Ad code

Latest

6/recent/ticker-posts

ट्रेनमध्ये दारू घेऊन जाता येते की नाही, जाणून घ्या रेल्वेचे नियम alcohol ban in indian railway

ट्रेनमध्ये दारू घेऊन जाता येते की नाही, जाणून घ्या रेल्वेचे नियम

रेल्वे मधून  दारूची बाटली घेऊन जाणे बेकायदेशीर आहे का? ट्रेन मध्ये प्रवास करताना सोबत दारूची बाटली बाळगल्यास शिक्षा किंवा दंड होऊ शकतो का? असे प्रश्न रेल्वे प्रवाशाच्या मनात कधी ना कधी आलेच असतील.

indian railway network हे भारतातील वाहतुकीचे सर्वात मोठे साधन आहे आणि त्यावर कोट्यवधी प्रवासी अवलंबून आहेत. आणि या ट्रेन मधून काही ना काही चुकीची कामे होऊच शकतात त्यात दारू तस्करी होणे, दारू पिऊन प्रवास करणे अश्या गोष्टी वर बंदी घालण्यासाठी  रेल्वेने काही नियम काढले आहेत रेल्वे कायदा 1989 अंतर्गत असे अनेक नियम आहेत, जे प्रत्येक रेल्वे प्रवाशाला माहित असणे आवश्यक आहे.


ट्रेनमधुन मद्य घेऊन प्रवास करणे हे तुम्ही कोणत्या राज्यात प्रवास करत आहात यावर अवलंबून आहे, कारण घटनेत सर्व राज्यांना दारूबाबत स्वतःचे नियम बनवण्याचे स्वातंत्र्य दिलेले आहे. दारूबाबतचे कायदे आणि नियम प्रत्येक राज्यांच्या यादीत वेगवेगळे आहेत. म्हणून, प्रत्येक राज्य आपल्या मर्यादेत मद्यविक्रीपासून सेवनापर्यंत नियम आणि कायदे वेगळे आहेत.


ट्रेनमध्ये प्रवास करताना किती दारू बाळगता येईल, काय नियम आहेत?


जर तुम्ही ट्रेनमधून प्रवास करत आहात आणि तुम्हाला सोबत दारू घेऊन जायचे असेल. तर तुम्ही हे करू शकता पन  त्यासाठी काही नियम आहेत ते तुम्ही पाळणे खूप गरजेचे आहे अन्यथा तुम्हाला तुरुंगवासाची शिक्षा देण्यात येईल. 

जर तुम्ही स्मार्ट पद्धतीने म्हणजे कोल्ड्रिंक्समध्ये दारू मिसळून प्यायचा प्रयत्न केला तर तोही गुन्हा आहे. तुम्ही ट्रेन मध्ये मद्यपान करू शकत नाही असे केल्याने तुम्हाला दंड होऊ शकतो आणि तुरुंगातही पाठवले जाऊ शकते. 

तुम्ही ट्रेनमधून प्रवास करताना दारूची एक बाटली घेऊन जाऊ शकता पण ती सीलबंद असणे आवश्यक आहे. पण सोबत तुम्ही बिले देखील बाळगली पाहिजेत, जेणेकरून तुम्ही तस्करी करत नाही हे सिद्ध करता येईल.

देशातील या राज्यांमध्ये दारूबंदी - train madhe daru ghevun jau shakto ka?

 
देशात अशी अनेक राज्ये आहेत, जिथे तिथल्या राज्य सरकारांनी केवळ दारू पिण्यावरच नव्हे, तर त्याच्याशी संबंधित सर्व प्रकारच्या क्रियाकलापांवर बंदी घातली आहे. त्यामुळे या राज्यांमध्ये रेल्वे, मेट्रो, बस किंवा अन्य वाहतूक सुविधांद्वारे मद्य कोणत्याही प्रकारे आणता येणार नाही. यामध्ये बिहार, गुजरात, लक्षद्वीप आणि नागालँडचा समावेश आहे. 

या राज्यांमध्ये दारूची विक्री, उत्पादन किंवा सेवन पूर्णपणे प्रतिबंधित आहे. अशा परिस्थितीत एखाद्या प्रवाशाने ट्रेनमधून दारू बंदी असलेल्या राज्यात दारू नेल्यास त्या राज्याच्या कायद्यानुसार त्याला तुरुंगवास आणि दंड होऊ शकतो.

बंदी नसलेल्या राज्यांमध्ये काय नियम आहेत?


ज्या राज्यांमध्ये दारूवर बंदी नाही, तेथे रेल्वे प्राधिकरणाच्या नियमांचे पालन करून दारू बंद बाटल्यांमध्ये नेता येते. तथापि, खुलेआम किंवा दारूच्या नशेत ट्रेनमध्ये चढणे नियमांच्या विरुद्ध आहे आणि त्याला शिक्षा होऊ शकते.

किती अल्कोहोल परवानगी आहे


जरी एखाद्या व्यक्तीने ट्रेनमध्ये अल्कोहोल घेतले तरी त्याचे प्रमाण 2 लिटरपेक्षा जास्त असू नये. त्यासोबतच अल्कोहोलची बाटली पूर्णपणे बंद असायला पाहिजे आणि तिला कव्हर पॅक केले पाहिजे. ट्रेनमध्ये ते कोणत्याही प्रकारे कोणालाही दिसू नये. पण ज्या राज्यात दारूवर बंदी नाही अशा राज्यात ट्रेनने प्रवास करतानाच परवानगी दिली जाते. जर तुमच्याकडे परवानगी नसेल तर दारू घेऊन बंदी असलेल्या राज्यात गेलात तर अवघड होईल.

काय आहे रेल्वे कायदा १९८९-

रेल्वे फलाटावर किंवा रेल्वे स्थानकाच्या कोणत्याही ठिकाणी उघड्यावर दारू पिणे किंवा वाहून नेणे बेकायदेशीर आहे. तुम्हाला रेल्वे कायदा 1989 अंतर्गत शिक्षा होऊ शकते रेल्वे कायदा 1989 म्हणते की कोणतीही व्यक्ती दारू किंवा इतर मादक पदार्थ, विषारी पदार्थ घेऊन रेल्वेच्या मालमत्तेवर जाऊ शकत नाही. रेल्वे अंतर्गत सर्व ठिकाणी दारू आणि इतर मादक पदार्थांचे सेवन करण्यास मनाई आहे.

६ महिने कारावास आणि दंड

रेल्वे कायदा 1989 चे कलम 145 सांगते की, रेल्वे तसेच रेल्वे प्लॅटफॉर्मसह रेल्वेच्या परिसरात कुठेही मद्य, मादक पदार्थाचे सेवन केले जाते. किंवा त्याच्या ताब्यात अमली पदार्थ आढळल्यास, त्याचे रेल्वे तिकीट किंवा रेल्वे पास रद्द करण्यात येईल. त्याला सहा महिने तुरुंगवास किंवा 500 रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो.

 

ज्या राज्यांमध्ये सूट आहे तेथे काय कायदा आहे?

राज्यांचा अबकारी कायदा मद्याची बाटली कोणत्याही प्रकारे आणण्याच्या किंवा घेऊन जाण्याच्या क्रियाकलापांची माहिती देखील देतो. राज्य उत्पादन शुल्क कायदा कोणतीही व्यक्ती 1.5 लिटर दारू सोबत घेऊन जाऊ शकते आणि एक बाटली उघडी असणे आवश्यक आहे, परंतु त्याला पिण्याची परवानगी नाही. 

यामुळे ही दारू विक्रीसाठी नसून स्वत:च्या वापरासाठी आहे याची खात्री होईल. यापेक्षा जास्त प्रमाणात दारू कोणी बाळगत असेल तर त्याला उत्पादन शुल्क अधिकाऱ्याची परवानगी घ्यावी.

धूम्रपानाबाबत काय नियम आहे (ट्रेनमध्ये धूम्रपान करण्यावर दंड)


भारतीय रेल्वेमध्ये धुम्रपान करण्यास पूर्णपणे बंदी आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे, परंतु तरीही काही लोक ट्रेनमध्ये धूम्रपान करतात. रेल्वे कायदा 1989 च्या कलम 167 नुसार, भारतीय रेल्वेमध्ये धूम्रपान करताना आढळलेल्या प्रवाशाला 100 रुपयांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो. 

याशिवाय, रेल्वे कायदा (रेल्वे कायदा, 1989) च्या कलम 167 नुसार, जर एखादा रेल्वे कर्मचारी ट्रेनमध्ये ड्युटीवर असताना मद्यधुंद अवस्थेत आढळला, तर 500 रुपये दंड किंवा 1 वर्षाचा तुरुंगवास किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Menu Site