Ad code

Latest

6/recent/ticker-posts

चालत्या ट्रेनमध्ये वेटिंग तिकिटावर कन्फर्म सीट सहज उपलब्ध होईल, फक्त हे काम ऑनलाइन करावे लागेल confirm waiting train ticket

चालत्या ट्रेनमध्ये वेटिंग तिकिटावर कन्फर्म सीट सहज उपलब्ध होईल, फक्त हे काम ऑनलाइन करावे लागेल


बरेच लोक लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी नेहमीच रेल्वेला प्राधान्य देतात. कारण रेल्वेचा प्रवास हा सुरक्षित आणि आरामदायी आहे. अनेक वेळा कोणत्या न कोणत्या कारणाने आपल्याला अचानक प्रवास करण्यासाठी रेल्वेचे तिकीट काढावे लागते. आणि अशा परिस्थितीत अनेक वेळा तुम्हाला कन्फर्म तिकीट मिळत नाही आणि तुम्हाला जबरदस्तीने वेटिंग तिकिटाच्या मदतीने without seet प्रवास करावा लागतो.


 जर तुम्हाला अशा प्रकारचा त्रास होत असेल तर घाबरू नका, कारण आजच्या या पोस्ट मध्ये आपण चालत्या ट्रेनमध्ये वेटिंग तिकिटावर कन्फर्म सीट सहज उपलब्ध कसे करता येतील हे पाहणार आहोत. 

भारतीय रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी अनेक नियम बनवते. या ट्रिकद्वारे तुम्हाला ट्रेनच्या कोणत्या डब्यात कोणती सीट रिकामी आहे हे काही वेळातच कळू शकेल. यानंतर तुम्ही TTE कडे जाऊन ती जागा तुमच्या नावावर करून घेऊ शकता. तुम्ही हे कसे करू शकता आणि चालत्या ट्रेनमध्ये कन्फर्म सीट मिळवण्यासाठी काय नियम आहेत ते  जाणून घेवू..


Train ticket rules for waiting passengers

तुम्हाला चालत्या ट्रेनमध्ये स्वतःसाठी कन्फर्म सीट बुक करायची असल्यास, तुम्ही ते सहज करू शकता. यासाठी सर्वप्रथम तुम्हाला IRCTC च्या अधिकृत वेबसाइट https://www.irctc.co.in/online-charts/ वर जावे लागेल. येथे गेल्यावर तुम्हाला त्या train चे नाव व नंबर टाकावा लागेल, त्या सोबतच येथे प्रवासाची तारीख टाकावी लागेल. 


येथे तुम्हाला होम पेजवर बुक तिकीट टॅब दिसेल. PNR स्थिती आणि चार्ट टॅब येथे तुम्हाला पहायला मिळेल.


यानंतर, तुम्ही हा चार्टवर कुठच्या डब्यामध्ये जागा रिकामी आहे ते पाहू शकता, व तुम्हाला हव्या असणाऱ्या डब्यात सीट बूक करू शकता. याआधी, indian railways मध्ये प्रवास करणार्‍या प्रवाशांना waiting तिकीट मुळे गाडीत बसण्यासाठी खूप संघर्ष करावा लागत होता. ट्रेनमध्ये जागा रिकाम्या असूनही टीटीई प्रवाशांना त्या सहज देत नव्हते त्यासाठी प्रवाश्यांकडून सोयीचे शुल्क आकारायचे. अशा स्थितीत टीटीईचा खिसा गरम करणाऱ्या प्रवाशांनाच जागा मिळायची. तर उर्वरित प्रवाशांना अडचणींचा सामना करून प्रवास करावा लागत असे.


आता या समस्येचा सामना करण्यासाठी भारतीय रेल्वेने सीट उपलब्धता डेटा ऑनलाइन दर्शविणे सुरू केले आहे. यामुळे सिस्टीममध्ये पारदर्शकता आली आहे आणि जागरुक प्रवासी इंटरनेटवर रिकाम्या बर्थ शोधून TTE मार्फत मिळवू शकतात. प्रत्येक ट्रेनमध्ये 2 प्रकारचे चार्ट तयार केले जातात. 

पहिला चार्ट हा  ट्रेन सुटण्याच्या चार तास आधी तयार केला जातो, व दूसरा चार्ट हा ट्रेन सुरू झाल्यानंतर रिकाम्या जागा तपासून  TTE द्वारे दुसरा चार्ट ऑनलाइन अपडेट केला जातो. हा दुसरा चार्ट पाहिल्यानंतरच त्यात रिकाम्या जागा पाहूनच प्रवासी सीटची मागणी करू शकतात.

जर तुमचे ट्रेन तिकीट कन्फर्म झाले नसेल तर तुम्ही या काही पर्यायांचा विचार करू शकता:

 1. वेटिंग लिस्ट किंवा RAC तिकीट: जर तुमचे तिकीट वेटिंग लिस्ट किंवा RAC असेल तर तुमचे तिकीट कन्फर्म होऊ शकते. जर तुमचं waitlist नंबर खूपच  लांब असेल तर टी टिकिट कन्फर्म होण्याची शक्यता खूपच कमी आहे. 

जर तुमचे टिकिट ऑनलाइन असेल व तुमचे तिकीट कन्फर्म झाले नाही तर तुमचे तिकीट आपोआप रद्द होईल. आणि तुमचे पैसे परत तुमच्या वॉलेट मध्ये जमा होतील. जर तुम्ही ऑनलाइन waiting टिकिट ने ट्रेन मधून प्रवास केलात व टीसी ने तुम्हाला पकडले तर तुमच्या कडून ते दंड आकारु शकतो. तसेच rac टिकिट ही कन्फर्म टिकिट चा असते पण यात तुम्हाला दोघात एक सीट शेअर करावी लागते.

 2. तत्काळ तिकीट: तुमचे तिकीट तत्काळ कोट्यावर बुक केले असल्यास, तुम्हाला प्रतीक्षा यादीत जावे लागणार नाही. पण, तत्काळ तिकीटचे कन्फर्मेशन मिळणे खूप अवघड काम आहे.  तत्काळ तिकीट बुकिंगसाठी तुमच्याकडे खूपच कमी वेळ असतो. 

 3. पर्यायी ट्रेन: जर तुमचे तिकीट कन्फर्म झाले नसेल तर तुम्ही दुसऱ्या ट्रेनचा विचार करू शकता. तुम्ही ट्रेनच्या टिकिट च्या  उपलब्धतेनुसार तुम्हाला दुसऱ्या ट्रेनसाठी तिकीट बुक करावे लागेल.

 4. रद्द करणे: जर तुमचे तिकीट कन्फर्म झाले नसेल आणि तुम्हाला ट्रेनने प्रवास करायचा नसेल तर तुम्ही तुमचे तिकीट रद्द करू शकता. तुम्हाला तिकीट रद्द करण्याचे शुल्क भरावे लागेल.

  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Menu Site