदपत्रे


1) मुलाचे जन्म प्रमाणपत्र किंवा सरकारी रुग्णालयातून डिस्चार्ज स्लिप
2) पालकांचे आधार
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे 5 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलाच्या बायोमेट्रिक प्रमाणीकरणासाठी, पालकांना आधार सेवा केंद्रात जावे लागते.

बाल आधारसाठी ऑनलाइन नोंदणी कशी करावी


 • सर्व प्रथम, अर्जदाराने UIDAI च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.
 • अधिकृत वेबसाइटला भेट दिल्यानंतर, आपल्या समोर home page  उघडेल.
 • या होमपेजवर तुम्हाला गेट आधार ऑप्शन मधून “Book an appointment” हा पर्याय दिसेल, तुम्हाला या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
 • या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर पहिले पेज तुमच्या समोर ओपन होईल.
 • या पृष्ठावर, तुम्हाला तुमचे राज्य आणि तुमचे जवळचे स्थान निवडावे लागेल, आधार केंद्र निवडावे लागेल आणि तुमची अपॉइंटमेंट बुक करावी लागेल.
 • त्यानंतर, तुम्ही तुमचा मोबाईल फोन नंबर टाकून आणि वन-टाइम पासवर्ड (OTP) तपासून भेटीची तारीख बुक करु शकता.
 • यानंतर, तुम्हाला तुमच्या मुलाला घेवून भेटीच्या दिवशी त्या ठिकाणी घेऊन जावे लागेल.
 • तिथे जाऊन तुमच्या मुलाचे आधार कार्ड बनवले जाईल.

बाल आधार कार्डसाठी ऑफलाइन अर्ज कसा करावा?

 • सर्वप्रथम, तुम्हाला तुमची कागदपत्रे आणि तुमच्या मुलाला आधार केंद्रात आणावे लागेल.
 • बाल आधार कार्ड मिळवण्यासाठी तुम्हाला नोंदणी फॉर्म भरून अर्ज करावा लागेल.
 • तुम्हाला अर्जावर आवश्यक असलेली सर्व माहिती भरावी लागेल जसे की मुलाचे नाव, पालकांचा आधार क्रमांक इ. मुलाचे जन्म प्रमाणपत्र आणि पालकांपैकी एकाचा आधार क्रमांक ही सर्व माहिती भरून तो अर्ज आधार केंद्रात  भरावा लागेल.
 • बाल आधार कार्ड बनविण्यासाठी, तुमचा मोबाईल क्रमांक देखील केंद्राकडे नोंदणीकृत असणे आवश्यक आहे आणि मुलाचे छायाचित्र सादर करणे आवश्यक आहे.
 • मुलाचे कार्ड आधार पालकांच्या आधार कार्डशी लिंक केले जाईल आणि त्यानंतर अर्ज सादर करावा लागेल.
 • त्यानंतर, मुलाच्या आधार कार्डची नोंदणी आणि पडताळणी पूर्ण झाल्यावर.
 • तुम्ही दिलेल्या मोबाईल फोन नंबरवर तुम्हाला एक confirmation संदेश प्राप्त होईल.
 • त्यानंतर दोन महिन्यांत बाल आधार कार्ड तुम्ही दिलेलें पत्यावर प्राप्त होईल.


अशाप्रकारे, तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने बाल आधार कार्ड बनवण्यासाठी अर्ज करू शकता. आशा आहे की आता तुम्ही यासाठी सहज अर्ज करू शकाल आणि तुमच्या मुलांसाठी बनवलेले बाल आधार कार्ड मिळवू शकाल.

आम्हाला आशा आहे की तुम्हाला ही माहिती आवडली असेल, जर होय तर हा लेख इतर लोकांसोबत शेअर करा जेणेकरुन त्यांना देखील याबद्दल माहिती मिळेल आणि त्यांच्या मुलांचे आधार कार्ड बनवता येईल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Menu Site