Ad code

Latest

6/recent/ticker-posts

Good Friday म्हणजे काय? गुड फ्रायडेची परंपरा, महत्व आणि मान्यता काय आहे

गुड फ्रायडे म्हणजे काय? गुड फ्रायडे का साजरा केला जातो गुड फ्रायडेची परंपरा, महत्व आणि मान्यता


ख्रिश्चन धर्मात गुड फ्रायडेला खूप महत्त्व आहे. ख्रिश्चन धर्माचे अनुयायी हा दिवस शोक दिन म्हणून साजरा करतात. चर्चमध्ये जाऊन प्रभू येशूचे स्मरण करतात आणि त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालण्याची प्रतिज्ञा घेतली जाते. जाणून घेऊयात Good friday का साजरा केला जातो? आणि याचा इतिहास काय आहे. त्या सोबतच Good Friday दिवशी काय करतात.


गुड फ्रायडेचा इतिहास History of Good friday

असे मानले जाते की सुमारे 2000 वर्षांपूर्वी भगवान येशू लोकांना एकता, अहिंसा, मानवता, बंधुता आणि शांततेचे धडे देत असत आणि त्या काळात ते खूप लोकप्रिय होते लोकांना त्यांची शिकवण आवडत असे ते त्यांच्या शिकवणीनुसार आचरण करत असत, सर्वांशी प्रेमाने वागत असत. पण तिथल्या धर्मगुरूंना स्वतःची लोकप्रियता कमी होण्याची भीती वाटू लागली आणि त्यांनी येशू ख्रिस्ताला मानवतेचा शत्रू घोषित केले. पण या घोषणेनंतरही येशू ख्रिस्ताच्या लोकप्रियतेवर कोणताही परिणाम झाला नाही. शेवटी त्याच धर्मगुरूंनी त्याच्यावर देशद्रोहाचा आरोप करून त्यांना फाशीची शिक्षा जाहीर करण्यात आली. या घोषणेनंतर येशू ख्रिस्ताला चाबकाने मारणे, फटके मारणे, काट्यांचा मुकुट घालणे इत्यादी अनेक शारीरिक यातना देण्यात आल्या आणि शेवटी त्याच्या पायात व हाताला खिळे ठोकून वधस्तंभावर लटकवण्यात आले.

येशु ख्रिश्चनांचा पवित्र ग्रंथ बायबलनुसार, येशू ख्रिस्ताला खिळ्यांच्या साहाय्याने सुमारे 6 तास त्या स्तंभावर लटकवले होते. त्याचवेळी येशु ख्रिस्ताच्या मृत्यूनंतर संपूर्ण राज्यात २४ तास अंधार होता आणि येशू ख्रिस्ताच्या मृत्यूमुळे, ख्रिश्चन धर्माचे अनुयायी 40 दिवस शोक करत होते. त्यांचा मृत्यू ज्या दिवशी झाला तो दिवस शुक्रवार होता म्हणून तेव्हापासून हा दिवस गुड फ्रायडे म्हणून साजरा केला जातो. येशु ख्रिस्ताच्या मृत्यूमुळे ester sunday च्या आधी येणाऱ्या शुक्रवार ला गुड फ्रायडे साजरा केला जाऊ लागला.

असे म्हणतात की येशु ख्रिस्ताच्या मृत्यु नंतर म्हणजेच काही धार्मिक ग्रंथांनुसार शुक्रवारनंतर येशू ख्रिस्त रविवारी पुन्हा जिवंत झाले होते. या आनंदात ईस्टर संडे साजरा होऊ लागला.


Good friday कसा साजरा करतात


गुड फ्रायडे च्या दिवशी येशु ख्रिस्ताच्या आयुष्यातील शेवटच्या क्षणांची पुनरावृत्ती चर्चमध्ये केली जाते आणि लोकांची सेवा केली जाते. हा शोक दिवस असल्याने या दिवशी चर्च आणि घरांमधून सजावट केली जात नाही. प्रभू येशूच्या स्मरणार्थ लोक काळे कपडे घालून पदयात्रा काढतात. या दिवशी चर्चमध्ये मेणबत्त्या पेटवल्या जात नाहीत आणि घंटा वाजवल्या जात नाहीत. गुड फ्रायडेच्या दिवशी, लोक त्यांच्या वाईट वागणुकीची झालेल्या चुकीची क्षमा मागतात. गुड फ्रायडेला शाकाहारी आणि सात्विक अन्न खाल्ले जाते. वधस्तंभाचे ( क्रॉस ) चुंबन घेऊन प्रभु येशू ख्रिस्ताचे स्मरण केले जाते. गुड फ्रायडेच्या दिवशी चर्चमध्ये विशेष प्रार्थना सभेचे आयोजन केले जाते.   येशू ख्रिस्ताची शिकवण वाचली जाते. त्यांनी सांगितलेले संदेश आणि शिकवण स्वतःच्या आयुष्यात आणण्याचा प्रयत्न केला जातो.


(अस्वीकरण: या लेखात दिलेली माहिती सामान्य समजुतींवर आधारित आहे. Naad marathi याची पुष्टी करत नाही. त्यांची अंमलबजावणी करण्यापूर्वी संबंधित तज्ञाशी संपर्क साधा)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Menu Site