Ad code

Latest

6/recent/ticker-posts

Important मनी मैनेजमेंट टिप्स, Money management tips in Marathi

Important मनी मैनेजमेंट टिप्स, Money management tips in Marathi 


पगारदार वर्ग असो किंवा व्यावसायिक सर्वांसाठी Money management म्हणजे पैश्याचा योग्य वापर करणे खूपच महत्त्वाचा भाग आहे. आपण दर महिन्याला किती बचत आणि गुंतवणूक करू शकतो याबद्दल नेहमीच संभ्रमात असतो.


Money management दरम्यान सर्वप्रथम, हे लक्षात ठेवा की तुम्हाला तुमचे खर्च, कर्ज आणि गुंतवणूक यामध्ये संतुलन राखावे लागेल. मध्यमवर्गीय व्यक्ती आयुष्यभर पैसे कमावते, तरीही त्याच्या ९०% समस्या पैशावर येऊन अडकतात. आणि त्यांना असे वाटते की कदाचित तो पुरेसे पैसे कमवू शकत नाही जेणेकरून त्याच्या सर्व गरजा पूर्ण होऊ शकतील, परंतु येथे समस्या पुरेसे पैसे कमवन्याचे नसून याचे खरे कारण म्हणजे पैशांचे व्यवस्थापन न करणे आहे.

खरंतर पैशाचं व्यवस्थापन म्हणजे आपला खर्च आणि बचत यांचा ताळमेळ राखणे. आणि ज्याला money management करता येते ती व्यक्ती त्याच्या बहुतांश गरजा पूर्ण करतो आणि ज्याला money management mhanje Kay हे समजत नाही ती व्यक्ती आयुष्यभर आपल्या कमाईला किंवा नशिबाला दोष देत राहते. जर तुम्हाला money management tips माहित असतील तर तुम्ही तुमच्या पैशाचे योग्य व्यवस्थापन करू शकाल.

जर तुम्हाला money management करता येत नसेल तर आम्ही तुम्हाला पैसे व्यवस्थापनाच्या येथे काही टिप्स देत आहोत, ज्यांच्या मदतीने तुम्ही तुमच्या पैशांचे व्यवस्थापन अधिक चांगल्या प्रकारे करू शकाल.

मनी मॅनेजमेंट म्हणजे काय? What is money management in marathi

मनी मॅनेजमेंट म्हणजे अशा ठिकाणी आपले पैसे हुशारीने खर्च करणे किंवा गुंतवणे, जेणेकरून आपले पैसे वाचून सतत वाढत राहतील आणि आपली उधळपट्टी कमी होईल, म्हणजेच खर्च कमी करू शकतो आणि अधिक बचत (गुंतवणूक) करू शकतो. म्हणजे अशा ठिकाणी तुमचे पैसे गुंतवणे, जेणेकरून भविष्यात कोणत्याही चांगल्या किंवा वाईट आर्थिक परिस्थितीला आपल्याला तोंड देता येईल.

आपल्याला भविष्यात नोकरी गेली किंवा तुमचे उत्पन्न कमी झाले असले, तरी त्या कठीण प्रसंगांना तोंड देण्यासाठी तुम्ही तुमच्या साठवलेल्या, गुंतवलेल्या पैशांचा आधार घेऊ शकता. मग तुम्ही केलेले मनी मॅनेजमेंट तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरतो यालाच आपण मनी मॅनेजमेंट म्हणतो.

सोप्या भाषेत सांगायचे तर मनी मॅनेजमेंट म्हणजे तुमच्या पैशाचे योग्यरित्या व्यवस्थापन करणे तुम्ही कमावलेल्या पैशातून किती टक्के तुमच्या गरजांवर खर्च होतो आणि किती टक्के बचत होतो याचे नियोजन करणे. Money management किंवा finance management मध्ये तुमच्या उत्पन्नानुसार, तुम्ही तुमचे खर्च, बचत आणि गुंतवणूक अशा प्रकारे व्यवस्थापित करता की तुम्हाला वर्तमानात तसेच भविष्यात पैशांच्या समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही.

वास्तविक, आपल्या सर्वांच्या उत्पन्नाचे स्त्रोत वेगळे असल्यामुळे आपले उत्पन्न ही वेगळे आहेत. यासोबतच आपला खर्च आपल्या जीवनशैलीनुसार, कुटुंबातील सदस्यांची संख्या आणि गरजांनुसार आपली निवड आणि प्राधान्य यानुसार बदलत असतो, त्यामुळे आपल्या पैशांच्या व्यवस्थापनासाठी उचललेली पावलेही भिन्न असतात.

म्हणूनच पैसे व्यवस्थापनाचा कोणताही निश्चित मार्ग नाही तरीही काही money management tips खूप उपयुक्त आहेत ज्यांची आपण या लेखात चर्चा करू.

Best Money Management Tips - Money Management Kase Karave

पैसे manage करणे म्हणजे पैसे वाचवणे

मनी मॅनेजमेंट टिप्समधील सर्वात महत्त्वाची आणि पहिली गोष्ट म्हणजे पैसे कसे वाचवायचे हे शिकणे. तुम्हाला तुमच्या खर्चावर नियंत्रण कसे ठेवायचे हे माहित असने महत्वाचे आहे.

तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनातील अनावश्यक गोष्टींवर बचत कशी करू शकता यावर लक्ष द्या. अनावश्यक होणारा खर्च कमी करून तुम्ही तुमची बचत आणखी वाढवू शकता. मंदीसारख्या कठीण काळातही तुम्ही बचत केलेले पैसे तुमची आर्थिक मदत करतील.

बचत गुंतवणुकीचे गुप्त सूत्र (50:30:20 सूत्र)


जसजसा पगार वाढतो तसतसा आपला खर्च देखील वाढतो हे तुम्ही देखील अनुभवले असेलच, हा खर्च का वाढतो कारण आपल्या अपेक्षा वाढतात म्हणून. बर्‍याच वेळा एखादी व्यक्ती पैश्याचे नीट व्यवस्थापन करू शकत नसल्यामुळे आर्थिक संकटाशी झुंजू लागते. 

अशा परिस्थितीत त्याने 50, 30 आणि 20 चे नियम पाळले पाहिजेत. याचा अर्थ एखाद्या व्यक्तीने त्याच्या पगाराचे तीन भाग करावेत. 50 टक्के, 30 टक्के आणि 20 टक्के. तो पगारातील 50 टक्के रक्कम त्याच्या गरजांसाठी खर्च करू शकतो, जसे की खाणेपिणे, घर आणि कुटुंब. दुसरा भाग म्हणजे 30% एखाद्याचा छंद पूर्ण करण्यासाठी, कुटुंबाला चित्रपट दाखवण्यासाठी किंवा कुठेतरी प्रवास करण्यासाठी वापरला जाऊ शकतो. त्याच वेळी, उर्वरित 20 टक्के रक्कम वाचविली जाऊ शकते.

जर एखाद्या व्यक्तीने दर महिन्याला त्याच्या पगाराच्या फक्त 20% बचत केली तर एका वर्षात त्याच्या खात्यात चांगली रक्कम असेल. भविष्यात अचानक येणारे संकट टाळण्यासाठी तो याचा उपयोग करू शकतो.

आर्थिक नियोजक म्हणतात, मासिक बचतीचे सूत्र खूपच सोपे आहे. तर त्याचा सर्वात सोपा फॉर्म्युला 50:30:20 काय आहे. चला 3 संकल्पनांवर समजून घेऊ.

1. एकूण उत्पन्नाच्या 50% वर घरगुती खर्च ठेवा

 तुमचे मासिक उत्पन्न कितीही असले तरी त्यातील जास्तीत जास्त 50% हा तुमच्या घराचा खर्च असावा. म्हणजे तुमचे उत्पन्न 1 लाख असेल तर तुमचा मासिक खर्च 50 हजार रुपयांपेक्षा जास्त नसावा. ज्यामध्ये तुमचे घरखर्च, बाहेर खाणे, जीवनशैली खर्च, शाळेची फी, कर्ज EMI इत्यादींचा समावेश आहे. हे सर्व तुमच्या 50,000 रुपयांसाठी केले पाहिजे.

2. तुमच्या इच्छेसाठी 30% रक्कम

पुढील घटक अतिशय महत्त्वाचा आहे. त्यात तुम्हाला करायचे असलेले खर्च आहेत. उदाहरणार्थ- घर खरेदी करणे, कार घेणे, मोबाईल, लॅपटॉप इ. त्यासाठी तुम्ही तुमच्या एकूण मासिक उत्पन्नाच्या 30% पर्यंत बचत करू शकता. म्हणजेच जर मासिक 1 लाख पगार असेल तर या खर्चासाठी 30,000 रुपये ठेवता येतील.

3. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी 20% ठेवा

Long-term गुंतवणुकीसाठी तुमच्या monthly उत्पन्नाचा २०% भाग हा दीर्घकालीन गुंतवणुकीमध्ये ठेवा. उदाहरणार्थ, मुलांच्या उच्च शिक्षणासाठी, लग्नासाठी, घर, गाडी घेण्यासाठी किंवा इतर कोणत्याही मोठ्या टार्गेट साठी मासिक उत्पन्नाचा दरमहा २०% गुंतवणूक करा. गुंतवणुकीसाठी तुम्ही इक्विटी म्युच्युअल फंड निवडू शकता. किंवा एखादी चांगले returns देणाऱ्या sceme मध्ये गुंतवणूक करू शकता.

शक्य तितक्या लवकर बचत सुरू करा

तज्ज्ञांनी शिफारस केली आहे की तुम्ही तुमची बचत लवकरात लवकर सुरू करावी. जरी सुरुवातीला तुमचा पगार किंवा उत्पन्न थोडा जरी असला तरी तुम्ही त्याची बचत करा. जितक्या लवकर तुम्ही बचत करायला सुरुवात कराल भविष्यात तुमच्याकडे तितका मोठा निधी असेल. जसा थेंबे थेंबे तळे साचे व प्रत्येक थेंब एक महासागर बनवतो ही म्हण तुम्ही ऐकली असेल. म्हणूनच तुम्ही तुमच्या पहिल्या पगारातूनच काहीतरी बचत करायला सुरुवात करा. जर तुम्ही तुमच्या उत्पन्नाचा एक छोटासा भाग बचत म्हणून ठेवलात, तर तुमच्याकडे आपत्कालीन परिस्थितीत मोठी रक्कम असेल.

हुशारीने खर्च करा

बहुतेक वेळा जेव्हा आपल्याकडे पैसा असतो तेव्हा आपण कुठचाही विचार न करता असलेले पैसे खर्च करतो, व शेवटी आपल्याकडे काही शिल्लक राहत नाही. म्हणूनच आपल्याकडे असणाऱ्या पैश्याची उधळपट्टी करू नका आणि जे काही खर्च कराल ते विचारपूर्वक करा. जर तुम्हाला एखादी गोष्ट खरेदी करावी की नाही असे वाटत असेल व आपल्याला त्या वस्तूची आता गरज नसेल तर ते काही काळासाठी पुढे ढकलून द्या, योग्य वेळी आणि गरज असेल तेव्हाच खरेदी करा. आपल्याला एखादी गोष्ट दिसली आणि ती आवडली तर लगेच विकत घेण्याची सवय टाळा.

खर्च करण्यापूर्वी बचत

मनी मॅनेजमेंट टिप्समधली ही टीप तुम्हाला आयुष्यभर उपयोगी पडेल. खर्च कितीही असो, त्याचा प्राधान्यक्रम समजून घ्या. त्या पैशाची किंमत समजून घ्या, तो पैसा कुठे जातोय, ते खर्च केल्याशिवाय तुमचे काम होऊ शकते का? खर्च करण्यापूर्वी थोडी बचत करावी. म्हणजेच, जेव्हा तुम्ही बचतीसाठी पुरेसा पैसा ठेवला असेल त्यानंतरच तुम्ही इतर गोष्टींवर खर्च करा.तुमच्या मदतीसाठी, आज आम्ही Money management tips in Marathi शेअर केल्या आहेत. हे अनुसरण केल्याने तुम्हाला पैशांच्या व्यवस्थापनाशी संबंधित थोड्याप्रमानात तरी  समस्या सोडवता येतील अशी अपेक्षा आहे.

तुम्हाला जीवनात यशस्वी व्हायचे असेल, तर तुम्ही finance  management वर लक्ष केंद्रित केले पाहिजे. पैश्याचा नियम असा आहे की ज्यांना पैसा कसा हाताळायचा हे माहित आहे, पैसा त्यांच्याकडेच राहतो. तुमच्या चांगल्या भविष्यासाठी, तुम्हाला तुमचे पैसे व्यवस्थापित करणे माहीत असायला हवे.

आजच्या लेखात Money management म्हणजे काय? आणि Money management कसे करावे? या बद्दल संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला. जर तुम्हाला लेखाशी संबंधित काही प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि लेख शेअर करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Menu Site