Ad code

Latest

6/recent/ticker-posts

महिलांनो इकडच तिकडच बोलण्यापेक्षा हे व्यवसाय करा कमाई खूप मजबूत होईल small part time business ideas for ladies in Marathi

महिलांनो इकडच तिकडच बोलण्यापेक्षा हे व्यवसाय करा कमाई खूप मजबूत होईल  small business ideas for women

 

Top Business Ideas for women : बहुतेक स्त्रिया घरचे काम संपल्यानंतर कोणाच्या घरात काय चाललं आहे ते  बोलायला बसतात. याचा त्यांना काय फायदा होतो ते माहीत नाही पण आमचा हा लेख वाचून त्यांना फायदा नक्कीच होणार आहे. आजच्या छोट्या लेखात मी तुम्हाला अश्या व्यवसाय कल्पना सांगणार आहे ज्याची सुरुवात महिला त्यांच्या घरापासून करू शकतात. आणि या व्यवसायांची सर्वात खास गोष्ट म्हणजे यासाठी त्यांना जास्त भांडवल लागणार नाही.

सध्या महागाई झपाट्याने वाढत आहे. यात जर नवरा बायको  एकत्र कमावत नसतील तर घर चालवणे कठीण होते. आपल्या देशात अशा अनेक महिला आहेत ज्या शिक्षित असूनही नोकरी न करता घरीच असतात यामागे काही वेगळ कारण असू शकत पण आमचा लेख त्या महिलांसाठी आहे ज्या काही करू इच्छित आहेत पण त्यांना योग्य मार्ग किंवा मार्गदर्शन मिळत नाहीये. अशा परिस्थितीत आम्ही असे  व्यवसाय शेअर करणार आहोत, जे महिला घरातून सुरू करू शकतात. शिवाय, त्यासाठी जास्त भांडवल न लागता या व्यवसायात नफा जास्त होईल.

1). होम ट्यूशन (Free home tuition business ideas for women in india)


होम ट्युटोरिंग ही महिलांसाठी सुरुवात करण्यासाठी लहान प्रमाणात व्यवसाय कल्पना आहे. होम ट्यूशन चा व्यवसाय आपल्या कामाला व वेळेला लवचिकता देते कारण हा व्यवसाय मुले आणि कुटुंबांच्या वेळापत्रकानुसार करता येते.

होम ट्यूशन हा व्यवसाय सहसा तुम्ही खूप लहान प्रमाणात सुरू करू शकता, यात आर्थिक गुंतवणूक कमी लागते.
स्त्रिया या  नैसर्गिक शिक्षिका असतात आणि त्यांच्याकडे खूप संयम असतो जर त्या स्वतच्या मुलांची शिकवणी घेवू शकतात तर इतर मुलांची शिकवणी ही सहजच घेवू शकतात. होम ट्यूशन हा मुलांच्या जीवनात बदल घडवून आणण्याचा एक उत्तम मार्ग आहे आणि त्याचबरोबर चांगली कमाई देखील करता येईल.

2). टिफिन सेवा व्यवसाय tiffin service business ideas for women 


मोठ्या शहरांतील अनेक महिलांसाठी हा व्यवसाय खूपच फायदेशीर आहे. आजकाल प्रत्येकाला घर सोडून दुसऱ्या ठिकाणी शिक्षणासाठी किंवा कमाईसाठी जावे लागते. अशा परिस्थितीत लोकांना चांगल्या अन्नाची आस असते. प्रत्येकालाच कामावर घरचा डबा मिळत नाही अश्या वेळी बहुतेक लोक टिफिन सेवेचा फायदा घेतात. टिफिन सेवेचा व्यवसाय सुरू करून शहरातील महिला चांगली कमाई करत आहेत. 

जर तुम्हाला देखील उत्तम स्वयंपाक करता येत असेल तर तुम्ही हा व्यवसाय करण्याचा विचार करू शकता, तसेच या व्यवसायासाठी फारसे भांडवल लागत नाही. तुम्ही कमी खर्चात हा व्यवसाय सुरू करू शकता.

3). बेकरी व्यवसाय Small bakery business ideas for women


महिलांसाठी बेकरी व्यवसाय सुरू करणे ही सर्वोत्तम व्यवसाय कल्पना आहे. बेकरी उद्योग हा एक फायदेशीर उद्योग आहे. तुम्ही बेकरी व्यवसायात विविध खाद्यपदार्थ ठेवू शकता आणि विकू शकता,  हो मित्रांनो, आजच्या काळात बेकरी शॉप हा खूप चांगला व्यवसाय आहे, या व्यवसायात लोक खूप पैसे कमवत आहेत कारण बेकरीमध्ये बनवलेल्या वस्तूंचा खप दिवसेंदिवस वाढत आहे. लोकांना बेकरी प्रॉडक्ट आवडतात आणि त्यामुळे चवीनुसार ते रोजच्या आहारात याचा समावेश करत आहेत आणि आज बेकरीच्या उत्पादनातून अनेक लोकांचा उदरनिर्वाहही चालला आहे.

bekary business हा  पैसे कमवण्याचा हा एक चांगला मार्ग बनला आहे, त्यामुळे जर तुम्ही व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही टेन्शनशिवाय बेकरी व्यवसाय सुरू करू शकता, तुम्हाला फक्त त्याबद्दल माहिती असणे आवश्यक आहे.

4). टेलरिंग व्यवसाय tailoring business ideas in india


जर तुम्हाला कपडे शिलाई करण्याचे ज्ञान असेल तर तुम्ही Tailoring Business सुरू करू शकता. आज प्रत्येक माणूस वेगवेगळ्या कामांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या कपड्यांना प्राधान्य देतो, ऑफिसला जायचे असेल तर फॉर्मल पॅन्ट आणि शर्ट, पार्ट्यांसाठी वेगवेगळे कपडे, सण-उत्सवात वेगवेगळ्या प्रकारचे कपडे पाहायला मिळतात, यामुळे आज कापड कटिंग आणि टेलरिंग हेही उत्तम रोजगाराचे साधन म्हणून लोक याकडे पाहत आहेत. कारण हा कमी खर्चात सुरू होणारा व्यवसाय आहे. 

महिलांसाठी शिवणकाम करणे खूप सोपे आहे. आणि त्या यात वेगळ्या डिझाईन देवून याला मोठ्या  व्यवसायात रूपांतरित करू शकते. काही महिला कपड्यांना वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन देवून या कामातून चांगला नफा मिळवत आहेत. प्रत्येक सणाला नवीन कपडे शिवले जातात. जेव्हा स्त्रिया त्यांच्या आजूबाजूच्या ठिकाणाहून ऑर्डर घेतात तेव्हा त्या प्रचंड कमाई करू शकतात. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी जवळपास कोणत्याही भांडवलाची गरज नाही.

5). Home-Based Hobby Classes


प्रत्येक व्यक्तीचा एक अनोखा छंद असतो, जो त्याची रोजची धावपळ आणि तणावातून थोडा आराम देतो. आठवडाभर मेहनत केल्यानंतर आराम करण्यासाठी थोडा वेळ मिळावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. पान काही जन या आरामच्या दिवशी आपला आवडीचा छंद जोपसत असतो, काही जन दिवसातून थोडासा वेळ काढून ते करत असतात जे त्यांना आवडत, प्रत्येकाचा छंद वेगळा असू शकतो.

काहींना चित्रकलेची, कुणाला नृत्याची, कुणाला गायनाची तर काहींना वाद्य वाजवून मनोरंजनाची आवड असते. पण खूप कमी लोक असतात जे आपल्या छंदातून पैसे कमवण्याचा विचार करतात. काही छंद तुम्हाला काही अतिरिक्त कमाई देत नाहीत तर काही छंद तुमची ओळख वाढवून देतात. तुम्ही तुमचा छंद तुमचा व्यवसाय बनवू शकता. असे अनेक छंद आहेत ज्यातून दरमहा हजारो रुपये कमावता येतात.

स्त्रिया नेहमीच मल्टीटास्किंग असतात त्यामुळे, अनेक स्त्रिया आता Home-Based Hobby Classes घेऊन आणि महिलांसाठी छोट्या व्यवसायाच्या कल्पना घेऊन त्यांच्या घरगुती कौशल्यांना यशस्वी व्यवसायात बदलू शकता. काही अतिरिक्त पैसे मिळवण्याचा हा एक उत्तम मार्ग आहेच, पण नवीन लोकांना भेटण्याचा आणि तुमची आवड इतरांसोबत शेअर करण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे.

6). पापड आणि लोणचे बनवण्याचा व्यवसाय business ideas in marathi with low investment


प्रत्येकालाच आपल्या जेवणात लोणचे किंवा पापड लागते, लोणाच्या शिवाय जेवण अपुरे आहे असे अनेक लोकांचे कारण आहे. नफा जास्त असल्याने पापड आणि लोणच्या च्या व्यवसायात पैसे मिळवणे सोपे आहे. महिलाही हा व्यवसाय घरबसल्या सुरू करू शकतात. आंबा, लिंबू, मिरची इत्यादींचे लोणचे तुम्ही घरी सहज बनवू शकता. लोणची आणि पापड बनवणे हे महिलांसाठी काही कठीण काम नाही हा व्यवसाय महिलांना उत्पन्नाचे साधन ठरू शकते. या व्यवसायातून महिन्याला किमान 20 हजार रुपये मिळतील.

7). हस्तनिर्मित हस्तकला Small business ideas in marathi


भारत ही कारागिरांची भूमी आहे जी आयुष्यभर आपली सर्जनशीलता दाखवतात. हस्तनिर्मित हस्तकला हा भावना व्यक्त करण्याचा आणि स्वतःला रिवाइंड करण्याचा एक उत्तम मार्ग आहे. तथापि, या प्रतिभेतून व्यवसाय तयार करणे अपारंपरिक मानले जात होते पण आज या आभासी जगात तुम्ही तुमच्या छंदाचे रूपांतर व्यवसायात करू शकता. आजच्या जगात हाताने बनवलेल्या वस्तूंची मागणी खूप जास्त आहे.

आज ऑनलाइन शॉपिंग ही खूप उपयुक्त गोष्ट आहे. त्यामुळे तुम्ही हस्तकला व्यवसाय सुरू करू शकता आणि ऑनलाइन किरकोळ विक्रेते बनू शकता. स्वत:चा व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या महिलांसाठी, हाताने बनवलेल्या वस्तू तयार करणे ही एक उत्तम संधी आहे, ज्याची त्यांना आवड आहे असे काहीतरी करण्याची संधी आहे जी त्यांचा उदरनिर्वाह करन्यासाठी मदत करू शकते.
 

8). ब्युटी पार्लर व्यवसाय most successful small business ideas


जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर ब्युटी पार्लर व्यवसाय उघडणे हा तुमच्यासाठी योग्य पर्याय असू शकतो. भारतीय अर्थव्यवस्था वेगाने वाढत आहे, आणि अशा व्यवसायात गुंतवणूक करण्यासाठी ही चांगली वेळ आहे. यासोबतच ब्युटी सलूनची मागणीही वाढत आहे. भारतीय महिलांची बदलती जीवनशैली मुळे भारतात ब्युटी पार्लर ची मागणी वाढत आहे. विविध प्रकारचे सौंदर्य सलून आहेत जे  स्त्रियांना त्यांची सुंदरता वाढवण्यासाठी प्रयत्न करतात. इतर व्यवसायांपेक्षा  ब्युटी सलून सुरू करणे सोपे आणि कमी खर्चिक असतात.

भारतात ब्युटी पार्लर व्यवसाय सुरू करणे आव्हानात्मक असले तरी अशक्य नाही. तुमच्याकडे योग्य कौशल्ये, स्टार्टअप भांडवल आणि बाजाराची समज असल्यास,तुम्ही हा व्यवसाय सहज सुरू करू शकता.

अलीकडच्या काळात महिलांमध्ये ब्युटी पार्लर खूप लोकप्रिय झाले आहेत. हा व्यवसाय अल्प प्रमाणात सुरू करण्यासाठी सुरुवातीला  खर्च येतो. तथापि, या प्रकरणात आपण अधिक कमाई करु शकता. घरामध्ये उघडलेल्या ब्युटी पार्लरचा लाभ घेण्यासाठी आजूबाजूच्या भागातून महिला येतात. या व्यवसायातील नफा मार्जिन 40% पर्यंत पोहोचू शकतो. हा व्यवसाय व्यवस्थित चालवला तर एका महिन्याची कमाई ६०-७० हजार रुपयांपर्यंत सहज पोहोचू शकते.

9). सौंदर्यप्रसाधनांचे दुकान small business ideas from home


सौंदर्यप्रसाधनांचे बारकावे स्त्रियांपेक्षा चांगले कोणाला माहित असतील. कॉस्मेटिक उद्योगाचे हे उत्कृष्ट ज्ञान त्यांना विक्री आणि विपणनामध्ये खूप प्रेरणादायी बनवू शकते. महिला  सौंदर्य प्रसाधनांची दुकाने चालवून त्यांचे नशीब व परिस्थिति नक्कीच बदलू शकतात. सौंदर्यप्रसाधनांचे दुकान स्त्रियांसाठी लहान व्यवसाय म्हणून सुरू होऊ शकते आणि कालांतराने मोठे होऊ शकते. सौंदर्य क्षेत्रातील महिलांसाठी कोणत्याही छोट्या व्यवसायाची कल्पना पूर्ण करून त्या उत्तम कमाई करू शकतात. 

10). पाककला क्लास  Cooking Class Business In Marathi

जर तुम्हाला उत्तम स्वयंपाक येत असेल व वेगवेगळ्या प्रकारचे अन्न तयार करता येत असेल तर तुम्ही स्वयंपाकाचे वर्ग सुरू करू शकता. व इतरांना स्वयंपाक करायला शिकवू शकता.

हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्याची गरज नाही. हा व्यवसाय तुम्ही घरबसल्या सुरू करू शकता. तुम्ही हा व्यवसाय अर्धवेळ देखील करू शकता.


निष्कर्ष

बर्‍याच वेळा असे होते की आपल्याकडे व्यवसायाची खूप चांगली कल्पना असते, परंतु गुंतवणुकीसाठी भांडवल नसल्यामुळे आपण आपला व्यवसाय सुरू करू शकत नाही, परंतु आता सरकार बँकेच्या माध्यमातून अशा सर्वांना मदत करत आहे ज्यांना स्वता चा व्यवसाय सुरू करायचा आहे. सरकारच्या अशा काही योजना आहेत ज्यांच्या अंतर्गत तुम्ही व्यवसाय कर्जासाठी अर्ज करू शकता तर आजपासूनच  आपल्या बिझनेस करण्याच्या कल्पनेला साकार करा. 

जर तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर इतरांना शेअर करा. 

धन्यवाद....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Menu Site