Ad code

Latest

6/recent/ticker-posts

B Tech कोर्स फूल फॉर्म आणि संपूर्ण माहिती Courses, Fee, Admission

B Tech Course Full form Details in Marathi 

शिक्षण हे आपले आयुष्य उत्तम करण्याचे व करिअर घडवण्याची पहिली पायरी आहे, शिक्षण हा एकमेव असा मार्ग आहे ज्याद्वारे व्यक्ती आपली स्वप्ने सत्यात उतरवू शकतो व आपले इच्छित करिअर घडवू शकतो. 10 वि 12 वि चे  शिक्षण संपल्यानंतर बहुतेक मुलांची Engineer, पोलीस अधिकारी, डॉक्टर आणि शास्त्रज्ञ इत्यादी होण्याची स्वप्ने असतात.

त्यांची ही स्वप्ने शिक्षणातूनच साध्य होऊ शकतात, त्यामुळे पालकही त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी त्यांच्या स्वप्नांना योग्य दिशा देण्यास तयार असतात. बी टेक हा भारतातीलच नव्हे तर जगभरातील सर्वात लोकप्रिय अभियांत्रिकी अभ्यासक्रमांपैकी एक आहे जो गेल्या अनेक वर्षांपासून सर्वात जास्त करिअरच्या संधी प्रदान करण्याच्या उद्देशाने ओळखला जातो.


 Engineering क्षेत्रात करिअर करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी B.Tech हा सर्वोत्तम पर्याय आहे. बी टेक कोर्स हा ४ वर्षांचा पदवीपूर्व Engineering course आहे जो १२वी नंतर केला जातो. यामध्ये थिअरीसोबत प्रॅक्टिकल नॉलेजही दिले जाते.

यामध्ये मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिल, इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर सायन्स इत्यादी अनेक स्पेशलायझेशन कोर्सेस आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार यापैकी कोणताही बी.टेक कोर्स करू शकता. व आपले करियर मध्ये यशस्वी होऊ शकता.


B-Tech म्हणजे काय? what is B.tech information in marathi

B-Tech हा Engineer होण्यासाठी ४ वर्षांचा सर्वात लोकप्रिय कोर्स आहे.  भारतात दरवर्षी लाखो मुले B-Tech अभ्यासक्रमाला प्रवेश घेतात. या कोर्स मध्ये सरकारी आणि खाजगी संस्था आपले योगदान देतात. या कोर्स मध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रवेश परीक्षा, गुणवत्ता यादी आणि थेट प्रवेशाची साधने आहेत जी पूर्ण करणे गरजेचे आहे. बी टेक कोर्समध्ये अनेक शाखा (विषय) आहेत, तुम्ही यापैकी कोणत्याही शाखेतून किंवा प्रवाहातून बी टेक कोर्स करू शकता.

B-tech या कोर्समध्ये आपण संगणक आणि तंत्रज्ञानाशी संबंधित विषयांवर अभ्यास करतो. ज्या विद्यार्थ्याला अभियांत्रिकी क्षेत्रात जायचे आहे, त्यांनी विज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्ण झाल्यावर बीटेकला प्रवेश घेउ शकता. अभियांत्रिकी क्षेत्रात b tech course तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरेल. ज्याद्वारे तुम्ही सिव्हिल इंजिनीअरिंग, केमिकल इंजिनिअरिंग किंवा कॉम्प्युटर इंजिनिअरिंग इत्यादी प्लॅटफॉर्मवर तुमचे करिअर बनवू शकता.

B.Tech ही बॅचलर डिग्री आहे, तुम्हाला कोणत्या विषयात आवड आहे त्यानुसार त्यामध्ये अनेक शाखा आहेत. उदा:- संगणक अभियंता, यांत्रिक अभियंता आणि अनेक शाखा आहेत, तुम्ही तुमच्या आवडीनुसार यात तुम्ही अर्ज करू शकता.

B.Tech full form - B.Tech चे पूर्ण रूप काय आहे?

बी टेक म्हणजे "Bachelor Of Technology" या कोर्समध्ये तुम्हाला वेगवेगळ्या तंत्रांबद्दल शिकवले जाते. हा कोर्स करून तुम्ही अगदी सहज इंजिनिअर होऊ शकता.

B-Tech Course Duration

बी टेक हा 4 वर्षांचा कोर्स आहे. यामध्ये प्रत्येकी 6 महिन्यांनी 1 सेमिस्टर होते म्हणजे एका वर्षात 2 सेमिस्टर असतात. अशा प्रकारे हा अभ्यासक्रम 8 सेमिस्टरमध्ये म्हणजेच 4 वर्षांमध्ये पूर्ण होतो.

या चार वर्षांत विद्यार्थ्यांना थेअरी आणि प्रॅक्टिकलच्या माध्यमातून संपूर्ण ज्ञान देऊन अभ्यासक्रम पूर्ण केला जातो. तसेच औद्योगिक प्रशिक्षण देखील दिले जाते.

What is the eligibility for B.Tech - बी टेक साठी पात्रता काय आहे

B tech ला प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी कोणत्याही मान्यताप्राप्त शाळेतून 10+2 परीक्षा किमान 50% गुणांसह उत्तीर्ण असने आवश्यक आहे. तसेच 10+2 मध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित हे विषय असावेत.
 विद्यार्थ्यांचे किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 24 वर्षे असणे आवश्यक आहे. व अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यासाठी प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.


B tech popular course


बी.टेक engineering मध्ये अनेक अभ्यासक्रम व विभाग आहेत. जसे की जर तुम्ही सॉफ्टवेअर क्षेत्रात बी.टेक केले तर तुम्हाला सॉफ्टवेअरशी संबंधित गोष्टी शिकवल्या जातील. यात तुम्ही निवडलेल्या विषयाशी संबंधित विषयीचे ज्ञान तुम्हाला यात दिले जाते.

B.tech या विषयात देखील खूप असे अभ्यासक्रम आहेत जे खूप विद्यार्थी निवडतात यातलेच काही येथे देत आहोत

B.Tech Civil Engineering

B.Tech Information Technology

B.Tech in Computer Science

B.Tech in Software Engineering

B.Tech Mechanical Engineering

B.Tech in Biotechnology

B.Tech in Production Engineering

B.Tech in Data Science and Engineering

B.Tech in Footwear Engineering

B.Tech in Food Technology

B.Tech in Robotics Engineering

B.Tech in Electrical and Electronics Engineering

B.Tech in Genetic Engineering

B.Tech in Telecommunication Engineering

B.Tech in Aerospace Engineering

B.Tech in Chemical Engineering

B.Tech in Electronics and Communication Engineering

B.Tech in Marine Engineering

B.Tech in Nano Technology

B.Tech in Automobile Engineering

B.Tech in Artificial Intelligence

B.Tech in Aeronautical Engineering

B.Tech in Plastic Engineering

B.Tech in Petroleum Engineering

B.Tech in Agricultural Engineering

या सर्व विभागांमध्ये बी.टेक अभ्यासक्रम चालवले जातात आणि विभागानुसार विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण दिले जाते.

बी टेक कोर्समध्ये प्रवेश प्रक्रिया (B.Tech Admissions)

जगभरात इंजीनियर ला सर्वात जास्त पगार घेणारे मानले जातात, म्हणूनच भारतात सर्वाधिक विद्यार्थी इंजीनीरिंग ला प्रवेश घेतात. उत्तम कमाई करणारे व्यावसायिक बनण्याची आकांक्षा खूप लोकांना इंजीनियर अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेण्यासाठी एक प्रेरक शक्ती म्हणून कार्य करते. म्हणूनच विद्यार्थी बारावी विज्ञान शाखेतून पुढे engineer च्या अभ्यासक्रमात प्रवेश घेतात. इंजीनियर बनण्याची स्पर्धा खूप जास्त असल्याने त्यामध्ये प्रवेश घेण्यासाठी जवळजवळ सर्व अभियांत्रिकी महाविद्यालये आणि संस्था बी.टेक साठी प्रवेश परीक्षा घेतात. यामध्ये पास झालेल्यांना व त्यातील सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्यांनाच यात पुढे प्रवेश दिल जातो. 

या प्रवेश परीक्षांमद्धे JEE Main, JEE Advanced, BITSAT, AP EAMCET सारख्या प्रवेश परीक्षा संस्थांना त्यांच्या गुणवत्तेनुसार विद्यार्थ्यांची तपासणी करण्यास मदत करतात. या प्रवेश परीक्षांमधील मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाते आणि पुढील स्क्रीनिंग प्रक्रियेनंतर शेवटी B.Tech प्रोग्राममध्ये प्रवेश दिला जातो.


पीसीएम विषयातील कोणताही 12वी उत्तीर्ण विद्यार्थी या परीक्षांमध्ये सहभागी होऊ शकतो. जर तुम्ही डिप्लोमा केला असेल तर तुम्हाला बीटेकच्या दुसऱ्या वर्षाला थेट प्रवेश मिळतो. मात्र यासाठीही प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.


B.tech course fee (बीटेक कोर्सची फी किती आहे?)


बी.टेक कोर्स फी किती आहे तर ही फी तुम्ही कोणत्या कॉलेज मधून B.Tech चा कोर्स करताय यावर अवलंबून आहे. कारण वेगवेगळ्या कॉलेज मध्ये त्या कॉलेज नुसार या कोर्स ची फी घेतली जाते. जर तुम्ही सरकारी कॉलेजमधून B.Tech कोर्स केलात तर तुमची फी कमी असेल, जर तुम्ही खाजगी कॉलेजमधून B.Tech कोर्स केलात तर तुमची फी खूप जास्त असेल.

जर तुम्ही खाजगी महाविद्यालयातून B.Tech कोर्स करन्याचा विचार करत असाल, तर तुमची फी प्रति वर्ष सुमारे ₹ 200000 ते ₹ 300000 असेल. आणि जर तुम्ही सरकारी कॉलेजमधून हा कोर्स करत असाल तर यामध्ये तुम्हाला कमी फी भरावी लागेल. कारण सरकारी कॉलेजमध्ये कोणत्याही कोर्सची फी खूपच कमी असते. सरकारी महाविद्यालयात बी.टेक कोर्सची फी जास्तीत जास्त 1 लाख प्रतिवर्ष इतकी असू शकते.

बी.टेक नंतर करिअर


बी टेक मध्ये आपल्याला सर्वात उत्तम व खूप सारे जॉब पर्याय मिळतात. कारण या कोर्स द्वारे तुम्हाला संपमुरण जगत कुठेही उत्तम करियर करण्याची संधि प्रदान करते, ज्यामध्ये यांत्रिक अभियांत्रिकी, संगणक अभियांत्रिकी, स्थापत्य अभियांत्रिकी, रासायनिक अभियांत्रिकी आणि इलेक्ट्रॉनिक्स इ.

B.Tech पूर्ण केलेल्या उमेदवारांना कॉलेज प्लेसमेंटद्वारे सहज नोकरी मिळू शकते, मोठ्या कंपन्या कॅम्पस सिलेक्शनवर विश्वास ठेवतात, त्यामुळे चांगल्या कॉलेजमधून B.Tech उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना नोकरीचे भरपूर पर्याय असतात.याशिवाय बी टेक नंतर उच्च शिक्षण घेऊन मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी, एमबीए इत्यादी लोकप्रिय अभ्यासक्रम करू शकतात.

बी टेक करण्याचे फायदे


तुम्हाला B.Tech चे अनेक फायदे मिळतील, जे तुम्हाला B.Tech कोर्स करायला भाग पाडतात, तर चला जाणून घेऊया त्याचे फायदे काय आहेत.

हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला सरकारी किंवा खाजगी क्षेत्रात सहज नोकरी मिळू शकते.
आजच्या जगात अ‍ॅडव्हान्स मशीन्स, टेक्नॉलॉजी आणि गॅजेट्सचा भरपूर वापर होत आहे, ज्यामुळे तुम्ही इंजिनीअरची फॅकल्टी बनून भरपूर पैसे कमवू शकता.
B.tech नंतर तुम्हाला मोठमोठ्या कंपन्यामद्धे चांगल्या पगाराच्या नोकरीची जागा मिळू शकते.
इंजीनियर ही अशी गोष्ट आहे जी लोकांची संसाधने सुधारण्यासाठी खूप उपयुक्त आहे, अभियंता क्षेत्रात उपलब्ध नोकरी भरपूर उत्पन्न देते.

बी टेक केल्यानंतर तुम्हाला परदेशतही नोकरीच्या उत्तम संधि मिळतात.

B.Tech करत असतानाच तुम्हाला अनेक कंपन्यांकडून प्लेसमेंटच्या ऑफर मिळत राहतात. ज्यामध्ये तुम्ही अर्ज करून सहज नोकरी मिळवू शकता.

निष्कर्ष- 

मित्रांनो, तुम्हाला बी टेक कोर्सच्या माहितीचा हा लेख कसा वाटला आम्हाला नक्की सांगा. यामध्ये आम्ही कोर्सबद्दल थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला आहे जेणेकरून तुम्हाला कमी वेळेत याविषयीची आवश्यक माहिती मिळेल.

तुम्हालाही इंजीनियर व्हायचे असेल तर बीटेक कोर्स करणे अनिवार्य आहे. तुम्ही या लेखाबद्दल तुमच्या सूचना आम्हाला कमेंट करून सांगू शकता. करिअरशी संबंधित अशीच माहिती मिळवण्यासाठी तुम्ही आमचा naadmarathi या ब्लॉगला फॉलो करा आणि हा लेख तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. 

धन्यवाद 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Menu Site