Ad code

Latest

6/recent/ticker-posts

Google adsense चे aproval मिळत नसेल तर इथून तुमचा ब्लॉग monetize करा. Best Google Adsense Alternative

आता google adsense शिवाय तुमचा ब्लॉग आणि वेबसाइट monetize  करा. Best Google Adsense Alternative to monetize your blog or website


ब्लॉग बनवलाय त्यात रोज नवीन पोस्ट टाकतोय पण अजून Google AdSense चे aproval आलेले नाही किंवा मिळत नाही. याचे काय कारण असावे आपण कोणती चूक करतोय का हे विचार करणे सोडा, आजच्या काळात नवीन ब्लॉगरसाठी Google AdSense चे approval मिळवणे खूप कठीण झाले आहे.


Google AdSense च्या टर्म्स आणि कंडिशन्स इतक्या कडक झाले आहेत कीब्लॉग मध्ये थोडीशी जरी चूक आढळली तरी Google AdSense चे aproval मिळत नाही. तसेच नवीन ब्लॉगरला त्याच्या ब्लॉगमध्ये काय समस्या आहे हे देखील समजत नाही. ब्लॉग तयार करून Google AdSense मधून कमाई करणे हा प्रत्येक ब्लॉगर्सचा ब्लॉगिंगमध्ये येण्याचा उद्देश असतो, परंतु जेव्हा ते आपल्या ब्लॉग वरती ads show व्हाव्यात आणि त्यातून कमाई व्हावी या साठी Google AdSense कडे अप्लाय करतात तेव्हा त्यांचे submition नाकारले जाते, खूप असे नविन ब्लॉगर Google AdSense aproval न मिळाल्याने डिमोटिव्ह होऊन ब्लॉगिंग सोडण्याचा निर्णय घेतात.

आज आम्ही हा लेख फक्त त्या ब्लॉगर्ससाठी लिहिला आहे. ज्यांचे Google AdSense aprove होत नाही किंवा ते Google AdSense सोबत अजून दुसरे ad network च्या ads आपल्या ब्लॉग वरती शो करून आपली कमाई वाढवू इच्छित आहेत.या लेखात, आम्ही top 10 best Google AdSense alternative platforms  बद्दल सांगणार आहोत, ज्याचा वापर करून तुम्ही तुमच्या ब्लॉगवर without किंवा with Google AdSense चांगली कमाई करू शकता.


चला पाहुयात असे कोणते प्लॅटफॉर्म आहेत ज्याचा वापर तुम्ही तुमच्या ब्लॉग मध्ये करून तुमची कमाई करू शकता. तुम्ही या ads नेटवर्क चा वापर करून तुम्ही तुमचा ब्लॉग monetize करू शकता. जर तुमच्याकडे पहिल्यापासून Google AdSense चे approval असेल तरीही हरकत नाही. चला तर जाणून घेवूयात या platforms बद्दल. 

#1 Taboola


Google Adsense Alternatives या यादीतील पहिला क्रमांकवर  येते Taboola. जर तुमचा ब्लॉग वर गूगल adsence चे आपरोवळ मिळाले नसेल तर तुमच्यासाठी Taboola हे पैसे कमवण्याचे एक मोठे platform आहे ज्याद्वारे तुम्ही तुमचा ब्लॉग monetize करू शकता.

Taboola हे सर्वात लोकप्रिय पर्यायी जाहिरात प्लॅटफॉर्मपैकी एक आहे, तसेच या platform चा वापर खूप असे मोठमोठे ब्लॉगर्स देखील करत आहेत, taboola तुम्हाला english तसेच विविध भाषांच्या ब्लॉग साठी उपयुक्त आहे यामध्ये तुम्ही तुमचा हिन्दी blog monetise करू शकता. हे कोणत्याही भौगोलिक स्थानावर 100% फिल रेट प्रदान करते आणि प्रचारित उत्पादन सूची समाविष्ट करते. 

taboola मध्ये अश्या ads शो केल्या जातात जय तुमच्या ब्लॉग ला अनुसरून असतात, visitor ला हे समजण्यात वेळ लागतो की ही ads आहे व ते सहजरीत्या त्या ads वर क्लिक करतात ज्यामुळे तुमची कमाई वाढते. Taboola त्या साइट्ससाठी आहे ज्यां site वर भरपूर ट्रॅफिक आहे,  जर तुम्ही नवीन किंवा लहान साइट मालक असाल, तर तुम्ही या प्लॅटफॉर्मचा लाभ घेवू शकणार नाहीत कारण त्याचा लाभ घेण्यासाठी, किमान 500,000 monthly views असणे आवश्यक आहेत.

#2 Mgid

Mgid हे एक Ad network आहे जे Publisher आणि Advertisers या दोघांना आपल्या advertise च्या सेवा  देते. google adsence प्रमाणेच आपली सेवा देते आनी हे खूप लोकप्रिय ad network platform आहे कारण हे सर्व देशांमध्ये आपली सेवा प्रदान करते. 

तुमच्या कडे गूगल adsense चे aproval असो किंवा नसो तुम्ही Mgid च्या सेवेचा फायदा घेवू शकता, यामुळे तुमचे google adsense च्या अकाऊंट वर कोणताही वाईट परिणाम होत नाही.

Mgid चे aproval घेण्यासाठी तुमच्या ब्लॉग वर प्रतिदिन 3000 चे ट्रॅफिक असणे आवश्यक आहे तरच तुमचा ब्लॉग mgid वर aprove होईल. तुम्ही तुमची कमाई $100 पूर्ण होतील तेव्हा ती रक्कम तुम्ही तुमच्या बँक खात्यात ट्रान्सफर करू शकता. यामध्ये तुम्ही तुमचा मराठी ब्लॉग देखील monetise करू शकता.
 

#3. Media.net


Media.net ही एक Casual advertising नेटवर्क प्रोग्राम आहे ज्याला Bing आणि Yahoo ने तयार केले आहे. जर तुम्हाला google Adsense चे अप्रूव्हल मिळाले नसेल तर तुम्ही Media.net वरुण तुमचा ब्लॉग monetize करू शकता. तुम्हाला Media.net च्या जाहिराती आपल्या ब्लॉग वर लावण्यासाठी media.net चे अप्रूव्हल घ्यावे लागेल यासाठी तुमच्या ब्लॉग वर english ब्लॉग पोस्ट असणे आवश्यक आहे. 

Media.Net फक्त इंग्रजी ब्लॉगला सपोर्ट करते तसेच तुमच्या ब्लॉगवर  US किंवा UK मधून ट्रॅफिक आले पाहिजे तरच तुम्हाला Media.net चे aproval मिळेल. media.net ला तुम्ही Google AdSense च्या सोबत देखील वापरू शकता. जेव्हा तुमच्याकडे Media.net वर $100 पूर्ण होतील तेव्हा ती रक्कम तुम्ही तुमच्या बँक खात्यात ट्रान्सफर करू शकता.

#4. Infolinks


Infolinks हा एक उत्तम  Google Adsense altenative पर्याय आहे जो त्याच्या प्रत्येक publisher ला dvertising च्या बदल्यात   चांगले पैसे देतो.

Infolinks ने तुम्ही तुमच्या ब्लॉगवर popup जाहिराती लावू शकता, media.net प्रमाणेच तुम्ही या नेटवर्कवर तुमचा ब्लॉग हिंग्लिशमध्ये असेल तरच तुम्हाला यामध्ये aproval मिळेल.

infolinks मध्ये तुम्हाला In-fold, in-text, in-frame आणि In-tag या सारख्या जाहिराती मिळतात त्यामुळे तुमच्या ब्लॉग चे इन्कम वाढते, infolinks चे aproval मिळणे कह्हुप सोपे आहे कारण तुमच्या ब्लॉगवर जास्त ट्रॅफिक लागत नाही, तसेच यामध्ये  तुमच्या ब्लॉग content च्या संबंधित जाहिराती तुमच्या ब्लॉग वर  दाखवते

Infolinks वर तुम्‍हाला Paypal द्वारे पेमेंट मिळते तसेच यामध्ये तुमचे किमान $50 झाले तर तुम्ही यामधून withdrawl करू शकता. जर तुम्हाला बँक ट्रान्स्फर करायचे असेल तर यासाठी तुम्हाला किमान $100 चे पेमेंट करावे लागेल.

#5 Chitika


Chitika हे High Paying Ads Network आहे, जर तुम्हाला गूगल अ‍ॅडसेन्स मंजूर होत नसल्यास तुम्ही तुमचा ब्लॉग Chitika या ad platform वरुण monetise करू शकता. आपल्या ब्लॉग वर  Chitika चे aproval घेने खूप सोपे आहे कारण याच्या टर्म्स आणि conditions खूप कमी आहेत. यामध्ये तुम्हाला फक्त  तुमचे एक खाते तयार करायचे आहे आणि आपल्या ब्लॉगवर Chitika च्या जाहिराती दाखवू शकता.

Chitika आपल्या ब्लॉगवर 3 प्रकारच्या जाहिराती ऑफर करते ज्यात  Search Targeted Ads, Mobile advertising आणि Local advertising यांचा समावेश आहे आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे याद्वारे तुम्ही तुमच्या आवडीच्या जाहिराती निवडून आपल्या ब्लॉग वर पब्लिश करू शकता. Chitika Network वर 350,000 पेक्षा जास्त दर्जेदार प्रकाशक आहेत.


#6 AdNow


इतर platforms प्रमाणे Adnow हे देखील आपल्याला आपले ब्लॉग व वेबसाइट monetise करण्याची संधि देते. Adnow चा वापर  सध्या 114 देशातील 160,000 हून अधिक लोक वापरत आहेत व त्यातून कमाई करत आहेत.

तुम्हाला Adnow मध्ये सहज मंजूरी मिळते, यामध्ये तुम्ही तुमचा मराठी ब्लॉग सह विविध language ला सपोर्ट करत असल्याने तुम्ही तुमचा ब्लॉग सहज monetise करू शकता. जेव्हा तुमच्याकडे Adnow वर $10 जमा होतात तेव्हा तुम्ही तुमच्या PayPal वर ट्रान्सफर करू शकता.

#7 Revenue Hits


Revenue Hits हे देखील एक लोकप्रिय Ad नेटवर्क आहे जे Best Google Adsense alternative platforms मध्ये येते, Revenue Hits च्या मदतीने तुम्ही तुमच्या ब्लॉग वर अधिक कमाई करू शकता, हे Ad नेटवर्क CPA जाहिरातींवर आधारित आहे.

येथे तुम्ही custom टूलबार वापरुन ads सेटिंग करू शकता, येथे तुम्हाला बॅनर, स्लाइडर, पॉप-अप इत्यादी जाहिराती मिळतात. हे तुम्हाला तुमचे पेमेंट $20 होतात तेव्हा तुम्ही Paypal द्वारे पैसे तुमच्या खात्यात घेवू शकता.

#8 Bidvertiser


Bidvetrtiser हे  ज्या वेबसाइट वर कमी ट्रॅफिक आहे त्या ब्लॉग व वेबसाइट साठी खूप उत्तम आहे. bidvertiser हे पे प्रति क्लिक जाहिरात नेटवर्क आहे.

BidVertiser 2002 मध्ये सुरू करण्यात आले होते, BidVertiser जाहिरात स्वरूपांची एक मोठी श्रेणी प्रदान करते. 
जर तुमच्या ब्लॉगवर अ‍ॅडसेन्स मंजूर होत नसेल किंवा तुमच्यावर बंदी घातली गेली असेल तर तुम्ही bidvertiser वापरू शकता.

BidVertiser चे कमीत कमी  पेआउट PayPal द्वारे $20 आणि बँक ट्रान्सफर चे  $50 आहे. याशिवाय, BidVertiser वर खाते तयार करणे खूप सोपे आहे. तुम्हाला फक्त काही पायऱ्या फॉलो कराव्या लागतील.

#9 Viglink


Viglink जाहिरात नेटवर्क इतर Ad network पेक्षा पूर्णपणे वेगळे आहे. तरीही नवीन ब्लॉगरसाठी या द्वारे पैसे कमविणे खूप सोपे आहे. Viglink सामान्य लिंक्सना Affiliate Links मध्ये रूपांतरित करते. जेव्हा तुमच्या द्वारे दिलेल्या लिंकवरून कोणी खरेदी करतो तेव्हा  तुम्हाला कमिशन मिळते.

#10 Ezoic

Ezoic एक प्रकारे Google AdSense Alternative पर्यायांमध्ये सर्वोत्तम आहे कारण त्यातील कमाई Google AdSense पेक्षा खूप जास्त आहे. कारण हे एक   Google चे उत्पादन आहे जे त्याच्या जाहिरात व्यवस्थापकाद्वारे जाहिराती दाखवते.

Ezoic मध्ये तुम्हाला उच्च दर्जाच्या जाहिराती पाहायला मिळतात, ज्यामुळे तुम्हाला जास्त CPC मिळते आणि तुमची कमाई जास्त होते.
परंतु त्याची मान्यता मिळविण्यासाठी तुम्हाला काही अटी पूर्ण कराव्या लागतील. जसे तुमच्याकडे चांगली रहदारी असली पाहिजे, तरच Ezoic मंजूर होईल. पण यामध्ये पेमेंट खूप लेट होतो त्यामुळे जास्तीत जास्त ब्लॉगगर्स याचा वापर करणे टाळतात. 

निष्कर्ष Conclusion


आशा आहे आत्तापर्यंत तुम्हाला Google Adsense च्या पर्यायांची चांगलीच माहिती मिळाली असेल. जर तुमच्या ब्लॉग वर  Google Adsense चे aproval मिळाले नसेल तर तुम्ही यांचा फायदा घेवून तुमचा ब्लॉग मोनेतीसे करू शकता. 

aproval घेण्यागोदार तुम्ही सर्वप्रथम तुम्ही सर्च इंजिनमधून तुमच्या ब्लॉग व वेबसाइट वर अधिक ट्रॅफिक मिळवण्यावर भर द्यावा. तुम्ही तुमची पोस्ट वारंवारता राखली पाहिजे, तसेच गेस्ट पोस्टिंगद्वारे तुमच्या ब्लॉग वर  बॅकलिंक्स वाढवा.

एकदा तुमच्या ब्लॉग वर ट्रॅफिक वाढले की तुमच्या ब्लॉग monetise होऊन कमाई करणे खूप सोपे जाईल. तर तुम्हाला ही पोस्ट top 10 best Google AdSense alternative platforms कशी वाटली ते नक्की सांगा व  तुम्ही कमाई करण्यासाठी वरीलपैकी कोणतीही पद्धत वापरत असल्यास खाली कॉमेंट मध्ये नक्की कळवा. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Menu Site