Ad code

Latest

6/recent/ticker-posts

या 10 सोप्या युक्त्यांसह पावसाळ्यात काही मिनिटांत ओले कपडे सुकवा

 या 10 सोप्या युक्त्यांसह पावसाळ्यात काही मिनिटांत ओले कपडे सुकवा

रिमझिम पावसाच्या धारेसोबत मान्सून दाखल झाला आहे. पावसाचा आस्वाद घेणे आपल्या सर्वांना आवडते आणि ओल्या मातीचा सुगंध आपल्याला एक वेगळीच मजा देतो. पावसाळ्याच्या थंड वातावरणात खिडकीतून बाहेर टक लावून हिरव्यागार गवतावरील पाण्याचे थेंब पाहत गरमागरम चहाचा घोट घेत पावसाळ्याचा आनंद लुटायला कोणाला आवडत नाही. लहान मुले तर पाऊस आला की पावसात उड्या मारत आपला आनंद व्यक्त करत असतात.


पण पावसाळ्यात सर्वात मोठी समस्या म्हणजे कपडे सुकवणे. सुरुवातीला जरी आपल्याला पाऊस आवडत असला तरी कालांतराने तो नकोसा होऊ लागतो, सततच्या पावसामुळे अनेक दिवस सूर्यप्रकाश येत नाही, त्यामुळे सगळीकडे जलमय वातावरण असल्याने कपडे नीट सुकवता येत नाहीत व धुतलेले कपडे दोन तीन दिवस ओलसर दमट राहतात त्यामुळे कपड्यांना दुर्गंधी येऊ लागते.


अशा परिस्थितीत आपण अनेक दिवस ओले कपडे वापरल्यास आपल्याला त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात. लहान मुलांच्या बाबतीत आपल्याला पावसात जरा जास्तच काळजी घ्यावी लागते. पावसाळ्यात ओले कपडे सुकवणे थोडे कठीण काम जरी असले, तरी येथे नमूद केलेल्या काही टिप्सच्या मदतीने तुम्ही तुमचे कपडे बऱ्यापैकी सुकवू शकता आणि त्यातील ओलावा दूर करू शकता. 

कसे ते जाणून घेऊया -


1). कपडे सुकावण्यासाठी स्टँड वापरणे


पावसाळ्यात कपडे सुकविण्यासाठी कपड्यांचे रॅक किंवा स्टँड वापरणे एक चांगला उद्देश पूर्ण करतात. त्यामुळे तुम्हाला कपडे लवकर सुकवण्याची काळजी करण्याची गरज नाही, चांगल्या प्रकारे डिझाइन केलेले स्टँड आणि रॅक खोलीच्या आत देखील ठेवता येतात आणि कपडे लटकवण्यासाठी आणि पंखाखाली सहज सुकविण्यासाठी वापरता येतात. यासाठी तुम्हाला पॉवर ड्रायरचीही गरज भासणार नाही, फक्त कपडे धुवा आणि पूर्णपणे सुकण्यासाठी कपड्याच्या स्टँडवर किंवा कपड्याच्या रॅकवर टांगून ठेवा.


2). घरातील आर्द्रता नियंत्रित करा

पावसाळ्यात घरातील आर्द्रता घरातील वातावरण आणि तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत त्रासदायक ठरू शकते. याच नमिमुळे पावसाळ्यात कपडे दमट ओले राहतात. खोलीतील आर्द्रता कमी करण्याचा एक चांगला मार्ग म्हणजे खोलीच्या एका कोपऱ्यात समुद्रातील मीठाची गोणी ठेवणे. मीठ खोलीतील ओलावा शोषून घेते, ज्यामुळे तुमच्या घरात बुरशीचा धोकाही कमी होतो.


जेव्हा तुम्ही खोलीतील आर्द्रता कमी होते तेव्हा कपडे लवकर सुकणे सोपे होते, यासाठी घरातील नमी कमी करण्यासाठी तुम्ही ह्युमिडिफायर देखील वापरू शकता. जेव्हा हवामान स्वच्छ असेल सूर्य चमकत असेल तेव्हा तुमच्या घरातील सर्व खिडक्या आणि दरवाजे उघडा. सूर्यप्रकाशामुळे घरातील वातावरण स्वच्छ होईल व त्यामुळे घरातील निर्जंतुकीकरण करेल. सूर्याचे अल्ट्राव्हायोलेट किरण स्वतःमध्ये जंतुनाशक म्हणून काम करतात.


3). Iron चा वापर करा


सामान्यतः आपण कपडे पूर्णपणे सुकल्यानंतर त्यावर इस्त्रीचा वापर करतो पण जेव्हा पाऊसाळ्यात कपडे  लवकर सुकत नाहीत तेव्हा बहुतेक लोक कपडे थोडेफार सुकल्यावर त्यावर इस्त्रीचा वापर करून कपडे सुकावतात. कपडे सुकविण्यासाठी इस्त्री वापरणे हा एक सोपा मार्ग आहे. इस्त्रिचा वापरल्याने कपड्यातील उर्वरित ओलावा कमी होतो. तुमच्या जीन्स किंवा टीजसारख्या कपड्यांच्या जाड भागांमध्ये ओलावा आहे असे तुम्हाला आढळल्यास तुम्ही त्यांना इस्त्री करून सहज वाळवू शकता.


4). हैंगर चा वापर करा.


कपडे सुकवण्यासाठी तुम्ही हँगर्सचा वापर करू शकता. ​​कपडे लवकर सुकवण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे. हॅन्गरवर कपडे लावल्याने कपडे लवकर सुकण्यास मदत करते कारण ते पसरलेले असतात आणि जास्त हवेच्या संपर्कात येतात.


जरी आपण वॉशिंग मशिनमध्ये कपडे धुतले तरी कपड्यांमध्ये थोडे पाणी शिल्लक राहते ( जर तुमच्याकडे advanced washing machine नसेल तर ). त्यामुळे कपड्यांमधील अतिरिक्त पाणी काढून टाकण्यासाठी कपडे धुवून झाल्यावर ते ओले कपडे हॅन्गरवर लटकवा जेणेकरून जास्तीचे पाणी बाहेर पडेल व त्यानंतर कपडे सुकायला ठेवा.


 5). कपडे व्यवस्थीत पिळून काढा


पावसाळ्याच्या दिवसात कपडे लवकर सुकत नाहीत. कपडे धुवून झाल्यावर ते कपडे नीट पिळून घ्या व नितळायला ठेवा व त्यातील अतिरिक्त पाणी निघाल्यावर ते सुकायला टाका. यामुळे तुमचे कपडे लवकर कोरडे होतील.


6). कूलरचा वापर करून कपडे कोरडे करा


कपडे लवकर सुकण्यासाठी कूलरचाही उपयोग होऊ शकतो जेव्हा हवामान थंड असते तेव्हा कूलरची गरज लागत नाही, परंतु कपडे सुकविण्यासाठी ते खूप उपयुक्त ठरू शकते. कपडे स्टँडवर नीट पसरवून ठेवा आणि त्यांच्यासमोरचा कुलर चालू करा. पण लक्षात ठेवा की कूलरचा पाण्याचा पंप बंद असेल, जर पाण्याचा पंप चालू राहिला तर कपड्यातील ओलावा लवकर जाणार नाही व कपडे कोरडे होण्यास अधिक वेळ लागेल.7). वॉशिंग मशीन ड्रायरचा वापर करा


पावसाळ्यात कपडे लवकर सुकत नाहीत पण जेव्हा तुम्ही मशीन मध्ये कपडे धुतल्या नंतर त्याचा वापर करून तुम्ही मशिनमध्येच कपडे नीट वाळवण्यासाठी मशिनचा सुकण्याचा वेळ थोडा वाढवा. जर तुम्ही सामान्यतः 1 मिनिटासाठी ड्रायर वापरत असाल तर त्याचा वेळ 3 मिनिटांपर्यंत वाढवा. या मुळे कपड्यातील पाणी शोषून घेतले जाते, ड्रायर मध्ये कपडे चांगले सुकतात त्यानंतर तुम्ही त्याला मोकळ्या वातावरणात टाकू शकता. मशीन मध्ये कपडे पंखा व सूर्यप्रकाशाशिवाय वाळवले जातात.


8). हेअर ड्रायरचा वापर करा


तुमच्याकडे वॉशिंग मशीन नसेल तर तुम्ही हेअर ड्रायरचीही मदत घेऊ शकता. हेअर ड्रायरचा वापर करून तुम्ही तुमचं कपडे लवकर सुकवू शकता. जर तुम्ही तुमचे प्राधान्य कपडे सुकण्याची वाट पाहत असाल, तर तुम्ही कपडे सुकवण्यासाठी हेअर ड्रायर वापरू शकता. होय, पावसाळ्यात कपडे सुकवण्यासाठी हेअर ड्रायरचा वापर केला जाऊ शकतो कारण ते वापरण्यास सोपे आणि प्रभावी आहे.9). एसीच्या बाहेरील युनिटजवळ कपडे सुकवा 


पावसाळ्यात सगळीकडेच ओलावा असतो. अशा परिस्थितीत घरात एसी चालवणे आवश्यक आहे. एसीचे बाह्य युनिट नेहमी गरम असते, एसी च्या compressor मधून नेहमी गरम हवा बाहेर टाकली जाते त्यामुळे तुम्ही कपडे सुकविण्यासाठी एसीच्या बाहेरील युनिटजवळ कपड्यांचे स्टँड ठेवू शकता. येथे कपडे खूप लवकर सुकतात.10).  हीटरचा वापर करा


हीटर चा वापर थंड हवामानात केला जातो, परंतु याचा वापर आपण पावसात कपडे सुकविण्यासाठी देखील करू शकतो. हीटर किंवा ब्लोअर कपडे सुकवण्यासाठी वापरू शकता. कपडे धुतल्यानंतर ओल्या कपड्यांमधून अतिरिक्त पाणी काढून टाकुन ते कपडे हीटर किंवा ब्लोअरजवळ ठेवा कपडे लवकर सुकतात.


अंतर्वस्त्रांची विशेष काळजी घ्या

या सीझनमध्ये तुम्हाला पॅन्ट आणि शर्टपेक्षा अंडरगारमेंटची जास्त काळजी घ्यावी लागते. चुकूनही ओले अंतर्वस्त्र घालू नका. पावसाळ्यासाठी जास्तीत जास्त अंतर्वस्त्रे आणि बनियान ठेवा. नेहमी सुके कपडे घाला तुमच्या आकारानुसार अंडरवेअर घाला.


वरील सर्व टिप्स पावसाळ्यात कपडे सुकवण्यासाठी प्रभावी आहेत त्यामुळे तुम्ही त्यांचा सहज वापर करू शकता.
टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Menu Site