Ad code

Latest

6/recent/ticker-posts

Cheque bounce झालाय? काय करावे सुचत नाहीये. जाणून घ्या चेक बाऊन्स झाल्यास काय करावे?

Cheque bounce म्हणजे काय? चेक बाऊन्स झाल्यास काय करावे? चेक बाऊन्स झाल्यास काय शिक्षा होते?


आपण कधी ना कधी बँकेत चेक बाऊन्स झाल्याच्या बातमी नक्कीच ऐकली असेल. कदाचित आपल्यापैकी कोणीही अशी व्यक्ती नसेल ज्यांना cheque bounce ची माहिती नसेल. कारण आजच्या काळात प्रत्येकजण बँकेतून व्यवहार करतो. आणि बहुतेक वेळा मोठी रक्कम असेल तेव्हा हा व्यवहार फक्त चेकनेच केले जातात. भविष्यात कधी तुम्हाला बाउन्स चेकच्या समस्येचा सामना करावा लागला, आणि तुम्हाला चेक बाऊन्सबद्दल योग्य माहिती नसेल तर तुम्हला खूप त्रास सहन करावा लागेल.


या पोस्ट च्या माध्यमातून आपण चेक बाऊन्स म्हणजे काय? चेक बाऊन्स का होतो? आणि चेक बाऊन्समुळे कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते? चेक बाऊन्स झाल्यावर काय करावे? याबाबतची माहिती तुम्हाला असणे आवश्यक आहे. जर आपण एखाद्या व्यक्तीला धनादेश दिला आणि अपुऱ्या निधीमुळे धनादेश परत आला तर तो गुन्ह्याच्या श्रेणीत येतो.

चेक बाऊन्स म्हणजे काय? चेक बाऊन्सचा अर्थ जाणून घ्या.

चेकशी संबंधित माहिती मिळवण्याआधी, हे जाणून घेणे आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे की चेक बाऊन्स म्हणजे काय? आणि आपला चेक बाऊन्स झाल्यावर काय होत? जेव्हा एखादा व्यक्ती पैशाच्या व्यवहारासाठी दुसऱ्या व्यक्तीला बँकेत व्यवहारासाठी धनादेश देतो आणि त्या cheque द्वारे ती रक्कम त्या व्यक्तीच्या खात्यात जमा होत नाही किंवा इतर काही चुकीमुळे किंवा खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने तो चेक रद्द होतो, याला cheque bounce किंवा cheque cancel होणे म्हणतात.

सोप्या भाषेत सांगायचे तर जेव्हा काही कारणास्तव बँक चेक नाकारते आणि पेमेंट केले जात नाही, तेव्हा त्याला चेक बाऊन्स म्हणतात. चेक बाऊन्सची अनेक कारणे असू शकतात, परंतु चेक बाऊन्स होण्याचे मुख्य कारण म्हणजे खात्यात पुरेशी शिल्लक नसणे किंवा व्यक्तीच्या स्वाक्षरीमध्ये फरक असणे. या मुळे बहुतांश वेळा cheque bounce होतो. यामुळे आपल्याला अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते आणि आर्थिक नुकसानही होते.


चेक बाऊन्स होण्याचे कारण 

Reasons for bounced checks. Cheque bounce honyachi karane


चेक बाऊन्स होण्याची अनेक कारणे आहेत, ज्यामुळे तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. चेक बाऊन्स होण्यापासून टाळण्यासाठी check bounce chi karane जाणून घेणे आवश्यक आहे, तरच तुम्ही चेक बाऊन्स होण्यापासून टाळू शकता.

चेक बाऊन्सचे कारण खालीलप्रमाणे आहे. बँकेने चेक न स्वीकारण्यामागे अनेक कारणे असतात.

  1. एखाद्याच्या खात्यामध्ये चेकमध्ये नमूद पैशांएवढे रक्कम नसतील तर.
  2. धनादेशावर चुकीची स्वाक्षरी असणे किंवा स्वाक्षरीत खाडाखोड असेल तर.
  3. चेकची तारीख उलटल्यानंतर चेक बँकेत सादर झाला असेल तर.
  4. चेकमध्ये कोणतीही चूक असेल किंवा ओव्हरराइट केलेले असेल तर.
  5. चुकीचा बँक खाते क्रमांक आढळल्यावर.
  6. खातेधारकाचे bank account बंद असेल तर.
  7. चेक बनावट असल्याचा संशयावर.
  8. चेक मधील शब्द आणि रक्कम जुळत नसेल किंवा काही त्रुटी असेल तर.
  9. खातेधारकाकडून पेमेंट थांबवले असेल तर.

चेक रिटर्न मेमो काय आहे? What is a Check Return Memo?

जेव्हा चेक बाऊन्स होतो तेव्हा बँकेकडून एक स्लिप दिली जाते ज्याला चेक रिटर्न मेमो म्हणतात. ही स्लिप ज्याने चेक जारी केला आहे त्याच्या नावावर असते, या स्लिपवर चेक बाऊन्स का झाला आहे याचे कारण लिहिले जाते. यानंतर चेकधारक किंवा प्राप्तकर्त्यासमोर 3 महिन्यांचा कालावधी असतो, ज्यामध्ये त्याला दुसऱ्यांदा चेक जमा करावा लागतो. जर यानंतर पुन्हा चेक बाऊन्स झाल्यास धनादेश जारी करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते.

चेक बाऊन्स झाल्यावर काय होते?

What happens when a cheque bounces? Check bounce zalyavar kaay hote?

चेक बाऊन्स झाल्यास बँका त्या ग्राहकांकडून दंड वसूल करतात. हा दंड चेक बाऊन्स कोणत्या कारणामुळे झाला त्यानुसार बदलू शकतो. हा दंड 150 ते 750 रुपये किंवा 800 रुपयांपर्यंत असू शकतो. चेक बाऊन्स होणे हा भारतात गुन्हा मानला जातो म्हणून Check Bounce Negotiable Instruments Act 1881 नुसार चेक बाऊन्स झाल्यास एखाद्या व्यक्तीवर कारवाई केली जाऊ शकते. त्यामुळे खातेधारकाला 2 वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा धनादेशाच्या दुप्पट रकमेचा दंड किंवा या दोन्हीही शिक्षा होऊ शकतात.

चेक बाऊन्स झाल्यास काय करावे? Cheque bounce zalyas kay karave?


चेक बाऊन्स होण्याच्या अनेक घटना आपल्या आजूबाजूला रोजच घडत असतात. त्यामुळेच चेक बाऊन्स झाल्यास काय करावे? याची माहिती आपल्याकडे असणे अत्यंत गरजेचे आहे, ज्यामुळे तुम्ही चेक बाऊन्स झालेल्या नुकसानीपासून वाचाल. तुम्हा सर्वांना आता माहीत झालेच असेल की check bounce ka hoto. चेक बाऊन्स झाल्यावर बँकेकडून ग्राहकाला पावती दिली जाते, ज्यात चेक का बाऊन्स झाला त्याची संपूर्ण माहिती लिहिलेली असते.

चेक जारी करणाऱ्या व्यक्तीला कायदेशीर नोटीस पाठवल्यानंतर 1 महिन्याच्या आत राशी न भरल्यास. त्यामुळे प्राप्तकर्ता निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स कायद्याच्या कलम १३८ अंतर्गत फौजदारी तक्रार दाखल करू शकतो.

खटला कधी येतो?

असे नाही की Cheque bounce होताच चेक देणाऱ्यावर खटला भरला जातो. चेक बाऊन्स झाल्यावर, बँकेकडून चेक देणाऱ्या व्यक्तीला प्रथम एक पावती दिली जाते, ज्यामध्ये चेक बाऊन्स होण्याचे कारण स्पष्ट केले जाते.  यानंतर ३० दिवसांच्या आत खातेधारकाला नोटीस पाठवावी लागते. नोटीस दिल्यानंतर 15 दिवसांच्या आत खातेधारकाकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्यास, नोटीस दिल्यानंतर 15 दिवस उलटल्यापासून एक महिन्याच्या आत अर्जदार मॅजिस्ट्रेटच्या न्यायालयात तक्रार दाखल करू शकतो. त्यानंतरही ही रक्कम न भरल्यास खातेधारकावर गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट 1881 च्या कलम 138 नुसार, चेकचा अनादर करणे हा दंडनीय गुन्हा आहे आणि यात आरोपीला दोन वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते अशा मुदतीसाठी एकतर कारावास, किंवा दंड, किंवा दोन्ही शिक्षेस पात्र आहे.

दिवाणी खटला दाखल करु शकता -

चेक बाऊन्स झाल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्याबरोबरच स्वतंत्र दिवाणी खटला दाखल करावा. ज्याद्वारे तुम्ही चेकच्या रकमेवर तसेच व्याजाचा दावा करू शकता. तुम्ही त्याच शहरात दिवाणी केस दाखल करू शकता जेथे तुम्ही राहता, किंवा तुम्ही चेक कुठे जमा केला आहे त्याठिकाणी तुम्ही खटला दाखल करू शकता.

( सूचना - जर चेक तुम्हाला भेट किंवा देणगी म्हणून जारी केला गेला असेल. अश्या परिस्थितीत तुम्ही गुन्हा दाखल करू शकत नाही. )

बाउन्स चेकचा काय परिणाम होतो

जर तुम्ही दिलेला चेक कोणत्याही कारणाने बाऊन्स झाला तर त्याचा तुमच्यावर बँक अकाउंट वर काय परिणाम होऊ शकतो याची माहिती खालीलप्रमाणे आहे.

1) Civil score affected - तुमचा आर्थिक क्रेडिट इतिहास चेक बाऊन्सद्वारे शोधला जाऊ शकतो, ज्यामध्ये तुम्ही ओव्हरड्राफ्ट मर्यादा ओलांडली असेल, किंवा बँकेची थकबाकी भरली नसेल, तर एक बाऊन्स तुमचा Civil score इतका खराब करू शकतो की तुम्ही भविष्यात पुन्हा कर्जासाठी अर्ज करण्यासाठी सक्षम होणार नाही.

2) Provision of Punishment - चेक बाऊन्स झाल्यानंतर देयकाने विहित मुदतीत जमा रक्कम न दिल्यास, निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट कायद्याच्या कलम 138 नुसार देयकाला दोन वर्षांची शिक्षा किंवा चेकच्या दुप्पट रकमेचा दंड भरावा लागेल.

3) Bank Penalty - जर तुमचा चेक सही न जुळल्यामुळे किंवा खात्यात अपुरी शिल्लक राहिल्यामुळे बाउन्स झाला, तर या bounce चेक मुळे  बँकेकडून फी आकारली जाते, काही बँकांमध्ये हे शुल्क सामान्यतः रु. 200 ते रु. 700 पर्यंत असते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Menu Site