Ad code

Latest

6/recent/ticker-posts

Etsy वर सामान विकून डॉलर मध्ये पैसे कमवा - how to earn money from Etsy in india

Etsy म्हणजे काय, Etsy वर पैसे कसे कमवायचे


बहुतेक वेळा आपल्या मनात ऑनलाइन पैसे कसे कमवायचे  हा विचार येतो, आजकाल बरेचजण ऑनलाइन काम करुण त्याबदल्यात चांगले उत्पन्न मिळवत आहेत. Online Paise Kamavnyache Marg  खूप  आहेत त्यापैकीच एक आहे Etsy. Etsy चा वापर करून तुम्ही ऑनलाइन सेलिंग करून कमाई करू शकता. जर तुम्हाला ऑनलाइन वस्तु विकुन पैसे  पैसे कमवायचे असतील तर तुम्हाला Etsy शी संबंधित माहिती असणे आवश्यक आहे.

 Etsy ला Online Marketing Business देखील म्हटले जाऊ शकते. ज्या प्रकारे व्यापारी Amazon, Flipkart वर ऑनलाइन वस्तु विकून कमाई करतात, त्याच प्रकारे तुम्ही Etsy वर तुमचे ऑनलाइन दुकान उघडू शकता आणि तुमचा माल सहज विकू शकता.
तुम्ही Etsy मध्‍ये तुम्ही ऑनलाइन सामान खरेदी करू शकता व विकू शकता. मित्रांनो आज या लेखात Etsy mhanaje kaay, ते कसे काम करते, etsy madhun paise kase kamvayache? याबद्दल माहिती घेऊ.

Etsy म्हणजे काय? What is Etsy

Etsy ही एक ई-कॉमर्स वेबसाइट आहे ज्यामध्ये तुम्हाला विंटेज आणि हाताने बनविलेल्या वस्तू (Handicraft Items) पाहायला मिळतात. यासोबतच तुम्हाला हॅण्डमेड ज्वेलरी, बॅग, कापड, होम डेकोर, फर्निचर इत्यादी वेगवेगळ्या वस्तु पाहायला मिळतील.

Etsy ही एक अमेरिकन ई-कॉमर्स वेबसाइट आहे. Etsy तयार करण्याचा उद्देश हा होता की लोक हस्तनिर्मित घरगुती आणि विंटेज वस्तू विकू आणि खरेदी करू शकतील. यामुळेच Etsy ला जगातील इतर सर्व ऑनलाइन ई-कॉमर्स वेबसाइट्सपासून वेगळे बनवते.

तुमच्याकडे चित्रकला, हस्तकला, गृहसजावटीच्या वस्तू तयार करणे. अशी काही कला असतील व त्या तुम्ही बनवून विकण्याचा विचार करत आहात तर etsy तुमच्यासाठी खूपच फायद्याचे ठरेल. जर तुम्ही वेगळे दिसणारे काहीही बनवण्यात तज्ञ असाल तर मग तुम्ही Etsy वर वस्तु विकून खूप चांगली कमाई करू शकता. 

तुम्हाला Etsy वर अनेक छोटे व्यवसाय आणि खरेदीदार सापडतील. जे Etsy वर स्वतःचे स्टोअर बनवून त्यांची उत्पादने विकत आहेत. येथे लोक हाताने वस्तु बनवतात व विकतात, Etsy वर स्टोअरची संख्या 7 दशलक्षाहून अधिक आहे.

Etsy कसे कार्य करते? How Etsy Works

Etsy हे ग्राहक आणि विक्रेता या दोघांसाठी खूपच उपयुक्त प्लॅटफॉर्म आहे. या प्लॅटफॉर्मसह आपली कमाई सुरू करण्यासाठी, तुम्हाला Etsy च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन आपले खाते तयार करावे लागेल. आपले username सेट केल्या नंतर तुम्ही यातून विक्री किंवा खरेदी ला सुरुवात करू शकता. येथे आपण तयार केलेल्या वस्तु विकण्यासाठी तुम्हाला  seling section मध्ये जाऊन तुम्ही तुमचे स्वतःचे ऑनलाइन स्टोअर उघडू शकता. 

तुमच्या ऑनलाइन स्टोअरमध्ये तुमच्या स्टोर चे नाव,  प्रोफाइल फोटो, तुम्ही विकत असणाऱ्ऱ्या समनाची यादी आणि उत्पादन कॅटलॉग जोडावे लागतील. याशिवाय आपण विकत असणाऱ्या वस्तूची किंमत आणि त्या वस्तु संबंधी  इतर महत्त्वाच्या माहितीचा समावेश करावा लागेल. तसेच पेमेंट मोड संबंधी माहिती देखील येथे भरावी लागेल. 

हे सर्व झाल्यावर जेव्हा एखादा ग्राहक तुमच्या ऑनलाइन स्टोअरमध्ये विकण्यासाठी ठेवलेली वस्तु ग्राहकाला आवडते व उपलब्ध असलेली वस्तू ग्राहक ऑर्डर करतो तेव्हा तुम्हाला ती वस्तू, संबंधित डिलिव्हरी पार्टनरमार्फत ग्राहकाच्या पत्त्यावर पॅक करून पाठवावी लागते. ग्राहकापर्यन्त यशस्वीरित्या वस्तु पोहचल्यानंतर, तुम्हाला ठराविक दिवसात Etsy प्लॅटफॉर्मद्वारे तुमच्या खात्यातील त्या वस्तूचे पैसे मिळतात.


Etsy अॅप कसे डाउनलोड करावे


Etsy ऍप्लिकेशन Google Play Store आणि Apple App Store वर उपलब्ध आहे. तुम्ही तुमच्या स्मार्टफोन मध्ये हे विनामूल्य download करून याचा उपयोग करू शकता.

Etsy मध्ये खाते कसे तयार करावे? How to Create an Etsy Account


Etsy वर seling account ची नोंदणी करण्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.

सर्वप्रथम तुम्हाला Etsy च्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल (www.etsy.com).

वेबसाइट ओपण केल्याल्यानंतर, “create account” किंवा “sign up” वर क्लिक करावे लागेल.

आपल्या बद्दलची सामान्य तपशील येथे प्रदान करण्यासाठी एक register page दिसेल. येथे, आपले नाव, ईमेल पत्ता, पासवर्ड  यासारखी विचारलेली माहिती भरून पुढच्या स्टेप्स फॉलो करा.

नोंदणी प्रक्रियेदरम्यान, तुम्हाला Etsy च्या अटी आणि गोपनीयता धोरण स्वीकारण्यास सांगितले जाईल. हे वाचा आणि समजून घ्या आणि नंतर “साइन अप” किंवा “सुरू ठेवा” सारखे बटण दाबा.

यानंतर, तुमच्या ईमेल पत्त्यावर एक verify link पाठविली जाईल.

तुमचे ईमेल खाते तपासा आणि दुव्यावर क्लिक करा किंवा ते सत्यापित करण्यासाठी सूचनांचे अनुसरण करा.

तुमचे खाते verify केल्यानंतर, तुम्हाला तुमचे प्रोफाइल पूर्ण करण्यास सांगितले जाईल. येथे तुम्ही तुमच्या दुकानाचे नाव, लोगो, बॅनर, त्यासंबंधी माहिती व पेमेंट पर्याय इत्यादी सेट करू शकता.

तुमची उत्पादने जोडून तुमचे दुकान म्हणजेच त्या page वर तुम्ही तयार केलेल्याउत्पादनांचे योग्य वर्णन, फोटो, किंमत, उपलब्धता इत्यादी अॅड करून तुमचे दुकान  पूर्ण करू शकता.

अशा प्रकारे, तुम्ही Etsy प्लॅटफॉर्मवर तुमचे खाते तयार करू शकता आणि व येथे असलेली handcrafted उत्पादने खरेदी किंवा विक्री करू शकता. लक्षात ठेवा Etsy वर वस्तु खरेदी विक्री करताना  येथे व्यापारी नियमांचे पालन केले पाहिजे.


Etsy वर काय विकायचे? What to Sell on Etsy

तुम्ही या प्लॅटफॉर्मवर विविध श्रेणींशी संबंधित वस्तू विकू शकता, सामान्यतः येथे हाताने बनवलेल्या वस्तू, विंटेज वस्तू आणि हस्तकला पुरवठा वस्तू अधिक प्रमाणात विकल्या जातात. या वेबसाइटवरील 90% वस्तू हस्तनिर्मित श्रेणीतील आहेत. तुम्ही या प्लॅटफॉर्मवर खाली दिलेल्या श्रेणींशी संबंधित वस्तू विकू शकता. जसे की 

उपकरणे, पिशव्या आणि पर्स, बांगड्या, रिंग, दागिने, बांगड्या, शोभेच्या वस्तु, होम डेकोरेशन. ई. वस्तु तुम्ही Etsy वर विकु शकता. 

निष्कर्ष

मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला Etsy kaay aahe  याबद्दल संपूर्ण माहिती मिळाली असेल. आम्ही या ब्लॉग पोस्टमध्ये Etsy बद्दल प्रत्येक छोटी माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे, या माहितीद्वारे तुम्ही  Etsy वर चांगले पैसे कमवू शकता. जर तुम्हाला ही माहिती आवडली  असेल तर तुमच्या मित्रांसह शेअर करा.
धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Menu Site