Ad code

Latest

6/recent/ticker-posts

Groww app मधून पैसे कसे कमवायचे – संपूर्ण माहिती मराठीमध्ये

Groww app मधून पैसे कसे कमवायचे How to Earn Money using Groww app


जर तुम्हाला लवकरात लवकर पैसे कमवायचे असतील, तर असे भरपूर प्लॅटफॉर्म आहेत ज्यामधून तुम्ही खूप सारे पैसे कमवू शकता. आज आपण त्यातल्याच एका platform बद्दल माहिती घेणार आहोत, जिथून तुम्ही भरपूर पैसे कमवू शकता, या पोस्ट मध्ये आपण Groww ॲपबद्दल माहिती घेणार आहोत, जर तुम्हाला ट्रेडिंग मध्ये गुंतवणूक करून पैसे कमवायचे असतील तर Groww ॲप तुम्हाला मदत करू शकते, आजच्या लेखात मी तुम्हाला (what is Groww app) groww ॲप म्हणजे काय ते सांगणार आहे. सोबतच 2023 मध्ये Groww app Varun paise kase kamvayache? Groww app in Marathi. या बद्दल माहिती घेऊ.

जर तुम्हाला तुमचा वर्तमान काळ व भविष्यात उत्तम जीवनशैली जगायची असेल, तर तुम्हाला आताच कुठेतरी गुंतवणूक करावी लागेल, जेणेकरून तुम्ही तुमचे उत्पन्न वाढवू शकाल आणि Groww हे असे एक प्लॅफॉर्म आहे जिथून तुम्ही stock Market मध्ये व Mutual Fund द्वारे भरपूर पैसे कमवू शकता.

खूप लोक म्युच्युअल फंड आणि ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करत आहेत व कमाई करत आहेत. जर तुम्हालाही Groww ॲपवर account तयार करून ट्रेडिंग सुरू करायचे असेल तर हा लेख शेवटपर्यंत वाचा, या लेखाद्वारे तुम्हाला Groww app बद्दल माहिती मिळेल.

Groww ॲप काय आहे What Is Groww App In Marathi


Groww ॲप हे एक उत्तम Best Trading Application आहे ज्याद्वारे तुम्ही Mutual Fund आणि शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवू शकता. व आपले पैसे वाढवू शकता.

हे ॲप एप्रिल 2016 मध्ये लाँच करण्यात आले होते, Groww ॲप हे Nextbillion Technology ने विकसित केले आहे. ॲप लाँच झाले तेव्हा सुरुवातीला यात फक्त म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूकी साठी याचा वापर होत असे, परंतु 2020 नंतर Groww ॲप ने स्टॉक ब्रोकिंग देखील सुरू केले.

Groww ऍपमध्ये तुम्ही म्युच्युअल फंड, स्टॉक्स मार्केट, इनिशियल पब्लिक ऑफरिंग्ज, डिजिटल गोल्ड आणि एक्सचेंज-ट्रेडेड फंडांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी डीमॅट खाते उघडू शकता. Groww ॲपमधे तुम्ही खरेदी केलेले फंड किंवा शेअर्स किती वाढले किंवा कमी झाले या तुमच्या सर्व गुंतवणुकीवर लक्ष ठेवू शकता.

Groww ॲपमधून पैसे कमवण्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत?


Groww अँपमध्ये sign up करण्यासाठी तुमच्याकडे या गोष्टी असणे अत्यंत आवश्यक आहे, त्याशिवाय तुम्ही Groww ॲपमध्ये साइन अप करू शकणार नाही.

  1. तुमच्या मोबाईलमध्ये Groww App असणे आवश्यक आहे.
  2. तुमच्याकडे पॅन कार्ड असणे आवश्यक आहे
  3. तुमच्याकडे आधार कार्ड सोबत मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे 
  4. तुमचे बँक खाते असले पाहिजे ज्यामध्ये तुमचा मोबाईल नंबर लिंक आहे
  5. याशिवाय 1 मोबाईल क्रमांक 1 ईमेल आयडी देखील आवश्यक आहे.

Groww ॲप इंस्टॉल कसे करावे?


जर तुम्हाला Groww ॲप द्वारे स्टॉक ट्रेडिंग, म्युच्युअल फंड इत्यादींमध्ये गुंतवणूक करायची असेल, तर सर्वप्रथम तुम्हाला प्ले स्टोअर/ॲप स्टोअर वरून Groww ॲप डाउनलोड करावे लागेल.


जर तुम्हाला Groww ॲपमध्ये साइनअपवर 100 रु.  बोनस मिळवायचा असेल तर तुम्ही येथे दिलेल्या डाउनलोड लिंकवरून Groww ॲप डाउनलोड करून इंस्टॉल करावे लागेल. तरच तुम्हाला बोनस म्हणून 100 रुपये मिळतील.Groww app नोंदणी कशी करावी?

Groww app मध्ये नोंदणी करणे खूप सोपे आहे, जे तुम्ही फक्त तुमच्या मोबाईलवरून करू शकता, चला तर मग Groww अँपमध्ये खाते कसे तयार करायचे ते जाणून घेऊया.

Step 1. सर्वप्रथम तुम्हाला येथे दिलेल्या लिंकवर क्लिक करून Groww अँप डाउनलोड करावे लागेल. ( या लिंक वर क्लीक करून groww अँप download केल्यावर तुम्हाला 100 रुपये bonus मिळेल)

Step 2. आता तुम्हाला Groww App ओपन करावे लागेल, App ओपन केल्यानंतर Continue With Google चा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.

Step 3. आता येथे तुमची Google ईमेल आयडी निवडा आणि तुमचा मोबाइल नंबर इंटर केल्यावर next बटन वर क्लिक करा.

Step 4. आता तुमच्या मोबाईल नंबरवर आलेला OTP येथे सबमिट करा. 

Step 5. आता येथे तुम्हाला तुमचा पॅन कार्ड क्रमांक आणि नाव टाकून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा.

Step 6. आता तुमचे बँक डिटेल्स भरा यात तुमचे बँक खाते क्रमांक, नाव आणि IFSC कोड असेल.

Step 7. या नंतर तुम्हाला तुमचा फोटो येथे सबमिट करावा लागेल

Step 8. येथे तुमच्या आवश्यक कागदपत्रांचा फोटो म्हणजेच pan कार्ड व आधार कार्ड चा फोटो अपलोड करा व खालील Agree बटणावर क्लिक करून तुमची सही सेव्ह करावी लागेल.

Step 9. या सर्व गोष्टी केल्यावर तुम्हाला तुमच्या कुटुंबातील कोणालातरी nominee म्हणून ठेवावा लागेल.

Step 10. आता तुमचे Groww खाते यशस्वीरित्या उघडले जाईल जेथे तुम्ही आता Groww अँप मध्ये गुंतवणूक करून पैसे कमवू शकता.


Groww App वरून पैसे कसे कमवायचे. How To Earn Money From Groww App


आम्‍ही तुम्‍हाला Grow App मधून पैसे कमवण्‍याचे काही उत्तम मार्ग सांगणार आहोत, त्या सर्व पद्धतींद्वारे तुम्ही Groww App कोणत्याही अडचणीशिवाय सहजपणे पैसे कमवू शकता.

परंतु तुम्हाला या खास गोष्टीकडे लक्ष देणे आवश्यक आहे की Groww App वरून पैसे कमवण्यासाठी तुमच्याकडे share market बद्दल ज्ञान असणे आवश्यक आहे, जर तुम्ही कोणत्याही ज्ञानाशिवाय दुसऱ्याच्या बोलण्यावरून कुठेही पैसे गुंतवले तर तुमचे गुंतवलेले सर्व पैसे गमावले जाऊ शकतात.

अपुऱ्या ज्ञानामुळे तुम्हाला यामध्ये आर्थिक नुकसान सहन करावे लागेल, म्हणून जर तुम्ही Groww अँपवरून पैसे कमवण्याचा विचार करत असाल तर त्याविषयीची तेव्हा योग्य माहिती मिळवा. यानंतर Groww app मध्ये पैसे गुंतवून पैसे कमवा. 

#1 - स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करून Groww App मधून पैसे कमवा


तुम्ही शेअर बाजाराबद्दल ऐकले असेलच ज्यामध्ये लोक शेअर्स खरेदी करतात आणि विकतात. शेअर बाजारातील चढ-उतारानुसार या मार्केटमध्ये लोक लाखो रुपये कमावतात.

Share Market मध्ये शेअर्स खरेदी करणे म्हणजे ज्या कंपनी चे share आहेत त्या कंपनीत पैसे गुंतवणे. आणि जेव्हा ती कंपनी चांगली कामगिरी त्या कंपनी ला फायदा होतो तेव्हा त्या कंपनी च्या share ची value वाढते त्यामुळे तुमच्या शेअरची किंमत वाढू लागते व तुम्हाला फायदा होतो.

समजा तुम्ही एखाद्या कंपनीचे 1000 रुपयांचे शेअर्स विकत घेतले आणि त्या कंपनीला फायदा होऊन त्याच्या share मध्ये वाढ होते या प्रकरणात, तुमचे गुंतवलेले 1000 रुपये वाढून 2000 किंवा 3000 किंवा त्याहूनही अधिक होऊ शकतात.

Groww अँपच्या मदतीने तुम्ही कोणत्याही कंपनीचे शेअर्स अगदी सहजपणे खरेदी करू शकता. शेअर मार्केटमध्ये नफा मिळविण्यासाठी तुम्हाला एखाद्या चांगल्या कंपनीमध्ये तुमचे पैसे गुंतवावे लागतील. आणि त्या कंपनीचे शेअर्स योग्य वेळी खरेदी आणि विकावे लागतात.

#2 - म्युच्युअल फंडात गुंतवणूक करून

स्टॉक मार्केट प्रमाणेच म्युच्युअल फंड हा देखील गुंतवणूक करून पैसे कमवण्याचा एक उत्तम मार्ग आहे जिथे तुम्हाला जास्तीत जास्त 34% पर्यंत परतावा मिळू शकतो मागील 3 वर्ष्यात mutual fund कंपन्यांनी जास्तीत जास्त रिटर्न्स दिले आहेत.

जेव्हा तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करण्यासाठी groww अँप मध्ये याल तेव्हा तुम्हाला mutual फंड च्या सर्व कंपन्या Groww मध्ये दिसतील, ज्यामध्ये तुम्ही तुमचे पैसे गुंतवून या AMC कंपन्यांमधून उच्च परतावा मिळवू शकता, जो Groww मधून पैसे कमवण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे.

या स्टॉक मार्केट आणि म्युच्युअल ची ही खासियत आहे की ते तुम्हाला सर्वात जास्त परतावा देते पण त्यात जोखीमही तितकीच जास्त असते, त्यामुळे योग्य कंपनीत आणि योग्य प्रकारात विचार करूनच गुंतवणूक करा, अन्यथा नुकसान होऊ शकते.

यामध्ये तुम्ही Lumpus किंवा SIP चा option निवडून mutual fund मध्ये गुंतवणूक करू शकता, mutual फंड मध्ये गुंतवणूक करणे एकदम सोपे आहे यात तुम्हाला returns देखील चांगले मिळतील 
( mutual fund विषयी अधिक माहिती साठी तुम्ही आमच्या contact us page द्वारे संपर्क करू शकता आम्ही तुमची नक्कीच मदत करू )

#3 - सोन्यात गुंतवणूक करून पैसे कमवा

Groww app च्या मदतीने तुम्ही gold मध्ये देखील इन्व्हेस्ट करू शकता, तुम्ही पाहिले असेलच की सोन्याची किंमत देखील नेहमी वर-खाली होत असते, परंतु तुम्ही हे नेहमीच पाहिले असेल की सोन्याच्या किमतीत नेहमीच वाढ होत असते, म्हणून बहुतेक लोक सोन्यात गुंतवणूक करून पैसे कमवतात, कारण बहुतेकांना वाटते की सोन्यात गुंतवणूक करणे योग्य आहे कारण त्याची किंमत एवढ्या वर्ष्यात कधीही कमी झाली नाही. जसजशी महागाई वाढत आहे त्यापेक्षाही जास्त वेगाने सोन्याची किंमतही वाढते.

Groww App वरून पैसे कमावण्‍यासाठी लोक सोन्यात गुंतवणूक करतात. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही तुमचा पैसा सोन्यात गुंतवून चांगला परतावा मिळवू शकता, परंतु हे लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या संशोधनानुसार येथे पैसे गुंतवा.

#4 - Fix Deposit (FD) मध्ये गुंतवणूक करून

जर तुमचे बँक मध्ये खाते असेल तर तुम्ही FD बद्दल ऐकले असेलच, तसेच तुम्ही FD मध्ये पैसे ठेवून त्यावरती व्याज घेत असालच. Fix Deposit ही एक पूर्णपणे सुरक्षित पद्धत मानली जाते.

जर तुम्हाला तुमच्या पैशावर कोणतीही जोखीम घ्यायची नसेल, तर तुम्ही तुमचे पैसे फिक्स्ड डिपॉझिटमध्ये म्हणजेच FD मध्ये गुंतवू शकता. येथे तुम्हाला तुमच्या Deposit वरती 6% ते सुमारे 7% व्याज मिळेल, fix deposit मध्ये पैसे गुंतवणे पूर्णपणे सुरक्षित मानले जाते कारण येथे शेअर बाजारातील चढ-उतार याचा काही प्रभाव पडत नाही.

तुम्ही तुमची FD बँक मध्ये किंवा एखाद्या carporate कंपनी मध्ये करू शकता, जेव्हा तुम्ही बँकेत FD करण्यासाठी जाता, तेव्हा तुम्हाला त्या बँक मध्ये खाते उघडावे लागते, परंतु हे Groww app तुम्हाला अशी सुविधा देते, जिथे तुम्ही मोबाईल Groww अँप द्वारे कोणत्याही बँकेत तुमची FD त्वरित करू शकता आणि Groww अँप मधून FD द्वारे पैसे कमवू शकता.


#5 - Refer करून पैसे कमवा

जर तुम्हाला मार्केटबद्दल चांगले ज्ञान नसेल तर तुम्ही या अँप ला refer करूम पैसे कमवू शकता. रेफर करून पैसे कमवण्याची प्रक्रिया अतिशय सोपी आहे. येथे कोणीही कोणत्याही अडचणीशिवाय Groww App आपल्या मित्रांना social media प्लॅटफॉर्म वर Refer करून पैसे कमवू शकता. जेव्हा एखादा व्यक्ती तुम्ही refer केलेल्या लिंक वरून अँप डाउनलोड करून त्यावर आपले account तयार करतो तेव्हा तुम्हाला पैसे मिळतात.


तुम्हाला फक्त Groww App ओपन करायचे आहे आणि नंतर रेफर ऑप्शनवर जावे लागेल आणि एखाद्या मित्राला येथून रेफर करावे लागेल. जेव्हा कोणी तुमच्या लिंकद्वारे तुम्हाला हे अँप रेफर करण्यासाठी ₹ 100 मिळतात, परंतु काहीवेळा Groww मध्ये ऑफर येतात, जेथे तुम्हाला प्रत्येक रेफर करण्यासाठी ₹300 ते ₹500 पर्यंत मिळू शकतात.निष्कर्ष - Groww App मधून पैसे कसे कमवायचे
तर ही होती Groww अँप बद्दल काही माहिती जिथे तुम्ही Groww App वरून पैसे कसे कमवायचे, Groww app काय आहे, Groww मधून कशाप्रकारे पैसे कमवू शकतो पर्यंतची माहिती दिलेली आहे.

आज आम्ही तुम्हाला Groww App ने पैसे कसे कमवायचे बद्दल सांगितले आहे आणि Groww App च्या सर्व पद्धतींची माहिती देखील दिली आहे. Groww App मध्ये पैसे कमवण्यासाठी आवश्यक गोष्टीची सविस्तर माहिती दिली आहे.

मला आशा आहे की तुम्हाला हा लेख आवडला असेल आणि तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळाले असेल जेणेकरून तुम्ही पैसे कमवू शकाल. जर तुम्हाला हा लेख माहितीपूर्ण वाटला असेल, तर तो तुमच्या मित्रांसह आणि सोशल मीडियावर देखील शेअर करा जेणेकरुन त्यांना देखील याबद्दल माहिती मिळेल आणि ते देखील पैसे कमावतील.


धन्यवाद !

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Menu Site