Ad code

Latest

6/recent/ticker-posts

M.tech कोर्स काय आहे. M.tech Course Full Details In Marathi

M.tech विषयी संपूर्ण माहिती, फूल फॉर्म, पात्रता, M.tech course काय असतो.

 M.tech course - खूप अश्या विद्यार्थ्यांचा असा प्रश्न असतो की b.tech नंतर काय करावे कुठचे शिक्षण घ्यावे? तर त्यांच्या साठी b.tech नंतर m.tech करणे खूप फायदेशीर होईल. 

आजच्या काळात बहुतेक विद्यार्थी बॅचलर पदवी मिळाल्यानंतर मास्टर डिग्री कडे वळतात, कारण मास्टर डिग्री केल्यानंतर त्यांना आकर्षण नोकरी मिळते. b.tech नंतर m.tech करणे विद्यार्थ्यांच्या भविष्याला उजवळ बनवू शकतो कारण हा कोर्स केल्यानंतर विद्यार्थीजवळ जॉब चे चांगले पर्याय उपलब्ध होतात. c

शिक्षणतील वाढत्या कॉम्पटिशन मुळे लोकांना लवकर आपल्या आवडीची नोकरी मिळत नाही. एक चांगल्या पगरची नोकरी मिळावी म्हणून खूप असे विद्यार्थी आपले पुढचे शिक्षण चालू ठेवतात. 

पदव्युत्तर अभ्यासक्रमामुळे आपण ज्या क्षेत्रात बॅचलर कोर्स केला आहे त्या क्षेत्रातील तज्ञ बनतो त्यामुळे त्यांना आपल्या आवडीची व चंगल्या पंगरची नोकरी मिळते. 

सध्या देशातील सर्वात लोकप्रिय पदव्युत्तर अभ्यासक्रमांपैकी एक म्हणजे M.Tech जो B.Tech किंवा इतर संबंधित क्षेत्रात बॅचलर कोर्स केल्यानंतर करता येतो.

m.tech हा मास्टर कोर्स आजच्या काळात फार कमी लोक करतात ज्यामुळे त्यांचे मूल्य आणखी वाढते. M.Tech हा लोकप्रिय मास्टर कोर्स आहे, हा कोर्स केल्यानंतर तुम्ही Technology मध्ये  प्राविण्य मिळवू शकता. 

आजच्या टेक्नॉलजी च्या युगात नवनवीन बदल होत आहेत यामुळे यात रोजगाराच्या संधि देखील वाढत आहेत, म्हणूनच M.tech कोर्स विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी खूप फायद्याचा होणार आहे.

म्हणूनच या पोस्ट मध्ये आम्ही विद्यार्थ्यांना  M.Tech अभ्यासक्रमाबाबत संविस्तर माहिती देत आहोत तर हा लेख तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. या लेखात  M.Tech mhanje kay,  M.Tech full form तसेच  M.Tech संबंधी इतर माहिती घेणार आहोत तर पोस्ट शेवट पर्यन्त नक्की वाचा.


एमटेक कोर्स काय आहेत - what is M.Tech in marathi

M. Tech हा पदव्युत्तर अभ्यासक्रम आहे ज्यामध्ये विद्यार्थ्यांना technology बद्दल शिकवले जाते त्याची सर्व माहिती यात विद्यार्थ्यांना देऊन त्यांना technology मध्ये एक्सपर्ट बनण्यासाठी शिकवले जाते. 

आज जगभरात technology चा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. M. tech हा कोर्स 2 वर्षाचा असून B.tech  किंवा B.E सारखे पदवीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी हा अभ्यासक्रम करू शकतात, Technology च्या फिल्ड मध्ये हा कोर्स खूपच लोकप्रिय आहे.

M.tech कोर्स केल्यानंतर विद्यार्थ्यांच्या समोर नोकरीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिल इंजिनीअरिंग, कॉम्प्युटर इंजिनीअरिंग जॉब इत्यादी अनेक क्षेत्रात विद्यार्थी करिअर करू शकतात.

What is M Tech full form?

M.tech चे full form Master of technology असे आहे यालाच मास्टर ऑफ इंजीनीरिंग असेही म्हणतात. M.Tech engineering शाखेतील स्पेशलायझेशनशी संबंधित कोर्स  आहे. विद्यार्थी त्यांच्या पदवीशी संबंधित कोणत्याही स्पेशलायझेशनची निवड करू शकतात.


M.tech Course कसा करावा?

तुम्ही तुमच्या आवडीच्या फील्ड मध्ये m.tech कोर्स करू शकता, एम टेक कोर्स करण्यासाठी b.tech कोर्स आवस्यक आहे. जो टेक्नॉलजी मधील एक ग्रॅजुएशन डिग्री आहे जे केल्यानंतर तुम्ही M.tech कोर्स करू शकता. master of technology करण्यासाठी आपण १२ चे शिक्षण साईन्स विषयातून पास झालात तर तुम्हाला या कोर्स मध्ये जास्त फायदा होईल.

m.tech मध्ये प्रवेश घेण्यासाठी ग्रॅजुएशन नंतर प्रवेश परीक्षा पास करायची असते, ही परीक्षा पास झाल्यानंतरच तुम्ही या कोर्स साठी admission घेऊ शकता. 


M.tech कोर्स किती वर्षांचा आहे? 


Master of Technology हा 2 वर्षाचा पोस्ट ग्रॅजुएशन कोर्स आहे विद्यार्थी त्यांचे B.tech व BE पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर पुढचे शिक्षण घेण्यासाठी  विद्यार्थी M.tech कोर्स ची निवड करतात. या कोर्स मध्ये टेक्नॉलजी संबंधी सर्व विषय कवर केले जातात.


M.tech साठी पात्रता –

मास्टर ऑफ टेक्नॉलजी करण्यासाठी विद्यार्थ्याने कोणत्याही विज्ञान शाखेतून BSC, BCA, B.tech, BE मध्ये पदवीधर असणे आवश्यक आहे.

तसेच बॅचलर पदवीमध्ये विद्यार्थ्यांना किमान 50% गुण असणे आवश्यक आहे.

जर तुम्हाला सरकारी महाविद्यालयातून हा कोर्स करायचा असेल तर या कोर्स घेण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या प्रवेश परीक्षेत तुम्हाला चांगले गुण मिळवणे अनिवार्य आहे.

हा कोर्स करण्यासाठी तंत्रज्ञान क्षेत्रात विशेष रस दाखवणे आवश्यक आहे.


मास्टर्स ऑफ टेक्नॉलॉजीचे विषय m tech courses list :


engineering फील्ड  हे अतिशय मोठे क्षेत्र आहे. भारतात अशा अनेक संस्था आहेत ज्या या संबंधित अभ्यासक्रम देतात. या क्षेत्रात विद्यार्थ्यांना अनेक पर्याय मिळतात, ज्यामध्ये तुम्ही M.Tech करू शकता.

यामध्ये मिळणाऱ्या उत्तम करियर च्या संधिमुळे  M.Tech करणे हा ट्रेंड बनला आहे. ज्या विद्यार्थ्यांना engineering, B.Tech आणि M.Tech या क्षेत्रात करिअर करायचे आहे त्यांच्यासाठी खूप चांगले पर्याय उपलब्ध आहेत.

खाली नमूद केलेल्या पर्यायातून कोणताही पर्याय निवडून तुम्ही त्यात एमटेक करू शकता.


 1. Civil Engineering
 2. Aeronautical Engineering
 3. aerospace engineering
 4. agricultural Engineering
 5. automobile engineering
 6. biotechnology
 7. chemical Engineering
 8. Electrical and Electronics Engineering
 9. Electronics & Telecommunication Engineering
 10. Electronics & Instrumentation Engineering
 11. Electronics Engineering
 12. energy engineering
 13. food biotechnology
 14. Food Process Engineering
 15. Information Technology
 16. marine engineering
 17. mechanical Engineering
 18. mining Engineering
 19. software engineering
 20. computer science
 21. manufacturing Engineering


एमटेक कोर्स करण्याचे फायदे 


एमटेक हा असा  कोर्स आहे ज्याला भारतातूनच नव्हे तर परदेशातही खूप मागणी आहे. हा कोर्स केल्यामुळे विद्यार्थ्यांसमोर करियर चे अनेक मार्ग खुले होतात माणूनच हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांचे भविष्य सोनेरी बनवू शकतो. म्हणूनच m.tech करण्याचे खूप असे फायदे आहेत.

हा कोर्स केल्यानंतर विद्यार्थी इंजीनीरिंग क्षेत्रात एक्स्पर्ट बनतो.

एमटेक कोर्स केल्यानंतर विद्यार्थ्याला नोकरीचे भरपूर पर्याय असतात, त्यामुळे एमटेक केल्यानंतर विद्यार्थ्याला लगेच नोकरी मिळते.

हा अभ्यासक्रम केल्यानंतर विद्यार्थी अभियांत्रिकी क्षेत्रात भविष्य घडवू शकतात.

तुम्ही तुमच्या व्यवसायात तुमची स्वतःची कंपनी देखील स्थापन करू शकता.

एम टेक कोर्स केल्यानंतर तुम्हाला परदेशातही नोकरी मिळू शकते.

तुम्हाला विदेशातही नोकरीच्या उत्तम संधि मिळतात.

M.Tech कोर्स करून तुम्ही मॅनेजमेंट क्षेत्रात करिअर करू शकता.

तुम्ही कोणत्याही महाविद्यालयात प्राध्यापकही होऊ शकता.

एमटेक अभ्यासक्रमानंतर शासन नोकरी सरकारी नोकऱ्यांसाठीही पर्याय आहेत.

एमटेक कोर्स केल्यानंतर तुम्ही वरिष्ठ अभियंता, प्रोजेक्ट मॅनेजर, रिसर्चर टेक्निकल, कन्सल्टंट टेक्निकल, टेक्निकल सायंटिस्ट, अकाउंट मॅनेजर, प्रोफेसर अशा मोठ्या पदांवर काम करू शकता.

हा कोर्स केल्यानंतर विद्यार्थ्यांसमोर teaching च्या क्षेत्रात पण करियर करण्याच्या संधि असतात.


M.Tech नंतर पगार (M.Tech जॉब सॅलरी)


तुम्ही तुमच्या आवडीच्या क्षेत्रात M.Tech कोर्स करू शकता, एमटेक कोर्स केल्यानंतर तुम्हाला मिळणारा जॉब व पगार तुम्ही निवडलेल्या  फील्डवर अवलंबून असतो, कारण वेगवेगळ्या क्षेत्रात होणारे काम त्याची मागणी हे सर्व वेगवेगळे असते, त्यावरच तुमचा नोकरीचा पगारही वेगळा असेल.


एम टेक नंतरच्या कोणत्याही नोकरीच्या पगाराबद्दल बोलायचे तर ते 50 ते 1.5 लाखांपर्यंत असू शकते. याशिवाय एम.टेक कोर्स केल्यानंतर तुमचा पगारही तुमच्या टॅलेंट आणि अनुभवावर अवलंबून असतो, म्हणजेच तुम्हाला असणाऱ्या नॉलेज नुसार तुम्हाला पगार मिळतो.


Best mtech colleges in india “M Tech Course Details in Marathi”


भारतमध्ये खूप असे सरकारी व प्रायवेट colleges आहेत जे तुम्हाला M.tech कोर्स प्रदान करतात. या कॉलेज मध्ये अडमिशन घेऊन तुम्ही M.tech कोर्स पूर्ण करू शकता. प्रत्येक कॉलेज मधील कोर्स ची फी ही त्यांच्या अभ्यासक्रमनुसार वेगवेगळी असू शकते. खाली आम्ही काही top M Tech college ची नावे दिली आहेत.


भारतीय प्रौद्योगिकी संस्थान, मुंबई (Indian Institute of Technology, Mumbai)

भारतीय प्रौद्योगिकी संस्थान मद्रास (Indian Institute of Technology Madras)

बिरला इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी एंड साइंस, पिलानी (Birla Institute Of Technology And Science, Pilani)

भारतीय प्रौद्योगिकी संस्थान रुड़की (Indian Institue of Technology Roorkee)

बनारस हिंदी विश्वविद्यालय, वाराणसी (Banaras Hindi university, Varanasi)

भारतीय प्रौद्योगिकी संस्थान कानपुर (Indian Institute of Technology Kanpur)

इंडियन इंस्टीट्यूट ऑफ बंगलौर, बेंगलुरु (Indian Institute of Banglore, Bengaluru)

भारतीय प्रौद्योगिकी संस्थान, चेन्नई (Indian Institute of Technology, Chennai)

भारतीय प्रौद्योगिकी संस्थान (आईआईटी गुवाहाटी), गुवाहाटी (Indian Institute Of Technology (IIT GUWAHATI), Guwahati)


निष्कर्ष

आजच्या पोस्टमध्ये M.tech fullform काय आहे, एम टेक कोर्स काय आहे आणि एम टेक कोर्स कसा करायचा? (M Tech Course kasa karaycha) तसेच यासंबंधी इतर माहिती येथे दिलेली आहे.

आशा आहे की तुम्हाला आमची पोस्ट आवडली असेल आणि ही  पोस्ट तुमच्यासाठी नक्कीच माहितीपूर्ण असेल! हा कोर्स केल्यानंतर तुम्ही तुमचे करिअर चांगले करू शकता.

एम टेक कोर्सबद्दल तुमचे प्रश्न, विचार आणि इतर कोणतीही माहिती खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून आमच्याशी शेअर करा! तसेच ही पोस्ट तुमच्या सोशल मीडियावर (फेसबुक, व्हॉट्सअॅप, ट्विटर, इंस्टाग्राम) देखील ही पोस्ट शेअर करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Menu Site