Ad code

Latest

6/recent/ticker-posts

गोविंदा रे गोपाळा ! श्रीकृष्ण जन्माष्टमी का साजरी करतात संपूर्ण माहिती

श्रीकृष्ण जन्माष्टमी ची संपूर्ण माहिती 

हिंदू धर्मात मोठ्या उत्साहात दरवर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाते. कृष्णा, बाळ गोपाळ, कान्हा, माखनचोर, कन्हैया अशा सुमारे 108 नावांनी त्याला ओळखले जाते तसेच युगानुयुगे प्रत्येकाच्या हृदयात वास करतो. आजच्या लेखात आपण कृष्ण जन्माष्टमी का साजरी केली जाते? कृष्णजन्माष्टमीचे महत्त्व? कृष्ण जन्माष्टमीची गोष्ट काय आहे? आणि श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करण्याचे कारण जाणून घेतले पाहिजे. 


फक्त भारतातच नव्हे तर भारताबाहेर हिंदू लोकांत हा सण साजरा केला जातो. त्यामुळे भगवान श्रीकृष्णाची उपासना करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी जन्माष्टमीची सर्व महत्त्वाची माहिती या लेखात उपलब्ध होणार आहे. भगवान श्रीकृष्णाचा वाढदिवस म्हणून जन्माष्टमी संपूर्ण भारतात मोठ्या उत्सवात साजरे केले जाते.

जन्माष्टमी म्हणजे काय - janmashtami 2023

जन्माष्टमी हा सण भगवान श्रीकृष्णाचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो, भगवान श्रीकृष्णाची जयंती कृष्ण जन्माष्टमी उत्सव देशभरात मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. हा उत्सव हिंदू calender प्रमाणे भाद्रपद महिन्यात कृष्ण पक्षातील अष्टमीला साजरी केली जाते.  

हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार या दिवशी उपवास करून देवाची विशेष प्रार्थना केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. संतती, दीर्घायुष्य आणि समृद्धीसाठी जन्माष्टमी सणाला विशेष महत्त्व आहे.

या दिवशी मंदिरे सजविली जातात आणि अनेक ठिकाणी श्रीकृष्ण रासलीला आयोजित करून श्री कृष्णाची पूजा केली जाते.  

2023 मध्ये कृष्ण जन्माष्टमी कधी आहे?

यावर्षी कृष्ण जन्माष्टमी हा सण 06 सेप्टेंबर ते 07 सेप्टेंबर दरम्यान साजरा केला जाणार आहे.

कृष्ण जन्माष्टमी पूजेची शुभ वेळ: 06 सेप्टेंबर दुपारी 3 वाजून 37 मिनिट पासून  07 सेप्टेंबर ला संध्याकाळी 4 वाजून 14 मिनिटांपर्यंत आहे. 

जन्माष्टमी का साजरी करावी? janmashtami information 

हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार भगवान श्री कृष्ण हे भगवान श्री हरी विष्णूचे आठवे अवतार आहेत, ज्यांना विश्वाचे पालनकर्ता म्हटले जाते. आणि कृष्णाच्या जन्मदिवसाच्या या शुभ मुहूर्तावर हा दिवस जन्माष्टमी म्हणून साजरा केला जातो.

या दिवशी भगवान श्रीकृष्णाने पृथ्वीवर अवतार घेतला. त्यावेळी मथुरेचा राजा कंस याच्या जाचामुळे सर्व जनता फार दु:खी झाली होती. म्हणून तो दिवस दुःखग्रस्तांचे रक्षणकर्ता भगवान श्रीकृष्णाने या दिवशी पृथ्वीवर अवतार घेतला आणि कंसाचा वध केला.

कृष्ण जन्माष्टमीचा सण कसा साजरा केला जातो? krushn janmashtami

जन्माष्टमीच्या सणाचा जल्लोष संपूर्ण भारतात त्यासोबतच परदेशात राहणारे भारतीयही तिथे जन्माष्टमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात.

जन्माष्टमीच्या या सणाला भाविक उपवास करतात, मंदिरे सजवली जातात, लाडू-गोपाळांच्या मूर्तींना झुलवले जाते, भजन-कीर्तन केले जाते आणि मंदिरांमध्ये श्रद्धेने आणि भक्तीने भगवान श्रीकृष्णाची पूजा केली जाते.


श्रीकृष्ण जन्माष्टमीची कथा story of krishna janmashtami

श्रीकृष्ण जन्माष्टमीची कथा मथुरा शहरापासून सुरू होते.भागवत पुरणानुसार द्वापर युगात मथुरा शहरावर कंस नावाचा जुलुमी राजा राज्य करत होता. आपला पिता उग्रसेन यांना गादीवरून काढून कंस स्वतः राजा झाला. त्याच्या राजवटीत मथुरेतील प्रजा अत्यंत दुखी होती कारण तो लोकांवर अत्याचार करत होता, गरीब लोकांना मारत होता दिवसेंदिवस त्याचे अत्याचार वाढत होते. मथुरा हे शहर सध्या उत्तर प्रदेशात वसलेले आहे.

आपल्या लाडक्या बहिननीचे लग्न वासुदेवशी झाल्यावर तेवढ्यात आकाशझाली  की देवकीला होणारे आठव्या मुलाच्या हातून कंसचा वध होणार आहे. आपल्या लाडक्या बहिणीला होणारे मूल आपल्या मृत्यूचे कारण बनणार आहे हे समजताच त्याने वासुदेव आणि देवकिला तुरुंगवासात टाकले .

तुरुंगवासात असताना कंसाने देवकी आणि वसुदेव यांना जन्मलेल्या सातही मुलांना  एक एक करून मारले. शेवटी श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमीला पहाटे, भगवान श्रीकृष्णाने माता देवकीच्या पोटी जन्म घेतला. जन्म झाला तेव्हा भगवान विष्णु यांनी साक्षात्कार देवून वासुदेव यांना त्या आठव्या मुलाला घेवून गोकुळात जायला  सांगितले जेथे नंद व यशोदा राहत होते. त्याच दिवशी यशोदा हिच्या पोटी एक मुलगी जन्माला आली, तिला भगवान विष्णूंनी आणण्यास सांगितले. जेव्हा वसुदेव श्रीकृष्णाला डोक्यावर ठेवून गोकुळ नगरीत नेण्यासाठी निघाले.


गोकुळात गेल्यावर नंद व यशोदा यांच्या मुलीसोबत आपल्या मुलाला बदलून वासुदेव पुन्हा तुरुंगात पोचले, सूर्योदयानंतर देवकीला  आठवा मुलगा झाल्याची माहिती कंसाला मिळाली तसा तो त्या आठव्या मुलाला मारण्यासाठी निघाला. पण कंसाने पाहिले की ती मुलगी आहे, तर आकाशवाणीने सांगितले की तुझ्या बहिणीचा आठवा मुलगा तुला मारेल. तरीही त्याने काही विचार न करता या मुलीला भिंतीवर आपटले, पण येथे चमत्कार झाला  त्या मुलीचे रूपांतर देवी योगमाया या मध्ये झाले आणि तिने कंसाला चेतावणी दिली की तुझ्या मृत्यू होणे अटळ आहे आणि सुखरूप आहे.

या घटनेनंतर कंसाने देवकीच्या आठव्या पुत्राचा वध करण्यासाठी विविध प्रकारचे राक्षस आणि विविध प्रकारचे योद्धे बोलावले आणि त्या मुलाला सर्वत्र शोधून मारण्याचा आदेश दिला. मात्र या कार्यात कोणालाही यश आले नाही.


देवकी आणि वासुदेव यांचा आठवा मुलगा श्रीकृष्ण गोकुळात वाढला त्याने आपल्या वेगवेगळ्या लीला दाखवून लोकांचे मन जिंकले, नंतर आपल्या खऱ्या आईवडिलांना कैद मधून मोकळे करण्यासाठी मथुरेला निघाले तेथेच  श्री कृष्णाने आपल्या अत्याचारी मामा कंसाचा वध केला, त्यानंतर संपूर्ण भारतभर लोक त्यांचा वाढदिवस कृष्ण जन्माष्टमी म्हणून साजरा करतात.


जन्माष्टमीचे महत्त्व काय? krishna janmashtami 2023

देशभरात प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या प्रकारे मोठया थाटात जन्माष्टमी साजरी केली जाते, यादिवशी श्रीकृष्णाची पूजा करून, उपवास ठेवून श्ल भगवान श्रीकृष्ण प्रसन्न व्हावेत म्हणून पूजा अर्चना केली जाते. जन्माष्टमी साजरी करण्याचे महत्त्व बघायचे तर भगवान विष्णूंनी भगवद्गीता या पवित्र ग्रंथात सांगितल्या प्रमाणे जेव्हा समाजात मानवाकडून कुकर्म वाढेल, सत्यावर असत्य हावी होईल आणि धर्माचा ऱ्हास होईल तेव्हा मी या जगात पुनर्जन्म घेईन आणि वाईटाचा नायनाट करण्यासाठी आणि चांगल्याला समर्थन देण्यासाठी पुनर्जन्म घेईन.


जन्माष्टमी या सणाचे मुख्य महत्त्व म्हणजे चांगल्या हेतूंना प्रोत्साहन देणे आणि वाईट प्रवृत्तीला परावृत्त करणे हे आहे. कृष्ण जन्माष्टमीही एकात्मतेसाठी साजरी केली जाते. हा पवित्र सण लोकांमध्ये बंधुभाव वाढवतो म्हणून जन्माष्टमीला एकतेचे प्रतीक मानले जाते.


Shrikrishna janmashtami information in marathi

मला आशा आहे की श्रीकृष्ण जन्माष्टमी का साजरी केली जाते हा लेख तुम्हाला नक्कीच आवडला असेल. जन्माष्टमी का साजरी केली जाते याची संपूर्ण माहिती वाचकांना मिळावी हा आमचा प्रयत्न होता. तसेच अशी नवनवीन व महत्वाची माहिती तुमच्या पर्यंत पोहचविण्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नात असू जेणेकरून असे लेख इतर कोणत्याही साइटवर किंवा इंटरनेटवर शोधण्याची गरज भासू नये.

यामुळे तुमचा वेळही वाचेल आणि तुम्हाला सर्व माहिती एकाच ठिकाणी मिळेल. या लेखाबद्दल तुमच्या मनात काही शंका असल्यास किंवा त्यात काही सुधारणा व्हाव्यात असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही खाली कॉमेंट लिहू शकता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Menu Site