Ad code

Latest

6/recent/ticker-posts

गावात सर्वात जास्त चालणारे व्यवसाय, तुम्ही देखील हे व्यवसाय करून तुम्ही उत्तम कमाई करू शकता small business ideas in village

गावात राहून काय व्यवसाय करायचा Small Business Ideas for Rural Areas, Villages, Small Towns in India 

 शहरी भागाप्रमानेच ग्रामीण भागातही  व्यवसाय करण्याचे खूप असे मार्ग आहेत. ग्रामीण भागातिल लोक कृषी क्षेत्रामध्ये योगदान देऊन राष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला वाढवण्यासाठी सर्वात जास्त मदत करतो. गावामधील लोक एक तर कृषी उद्योगात योगदान देतात म्हणजेच शेती मध्ये योगदान देतात  किंवा प्रामुख्याने स्वत:चा व्यापार किंवा पशुधन, छोटा व्यवसाय करतात अथवा निर्माण संबंधित व्यवसायामध्ये असतात. गावामध्ये बहुदा लहान या मोठ्या व्यवसायाचे संधी उपलब्ध नाहीत, त्यांमुले कोणता व्यवसाय सुरू करणे याची माहिती लोकांकडे नसते. या लेखात, आम्ही ग्रामीण भागातील काही प्रमुख छोटे व्यवसाय (Business ideas in village) वर चर्चा करू.

भारतात सर्वाधिक लोकसंख्या खेड्यात राहते. देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी 68% लोक ग्रामीण भागात राहतात. अशा परिस्थितीत सर्वच लोक शहरात जाऊन पैसे कमवू शकत नाहीत. गावातच स्वत:चा व्यवसाय सुरू करूनही चांगली कमाई करता येते. ग्रामीण भागाच्या विकासासाठी सरकार आता विशेष प्रयत्न करत आहे. विशेषतः ग्रामीण भागातील नागरिकांसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. आज आम्ही तुम्हाला गावात राहून कोणते व्यवसाय सुरू करू शकता याबद्दल सांगणार आहोत.


गावातील व्यवसाय कल्पना  best business ideas in village


Tutor services

ग्रामीण भागात tution classes ची कमतरता ही एक मोठी समस्या आहे, जर तुम्ही उच्च शिक्षित असाल तर तुम्ही गावामध्ये राहून लहान मुलांची क्लासेस घेवून व पात्र शिक्षकांसह शिकवणी केंद्र सुरू करणे ही एक चांगली व्यवसाय कल्पना असू शकते. तुम्ही तुमच्या सू शिक्षित मित्रांसोबत विविध क्लासेस घेवू शकता यामध्ये sports, आर्ट, क्राफ्ट, dance, music, शिकवणी या सारखे क्लासेस घेवू शकता. 

यातून  पात्र स्थानिक तरुणांनाच रोजगार मिळणार नाही तर मुलांना त्यांच्या घराजवळ एक चांगली शिक्षण संस्था शोधण्यात मदत करेल. या व्यवसायासाठी जास्त भांडवल आणि जागेची आवश्यकता नसते आणि, तुमच्याकडे केंद्र चालवण्याची पात्रता आणि आवश्यक कौशल्ये असल्यास, यात व्यवसाय करण्याची एक चांगली संधी आहे. शिकवण्याची सेवा कमी मनुष्यबळासह सुरू होऊ शकते परंतु कालांतराने टी  वाढत जाईल.


Transport Goods –

ग्रामीण भागात बहुतांश लोक शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. काही लोक यापेक्षा चांगला पैसा मिळवून आपले आयुष्य सुधारतात. गावी पिकावलेली शेतीतील धन्य भाजीपाला शहरात नेवउण विकाव लागतो, बहुतेक वेळा गावात वाहतुकीची सोय चांगली नसते, शेतकऱ्यांना धान्य, फळे, भाजीपाला विकण्यासाठी शहरात जावे लागते, मात्र वाहनांच्या कमतरतेमुळे शहरातूनच वाहनांची बुकिंग करावे लागते त्यासाठी त्यांना जास्त पैसे मोजावे लागतात. 

हा अवसर तुमच्या साथी चांगला ठरू शकतो तुम्ही हा व्यवसाय गावातच सुरू करू शकता. यासोबत तुम्हाला ट्रॅक्टर ट्रॉली लागेल, जी तुम्ही भाड्याने देखील चालवून चांगला नफा कमवू शकता. वाहन खरेदी करताना तुम्हाला पैसे गुंतवावे लागतील, पण आजकाल सरकारच्या काही योजनांमधून ट्रॅक्टर घेण्यासाठी विशेष सबसिडीही देत ​​आहे. 


मिनी सिनेमा हॉल mini cinema hall 

चित्रपट पाहणे कोणाला आवडत नाही. शहरांमध्ये मोठमोठे मल्टिप्लेक्स, सिनेमा हॉल आहेत, पण खेड्यापाड्यात मनोरंजनाची तशी सोय नाही. कारण गावात सिनेमा हॉल सहज बघायला मिळत नाही आणि लोकांकडे पैसे असूनही सिनेमा हॉलमध्ये सिनेमा बघायला मिळत नाही. अशा परिस्थितीत तुम्ही गावात मिनी सिनेमा हॉलचा व्यवसाय सुरू करणे हा एक चांगला पर्याय आहे. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला किमान ₹1 लाख ची गुंतवणूक करावी लागेल.


प्रोजेक्टरच्या मदतीने तुम्ही चित्रपट आणि इतर प्रकारचे व्हिडिओ दाखवून गावातील लोकांचे मनोरंजन करू शकता, तुम्ही प्रोजेक्टरद्वारे गावकऱ्यांना शेतीशी संबंधित व्हिडिओ देखील दाखवू शकता. त्याऐवजी, तुम्ही त्यांच्याकडून ₹50 ते ₹100 पर्यंत शुल्क आकारू शकता.


कपड्याचे दुकान clothing store small business ideas in village

लोकांना कपड्यांचा व्यवसाय करणे खूप आवडतो कारण हा कमी खर्चात चांगला नफा देणार उत्तम व्यवसाय आहे. जर तुम्ही तुमच्या गावात व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर हा देखील एक चांगला पर्याय आहे. तुम्ही शहरात जे कपडे trending  ला आहेत ते कपडे आणून गावात विकू शकता. 

तुमच्या गावात जे कपडे प्रसिद्ध आहेत, त्याच प्रकारचे कपडे तुम्हाला विक्रीसाठी आणावे लागतील. यासोबतच तुम्हाला हवे असल्यास तुम्ही टेलरिंगचे कामही करू शकता, यामुळे तुमचे उत्पन्नही वाढेल. लहान मुलांच्या कपड्यांपासून ते जुन्या कपड्यांपर्यंत सर्व प्रकारचे कपडे विकु शकता .


विशेष प्रसंगी किंवा दैनंदिन गरजांसाठी कपडे खरेदी करण्यासाठी मोठ्या शहरांमध्ये जाणे हे खेड्यांमध्ये सामान्य आहे. चांगल्या ब्रँड्स, फॅब्रिक्स आणि विविधतेसह कपड्यांचे दुकान सुरू करणे हा यशाचा एक निश्चित मार्ग आहे. जर तुम्ही अत्याधुनिक फॅशन, डिझाईन्स आणि कपड्यांची विविध  शैली देऊ शकत असाल तर खेडे आणि लहान शहरांमध्ये खूप कमाई करू शकता.


पोल्ट्री फार्म – Village Business Ideas in Marathi

कुक्कुटपालन व्यवसाय हा खासकरून गावात होणारा एक चांगला आणि फायदेशीर व्यवसाय आहे, जर तुम्हाला गावात राहून व्यवसाय करण्याची इच्छा असेल तर तुम्ही कुक्कुटपालन व्यवसायातही आजमावू शकता. कुक्कुटपालनाच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या गावाशी आणि जवळपासच्या गावांशी संबंध प्रस्थापित करून तुमचा व्यवसायाला भर देऊ शकता. तुम्ही एकाच वेळी भरपूर कोंबड्या विकत घेतल्यास या व्यवसायात तुम्हाला अधिक नफा मिळू शकतो.


कोंबड्यांचा वापर मांसासाठी व अंडी साठी  केला जातो. आणि विशेषतः मोहरम, ईद, होळी इत्यादी सणांमध्ये त्याची मागणी खूप वाढते आता तर लोक आठवड्यातून एकदा तरी मांसाहार नक्कीच करतात. तुम्ही शहरामध्ये किंवा जवळपासच्या हॉटेल्स आणि मांस विक्रेत्यांना या कोंबड्यांचा नियमित पुरवठा करून तुम्ही पैसे कमवू शकता.


रिचार्ज दुकान

तुम्ही गावात मोबाईल किंवा टीव्ही रिचार्जचे दुकान उघडू शकता. आजकाल प्रत्येकाकडे मोबाईल आहे तसेच प्रत्येकाकडे टीव्ही आहेच व त्यासाठी लागणारे डिशटीव्ही सारखे डिश असणारच त्यामुळे तुम्ही हे रीचार्ज चे दुकान टाकून आपला व्यवसाय चालू करू शकता,  आजकाल रिचार्ज जरी ऑनलाईन केले जात असले तरी गावात हे सर्वांनाच करायला जमत नाहीत. मोबाईल रिचार्ज व्यतिरिक्त तुम्ही मोबाईल ऍक्सेसरीज, मोबाईल फोन देखील ठेवू शकता.


किराणा दुकान kirana store business idea in village

आपल्याला दररोज आवश्यक असलेल्या काही वस्तू खरेदी करण्यासाठी शहरात जाणे कुणालाही परवडत नाही, त्यामुळे आपल्या गावातच एक मोठ किरण मालाचे दुकण असेल तर प्रतेकला किती फायदेशीर ठरेल ना. जर तुम्ही असे दुकान गावातच सुरू केले तर तुमच्यासाठी किती फायदेशिर होईल याचा विचार करा. किरण मालापासून ते लहाणं साबणापर्यंत सर्वच वस्तू जवळ बाळगणारे किराणा दुकान असणे सोयीचे असेल यात तुमचा वेळ वाचेल, व प्रवास खर्चही कमी कराल.


किराणा स्टोअर ही खेडेगावातील एक लहान व्यवसाय कल्पना आहे. भारतात किंवा अन्य ठिकाणी लोक नेहमी स्थानिक पातळीवर खरेदी करण्यास प्राधान्य देतात, म्हणून आवश्यक वस्तू विकणारे किराणा स्टोअर उघडणे ही एक शहाणपणाची गुंतवणूक असू शकते. किराणा दुकाने विविध व्यवसायांचे आयोजन करू शकतात. किरण माला सोबत तुम्ही घरगुती वस्तूंसह डीटीएच आणि फोन रिचार्ज कार्ड देखील विकू शकता.


शिंपी - tailor business ideas in village

जर तुम्हाला शिवणकाम माहित असेल तर तुम्ही टेलरिंग, ट्रेलरचे काम सुरू करू शकता. यासाठी तुम्हाला शिलाई मशीन आणि काही टेलरिंग मटेरियल लागेल. हे काम तुम्ही तुमच्या घरातील छोट्या खोलीतही सुरू करू शकता. पुरुषांसोबत महिलाही हा व्यवसाय करू शकतात. दोघे मिळून हा व्यवसाय करू शकतात. जर तुम्हाला टेलरिंग कामाचे विविध कल्पना येत असतील तर तुम्ही लोकांना या विषयी प्रशिक्षण ही देऊ शकता. तुम्ही त्यांचे क्लास देखील घेऊ शकता. 


तुम्ही तुमच्या आयडिया शहरामधील दुकानदारांना दाखवून त्यांच्याकडून ऑर्डर ही घेऊ शकता. शहरामध्ये लोक फॅशनेबल कपडे घालण्यासाठी खूप पैसे मोजतात. जर तुम्हाला चांगल्या डिझाईन येत असतील तर तुम्ही ते देखील करू शकता. गावातही लोक फॅशन चे कपडे घालायला चांगली किंमत मोजातील. 


वेल्डिंग आणि फॅब्रिकेशन व्यवसाय Welding and fabrication business idea in rular area

या व्यवसायात लोखंडी गेट्स, ग्रील्स, विविध प्रकारच्या खिडक्या, दरवाजे बनवले जातात. हा व्यवसाय तुम्ही गावात उघडू शकता आजकाल सर्वत्र पक्की घरे बांधली जात आहेत, प्रत्येकाला आपल्या घरात उत्तम सुविधा हव्या असतात. तुम्ही विविचा प्रकरचे  गेट खिडक्या तसेच लोखंडी खट वगेरे बनवून विकू शकता. तुमच्या या व्यवसायात गावातही भरपूर नफा मिळेल. तुम्ही यासोबतच हार्डवेअरचे समान ही विकू शकता.


असे  काही व्यवसाय अवलंबून तुम्ही गावात चांगला नफा कमवू शकता. पैसे कमवण्यासाठी तुम्हाला शहरात जाण्याची गरज नाही. कष्टाने माणूस कुठेही राहून मोठा माणूस बनू शकतो.


शेवटी

परिस्थिती योग्य असल्यास भारतातील ग्रामीण किंवा लहान खेड्यांमध्ये तुमचा लघु-उद्योग स्थापित करणे समृद्ध होऊ शकते. तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याच्या तुमच्या स्वप्नाचा पाठपुरावा करण्याची हीच वेळ आहे जर ते तुमचे नेहमीच ध्येय असेल.

 तुम्ही काहीही करत असलात, तुम्ही साइड बिझनेस सुरू केलात किंवा तुमची 9-ते-5 नोकरी सोडली तरीही, प्रत्येकासाठी काहीतरी आहे. तुमची व्यवसायाची निवड तुमची कौशल्ये, तुमची आवड आणि तुमच्याकडे असलेल्या संसाधनांवरून निश्चित केली जाईल. तुम्ही तुमचा स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू करण्यासाठी व्यवसाय कर्जाच्या शोधात असाल, तर तुम्हाला बँकेकडून व्यवसाय कर्ज मिळू शकते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Menu Site