Ad code

Latest

6/recent/ticker-posts

Driving License: आता घरी बसून मिळवा ड्रायविंग लायसेंस. सोप्या पद्धतीने आणि कमी खर्चात अर्ज कसा करायचा.

ऑनलाइन ड्रायविंग लायसेंस कसे काढावे? संपूर्ण प्रक्रिया येथे जाणून घ्या

मित्रांनो, पेट्रोल किती जरी महाग झाले तरी स्वतची गाडी घेवून फिरण्याची मजाच वेगळी, पण गाडी घेवून फिरताना आपल्याकडे जर License नसेल तर तीच मजा सजा मध्ये कशी बदलते तेही आपल्याला माहीतच आहे. गाडी चालवताना जर आपल्याकडे driving License नसेल तर मोठे चालान कापावे लागते त्यामुळे आपल्याकडे योग्य ते driving License असणे आवश्यक आहे.

आजच्या काळात प्रत्येकाकडे स्वतःचे दुचाकी किंवा चारचाकी वाहन आहे, आणि ते वाहन चालवण्यासाठी Driving License असणे अत्यंत आवश्यक आहे. अनेकजण Driving License काढताना थोडा वेळ वाचवण्यासाठी एजंटची मदत घेतात आणि नकळतपणे प्रमाणापेक्षा जास्त पैसे खर्च ककरतात.बहुतेक वेळा एजंट काही कारण सांगून फसवणूक करतात आणि अजून जास्त पैसे उकळू पाहतात. 

या लेखात आम्ही तुम्हाला कोणत्याही एजेंट च्या मदतीशिवाय तुम्ही स्वतः तुमच्या मोबाइल किंवा कम्प्युटर वरुण ड्रायव्हिंग लायसन्ससाठी ऑनलाइन अर्ज करू शकता.

how to apply for driving License online - आता  रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्यासाठी वेबसाइट सुरू करण्यात आली आहे. ज्याद्वारे तुम्ही घरबसल्या Online Driving License सहजपणे  तयार करू शकता.

जर तुम्हालाही Online Driving License Kase Kadhayache असा प्रश्न पडत असेल तरही पोस्ट शेवट पर्यन्त नक्की वाचा.

ड्रायव्हिंग लायसन्स म्हणजे काय? (What is a driving license?)

Driving License? हा असा अधिकृत दस्तऐवज आहे जो भारत सरकारद्वारे जारी केला जातो. या License मुळे लोकांना ही परवानगी मिळते की ते अधिकृतपणे वाहन चालवू शकतात. भारतात ड्रायव्हिंग लायसन्स Regional Transport Authority (RTA) किंवा त्याच राज्यातील Regional Transport Office (RTO) द्वारे जारी केले जाते.

1988 मध्ये जारी करण्यात आलेल्या मोटार वाहन कायद्यानुसार, कोणत्याही नागरिकाला ड्रायव्हिंग लायसन्सशिवाय सार्वजनिक रस्त्यावर वाहन चालवता येत नाही तसेच वाहन चालवताना दिलेल्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे असे. जर वाहक विना परवाणा ड्रायविंग करत असेल व नियमांचे उल्लंघन करत असेल व असे करताना पकडले गेल्यास त्याला योग्य तो दंड भरावा लागू शकतो.

म्हणूनच जर एखाद्या नागरिकाला आपले वाहन रस्त्यावर चालवायचे असेल तर त्याने प्रथम valid driving license घेणे आवश्यक आहे आणि त्यानंतरच आपण आपले वाहन रस्त्यावर चालवू शकता. 


जर तुम्ही ड्रायव्हिंग शिकत असाल तर तुम्हाला लर्निंग लायसन्स मिळवावे लागेल जे Provisional License म्हणून काम करेल. यानंतर कायमस्वरूपी Driving Licenseसाठी पात्र होण्यासाठी ड्रायविंग test द्यावी लागेल. ऑनलाइन सुविधांच्या आगमनामुळे वापरकर्त्यांना घरात बसून ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करु शकतात. 

ड्रायव्हिंग लायसन्ससाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा (Online apply for driving license in India)


ऑनलाइन ड्रायविंग लायसन्स साठी apply करणे आणि ते मिळवणे आता खूपच सोपे झाले आहे. तुम्ही सहजपणे तुमच्या मोबाइल व कम्प्युटर वरुण ड्रायविंग लायसेंस साठी अप्लाय करून ड्रायविंग लायसेंस मिळवू शकता. लर्निंग लायसन्स किंवा ड्रायव्हिंग लायसन्ससाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे-

◾️driving license साठी apply करण्यासाठी सर्वप्रथम उमेदवार रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. sarthi.parivahan.gov.in 
◾️ त्यानंतर तुमच्या स्क्रीनवर एक होम पेज उघडेल. येथे तुम्हाला पेजमध्ये license चे प्रकार दिसतील त्यात तुम्हाला पाहिजे त्या लायसेंस साठी अप्लाय करू शकता. आपण येथे learning license साठी  Apply करत आहोत तुम्ही येथे  Apply for learning license वर क्लिक करा.


◾️ आता या नवीन page वर तुम्हाला तुमचे राज्य निवडावे लागेल यासाठी खाली देलेल्या Select State Name या बटणावर क्लिक करावे लागेल.


◾️यानंतर तुम्ही नवीन पेजवर पोहोचाल येथे तुम्हाला Apply for learner licence वर क्लिक करावे लागेल.

◾️या page मध्ये तुम्हाला लायसेंस काढण्यासाठी कोणकोणत्या document ची आवश्यकता आहे त्याची माहिती देलेली आहे.येथे तुम्हाला Continue वर क्लिक करावे लागेल.

◾️आता येथे तुम्हाला तुमच्या आधार कार्ड नो टाकून यात प्रवेश करावा लागेल. त्यानंतर तुम्हाला अर्जाचा फॉर्म तुमच्या स्क्रीनवर दिसेल.

◾️तुम्हाला अर्जामध्ये तुमच्या पसंतीनुसार श्रेणी निवडावी लागेल आणि फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती भरावी लागेल.
◾️यानंतर तुम्हाला सर्व महत्त्वाची कंगडपत्रांचे फोटो अपलोड करावी लागतील.

◾️सर्व महिती भरल्यानंतर आता LL Test Slot Online वर क्लिक करा आणि सबमिट बटणावर क्लिक करा.

◾️यानंतर तुम्हाला आरटीओ कार्यालयात जावे लागेल. तिथे तुम्हाला तुमची परीक्षा द्यावी लागेल. तुम्ही चाचणी उत्तीर्ण झाल्यास तुम्हाला लर्निंग लायसन्स दिले जाईल. 

लर्निंग लायसेंस मिळाल्या नंतर तुम्हाला 3 महिन्याच्या आत तुमची ड्रायविंग टेस्ट द्यावी लागेल ही टेस्ट दिल्यानंतर व तुम्ही यात पास झाल्या नंतर महिन्याभरातच  तुम्हाला तुमचे ड्रायविंग लायसेंस पोस्ट द्वारे तुमच्या घरी येईल.

Driving License काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे (How to Apply for Driving License in marathi)


ऑनलाइन ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करण्यासाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत -

🔶कायमस्वरूपी पत्त्याचा पुरावा: आपल्या पत्त्याच्या पुरावा देण्यासाठी आपण निवडणूक कार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट, तुमच्या घराची कर पावती, वीज बिलाची पावती, रेशनकार्ड, सरकारी कर्मचाऱ्यांनी दिलेला पत्ता पुरावा, तहसीलकडून दिलेला रहिवासी दाखला इ. तुमच्याकडे एक गोष्ट असणे आवश्यक आहे.

🔶वय प्रमाणपत्र: तुमचे वय या प्रमाणपत्राद्वारे तपासले जाते की तुमचे वय 18 वर्षे आहे की नाही, यामध्ये तुम्हाला जन्म प्रमाणपत्र, हायस्कूल / 10 वी मार्कशीट, पॅन कार्ड, मॅजिस्ट्रेटने जारी केलेले जन्मतारीख प्रतिज्ञापत्र इत्यादी सादर करावे लागतील. यापैकी एक डॉक्युमेंट तुमच्याकडदे असणे आवश्यक आहे.

🔶ओळखपत्र: ओळखपत्रामध्ये, तुमच्याकडे आधार कार्ड, निवडणूक कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट इत्यादींपैकी कोणतीही एक गोष्ट असली पाहिजे.

तुमच्याकडे वरील कागदपत्रे असतील तर तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्ससाठी ऑनलाइन अर्ज करू शकता.


ऑफलाइन ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज कसा करावा - How to Apply for Offline Driving License


ऑफलाइन पद्दतीने ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी तुम्हाला आधी RTO ऑफिस ला जाऊन लर्निंग लायसन्स काढावे लागते. लर्निंग लायसन्स मिळविण्यासाठी, तुम्हाला मोटार ड्रायव्हिंग व्हेईकल कायद्यानुसार फॉर्म 1 आणि फॉर्म 2 मध्ये अर्ज करावा लागेल.

यासाठी तुम्हाला तुमची जन्मतारीख आणि पत्त्याचा पुरावा पडताळावा लागेल. यासाठी पासपोर्ट, आधार कार्ड, pan कार्ड, voter id हे कागदपत्र लागतील.

लर्निंग लायसन्ससाठी तुमचा फोटो असणेही बंधनकारक आहे आणि तुम्ही जे काही कागदपत्र देत आहात, ते तुमच्याकडे मूळ स्वरूपात असले पाहिजे हे लक्षात ठेवा.

तुम्ही हा फॉर्म पूर्ण भरून तुमच्या जवळच्या RTO ऑफिस मध्ये हे फॉर्म सबमिट करा त्यानंतर आरटीओ अधिकारी तुमच्या कागदपत्रांची पडताळणी करतो आणि त्यानंतर तुम्हाला यासाठी लागणारी फी भरावी लागते.

जेव्हा आपण फॉर्म सबमिट करतो तेव्हा आपले बायोमेट्रिक रेकॉर्ड घेतले जाते. यासाठी वेबकॅमच्या मदतीने तुमचा फोटो आणि तुमच्या अंगठ्याचा ठसाही घेतला जातो.

ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुम्हाला लर्निंग लायसन्स चाचणी द्यावी लागेल.

लक्षात घ्या लर्निंग लायसन्स हे फक्त तुम्हाला गाडी चालवायला शिकण्यासाठी दिलेले लायसेंस असते. ते तुमचे हा अंतिम ड्रायव्हिंग लायसन्स नसतो. लर्निंग लायसन्स मिळाल्या नंतर तुम्ही गाडी चालवू शकता पण यात ही काही अति आहेत. 

जसे की learning license असलेल्या व्यक्तींनी त्यांच्या वाहनाच्या पुढील आणि मागे मोठ्या अक्षरात L लिहावे. तसेच लर्निंग लायसन्स धारण केलेली व्यक्ती गाडी चालवत असताना ड्रायव्हिंग लायसन्स धारण केलेली व्यक्ती सोबत असणे आवश्यक आहे. हा लर्निंग लायसन्स फक्त 6 महिन्यांसाठी असतो. या 6 महिन्यांत तुम्हाला अंतिम ड्रायव्हिंग लायसन्स साठी टेस्ट देवून ते मिळवावे लागेल.

Driving license साठी अर्ज करण्याची पद्धत –


लर्निंग लायसन्स मिळाल्यानंतर 1 महिन्यानंतर तुम्ही अंतिम परवान्यासाठी अर्ज करू शकता. यासाठी तुम्हाला फॉर्म 4 साठी अर्ज करावा लागेल. आणि सोबत फॉर्म 1 आणि 2 आणि लर्निंग लायसन्स देखील द्यावे लागेल. 

जेव्हा तुम्ही ड्रायव्हिंगची चाचणी द्यायला तयार असाल, तेव्हा तुम्हाला योग्य शुल्कासह हा फॉर्म भरावा लागेल. तुम्ही 3 चाकी, 4 चाकी, LMV, HMV इ. तुम्ही फॉर्म सबमिट सबमिट करू शकता हे केल्यावर तुम्हाला ड्रायव्हिंग टेस्टसाठी जावे लागेल.

ड्रायव्हिंग टेस्ट देताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात


⚫️ ड्रायविंग टेस्ट देतब RTO तुम्हाला चाचणीसाठी कोणतेही वाहन देत नाही तुमच्याकडे तुमचे स्वतःचे वाहन असणे आवश्यक आहे.

⚫️ तुम्ही ज्या वाहनाच्या लायसेंस साठी अर्ज करत आहात ते वाहन तुमच्याकडे असले पाहिजे.

⚫️ तुमची ड्रायव्हिंग चाचणी घेताना RTO अधिकारी तुमच्या ड्रायव्हिंगबद्दल प्रश्न विचारू शकतात. त्यामुळे तुम्ही आधीच याची तयारी करावी आणि चाचणीसाठी जावे.

तुमची चाचणी योग्य प्रकारे झाल्यानंतर, तुमचा ड्रायव्हिंग लायसन्स स्पीड पोस्टद्वारे तुमच्या पत्त्यावर वितरित केला जाईल.

मित्रांनो, तुम्हाला ही पोस्ट How to Apply for Driving License विषयी माहिती कशी वाटली? तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगू शकता. तसेच तुमची काही सूचना असेल तर कमेंट करून सांगू शकता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Menu Site