Ad code

Latest

6/recent/ticker-posts

बँकेच्या चेकवर कोपऱ्यात दोन रेषा का मारतात? त्याच काय अर्थ असतो.

बँक चेकवर दोन रेषा का काढल्या जातात, तुम्हाला त्याचा संपूर्ण अर्थ माहित आहे का?


अनेक आर्थिक व्यवहार सद्या ऑनलाइन होत असले तरी आजही बहुतेक वेळा मोठे व्यवहार करण्यासाठी लोक चेक चा वापर करतात. चेक हे कोणालाही पेमेंट करण्याचे एक उत्तम साधन आहे. चेकद्वारे समोरच्याला डायरेक्ट रक्कम न देता बँकेमधून रक्कम दिली जाते. पण चेक दुसऱ्या व्यक्तीला देण्याआधी आपल्याला त्यावर आपण ज्या व्यक्तीला चेक देत आहोत त्या व्यक्तीचे नाव, तारीख, रक्कम टाकल्यानंतर त्यावर स्वाक्षरी करावी लागते. चेकवर स्वाक्षरी हा महत्वाचा भाग असतो. याशिवाय आणखी एक गोष्ट महत्वाची असते ती म्हणजे चेकच्या वरच्या बाजूच्या कोपऱ्यात दोन तिरक्या रेषा मारणे. पण तुम्हाला माहित आहे का? या रेषा का मारल्या जातात. चला तर मग जाणून घेऊया याचा अर्थ आणि याचे काय महत्त्व आहे. चेक हा खातेधारकाला बँकेने दिलेले बुक असते ज्याद्वारे खातेधारक बँकेचे व्यवहार करू शकतो. चेकच्या मदतीने लाखो रुपये एका खात्यातून दुसऱ्या खात्यात कोणत्याही अडचणीशिवाय ट्रान्सफर करता येतात. प्रत्येक चेकवर एक चिन्ह असते, जे कोणत्या ना कोणत्या प्रकारे पैसे भरण्याचा आदेश देते.


तुम्ही चेकवर रक्कम, प्राप्तकर्त्याचे नाव, बँक तपशील, सही इत्यादीं पाहिल असेल. परंतु या सर्वांसह तुम्ही चेकवर काढलेल्या दोन रेषा देखील पाहिल्या असतील, ज्या चेकच्या अगदी कोपऱ्यात काढलेल्या असतात. पण तुम्ही हा विचार केलाय का या  रेषा का काढल्या जातात याचे महत्व काय आहे. आणि या दोन रेषा काढल्याने चेकमध्ये काय बदल होतात हे तुम्हाला माहिती आहे का. जाणून घ्या या रेषांशी संबंधित काही खास गोष्टी.


चेक देताना चेकवर दोन तिरप्या रेषा मारल्या जातात. या दोन रेषांमुळे चेकच्या व्यवहाराचे स्वरुप पूर्णपणे बदलून जाते. त्यामुळे चेकवर नेहमी विचार करुनचं या रेषा मारयला हव्यात. अन्यथा पुढील व्यक्तीला खात्यातून पैसे काढण्यात अडचण येऊ शकते. ज्या व्यक्तीच्या नावे धनादेश काढला जातो आणि त्यांना पैसे द्यायचे असतात त्यांच्यासाठी ही रेषा काढली जाते. या रेषांचा अर्थ तुम्ही ज्या व्यक्तीच्या नावाने चेक काढला आहे त्याच व्यक्तीच्या खात्यावर पैसे ट्रान्सफर केले जावेत असा होतो.

या रेषांचा उपयोग काय?

ही रेषा खातेदाराचे चिन्ह मानली जाते, याद्वारे धनादेश ज्या व्यक्तीच्या नावावर काढला जातो त्याच्या खात्यात पैसे हस्तांतरित केले जावेत. याचा अर्थ चेकमध्ये लिहिलेली रक्कम फक्त त्याच व्यक्तीच्या खात्यात हस्तांतरित केली जाईल. ते रोखीने काढता येत नाही म्हणजेच ज्याचे नाव चेकवर असेल, त्याच्या खात्यातच पैसे ट्रान्सफर होतील.

बरेच लोक चेकवर दोन ओळी काढल्यानंतर त्यात Account Payee असे लिहितात, ज्यामुळे चेकचे पैसे खात्यातच हस्तांतरित केले जावेत हे स्पष्ट होते. हे लिहिल्यानंतर बँकेत धनादेश जमा करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला त्यातून रोख रक्कम न मिळता त्याच्या खात्यात जमा व्हावी असा त्याचा अर्थ असतो. अनेक धनादेशांवर ते आधीच छापलेले असते.

पण एखाद्या व्यक्तीचे बँक अकाउंट नसेल अथवा त्याला तातडीने पैशांची गरज नसेल तर या रेषा मारणे टाळले पाहिजे.

बँक मर्यादित धनादेश देते

तुम्ही धनादेशाद्वारे पैसे भरल्यास, तुम्ही हे लक्षात ठेवावे की बँकेद्वारे मर्यादित संख्येत धनादेश जारी केले जातात. दरवर्षी मर्यादित संख्येत धनादेश ग्राहकांना दिले जातात आणि अधिक धनादेशांची आवश्यकता असल्यास, बँक त्यासाठी शुल्क आकारते.टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Menu Site