Ad code

Latest

6/recent/ticker-posts

Kidney Stone बिअर पिल्याने मुतखड्याचा त्रास खरच कमी होतो का? काय आहे सत्य तज्ज्ञांकडून ऐका

Kidney Stone बिअर पिल्याने मुतखड्याचा त्रास खरच कमी होतो का? काय आहे सत्य तज्ज्ञांकडून ऐका


तुम्ही बिअर पिणाऱ्या लोकांच्या तोंडून हे नक्कीच ऐकले असेल की, बिअर पिल्याने मुतखडा ( Kidney stone ) पडतो. हे ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसला असेल, बिअर पिणाऱ्या प्रत्येक 3 पैकी एका भारतीयाला वाटते की बिअर प्यायल्याने किडनी स्टोन बाहेर पडतात. परंतु हा दावा अगदी सामान्य आहे. तर या मध्ये काय सत्यता आहे ते आम्ही तुम्हाला तज्ज्ञांच्या उत्तरातून सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला पडलेल्या प्रश्नांच्या गोंधळलेल्या परिस्थितीतून बाहेर पडण्यास मदत होईल.

Kidney stone, beer for kidney stone,


Kidney stone :-  मुतखड्याची समस्या आजकाल सामान्य झाली आहे आणि दिवसेंदिवस अनेकांना याचा त्रास होत आहे. मुतखड्याची समस्या मुतखडा असणाऱ्या व्यक्तीचे जीवन दयनीय बनवते, कारण किडनी स्टोनची वेदना इतकी वेदनादायक असते की वेदना होत असताना काय होत आहे हे आपण समजू शकत नाही. ही वेदना इतकी तीव्र असते की त्या व्यक्तीला सहन होत नाही. यामध्ये व्यक्तीला पोटापासून पाठीपर्यंत विचित्र वेदना होतात. त्यावेळी त्याला काही समजत नाही की काय करावे. 

अनेक वेळा आपण या आजारावर घरगुती उपाय करतो, त्याने आपल्याला काही प्रमाणात फायदा देखील होतो. पण घरगुती उपाय करताना जर त्यात काही कमी जास्त झाले तर त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात. मुतखडावरती (kidney stone)  काही घरगुती उपाय केले जातात, यामध्ये बिअरचा क्रमांक अगदी वर लागतो. 

अनेक लोकांच्या मते बिअर प्यायल्याने मुतखडा होत नाही किंवा मुतखडा असेल तर तो पडतो असे अनेक समज-गैरसमज आहेत. मुतखड्यावरती बिअर कितपत फायदेशीर आहे आणि मुतखडा कसा होतो हे आपण पुढे पाहू.


मुतखडा(kidney stone) काय आहे? What is kidney stone?

किडनी स्टोन हे आपल्या किडनीमध्ये जमा झालेले एक प्रकारचे स्फटिकं असतात. जो मूत्रात सापडलेल्या घटकांपासून मूत्रपिंडात तयार होतो. बहुधा हे खडे कॅल्शियम किंवा यूरिक ऍसिडपासून तयार होतात. या प्रक्रियेला नेफ्रोलिथियासिस म्हणतात. किडनी स्टोन लहान किंवा मोठे असू शकतात. किडनीतून मूत्राशयापर्यंत मूत्र वाहून नेणाऱ्या नळ्यांमध्ये हे दगड अडकतात त्यामुळे तीव्र वेदना होतात. हे दगड बहुदा किडनी मध्ये जमा होतात त्यामुळे याला किडनी स्टोन म्हणतात. किडनी व्यतिरिक्त हे खडे आपल्याला मूत्राशयात पण आढळतात. हे स्टोन जमा झाल्याने लघवी करणे अतिशय त्रासदायक होते.


किडनी स्टोन होण्याची कारणे:- 


मुतखडा हा आपल्या खराब जीवनशैलीचा परिणाम आहे, शरीरात पाण्याची कमतरता असल्यामुळे किंवा व्यायामाचा अभाव असणे, चहा-कॉफी चे सेवन जास्त करणे, खूप प्रमाणात तळलेले किंवा भाजलेले अन्न खाणे, कमी पाणी पिणे आणि लघवी जास्त वेळ अडवून ठेवणे इत्यादी मुळे मुतखडा होण्याचे प्रमाण वाढतात. 

Kidney stone Image by brgfx on Freepik


याशिवाय शरीरात जास्त प्रमाणात कॅल्शियम असणे किंवा high protein घेणे हे देखील किडनी स्टोन बनण्याचे मुख्य कारण आहे. जेव्हा शरीरामध्ये मीठ आणि इतर खनिजे एकमेकांच्या संपर्कात येतात तेव्हा किडनी मध्ये किंवा मूत्राशयात हे खडे तयार होऊ लागतात, ज्याला किडनी स्टोन म्हणतात. शरीरात हे मूतखडे कॅल्शियम, ऑक्सलेट आणि कॅल्शियम फॉस्फेटपासून बनत असतो. मुतखड्याची समस्या वेदना देण्याबरोबरच इतर अनेक समस्यांना निमंत्रण देते. ज्याला दूर करणे खूप कठीण आहे जर हे खडे लहान असतील तर औषध उपचार करून लघवीतून बाहेर काढता येतो.

बिअर पिणे हा मुतखडयावर इलाज आहे का?


मुतखडा दूर करण्यासाठी कोणतेही पक्के उपचार नसले तरी लहान आकाराचे दगड काही घरगुती उपायांनी नक्कीच काढता येतात. यासाठी, अधिकाधिक द्रव पिण्याचा सल्ला दिला जातो. यात पाणी पिणे, काही फळांचा रस पिणे, काढा पिणे यांचा समावेश आहे. परंतु मोठ्या आकाराच्या खड्यावर केवळ शस्त्रक्रिया करण्याची शिफारस केली जाते. काही अभ्यासांमध्ये असा दावा करण्यात आला आहे की नियमितपणे थोड्या प्रमाणात बिअर पिल्याने दगडांपासून मुक्त होण्यास मदत होते. पण खरंच असं होतं का? याविषयी आम्ही डॉक्टर यांच्याशी सल्लामसलत केली, तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितले की, "बीअर प्यायल्याने स्टोन निघून जातो." परंतु हे लक्षात ठेवा की बिअर बार्लीपासून ( जव, गहू ) बनविली पाहिजे आणि ती घेतल्याने फक्त लहान आकाराचे दगड बाहेर येतात.

 डॉक्टर हे देखील सांगतात की, बिअर प्यायल्याने डायरेसिस होतो. यामुळे लघवीचा स्राव वाढतो. त्यामुळे किडनीवर दाब पडतो आणि लघवीसोबत स्टोन बाहेर पडतो. म्हणूनच त्याचे नियमित सेवन लहान आकाराचे दगड काढण्यासाठी फायदेशीर आहे.


त्यामुळे तुम्हाला किडनीचा त्रास होत असेल तर बार्लीपासून बनवलेली बिअर प्या. पण हे लक्षात ठेवा की त्याचा जास्त वापर करू नये, कारण असे दिसून आले आहे की ज्या व्यक्तीला किडनी स्टोनची समस्या दीर्घकाळापासून आहे ते मोठ्या प्रमाणात बिअर पितात, ज्याचा त्यांच्यावर विपरीत परिणाम होतो. आम्ही तुम्हाला किडनी स्टोन घालवण्यासाठी बिअर प्या अस सांगत नाही आहोत. किडनी स्टोन पासून मुक्तता मिळवण्यासाठी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि हेच तुमच्यासाठी जास्त फायद्याचं ठरेल.अस्वीकरण
तुमची त्वचा आणि शरीर तुमच्यासारखेच वेगळे आहे. आमच्या लेखा द्वारे आम्ही तुम्हला योग्य ते मार्गदर्शन देण्यासाठी हा लेख लिहला आहे, तुमच्या पर्यंत सुरक्षित आणि तज्ञ सत्यापित माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे, परंतु तरीही तुम्ही कोणताही घरगुती उपाय, हॅक किंवा फिटनेस टिप वापरण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा अवश्य सल्ला घ्यावा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Menu Site