Ad code

Latest

6/recent/ticker-posts

सगळीकडे चर्चेत असणार Chat GPT नक्की आहे तरी काय? Chat GPT information in marathi

चॅट जीपीटी म्हणजे काय आणि ते कसे कार्य करते? त्याचे फायदे व तोटे काय आहेत.


सद्या इंटरनेटवर आणि तंत्रज्ञानाच्या जगात ChatGpt ची चर्चा खूपच वेगाने होत आहे. असे सांगितले जात आहे की ChatGPT हे गुगल सर्चलाही टक्कर देऊ शकते. मिळालेल्या माहितीनुसार ChatGPT वरून तुम्ही जे काही प्रश्न विचाराल, त्याचे उत्तर तुम्हाला तत्काळ लिहून दिले जाते. याच्या नावावरूनच हे समजतंय की ChatGPT मध्ये आपण AI सोबत chatting करून माहिती मिळवू शकतो. यामुळेच लोकांना याबद्दल आश्चर्य वाटत आहे. ChatGPT हे Artificial Intelligence म्हणजे AI चे जिवंत उदाहरण आहे, जे वापरकर्त्यांसाठी असिस्टंट सारखे काम करते.

OpenAI द्वारा यावर अजून काम सुरू असून लवकरात लवकर या ChatGPT चे updated version पाहायला मिळणार आहे. ज्यावेळी चाट जीपीटी इंटरनेटवर आले त्यापासून लोकांकडून याला चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे. खूप लोकांनी याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. चला जाणून घेऊयात CHATGPT म्हणजे काय? आणि ChatGpt चा इतिहास काय आहे? आणि ChatGpt चे फायदे व तोटे याबद्दल सर्व माहिती समजून घेऊ. 

चॅट जीपीटी म्हणजे काय? What Is ChatGPT in Marathi?


ChatGPT हे OpenAI ने तयार केलेले एक प्रकारचे चॅट बॉट आहे, जे आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर काम करते. वर सांगितल्या प्रमाणे तुम्ही Chat GPT वरती AI सोबत chatting करून सहज व जलदरित्या आपण विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे chatgpt आपल्याला देते. जेव्हा आपण Google वर काहीही शोधतो तेव्हा गुगल आपल्याला त्या गोष्टीशी संबंधित अनेक वेबसाइट दाखवते, परंतु चॅट जीपीटी वेगळ्या पद्धतीने काम करते. येथे तुम्ही कोणताही प्रश्न विचारता तेव्हा चॅट जीपीटी तुम्हाला  विचारलेल्या प्रश्नाचे सविस्तर उत्तर देते जे लोकांना खूप आवडायला लागले आहे. Chat gpt च्या search Engine ला खूप अभ्यास करून विकसित केलेले आहे. Chat GPT ला open ai ने 30 नोव्हेंबर 2022 रोजी लॉन्च केले होते. त्याची अधिकृत वेबसाइट chat.openai.com आहे. जेव्हापासून चाट gpt लॉंच झाला तेव्हापासून त्याच्या वापरकर्त्यांची संख्या वाढतच आहे. ही संख्या आतापर्यंत सुमारे 10 दशलक्षांपेक्षा जास्त झाली आहे.

चॅट GPT चा पूर्ण फॉर्म Full form of chat GPT

Chat GPT हे नाव तुम्ही ऐकले असेलच पण त्याचे पूर्ण नाव तुम्हाला माहित आहे का Chat GPT चा फुल्ल फॉर्म Chat Generative Pretrend Transformer असे आहे. चॅट GPT हे आपल्या खूप फायद्याचे ठरणार आहे, याद्वारे आपण निबंध, यूट्यूब व्हिडिओ स्क्रिप्ट, कव्हर लेटर, चरित्र, रजा अर्ज इत्यादी हे आपल्याला लिहून दिले जाऊ शकते.

चॅट GPT चा इतिहास History of Chat GPT

चॅट जीपीटीची सुरुवात कशी झाली


Chat GPT च्या इतिहासाबद्दल बोलायचे झाले तर, Chat Gpt ची सुरुवात 2015 मध्ये निर्माता Sam Altman यांनी टेस्ला आणि स्पेस एक्सचे मालक एलोन मस्क यांच्या सोबत एक ना-नफा प्रकल्प म्हणून त्यावर काम करण्यास सुरुवात केली. पण काही वर्षांनी इलॉन मस्क यांनी हा प्रकल्प मधेच सोडला.

यानंतर, बिल गेट्सच्या मायक्रोसॉफ्ट कंपनीने यामध्ये मोठी रक्कम गुंतवली आणि 30 नोव्हेंबर 2022 रोजी Chat Gpt चा प्रोटोटाइप लाँच करण्यात आला. ओपन आर्टिफिशियल इंटेलिजेंस ओपन एआय कंपनीचे सीईओ सॅम ऑल्टमन यांच्या म्हणण्यानुसार, चॅट जीपीटी लाँच झाल्यानंतर केवळ 1 आठवड्यानंतर सुमारे 10 दशलक्ष लोकांपर्यंत पोहोचली होती. आणि वापरकर्त्यांची संख्या सतत वाढत आहे.

Chat GPT कसे कार्य करते? How does Chat GPT work?

Chat GPT हा आर्टिफिशिअल इंटेलिजन्स वर आधारित एक चाट रोबोट आहे जो वापर कर्त्याने विचारलेल्या प्रश्नाचे चॅटिंग द्वारे मजकूर स्वरूपात उत्तर देतो. ChatGPT कसे कार्य करते याबद्दल त्याच्या अधिकृत वेबसाइटने तपशीलवार माहिती दिली आहे. Open AI ने chat gpt ला  सार्वजनिकरित्या उपलब्ध डेटा विकसकाने प्रशिक्षित करण्यासाठी वापरला आहे. येथे विकसित केलेल्या डेटावरून हा चॅट बॉट आपण यात विचारलेल्या प्रश्नाचे आपल्या डेटा मध्ये उत्तर शोधतो आणि नंतर योग्य आणि सोप्या भाषेत उत्तर देतो.

जर यामध्ये दिलेल्या उत्तराने तुम्ही समाधानी नसाल तर त्यामध्ये chatgpt तुम्हाला त्याच्याशीच निगडित दुसरी उत्तरे देखील देतो. तुम्हाला मिळालेल्या उत्तराने तुम्ही समाधानी आहात की नाही हे सांगण्याचा पर्यायही तुम्हाला येथे मिळतो. तुम्ही जे काही प्रश्न विचारता त्यानुसार ते आपला डेटा सतत अपडेट करत राहतो.

चॅट GPT ची खास वैशिष्ट्ये Special features of Chat GPT

आत्तापर्यंत आम्ही तुम्हाला चॅट जीपीटी म्हणजे काय, चॅट जीपीटी कशी काम करते याविषयी माहिती दिली आहे, पण आता आम्ही तुम्हाला चॅट जीपीटीची काही महत्त्वाची वैशिष्ट्ये सांगणार आहोत-

 1. चॅट GPT चा वापर कोणत्याही प्रकारची लिखित सामग्री तयार करण्यासाठी वापरली जाऊ शकते.
 2. येथे विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला लेखाच्या स्वरूपात तपशीलवार दिली जातात.
 3. चॅट GPT वर विचारलेल्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर रिअल टाइममध्ये दिले जाते
 4. चॅट जीपीटी वापरण्यासाठी वापरकर्त्यांना कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही, लोक ते पूर्णपणे विनामूल्य वापरू शकतात.
 5. वापरकर्ते चॅट GPT च्या मदतीने निबंध लिहणे, व्हिडिओ सामग्री तयार करणे, चरित्र लिहणे इत्यादी तयार करू शकतात.

चॅट जीपीटी मध्ये लॉगिन किंवा सिंग अप कसे वापरावे How to use Login or Sign Up in Chat GPT

Chat GPT चा वापर करण्यासाठी तुम्हाला काही स्टेप्स वापराव्या लागतील ज्या एकदम सोप्या आहेत. याचा वापर करण्यासाठी तुम्हाला त्याच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल आणि तुमचे खाते बनवावे लागेल. खाते तयार केल्यानंतरच तुम्ही आरामात चॅट GPT वापरू शकता. सध्या chat gpt वापरणे पूर्णपणे फ्री आहे, पण भविष्यात असे होऊ शकते की ते वापरण्यासाठी लोकांकडून सामान्य शुल्क वसूल केले जाउ शकतात.
चला जाणून घेऊयात चाट gpt कसे वापरावे

1: ज्या व्यक्तीला Chat GPT च्या अधिकृत website ला उघडायचे आहे. याची website आहे Chat.openai.com ही वेबसाइट उघडावी लागेल.

2: वेबसाईटच्या होम पेजवर गेल्यानंतर येथे लॉगिन आणि साइन अप असे दोन पर्याय दिसतील, त्यापैकी तुम्हाला साइन अप या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

3: तुम्ही येथे ईमेल आयडी किंवा मायक्रोसॉफ्ट खाते वापरून खाते तयार करू शकता.

4: आता तुम्हाला येथे पहिल्या बॉक्समध्ये तुमचे नाव टाकावे लागेल आणि त्यानंतर तुम्हाला date of birth टाकल्यानंतर तुमचा फोन नंबर बॉक्समध्ये टाकावा लागेल आणि Continue बटणावर क्लिक करावे लागेल.

5: आता तुम्हाला एक otp येईल या otp स्क्रीनवर दिसणार्‍या बॉक्समध्ये टाका आणि Verify बटणावर क्लिक करा.

6: फोन नंबरची पडताळणी केल्यानंतर, तुमचे खाते चॅट GPT वर तयार केले जाते. त्यानंतर तुम्ही त्याचा वापर सुरू करू शकता.

7: येथे तुम्ही चाट बॉक्स मध्ये जी माहिती विचारलं त्याचे उत्तर तुम्हला मिळेल.

Chat GPT चे फायदे काय आहेत

Chat GPT हे नवीनच लॉन्च झालेले आहे. त्यामुळे चॅट जीपीटीच्या फायद्यांबद्दल जाणून घेण्यास प्रत्येकाला खूप उत्सुकता आहे. आम्‍ही तुम्‍हाला खाली त्‍याच्‍या फायद्याविषयी माहिती देऊ आणि chat GPT che fayde kay aahet ते जाणून घेऊ.

Chat GPT che fayde

 1. चॅट GPT त्याच्या वापरकर्त्यांच्या प्रश्नांची उत्तरे वेगवेगळ्या वेबसाईट स्वरूपात न देता ते तुमच्या प्रश्नांची उत्तरे थेट मजकूर स्वरूपात सादर करते.
 2. चॅट जीपीटीच्या कोणत्याही उत्तराने तुम्ही समाधानी नसाल तर ते तुमच्याकडून सूचना घेते आणि मिळालेल्या माहितीनुसार त्याची उत्तरे आणि निकाल अपडेट करत राहते.
 3. चॅट Gpt यावेळी वापरण्यासाठी पूर्णपणे विनामूल्य आहे. तुम्ही याच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन तुम्ही हा चॅट बॉट विनामूल्य वापरू शकता.
 4. ब्लॉगिंग आणि सामग्री लेखनाच्या दृष्टिकोनातून चॅट जीपीटी देखील खूप उपयुक्त आहे कारण स्क्रिप्ट आणि इतर सामग्री देखील चॅट जीपीटीद्वारे सहज तयार केल्या जाऊ शकतात.
 5. आम्ही तुम्हाला सांगतो की चॅट Gpt आता केवळ मजकूरच नाही तर प्रतिमा देखील इनपुट म्हणून स्वीकारते.

वर आपण chat gpt च्या फायद्यांबद्दल जाणून घेतले, आता आपण चॅट जीपीटीचे तोटे काय आहेत याचीही माहिती घेऊ या.

चॅट GPT चे तोटे Disadvantages of Chat GPT

 1. चॅट GPT सध्या खूप भाषांमध्ये उपलब्ध आहे तरीही ते इंग्रजी भाषेला जास्त सपोर्ट करते. बाकीच्या भाषांमध्ये ये थोडे कमी शब्दरचना देते त्यामुळे इंग्रजी भाषा जाणणाऱ्यांसाठीच ते उपयुक्त ठरेल.
 2. असे अनेक प्रश्न आहेत ज्यांचे चॅट GPT तुम्हाला अचूक उत्तर देऊ शकत नाही.
 3. ChatGPT प्रशिक्षण 2022 मध्येच पूर्ण झाले आहे, त्यामुळे मार्च 2022 नंतर, तुम्हाला कदाचित इथल्या बहुतांश घटनांची माहिती मिळू शकणार नाही.
 4. जोपर्यंत संशोधन कालावधी आहे तोपर्यंत वापरकर्ते ते विनामूल्य वापरू शकतात. संशोधन कालावधी पूर्ण झाल्यानंतर वापरकर्त्याला ते वापरण्यासाठी पैसे द्यावे लागतील, जरी किती पैसे द्यावे लागतील याबद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

निष्कर्ष

मला आशा आहे की Chat gpt mhanaje kay हा लेख वाचल्यानंतर तुम्हाला चॅट जीपीटीबद्दल जे काही प्रश्न पडले असतील त्याचे उत्तर मिळाले असेल.  जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल, तर ती तुमच्या मित्रांसोबत शेअर करा जेणेकरून त्यांना Chat GPT बद्दल योग्य माहिती मिळू शकेल.

या लेखात मी चॅट जीपीटी बद्दलची संपूर्ण माहिती अगदी सोप्या शब्दात सांगितली आहे, ज्यामध्ये तुम्हाला Chatgpt kay aahe, Chat gpt kase kam karate, सोबतच Chat gpt chi vaishishtya, chat gpt che fayde v tote kay aahet याची संपूर्ण माहिती यात आहे.

तरीही तुम्हाला त्यात काही चूक वाटत असेल, तर तुम्ही मला कॉमेंट द्वारे जरूर सांगा. मी ती माहिती यात अपडेट करेन. तसेच chat gpt संदर्भात काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता किंवा या ब्लॉगवर आमच्याशी contact पेजवर संपर्क साधु शकता, मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Menu Site