Ad code

Latest

6/recent/ticker-posts

कोकणातिल लोकांसाठी या व्यवसाय कल्पना ज्या खूपच फायदेशीर ठरणार आहेत | 16 Business ideas In konkan

 कोकणात हे व्यवसाय करून 1 लाख महिन्याला कामवू शकता | कोकणात 16 नवीन व्यवसायाच्या संधी


कोकण हा महाराष्ट्रातील प्रगतशील विभाग आहे, तसंच हा नैसर्गिक साधन संपत्तीने बहरलेला भाग आहे. कोकणामध्ये एवढं असूनही येथील कोंकणी माणूस व्यवसायकडे न वळता शहरात जाऊन नोकरीच्या शोधात असतो, व मनासारखी नोकरी न मिळाल्यावर नशिबाला दोष देत राहतो. 

कोकण पट्टा हा मुंबई पासून गोवा पर्यंत आहे आणि येथील तरुणांनी नोकरी कडे न वळता व्यवसायकडे वळावे म्हणून ही पोस्ट लिहली आहे. कोकणातील अनेक लोकांना व्यवसाय सुरू करायचा आहे, पण कोणता व्यवसाय करायचा कुठे सुरू करायचा हे त्यांना माहीत नाही, किंवा त्यांच्याकडे योग्य ते भांडवल नाही, यामुळेच आपला कोंकणी माणूस व्यावसायकडे न वळता शहरात जाऊन नोकरी करतो.


कोकणात व्यवसायाच्या अनेक संधी आहेत. या पोस्टमध्ये आम्ही रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गातील लोकांना असे लघु व्यवसाय कल्पना सांगणार आहोत जे ते आपल्या आजूबाजूला मिळणाऱ्या गोष्टींपासून सुरू करू शकतात. ज्या गोष्टी कोकणात सहज उपलब्ध आहेत, यासाठी त्यांना कुठे लांब जावे लागणार नाही, तसेच या business ideas इतर विभागातही यशस्वी नक्कीच होतील. त्यामुळे ही पोस्ट शेवट पर्यंत नक्की वाचा.

चला तर मग सुरुवात करूया -


कोकणातील  सर्वोत्तम व्यवसाय कल्पनांची यादी best business ideas in Konkan


1. निसर्ग पर्यटन Nature tourism business ideas in Konkan

आजकाल शहरात राहणार्‍या प्रत्येकाला निसर्गाची उणीव भासत आहे आणि म्हणूनच त्यांना निसर्गाने नटलेल्या अशा ठिकाणांना भेट द्यायला आवडते. आणि शहरातील बहुतेक लोक आपल्या सुट्ट्या इंजॉय करण्यासाठी निसर्गाच्या सानिध्यात जाणे पसंत करतात, तसेच गोव्याला येणारे बरेचसे विदेशी पर्यटक भारतातील गावाचे राहणीमान पाहण्यासाठी त्याच्या आजूबाजूच्या गावी भेट देत राहतात.

कोकण हे अशा लोकांसाठी अतिशय चांगले ठिकाण आहे कारण कोकण हा नैसर्गिक साधन संपत्तीने व समुद्र किनार पट्टीने वेढलेला भाग आहे. कोकणात आजही मोठ्या संख्येने लोक शेती व्यवसायात गुंतलेले आहेत आणि त्यामुळे त्यांच्यासाठी हा एक चांगला व्यवसाय आहे.

तुम्ही तुमच्या जमिनीवर एक छोटे कृषी पर्यटन किंवा निसर्ग पर्यटन केंद्र विकसित करू शकता आणि भारत आणि परदेशातील पर्यटकांना आकर्षित करू शकता. तसेच तुम्ही पर्यटक गाइड म्हणून ही काम करू शकता किंवा त्यांना सेवा पुरवू शकता.


2. काजू प्रक्रिया व्यवसाय Cashew processing business ideas in kokan 

काजू हे जगभरातील सर्वात लोकप्रिय ड्रायफ्रुट्सपैकी एक आहे. तसेच याला बाजारात खूप मागणी आहे, काजू हे कोकणातील प्रमुख पिकांपैकी एक असून काजू प्रक्रिया व्यवसायात करियर करण्यासाठी मोठी संधी आहे. काजू बी तुम्हाला कोकणात सहज उपलब्ध होईल कारण काजू चे पीक कोकणात मोठ्या प्रमाणात घेतले जाते.

तुम्ही काजू बी प्रक्रियेचे आवश्यक प्रशिक्षण घेऊ शकता, त्यात तुम्हाला काजू वर कशी प्रक्रिया केली जाते त्याला बाजारात कसे विकावे याचे सर्व मार्गदर्शन दिले जाते, प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर तुम्हाला काही यंत्रसामग्री खरेदी करू शकता यामध्ये सरकार सबसीडी पन देते. योग्य ती यंत्र सामग्री घेवून तुम्ही  तुमचा काजू प्रक्रिया व्यवसाय सुरू करू शकता.


3. नारळ शेती येआणि पुनर्विक्री small business ideas in konkan

नारळ हा बाजारात खूप मागणी असणार घटक आहे, तसेच हा जेवणामध्ये व पूजेसाठी वापरत येतो, कोकणात याचा वापर जेवणामद्धे मोठ्या प्रमाणात वापरला जातो, फक्त कोकणामध्येच नाही तर इतर ठिकाणी देखील केला जातो, म्हणूनच नारळ हा बहुपयोगी असल्याने याला बाजारात मोठी मागणी आहे. 

नारळ शेती ही कोकणातील तसेच समुद्र किनारपट्टी लगत भागातील एक मोठ्या प्रमाणात होणारी व फायदेशीर शेती व्यवसाय कल्पना आहे. जर तुमच्याकडे शेतजमीन असेल तर तुम्ही या शेती व्यवसायाचा विचार तुम्ही नक्कीच करू शकता.

तुम्ही तुमचे नारळ भारतातील इतर शहरे आणि राज्यांमध्येही विकू शकता. तसेच त्याच्या वरील आवरणाला तुम्ही त्यावर प्रक्रिया करणाऱ्या व्यावसाईकला विकू शकता किंवा तुम्ही त्यापासून इतर वस्तु तयार करून बाजारात विकून कमाई करू शकता.


4. पायपुसणी  Choir Mat (Doormat) business ideas in Konkan

तुम्ही दाराबाहेर नारळाच्या कीशी पासून बनवलेली चटई पाहिली असेल. याला डोअरमॅट असेही म्हणतात, ज्याचा वापर घरात प्रवेश करण्यापूर्वी पाय स्वच्छ करण्यासाठी केला जातो.

सिंधुदुर्गात नारळ उत्पादन घेणे खूप काळापासून घेतले जात आहे, आणि कोकणात जेवणामद्धे नारळाचा वापर नेहमीच होतो, तुम्ही नारळ चे उत्पादन घेणाऱ्याकडून नारळ सोलल्यानंतर नारळाची वरील साल घेवून त्यावर प्रक्रिया करून त्यापासून दोरी तयार करू शकता व तुम्ही कॉयर मॅटचा उत्पादन कारखाना सुरू करू शकता. जवळपास प्रत्येक घरात या प्रकारची चटई वापरली जाते आणि त्यामुळे बाजारात या उत्पादनाला मोठी मागणी आहे. तुम्ही तयार केलेले उत्पादन online ही विकू शकता.


5. आधुनिक तांदूळ मिलिंग  business ideas in marathi without investment


तांदूळ हे कोकणातील मुख्य पिकांपैकी एक आहे. तांदुळचे पीक कोकणातील प्रत्येक शेतकरी घेत असतो. आणि या क्षेत्राशी संबंधित अनेक व्यवसाय आहेत जे तुम्ही करू शकता. कोकणात या व्यवसायाच्या कल्पनेतून तुम्ही आधुनिक राईस मिल सुरू करू शकता आणि चांगले पैसे कमवू शकता. तुम्ही अश्या शेतकऱ्यांशी संपर्क साधू शकता जे मोठ्या प्रमाणात तांदळाचे पीक घेतात, तुम्ही यांच्याकडून कच्चा माल विकत घेऊन त्यावर प्रक्रिया करू शकता.

तांदूळ गिरणी व्यवसायात अनेक प्रकारच्या प्रक्रियांचा समावेश आहे जसे की साफसफाई करणे, तांदळाच्या दाण्यांचे बाह्य भुसे काढणे आणि प्रतवारी करणे. या सर्व प्रक्रिया करून तुम्ही त्याची योग्य प्रमाणात पॅकिंग करून विक्रेत्याणा विकू शकता. तसेच तांदळाचे पीठ तयार करूनही ते बाजारात विक्रीसाठी ठेवू शकता. 


6. तांदळाच्या भुसापासून पुठ्ठा तयार करणे  business ideas in rular area for

कोकणात तांदळाचे उत्पादन खूप जास्त प्रमाणात घेतले जाते, परंतु तांदळाच्या उत्पादनादरम्यान तांदळाच्या वरील टरफलाचे भूश्यासारख्या मोठ्या प्रमाणात कचरा देखील तयार होतो. याला टाकावू वस्तु समजून आपण त्याला टाकून देतो किंवा जाळून टाकतो. परंतु ती तुमच्यासाठी व्यवसायाची संधी देखील असू शकते.

टाकाऊ तांदळाच्या भुसापासून तुम्ही त्यावर प्रक्रिया करून तुम्ही पुठ्ठा तयार करू शकता आणि त्यातून चांगले पैसे कमवू शकता. पुठ्ठा हे अत्यंत उपयुक्त उत्पादन आहे आणि ते अनेक उद्योगांमध्ये वापरले जाते. 


7. बेडशीट आणि पिलो कव्हर्सचे उत्पादन wholesale business ideas in maharashtra


जवळजवळ प्रत्येक घरात बेडशीट आणि उशा वापरल्या जातात. कोकणात खासकरून चादर किंवा गोधडी वापरतात, जर तुम्ही कमी गुंतवणूक करून एक चांगला व्यवसाय करू इच्छित आहात तर गोंधडी, बेडशीट व उश्या बनवण्याचा व्यवसाय करण्याचा विचार तुम्ही करू शकता. तुम्ही वेगवेगळ्या डिझाईन च्या गोंधड्या बेडशिट   तयार करून त्या बाजातर किंवा ऑनलाइन विकू शकता, बाजारात रंगीबेरंगी आणि डिझायनर बेडशीट आणि पिलो कव्हर्सना मोठी मागणी आहे. मोठमोठ्या शहरात हाताने  तयार केलेल्या माल लोक उत्साहाने खरेदी करतात.

तुमच्याकडे आवश्यक गुण आणि गुंतवणूक क्षमता असल्यास तुम्ही कोकण मध्ये  बेडशीट आणि पिलो कव्हर निर्मितीचा व्यवसाय सुरू करू शकता. तुम्ही तुमच्या बेडशीट आणि पिलो कव्हर इतर शहरांमध्ये आणि राज्यांमध्ये देखील विकू शकता


8. दुग्धजन्य पदार्थ बनवणे आणि विक्री करणे dairy business ideas in village


बाजारपेठेत दुग्धजन्य पदार्थांना मोठी मागणी आहे. जवळपास प्रत्येक घरात दुधापासून तयार केलेले पदार्थ खाल्ले जातात. जर तुमच्याकडे गाई म्हशी असतील तर तुम्ही त्यांच्या दुधापासून तूप, पनीर, दही आणि चीज असे वेगवेगळे दुधाचे पदार्थ तयार करू शकता. 

दूध विकण्या व्यतिरिक्त तुम्ही हे पदार्थ विकून दुधापेक्षा जास्त पैसे कमवू शकता कारण हे पदार्थ दुधापेक्षा महाग आहेत. तुम्ही तुमचा डेअरी ब्रँड देखील तयार करू शकता आणि ही उत्पादने बाजारात विकू शकता.


9. विटा उत्पादन किंवा चिरा उत्पादन करा  most profitable business in konkan


बांधकामाशी संबंधित कामांमध्ये आवश्यक असलेला सर्वात महत्त्वाचा कच्चा माल म्हणजे विटा किंवा चिरा दगड. कोकणामध्ये घर बांधणीसाठी चिरा दगड वापरतात हा व्यवसाय तुमच्यासाथी खूपच फायदेशीर होईल. पण चिरा दगड काढण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागेल, त्यासाथी तुम्हाला सरकारची परवानगी घ्यावी लागेल शिवाय तुमच्याकडे मुबलक प्रमाणात जमीन असणे आवश्याक आहे, याव्यतिरिक्त वीट तयार करण्यासाठी तुम्हाला जास्त मशकात करण्याची गरज लागणार नाहीये. तुम्ही विटा सहज तयार करून विकू शकता, नवीन बांधकामासाठी लोकांकडून विटांची मागणी असतेच अनेक प्रकारच्या विटा तयार करून विकू शकता. जिथे बांधकाम चालू आहे अश्या ठिकाणी विटांची गरज लागणार आहे.


तुमच्याकडे आवश्यक गुंतवणुकीची क्षमता असेल तर सिंधुदुर्गातील त्यांच्या व्यवसायाच्या संधीचा तुम्ही नक्कीच विचार करू शकता. या व्यवसायमध्ये तुम्हाला जास्त भांडवलाची गरज लागणार आहे.


10.  कोकम ब्रँड तयार करा zero investment business ideas in marathi


कोकणात कोकम शेती खूप लोकप्रिय आहे. त्यात अनेक शेतकरी सहभागी आहेत. कोकम खाण्याचे अनेक आरोग्यदायी  फायदे आहेत त्यामुळे बाजारात याला मोठी मागणी आहे. तुम्ही कोकमचे विविध प्रकार बनवून बाजारात विकू शकता. तुम्ही कोकम सरबत, कोकम आगळ, कोकम असे अनेक पदार्थ तयार करून विकू शकता व पैसे कामवू शकता.


11. कोकण पर्यटन कार्यक्रम सुरू करा most profitable business ideas in marathi

महाराष्ट्रातील पर्यटनासाठी कोकण हे एक उत्तम ठिकाण आहे. कोकणात आंबोली हिल स्टेशन, सिंधुदुर्ग किल्ला, विजयदुर्ग किल्ला, तारकर्ली बीच, वेतोबा मंदिर, नापने धबधबा, गणपती पुळे, रत्नागिरी बीच, तसेच अनेक लोकप्रिय मंदिरे व  शेकडो चांगली पर्यटन स्थळे आहेत.

कोकणात  तुम्ही एक छोटी पर्यटन कंपनी सुरू करून या व्यवसायातून चांगली कमाई करू शकता. अनेक लोक कोकणात फिरायला येतात पण त्यान कोणती जागा फिरण्यासाठी उत्तम आहे या बदडल माहिती नसल्याने तुम्ही या संधीचा फायदा घेवून त्यांना मार्गदर्शन करून कमाई करू शकता.


12. आंबा काजू शेती आणि निर्यात business ideas for konkan


जगात सर्वत्र आंबा खाल्ला जातो आणि उच्च दर्जाच्या आंब्याला देशात व परदेशात मोठी मागणी आहे. कोकणात तुमच्याकडे शेतजमीन असल्यास तुम्ही आंबा शेती किंवा काजू शेती सुरू करू शकता आणि त्यातून चांगले पैसे कमवू शकता. तुम्ही आंब्यापासून व काजू पासून विविध पदार्थ तयार करून बजारत विकू शकता, उत्पन्न वाढवण्यासाठी तुम्ही इतर देशांमध्ये आंबा व काजू निर्यात करू शकता.

कोकणातील हापूस आंब्याला इंटरनॅशनल मार्केट मध्ये मोठी मागणी आहे, ही तुमच्यासाठी एक चांगली संधि ठरू शकते.

13. प्रॉडक्ट online sellling करा online business ideas for konkan

जर तुम्ही एखादे product तयार करत करत असाल तर तुम्ही ते ऑनलाइन विकू शकता. मी तुम्हाला सांगू इच्छितो की जर तुम्ही सावंतवाडी किंवा त्याच्या आसपास राहत असाल तर तुमच्याकडे एक चांगली बिझनेस oportunity ठरू शकते, कारण सावंतवाडी तिल लकडी खेळणी जग प्रसिद्ध आहेत, तुम्ही त्या व्यापऱ्यांकडून अशी खेळणी कमी किंमतीत विकत घेवून amazon flipkart वर वाढीव किंमतीत विकू शकता. 

तसेच जर तुम्ही इतर ठिकाणी काही वस्तु बनवत असाल तर ते ही तुम्ही विकू शकता. जसे की शोभेच्या वस्तु, खाण्याच्या वस्तु, इतर उपयोगी वस्तु ज्या  लोकांना आवडतील अश्या वस्तु तुम्ही बनवून विकू शकता. 


14.फर्निचर मॅन्युफॅक्चरिंग business ideas in marathi with low investment


तुम्ही फर्निचर बनवण्याचे योग्य प्रशिक्षण घेऊन तुमच्या परिसरात हा व्यवसाय सुरू करू शकता. जवळपास प्रत्येक घरात आणि कार्यालयात फर्निचरचा वापर केला जातो आणि विविध प्रकारच्या फर्निचर उत्पादनांना मोठी मागणी आहे. तुम्ही तुमच्या ग्राहकांसाठी सानुकूलित फर्निचर उत्पादने बनवू शकता.


15. सुपर मार्केट स्टोअर best business ideas in rular area

जसे शहरात आपल्याला मोठ मोठे दुकाने पाहायला मिळतात जेथे आपल्या गरजेच्या सर्वच वस्तु एकाच दुकानात उपलब्ध असतात, अशी दुकाने गावात पाहायला मिळत नाहीत. 

गावी लोक वस्तु खरेदी करण्यासाठी त्यांना विविध वस्तु खरेदी करण्यासाठी वेगवेगळ्या दुकानात जावे लागते. तुम्ही तुमच्या जवळपास च्या बाजारात असे एखादे दुकान टाकू शकता जेथे लोकणच्या गरजेच्या सर्वच वस्तु उपलब्ध होतील.


16. आवळ्याचे विविध उत्पादने बनवा आणि विक्री करा. small business ideas in kokan


आवळा हे आपल्या आरोग्यासाठी सर्वात आरोग्यदायी फळांपैकी एक आहे बाजारात आवळाशी संबंधित उत्पादनांना मोठी मागणी आहे. तुम्ही एक छोटासा घरगुती व्यवसाय सुरू करू शकता जिथे तुम्ही आवळा उत्पादने बनवू शकता आणि बाजारात विकू शकता. तुम्ही आवळा सुपारी, आवळा लोणचे, आवळ्याचा रस अशी विविध उत्पादणे तयार करून बाजारत विकू शकता शहरामध्ये अश्या उत्पादनांना मोठी मागणी आहे.


तर या होत्या काही business ideas for konkan. यात आम्ही तुम्हाला काही व्यावसाय कल्पना सांगितल्या आहेत ज्या तुमच्या business करण्याची आवडीला अस्तित्वात आणू शकतात.


निष्कर्ष  : कोकणसाठी या काही सर्वोत्तम व्यवसाय कल्पना आहेत. तुम्हाला ही पोस्ट कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा, जर तुमच्या कडे काही चांगले लेख असतील तर तुम्ही आम्हाला naadmarathi.in@gmail यावरती मेल करू शकता किंवा कॉमेंट बॉक्स मध्ये कॉमेंट करू शकता. आम्ही तुमच्या नावसाहित ती पोस्ट सबमिट करू. ही पोस्ट आवडल्यास तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. 

धन्यवाद ....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Menu Site