Ad code

Latest

6/recent/ticker-posts

शुक्रवारी चुकूनही हे काम करू नका, नुकसान होऊ शकते things not to do on friday

 शुक्रवारी हे काम करू नका, होऊ शकते भारी नुकसान


असे मानले जाते की ज्योतिष शास्त्रानुसार काम केल्याने घरात सुख-समृद्धी येते तसेच आपल्या कोणत्याही कामात अडथळा येत नाही. आपल्याला बहुतेक वेळा सांगितले गेले आहे की शनिवार नखे कापू नयेत रात्री नखे कापू नयेत. तसेच सोमवार, मंगळवार गुरुवार किंवा शनिवारी घरी अंडी आणि मांस शिजवू नये व खाऊ नये. पण तुम्ही कधी असा विचार केला आहे का हे नियम का आहेत? आजच्या लेखात आम्ही तुम्हाला सांगतो की ज्योतिष शास्त्रामध्ये प्रत्येक दिवसासाठी वेगवेगळे नियम बनवले आहेत ज्याचे पालन केले पाहिजे.इतर वारांप्रमाणे शुक्रवार हा देखील एक असा वार आहे या दीवशी काही गोष्टी आपण मुद्दामहून करू नयेत. शुक्रवार हा देवी लक्ष्मी आणि शुक्राला समर्पित आहे. त्यामुळे या दोन गोष्टी लक्षात घेऊन शुक्रवारी आपले काम करावे. शुक्रवारी कोणत्या गोष्टी करू नयेत याबद्दल आम्ही ज्योतिष तज्ञ यांच्याशी बोललो तेव्हा त्यांनी आम्हाला  याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.


शुक्रवारी या गोष्टी दान करू नयेत 


एखादी वस्तु दान करणे शुभ मानले जाते. म्हणूनच मनुष्याने आपल्या जवळ जे आहे त्यातले थोडेफार श्रद्धेनुसार दान करत राहावे असे म्हटले आहे. दान केल्याने तुम्हाला याचे खूप चांगले परिणाम पाहायला मिळतात.


ज्योतिष शास्त्रानुसार कोणत्याही गोष्टीचे दान करण्यासाठी एक वेळ आणि दिवस असतो म्हणूनच खूप लोक वेळ व दिवस पाहून दान करतात. कोणत्या दिवशी काय दान करावे आणि काय करू नये हे जाणून घेणे खूप गरजेचे आहे. ज्योतिष शास्त्रानुसार शुक्रवारी काही वस्तूंचे दान करणे टाळावे. यामध्ये साखर आणि चांदीचा समावेश आहे. साखरेचे दान केल्याने शुक्र ग्रह कमजोर होऊ शकतो. अशा स्थितीत तुमचे भौतिक सुख कमी येऊ शकते.


मालमत्ता खरेदी करणे टाळा


जमीन किंवा घर घेणे हे स्वप्न प्रत्येकाचेच असते आणि हे स्वप्न पूर्ण करायला खूप मेहनत ही लागते. अनेकदा लोक मालमत्तेशी संबंधित गोष्टींसाठी ज्योतिषशास्त्राचा सल्ला घेतात. जर तुम्ही देखील मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल तर लक्षात ठेवा की शुक्रवारी प्रॉपर्टीशी संबंधित कोणतेही काम करू नका. असे केल्याने तुमचे नुकसान होऊ शकते.


पती-पत्नीने एकमेकांशी भांडू नये


पती-पत्नीमध्ये मतभेद होणे स्वाभाविक आहे, पण कधीकधी या मतभेदांचे रूपांतर भांडणात, कलहात आणि मोठ्या संकटात कधी होते, हे कळत नाही. मुळात भांडण करणे ही योग्य गोष्ट नाही, परंतु जर तुम्ही शुक्रवारी असे केले तर तुमच्या वैवाहिक जीवनात अडचणी येऊ शकतात. 

शुक्रवार हा देवी लक्ष्मी आणि शुक्राचे प्रतीक आहे. शुक्र शारीरिक आणि वैवाहिक सुखाचे प्रतीक आहे. अशा परिस्थितीत जर शुक्रवारी पती-पत्नीने चुकूनही एकमेकांशी भांडू नये. अन्यथा, लहानसा त्रासही मोठ्या समस्येत बदलू शकतो.


कोणाचा अपमान करू नका

अपमान न करणे केवळ एका दिवसासाठीच नाही तर कधीच करू नये. खास करून शुक्रवारी स्त्री चा अपमान करू नये कारण माता लक्ष्मी हे स्त्रीचे रूप आहे. अशा परिस्थितीत जर तुम्ही शुक्रवार च्या दिवशी स्त्रीचा अपमान करत असाल तर याचा अर्थ तुम्ही देवी लक्ष्मीचा अपमान करत आहात. ज्या घरांमध्ये स्त्रियांचा सन्मान होत नाही, तिथे माता लक्ष्मी कधीच वास करत नाही तिथे सुख, पैसा आणि ऐश्वर्य यांचा अभाव असतो.


उधारीचे व्यवहार करू नका

चुकूनही शुक्रवारी कोणाला उधार किंवा उसने  पैसे देऊ नका किंवा घेऊ नका. असे मानले जाते की शुक्रवारी दिलेले पैसे परत येत नाहीत.

आशा आहे की तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल. इतर समान लेख वाचण्यासाठी, कृपया आम्हाला कमेंट करून सांगा आणि आमच्या naadmarathi.in  वेबसाइटशी कनेक्ट रहा.


अस्वीकरण

या लेखात समाविष्ट असलेल्या कोणत्याही माहिती,साहित्य,गणनेच्या अचूकतेची किंवा विश्वासार्हतेची हमी दिलेली नाही. ही माहिती विविध माध्यमांतून,ज्योतिषी,पंचांग,प्रवचने,श्रद्धा व शास्त्रांमधून गोळा करून तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे. आमचा उद्देश फक्त माहिती प्रदान करणे आहे, वापरकर्त्यांनी ती फक्त माहिती म्हणून घ्यावी. शिवाय, त्याचा कोणताही वापर करणे ही केवळ वापरकर्त्याची जबाबदारी असेल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Menu Site