Ad code

Latest

6/recent/ticker-posts

Personality test: तुमची चालण्याची स्टाइल तुमच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल काय सांगते ते पहा

Personality test: तुमची चालण्याची स्टाइल तुमच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल काय सांगते ते पहा

बऱ्याच लोकांना असे वाटते की एखाद्या व्यक्तीचा स्वभाव हा त्याच्या ड्रेसिंग सेन्सवरून आणि त्याच्या बोलण्याच्या पद्धतीवरूनच ठरवता येतो. पण एवढेच नाही तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या चाळण्यावरून देखील त्याची पर्सनॅलिटी टेस्ट करू शकता. एखाद्या व्यक्तीची चालण्याची स्टाइल देखील त्याच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल बरेच काही दर्शवत असते.


चालणे ही एक सामान्य मानवी क्रिया आहे, परंतु तुम्हाला माहित आहे का तुमची चालण्याची पद्धत तुमच्या व्यक्तिमत्त्वाच्या वैशिष्ट्यांबद्दल काय सांगते? तुम्ही कसे चलता यावर देखील समोरील व्यक्ति तुमची Personality ठरवतो, चालताना तुमच्या पावलांच्या गतीपासून तुम्ही तुमचे हात हलवण्यापर्यंत, तुमच्या चालण्याबद्दलचे छोटे छोटे Details तुमचे वर्तन, आत्मविश्वास आणि तुमच्या भावनिक स्थितीबद्दल माहिती देऊ शकतात. या लेखात, आम्ही आपल्या वेगवेगळ्या चालण्याच्या स्टाइल वेगवेगळ्या व्यक्तिमत्त्वाच्या वैशिष्ट्यांचा परिचय कसा देऊ शकतो ते पाहनार आहोत.

Walking personality test: या जगात प्रत्येक माणूस वेगळा आहे त्याच प्रमाणे प्रत्येक व्यक्तीची विचार करण्याची, बोलण्याची, चालण्याची, झोपण्याची, जगण्याची, हावभाव करण्याची स्वतःची एक वेगळी पद्धत असते, काही लोक भरभर चालतात तर काही स्लो रमतगमत चालतात त्याच प्रमाणे काही लोक लांब लांब पाऊले टाकत चालतात.

 असेही काही लोक आहेत जे आपले डोके खाली ठेवून हळू चालतात तर काही जण जगाचे मालक असल्यासारखे आत्मविश्वासाने चालतात. तुमची चालण्याची शैली तुमच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल काय सांगते? आपण ज्या पद्धतीने चालतो ते तुमच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल बरेच काही प्रकट करू शकते. 

तुमची चालण्याची शैली तुमच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये दर्शवते (Your walking style reflects your personality traits):-

ज्या प्रकारे आपल्या झोपण्याची पद्धत, आपल्या डोळ्यांचा रंग किंवा आपण आपला फोन पकडण्याची पद्धत एकमेकांपासून भिन्न असते त्याचप्रमाणे आपल्या हालचाली देखील एकमेकांपासून भिन्न आहेत.

#1 हळू चालणारे (Slow Walker Personality Traits)

जर तुम्ही तुमचे खांदे सरळ ठेवून आणि  डोके उंच करून हळू आणि आत्मविश्वासाने चालत असाल, तर तुमचे व्यक्तिमत्त्व हे स्पष्ट करते की तुम्ही शांत आणि आकर्षक व्यक्तिमत्वाचे आहात. तुम्ही तुमच्या चालण्याच्या स्टाइल कडे पाहून लोक तुमच्या अनौपचारिक वातावरणाकडे आकर्षित होतात. 

तुम्ही लोकांना न घाबरता, न लाजता  तुम्ही तुमच्या मार्गावर चालत राहता. तुमची fashion स्टाइल कळत  नकळत पणे लोकांना त्यांची पूर्ण क्षमता साध्य करण्यासाठी प्रेरित करते. तुम्ही सामाजिक आणि मैत्रीपूर्ण आहात तुम्ही नवीन अनुभवांचा आनंद घेता. तुम्ही सहजपणे लोकांना विश्वासात घेता.

#2 वेगात चालणारे (Fast Walker Personality Traits)

जर  तुमची चालण्याची गती फास्ट असेल तुम्ही वेगाने चालत असाल, तर तुमच्या व्यक्तिमत्त्वाच्या वैशिष्ट्यांवरून दिसून येते की तुम्ही बहिर्मुखी आहात, नवीन अनुभव घेण्यासाठी खुले आहात आणि तुम्ही स्वतशी व ईतरांशी  प्रामाणिक आहात. तुम्ही तुमची नियमित कामे वेळेत पार पाडता, ज्या प्रकारे तुम्ही तुमची कामे पार पाडता त्यामध्येही तुमचा ट्रेंड वेगवान आहे.

तुम्ही एक चांगले, मिलनसार आणि मैत्रीपूर्ण व्यक्ति आहात जो नवीन लोकांमध्ये कोणताही संकोच न करता न लाजता सहजपणे मिसळतो. तसेच तुम्ही समोर आलेली कोणतीही अडचनी पासून पळ काढत नाही व जोखीम घ्यायला घाबरत नाही. जलद चालणारे लोक शक्य तितक्या लवकर आपले ध्येय गाठण्यात विश्वास ठेवतात. 

तुम्ही निर्भयपणे तुमचे विचार किंवा मत मांडता तसेच तुमचे विचार लोकांना पटवून देता. तुम्हाला मुक्तपणे जगायला आवडते तुम्ही नेहमी अत्यंत सतर्क आणि सामान्य गर्दीच्या पुढे असता.

#3 सरळ चालणारे (Straight Walker Personality Traits)

जे लोक चालताना त्याचे खांदे आणि छाती ताठ ठेवून सरळ चालतात. असे लोक शारीरिकदृष्ट्या मजबूत आहेत. त्याचा आत्मविश्वास खूप आहे आणि ते आरोग्याच्या दृष्टीनेही तंदुरुस्त आहेत.

अशी लोक त्यांच्यापेक्षा वेगळा विचार करणार्‍या लोकांशी जुळवून घेतात. आपल्या दैनंदिन जीवनात तुमच्या सभोवतालची  लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात याबद्दल तुम्हाला कोणताही त्रास होत नाही. तसेच सरल चालणारे लोक स्वतचे निर्णय घेण्यात सक्षम असतात तसेच ते  विचारवंत आणि  समस्या सोडवणारे असतात.

#4 लांब पाऊले टाकून चालणारे (Long strides walker personality traits)

जर तुम्ही लांब लांब पाऊले टाकत चालत असाल, तर तुमच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये सांगतात की तुम्ही आत्मविश्वासू आहात. आत्मविश्वास असलेले लोक मोठी पावले उचलतात आणि आओल्या उद्देशाच्या भावनेने चालत असतात. ही लोक कमी चिंताग्रस्त असतात आणि त्यांचे स्वतावर खूप नियंत्रण असते. 

याव्यतिरिक्त तुम्ही तुमच्या ध्येये आणि विश्वासांबद्दल उत्कट आहात. तुम्ही तुमच्या विश्वासांचे रक्षण करण्यातही चांगले आहात. तुम्ही कोणतीही परिस्थिती चातुर्याने आणि हुशारीने सहज हाताळू शकता. तुम्ही तुमच्या गोष्टी करण्याच्या पद्धतीमध्ये अत्यंत चिकाटीने आहात.

#5 आरामात चालणारे (relaxed strides walker personality traits) 

जर तुम्ही चालताना नेहमी आरामात चालता तेव्हा तुमचे व्यक्तिमत्व हे सांगते की तुम्ही जीवन आपल्या मर्जी ने जगने पसंत करता. तुम्ही नेहमी टेंशन मुक्त राहणे पसंत करता, तसेच तुम्ही आपल्या जीवनात समाधानी आहात. तुम्ही घरी असा किंवा गर्दी मध्ये तुममहि नेहमी शांत राहता व लोकांशी प्रेमाने आपुलकीने संवाद साधता.

व्यक्ति जेव्हा गर्दीतून किंवा रस्त्यातून कुठलिच पर्व न करता आपल्या चालण्याच्या स्टाइल मध्ये मन ऊंच करून आत्मविश्वासाने चालतात तेव्हा इतर लोक त्यांच्याकडे आकर्षित होतात.  

#6 पाय घासून चालणे (Shuffling and your personality)

जेव्हा तुम्ही चालताना रस्त्यात तुमचे पाय घासून चलता तेव्हा तुमचे व्यक्तिमत्व हे सांगते की तुम्ही चिंताग्रस्त व्यक्ती आहात किंवा खूप काळजी करत आहात. अभ्यासातून असे दिसून आले आहे की जेव्हा कोणी चालताना पाय सरपटत चालतो तेव्हा अशा चालण्याची शैली असलेले लोक सहसा स्वतःमध्ये उदास असतात. ते स्वतमध्येच गुंतून असतात त्यांना बाहेर लोकांमध्ये मिसळायला आवडत नाही. 

ते स्वताला इतर गोष्टींपासून किंवा चिंताजनक विचारांपासून स्वतःला दूर ठेवण्यावर त्यांचे नियंत्रण नसते. ते नेहमीच त्यांचा भूतकालात  त्यांच्यासोबत वर्तमानात ओढतात. ते एखाद्या गोष्टीवर बराच काळ अडकून राहतात.

जीवनात किंवा दैनंदिन कामे करताना त्यांच्यात ऊर्जा आणि उजगत असतात नेहमी होऊन गेलेल्या गोष्टीचा विचार करत असतात. कोणतेही काम पूर्ण करताना किंवा समस्या सोडवताना त्यांना अडचणी येतात.

प्रतेकाची चालण्याची शैली वेगवेगळी असते तसेच चालणे हे एक  अनोखा प्रकार आहे जो आपल्या व्यक्तिमत्त्वातील लपलेले छोटे छोटे  पैलू प्रकट करू शकतो. हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की या व्याख्या निश्चित नसल्या तरी लोक आपल्याबद्दल काय विचार करतात आणि आपण स्वतःला जगासमोर कसे सादर करतो याबद्दल ते मनोरंजक अंतर्दृष्टी प्रदान करू शकतात. पुढच्या वेळी तुम्ही फिरायला बाहेर जाल तेव्हा तुमच्या चालण्याकडे, वेगाकडे आणि मुद्राकडे लक्ष द्या आणि इतर लोक तुमच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल काय म्हणत असतील याचा विचार करा.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Menu Site