Ad code

Latest

6/recent/ticker-posts

रात्री निवांत झोप हवी असेल तर तुमच्यासाठी या टिप्स खूप उपयुक्त ठरतील

रात्री निवांत झोप हवी असेल तर तुमच्यासाठी या टिप्स खूप उपयुक्त ठरतीलदिवसभराचा थकवा आणि कामाचे टेंशन सर्वांनाच आहे, आणि हीच कारणे  कधी कधी आपली रात्रीची झोप हिरावून घेतो. अपुरी झोपेमुळे दुसऱ्यादिवशी आपले कामात मन लागत नाहीच त्याशिवाय ही अपुरी झोप आपल्या आरोग्यावर देखील वाईट परिणाम करते. 


रात्री जर तुमची झोप नीट झाली नाही तर तुम्हाला डोळ्यांखाली काळी वर्तुळे आणि निस्तेज त्वचेची समस्या होऊ शकते. अशा स्थितीत तुम्हाला रात्री पूर्ण झोप घेता आली पाहिजे. निवांत व पूर्ण झोप येण्यासाठी झोपण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी घेतल्यास चिंतामुक्त झोप येऊ शकते.


आपली झोप पूर्ण झाली की शरीर उत्साही राहते. कारण झोप हा आपल्या दैनंदिन दिनक्रमाचा सर्वात महत्वाचा भाग आहे. झोपेच्या कमतरतेमुळे शरीरात आजार होऊ शकतात.

मनसोक्त झोप येण्यासाठी तुम्ही येथे दिलेल्या काही टिप्स वापरू शकता.

झोपण्यापूर्वी eye pad वापरा 


दिवसभर लॅपटॉपवर किंवा उन्हात काम केल्याने आपले डोळे थकतात आणि या थकव्यावर मात करण्यासाठी, डोळे शांत ठेवण्यासाठी बहुतेक  लोक सहसा आय ड्रॉप्स चा वापर करतात, परंतु झोपण्याच्या एक तास आधी डोळ्यांवर eyepad  ठेवणे खूपच फायद्याचे आहे. 

यासाठी तुम्ही काकडीचा रस आणि गुलाबपान्यामद्धे कापूस भिजवून डोळ्यावर ठेऊ शकता. आयपॅड वापरल्यानंतर तुम्हाला खूप चांगली झोप लागेल कारण डोळ्यांचा सर्व थकवा निघून गेला असेल.


बेडरूम लॉक करून झोपा 

बहुतेक वेळा असे होते की आपण बेडरूम चा दरवाजा नीट लावला की नाही याची मनाला खात्री पटत नाही, व झोपताना आपण तळमळत राहतो की कोणी आतमध्ये येईल असे विचार मनात येत राहतात. म्हणून झोपण्यापूर्वी बेडरूमला घराला नीट कुलूप लावा. कोणीतरी तुमच्या खोलीत येईल म्हणून नाही तर असे केल्याने मन शांत होते आणि शांती मिळते.

रात्री जेवल्यानंतर चालणे

रात्री जेवल्यानंतर कमीत कमी 30 मिनिटे चालायला गेलात तर अन्नपचन चांगले होते आणि रीलॅक्स वाटते. जेवल्यानंतर लगेच झोपल्यास पोट फुगण्याची किंवा गॅसची समस्या होऊ शकते. यामुळे तुम्हाला झोपायलाही त्रास होतो आणि अस्वस्थपणा वाटतो. म्हणूनच झोपण्यापूर्वी ३० मिनिटे चालणे आवश्यक आहे.

झोप येत नसेल तर उठून बसा

जर तुम्हाला लवकर झोप येत नसेल किंवा झोप वारंवार तुटत असेल तर उठून बसा किंवा कहितरि काम करा. जेव्हा आपल्याला झोप येत नाही व आपण झोप यावी म्हणून अंथरूनत पडून असतो तेव्हा आपले डोके जास्त वेगाने विचार कारने चालू करते त्यामुळे आपली झोप उडते. तर झोपताना काळजी करण्याची गरज नाही. अश्या वेळी उठून काहीतरी करा ज्यामुळे तुम्हाला आराम मिळेल आणि तुम्हाला पुन्हा झोप येईल.मोबाईलपासून दूर राहा

खूप जणांना ही सवय आहे की झोपताना मोबाइल हाताळणे ही प्रत्येकाची सवय असते. पण झोपण्यापूर्वी मोबाईल वापरणे खूप हानिकारक आहे. झोपताना मोबईल हातळल्याने यामुळे आपली झोप कमी होते. जर तुम्ही 7 तासांची शांत झोप घेतली नाही तर तुम्हाला दिवसभर जडपणा जाणवेल आणि तुमची त्वचाही निस्तेज होईल.जास्त विचार करू नका 

अनेकजण झोपल्यानंतर दिवसभरातील घडामोडी आणि गोष्टींचा विचार करू लागतात. यामुळे ते विचारात व चिंतेत अडकून राहतात हे चुकीचे आहे.झोपण्यापूर्वी कुठलाही विचार करणे टाळा. यासाठी तुम्ही झोपण्यापूर्वी ध्यान लावू शकता तसेच तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत व मित्रांसोबत बोला त्यामुळे तुमचे मन मोकळे होईल व तुम्हाला टेंशन  फ्री झोप येईल.


हे काम झोपण्यापूर्वी करू नका

जर तुम्हाला झोपण्यापूर्वी चहा किंवा कॉफी पिण्याची सवय असेल तर ते चुकीचे आहे कारण रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही कॅफिनचे सेवन केले तर तुम्हाला झोप येत नाही. 

याव्यतिरिक्त जर तुम्ही झोपण्यापूर्वी गरम दूध प्यायले तर ते तुमच्या आरोग्यासाठी खूप चांगले राहते आणि त्यातून तुम्हाला चांगली झोप लागते. एवढेच नाही तर तुमच्या चेहऱ्यावर ग्लोही कायम राहील.

त्यामुळे रात्री अंथरुणावर झोपण्यापूर्वी हे काम अवश्य करा, जेणेकरून तुम्हाला चांगली झोप लागेल आणि तुमच्या चेहऱ्यावरील चमक कायम राहील.


चांगल्या झोपेचे फायदे


आपल्या शरीरासाठी 7 ते 8 तासांची झोप खूप महत्त्वाची आहे. चांगली व निवांत झोप घेण्याचे अनेक फायदे आहेत. जेणेकरून माणसाचे आरोग्य निरोगी व टवटवीत राहते. अशाच काही फायद्यांबद्दल आपण पुढे जाणून घेणार आहोत.

शरीर ताजे राहते -
दिवसभर काम करून आपले शरीर पूर्णपणे थकूम जाते, त्याला रीफ्रेश करण्यासाठी पुरेशी झोप घेणे खूप महत्वाचे असते. पुरेशी झोप घेतल्याने आपल्या शरीरातील क्षीण दूर होतो व शरीर ताजे टवटवीत दिसते.

मानसिक स्थिती सुधारते - 
जेव्हा आपण दिवसभर  काम करत राहतो तेव्हा त्याचा मनावर तसेच शरीरावर वाईट परिणाम होतो. पुरेशी झोप घेतल्याने मानसिक आरोग्य सुधारते, त्यामुळे तणाव आणि चिंता कमी होते.

स्मरणशक्ती चांगली राहते -
झोप पूर्ण झाल्यामुळे आपण फ्रेश फील करतो त्यामुळे आपली  स्मरणशक्ती चांगली राहते आपण पॉसिटीव विचार करतो. पुरेशी झोप घेणाऱ्या लोकांची स्मरणशक्ती कमी झोप घेणाऱ्या लोकांपेक्षा चांगली असते. जेणेकरून त्यांना गोष्टी दीर्घकाळ लक्षात राहतील.

एकाग्रता वाढणे - 
पुरेशी झोप घेतल्याने एकाग्रता वाढते. त्यामुळे कोणतेही काम करताना त्या कामात मन गुंतलेले असते त्यामुळे मन इकडे तिकडे भटकत नाही, ते काम एकाग्रतेने करता येते.

रोगप्रतिकारशक्ती वाढवा - 
गाढ आणि सामान्यपेक्षा जास्त झोप घेतल्याने शरीर टवटवीत राहते शरीरातील रोगप्रतिकार शक्ती देखील सुधारते. ज्यामुळे तुम्हाला कोणत्याही आजाराशी लढण्याची, संक्रमणाशी लढण्याची ताकद मिळेल.

तणाव कमी करण्यास उपयुक्त - 
तणावाखाली राहिल्याने आपण कोणत्याही आजाराचा लवकर बळी जातो. जर तुमची झोप चांगली असेल तर तणाव कमी होण्यास मदत होते.


जर तुमच्या झोपेच्या कमतरतेमुळे तुमच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत असेल तर तुम्हाला डॉक्टरांना भेटण्याची गरज आहे.


आशा आहे की तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल. जर तुमचे काही प्रश्न किंवा माहिती द्यायची असेल तर तुम्ही आम्हाला कॉमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता.

Image credit - PEXELS

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Menu Site