Ad code

Latest

6/recent/ticker-posts

वयाच्या 40 व्या वर्षी तरुण दिसण्यासाठी या टिप्स वापरून पहा

वयाच्या 40 व्या वर्षी तरुण दिसण्यासाठी या टिप्स वापरून पहा


जसजसे आपले वय वाढत जाते तसतसे आपले सौंदर्य कमी होत जाते. या वाढत्या वयात आपण तरुण दिसणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते, आपल्या शरीरावर येणाऱ्या सुरकुत्या , डोळ्याखाली येणारे काळे दाग, कोरडी त्वचा हे सर्व नहिशे होऊन तरुणपणा सारखा टवटवीत पणा यावा हे प्रत्येक स्त्रीला हवे असते . 

अनेक स्त्रिया तरुण दिसण्यासाठी पार्लर मध्ये जाऊन, वेगवेगळे सौंदर्य प्रसाधणे वापरुन तरुण दिसण्यासाठी प्रयत्न करतात, व  अनेक स्त्रिया आपले हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्या त्वचेची काळजी घेण्यात अपयशी ठरतात. वेगवेगळ्या केमिकल रहित क्रीम वापरुन त्या त्यांच्या त्वचेला नुकसान पोचवतात. 

अनेकदा आपल्याला आपली त्वचा, तिच्या समस्या आणि त्याचे प्रकार याची जाणीव नसते. म्हणून, तरुण दिसण्यासाठी, आपण प्रथम आपली त्वचा आणि त्याच्या गरजा समजून घेतल्या पाहिजेत.

जसजसे तुमचे वय वाढते तसतसे त्वचा मोठी दिसू लागते ही प्रक्रिया आपण नियंत्रित करू शकत नाही कारण हे सर्व नैसर्गिक आहे. परंतु तुमची जीवनशैली आणि पर्यावरणीय घटक तुमच्या त्वचेवर कसा परिणाम करतात हे तुम्ही नियंत्रित करू शकता. या लेखात आपन तरुण आणि चमकदार त्वचा मिळविण्यासाठी काही सोप्या परंतु प्रभावी टिप्स मदत करेल याची थोडक्यात माहिती घेवू.


पुरेशी झोप घ्या 

जस जसे आपले वय वाढते  तशी आपल्यावरील जबाबदऱ्या देखील वाढतात, जबाबदऱ्या वाढल्या की टेंशन येते व झोप कमी येते. अस्वस्थ पना येतो यामुळे आपले वय देखील जास्त दिसू लागते, चांगली झोप न लागणे हे आपल्या त्वचेसाठी व आरोग्यासाठी खूपच नुकसांकरक आहे. पुरेशी झोप न लागल्याने डोळ्याभोवती काले दाग येणे, चेहऱ्यावर सुरकुत्या पडणे अश्या समस्या येतात. त्यामुळे ८ तासाची पुरेशी झोप घेने आवश्यक आहे.


आपली त्वचा हळूवारपणे स्वच्छ करा.

बहुतेक वेळा काही स्त्रिया सुंदर दिसण्यासाठी facewash स्कब वापरुन चेहरा धुतात. पण जास्त स्क्रब केल्याने आपल्या त्वचेला त्रास होऊ शकतो. तसेच केमिकल रहित स्क्रब वापरल्याने आपल्या त्वचेवर जळजळ सुरू होते व त्वचेचे वृद्धत्व वाढते. म्हणूनच आपला चेहरा हा नेहमी नैसर्गिक रित्या तयार केलेल्या स्क्रब ने सौम्य हाताने धुतल्याने  आपल्या त्वचेला होणारा त्रास कमी होईल व  प्रदूषण आणि इतर पदार्थ काढून टाकण्यास मदत होते.तुमचा दिनक्रम बनवा

तुम्हाला वयाच्या 40 व्या वर्षी 25 चे दिसायचे असेल तर तुम्हाला तुमच्या  रुटीनमध्ये काही बदल करावे लागतील. तुमची दैनंदिन दिनचर्या बनवा आणि त्याचे पालन करा. दिवसभर आपल्याला काय करायचे आहे किती खायचे आहे कधी झोपेचे आहे हे सर्व नियमानुसार करा.

आपल्या जीवनात डेलि रुटीन फॉलो केल्यानेही खूप फरक पडतो. तुम्ही वेळेवर झोपत असल्याने आणि वेळेवर उठल्यामुळे अनेक गोष्टी वेळेवर होतात आणि त्याचा परिणाम तुमच्या चेहऱ्यावर दिसून येतो. हे रुटीन महिनाभर फॉलो करा, काही दिवसातच तुम्हाला फरक स्पष्ट दिसेल.


जास्त पाणी प्या

महिला असो की पुरुष, पाणी कमी प्यायले तर चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागतात व व्यक्ति वृद्ध दिसू लागते . चेहऱ्यावरील सुरकुत्या  दूर करण्यासाठी, दररोज 3 ते 4 लिटर पाणी प्यायलेच पाहिजे. यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात, शरीरातील पाण्याची  कमी भरून निघते त्वचा टवटवीत राहते यामुळे चेहऱ्यावर चमक येते.त्वचेची विशेष काळजी घ्या

जेव्हा आपण 40 पर्यंत पोहोचतो तेव्हा आपल्या त्वचेमध्ये बरेच बदल झालेले असतात, त्यामुळे त्यावर खूप लक्ष देणे आवश्यक आहे. आपल्या चेहऱ्यावर वेगवेगळे प्रयोग करणे टाळा महणजे वेगवेगळी सौंदर्य प्रसाधने यांचा वापर कमी करा. 

त्याचप्रमाणे सकाळी संध्याकाळी चेहरा धुतल्यावर लगेच पानी पुसू नका व मऊ कापडाने चेहरा पुसून घ्या. तसेच रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्याला मसाज करा चेहऱ्याला मसाज केल्याने त्वचा मऊ होते याने तुमचा चेहरा उजळेल, सुरकुत्या पडणार नाहीत आणि त्वचा सुंदर आणि चमकदार होईल.

सकस आहार आवश्यक-

निरोगी, संतुलित व पौष्टिक आहार घेतल्याने त्वचेच्या आरोग्यावर आणि स्वरूपावर लक्षणीय परिणाम होतो. तुमच्या शरीराला आणि त्वचेला आवश्यक पोषक द्रव्ये देण्यासाठी भरपूर फळे, भाज्या, संपूर्ण धान्य आणि पातळ प्रथिने खा.

दररोज व्यायाम करा

शरीर तंदुरुस्त आणि फिट ठेवण्यासाठी दररोज व्यायाम करणे आवश्यक आहे. वाढत्या वयानुसार आपले शरीर भरू लागते आपले वजन वाढू लागते  त्यामुळे आपण वयाच्या आधीच म्हातारे दिसू लागतो. यापासून सुटका मिळवण्यासाठी आणि स्वत:ला स्लिम आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी व्यायाम करणे आवश्यक आहे. त्यामुळे वेळ मिळेल तेव्हा व्यायाम करा.


या टिप्स वापरून तुम्ही तरुण त्वचा मिळवू शकता. वृद्धत्व ही एक प्रक्रिया आहे ज्यावर आपले नियंत्रण नसते. परंतु आपण आपल्या जीवनशैलीत छोटे मोठे बदल करू शकतो जसे की नियमित व्यायाम करणे, निरोगी आहार घेणे, धूम्रपान आणि मद्यपान टाळणे आणि योग्य प्रमाणात झोप घेणे हे त्वचा तरुण दिसण्याचे काही उत्तम मार्ग आहेत.


Image credit - freepik and pexels

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Menu Site