Ad code

Latest

6/recent/ticker-posts

स्वराज्यरक्षक संभाजी महाराज यांची वीर गाथा Chhatrapati Sambhaji maharaj information

स्वराज्याचा विस्तार करणारे छत्रपती संभाजी महाराजांची वीर गाथा

नमस्कार मित्रांनो, सर्वात आधी तुमचे नादमराठी कडून मनःपूर्वक आभार, सध्याच्या बदलत्या आणि इतिहासापासून दूर होत चाललेल्या जीवनशैलीत तुम्ही इतिहासाची पाने उघडून बघत आहात, आणि आपला थोर वीर मराठ्यांच्या इतिहासाची माहिती घेण्यासाठी इथ पर्यंत आलात त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. या पोस्ट मध्ये आपण छत्रपती संभाजी महाराज यांच्या बद्दल थोडक्यात व महत्वाची माहिती घेऊ.

तुम्ही सर्वांनी श्री छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल ऐकले असेलच व तुम्हाला त्यांच्याबद्दल त्यांच्या पराक्रमाची माहिती असेलच. पण तुमच्यापैकी कोणाला त्यांच्या मुलाबद्दल म्हणजेच छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल माहिती आहे का? जर नसेल तर या पोस्ट च्या माध्यमातून तुम्हाला छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न करीत आहे.


छत्रपती संभाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुत्र होते. तसेच ते आपल्या वडिलांप्रमाणेच महान राजा होते. संभाजी महाराज आपले वडील शिवाजी महाराज यांच्यासारखे शूर आणि प्रतिभावान व्यक्ती होते. वडीलांच्या निधनानंतर त्यांनी मराठा साम्राज्याची सूत्रे हाती घेतली. व मुघलांवर त्यांचा कर्दनकाळ म्हणून बरसत होते, मुघलांनी त्यांच्यावर अनेक वेळा हल्ले केले, पण मुघल त्यांना पराभूत करू शकले नाहीत. संभाजी महाराजांच्या जीवनाचा परिचय अतिशय पराक्रम आणि बलिदानाने भरलेला आहे. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य हिंदुत्वाच्या सेवेत अर्पण केले होते. संभाजी महाराज लहानपणापासूनच अत्यंत विद्वान होते, त्यांच्या जीवनातील अनेक गोष्टी त्यांनी बालपणीच शिकल्या होत्या. आपल्या आयुष्यात लढलेल्या सर्व युद्धांमध्ये एकही युद्ध न हारता आपल्या वडिलांचे स्वप्न साकार करत होते.

शिवाजीपुत्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या संभाजी महाराजांचे जीवन त्यांचे वडील छत्रपती शिवाजी महाराज यांच्याप्रमाणे देशासाठी आणि हिंदुत्वासाठी समर्पित होते. संभाजी महाराजांनी लहानपणापासूनच राज्यातील अनेक राजकीय प्रश्न सोडवले. आणि या दिवसात मिळालेल्या संघर्षासोबतच शिक्षण आणि दीक्षा यामुळे बाळ शंभूजी राजे काळाच्या ओघात वीर संभाजी राजे होऊ शकले.

छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास ( History Of Chhatrapati Sambhaji Maharaj )

संभाजी महाराज यांचा जन्म आणि शिक्षण

छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म १४ मे १६५७ रोजी पुरंदर किल्ल्यावर झाला. संभाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या पहिल्या पत्नी सईबाई यांचे पुत्र होय. तीन बहिणींच्या पाठीवर जन्मास आलेल्या राजपुत्राचे नाव राजमाता जिजाऊंनी संभाजी ठेवले. परंतु संभाजी महाराज 2 वर्षांचे असताना त्यांची माता सईबाईंचा मृत्यू झाला होता, म्हणून संभाजींचे पालनपोषण त्यांच्या आजी म्हणजेच वीरमाता जिजाबाई यांनी केले. संभाजी महाराजांना छावा असेही संबोधले जात होते, ज्याचा मराठीत अर्थ सिंहाचे बाळ असा होतो. संभाजी महाराजांना संस्कृत आणि इतर अनेक भाषांचे ज्ञान होते.

शंभूराजे हे तलवार बाजीत व युद्धकलेत निपुण असून केशव भट व उमाजी पंडित यांनी संभाजी राजेंना उत्तम शिक्षण दिले. केशव भटांनी त्यांना दंडणीती आणि युद्धकलेतील शिक्षण दिले, त्याचबरोबर त्यांना घोडेस्वारी तलवारबाजी, तिरंदाजी, तालीम याचेही शिक्षण दिले.

संभाजी महाराजांनी अवघ्या वयाच्या १४ व्या वर्षी बुधभूषणम, नायिकाभेद, सातशतक आणि नखशिखांत या संस्कृत ग्रंथांची रचना केली होती. यावरूनच त्यांच्या शिक्षणाचा आढावा लागतो.

संभाजी महाराजांचे कुटुंब

संभाजी महाराजांचे कुटुंब

नाव संभाजी शिवाजी भोसले
जन्म १४ मे १६५७
जन्मस्थान पुरंदर किल्ला (पुणे)
वडीलांचे नाव छत्रपती शिवाजी शहाजी भोसले
आईचे नाव सईबाई शिवाजी भोसले
आजी जिजाबाई शहाजी भोसले
आजोबा शहाजीराजे भोसले
पत्नी येसूबाई
मुलांचे नाव छत्रपती शाहू महाराज, मधोसिंग व उधोसिंग
मुलगी भवाणीबाई
भाऊ राजाराम छत्रपती
बहीण शकूबाई, अंबिकाबाई, राणूबाई जाधव, दीपाबाई, कमलाबाई पालकर, राजकुंवरबाई शिर्के

छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी राजे यांचे नाते

शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी यांचे संबंध फारसे चांगले नव्हते, याचा अर्थ मुलगा आणि वडील दोघांचेही मत अजिबात जुळले नाहीत, याला त्यांचा धाकटा भाऊ राजा राम हे देखील एक कारण आहे, कारण छत्रपती संभाजींच्या दुसऱ्या आई म्हणजे सावत्र आई सोयराबाईंना आपल्या मुलाला म्हणजे राजा रामला त्या राज्याचा उत्तराधिकारी बनवायचे होते. आणि तिच्या इच्छेने ती नेहमी शिवाजी महाराजांच्या मनात संभाजी राजेबद्दल द्वेष उत्पन्न करत असे, त्यामुळे लवकरच शिवाजी महाराज आणि संभाजी राजे यांच्यात अविश्वास निर्माण होऊ लागला. आणि यामुळे या दोघ पिता-पुत्र यांचे नाते अजिबात जुळले नाहीत.

छत्रपती संभाजी महाराजांनी आपले शौर्य आणि अभिमान अनेक वेळा दाखवला पण छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीच त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही. एकदा असंही घडलं की काही कारणास्तव छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजी राजेंना शिक्षा दिली, संभाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांना खूप राग आला आणि त्यांनी संभाजी महाराजांना कैद करण्याचा आदेश दिला आणि त्यांना पन्हाळा किल्ल्यात कैद केले. आणि त्यावेळी संभाजी महाराज आपली पत्नी येसूबाई यांना त्या किल्ल्यावरून घेऊन तेथून पळून मुघलांकडे गेले आणि मुघलांना जाऊन भेटले. आणि त्या काळात शिवाजी महाराजांना अनेक संकटांचा सामना करावा लागला. पण जेव्हा संभाजी महाराजांनी मुघलांना हिंदूंवर अत्याचार करताना पाहिले तेव्हा संभाजी महाराजांना राहवलं नाही आणि ते आपले वडील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडे परतले आणि त्यांनी वडिलांची माफीही मागितली.

buy Sambhaji Maharaj Statue

संभाजी आणि कवी कलश

संभाजी महाराज जेव्हा मुघलांपासून दूर जात असताना, वडिलांकडे न जाता ते महाराजांच्या मंत्र्याचे दूरचे नातेवाईक रघुनाथ कोरडे यांच्याकडे थांबले होते. संभाजी महाराजांनी सुमारे एक ते दीड वर्ष त्यांच्यासोबत घालवले, त्या ठिकाणी ते एक सामान्य ब्राह्मण म्हणून तेथे जगत होते. तिथे राहत असतानाच संभाजी राजेंची कवी कलशशी भेट झाली. तेथेच संभाजी महाराजांना संस्कृत भाषेचेही ज्ञान मिळाले, संभाजी महाराज आणि कवी कलश खूप चांगले मित्र झाले. नंतर संभाजी राजे यांचा राज्याभिषेक झाल्यावर संभाजी राजेंनीं कवी कलशला आपला सल्लागार म्हणून ठेवले.

छत्रपती शिवरायांच्या मृत्यूनंतर संभाजी उत्तराधिकारी झाले.

छत्रपती शिवाजी महाराज 03 एप्रिल 1680 रोजी महाराष्ट्रातील त्यांच्या रायगड किल्ल्यावर निधन पावले. त्यांच्या मृत्यूबाबत इतिहासकारांमध्ये मतभेद आहेत. काही इतिहासकारांचा असा विश्वास आहे की त्याचा मृत्यू नैसर्गिक होता, परंतु अनेक पुस्तकांमध्ये इतिहासकार लिहितात की त्यात कटाचा एक भाग म्हणून विष देण्यात आले होते. यानंतर त्यांची प्रकृती बिघडली आणि 3 एप्रिल 1680 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला, सर्वत्र स्वराज्यात शोक पसरला आपला लाडका राजा गमावल्याचे दुःख सर्वत्र पसरले. ज्यावेळी महाराजांचा मृत्यू झाला त्यावेळी संभाजी महाराजांना पन्हाळा किल्ल्याच्या आत निरीक्षणाखाली ठेवण्यात आले होते. आणि शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर सर्वांच्या मनात एकच प्रश्न निर्माण झाला की पदाचा उत्तराधिकारी कोण होणार नंतर संभाजींची सावत्र आई सोयराबाई यांचा मुलगा राजा राम यांना उत्तराधिकारी बनवण्याची चर्चा सुरू झाली. पण जेव्हा शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला आणि राजा रामला राजा बनवण्याची चर्चा चालू होती, तेव्हा राजा राम फक्त 10 वर्षांचे होते. पण तरीही सभेतील सर्व लोकांनी एकमत केले की केवळ राजा रामच उत्तराधिकारी करण्याचे ठरवले. पण सोयराबाई यांचे भाऊ हंबीरराव मोहिते यांना हे पटले नाही व त्यांनी संभाजी महाराजांना साथ देत त्यांचा हा कट फेटाळून टाकला व संभाजी महाराजांना मदत करत 27 एप्रिल 1680 मध्ये संभाजींनी पन्हाळा किल्ला स्वतःच्या ताब्यात घेतला. त्यानंतर 18 जून 1680 रोजी संभाजींनी रायगड किल्लाही ताब्यात घेतला.

या दोन्ही किल्ल्यांवर आपला अधिकार प्रस्थापित केल्यानंतर, 20 जुलै 1680 रोजी संभाजी महाराज गादीवर बसले. व संभाजी महाराजांचा १६ जानेवारी १६८१ रोजी राज्याभिषेक करण्यात आला. राज्याभिषेकानंतर संभाजी महाराजांनी राज्याची सर्व सूत्रे हातात घेऊन मराठा सामराज्याचं वेगाने विस्तार केला.

छत्रपती संभाजी महाराजांची लढाई

छत्रपती संभाजी महाराज हे अतिशय शूर योद्धे होते, त्यांनी अनेक लढाया केल्या होत्या त्यापैकी एकही लढाई त्यांनी हरली नाही. संभाजी महाराज अवघ्या 16 वर्षांचे असताना त्यांच्या आयुष्यातील पहिले युद्ध ते लढले व ते युद्धही त्यांनी जिंकून शिवाजी महाराजांची मान उंचावून दाखवली.  संभाजी महाराजांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यात 120 लढाया केल्या, त्यापैकी एकही लढाई ते हरले नाहीत. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराज मुघलांवर त्यांचा कर्दन काळ म्हणून बरसत होते, त्यावेळी त्याचा मुख्य आणि सर्वात मोठा शत्रू एकच होता, त्याचे नाव होते औरंगजेब. संभाजी महाराज असे एकमेव योद्धा होते ज्यांनी असा इतिहास घडवला होता. संभाजीराजांनी गोव्याचे पोर्तुगीज, जंजिर्‍याचा सिद्दी आणि म्हैसूरचा चिक्कदेवराय या शत्रूंना असा जोरदार धडा शिकवला की त्यांची संभाजीविरुद्ध औरंगजेबाला मदत करायची हिंमत झाली नाही. तसेच त्यांपैकी कोणीही त्यांच्याविरुद्ध उलटू शकला नाही. संभाजीराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी सर्व शत्रूंशी एकहाती झुंज दिली.


छत्रपती शिवरायांच्या मृत्यूनंतर सर्व मराठ्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागला. आणि मुघलांना असे वाटले की शिवाजी राजांच्या मृत्यूनंतर  संभाजी आपल्यासमोर फार काळ टिकू शकणार नाही. आणि औरंगजेबाने मराठा राज्यांवर हल्ले करायला सुरुवात केली पण मुघलांचा हा प्रयत्न जवळपास ५ महिने चालला, पण त्या प्रयत्नात तो यशस्वी होऊ शकला नाही. परंतु 1687 मध्ये मराठा सैन्य मुघलांसमोर कमकुवत ठरत होते आणि त्या युद्धात मराठा सेनापती हंबीराव मोहिते शहीद झाले, सेनापतीच्या मृत्यूनंतर सर्व सैनिक घाबरले. आणि त्याच काळात 1689 मध्ये संभाजी महाराज यांना मुघलांनी संघमेश्वर येथे ताब्यात घेतले.

संभाजी महाराजांचे कर्तृत्व

संभाजी महाराज हे एक शूर मराठा शासक होते ज्यांनी हिंदूंसाठी खूप योगदान दिले. वडिलांच्या स्वप्नाला सत्यात उतरवायला त्यांनी खूप मेहनत घेतली. मुघलांना मराठ्यांशी लढण्यात गुंतवून ठेवून त्यांनी उत्तर भारतातील राज्यकर्त्यांना त्यांचे राज्य परत मिळवून शांतता प्रस्थापित करण्याची संधी दिली.

केवळ दक्षिण भारतातील हिंदूच नव्हे तर उत्तर भारतातील हिंदूही शूर मराठा शासक संभाजींचे कृतज्ञ आहेत. जर संभाजी महाराजांनी औरंगजेब आणि इतर मुघल शासकांसमोर शरणागती पत्करली असती किंवा तह केला असता तर पुढील दोन ते तीन वर्षात औरंगजेब किंवा इतर मुघल शासकांनी उत्तर भारतातील राज्ये परत मिळवली असती. पण त्यांनी तसे केले नाही आणि शेवटपर्यंत त्यांच्याशी लढा देत हिंदवी स्वराज्याला प्रस्थापित करत राहिले.

इतकेच नाही तर मुघलांच्या दबावाखाली हिंदूंवर जबरदस्ती करून त्यांना हिंदूतून मुस्लिम बनलेल्या बांधवांना संभाजी महाराजांनी स्वदेशी परतण्यास आणि धर्मांतर करण्यास मदत केली. खरे तर मुघलांनी त्यांच्या दबावाखाली अनेक हिंदू बांधवांचे मुस्लिम धर्मात धर्मांतर केले होते. पण शिवाजी महाराजांच्या काळापासून हिंदू पुन्हा मायदेशी येऊ लागले.

शिवाजी महाराजांच्या उत्तरार्धात त्यांचा मुलगा संभाजी यांनी वडिलांचे कार्य पुढे नेले आणि त्यांनी पुन्हा धर्मांतराचे काम करण्यासाठी एक वेगळा विभाग बनवला, जेणेकरून ते पुन्हा हिंदू धर्मात येतील.

buy Book of शिवाजी कोण होता + छत्रपती संभाजी महाराज


संभाजी महाराजांना कैद करून त्यांच्यावर अत्याचार केले

1689 पर्यंत परिस्थिती बदलली होती. इतिहासकार असे सांगतात की फेब्रुवारी 1689 साली  संगमेश्वर येथील बैठक संपवून संभाजी महाराज राजगडावर जात असताना क्षत्रूच्या आगमनाची माहिती मराठा राजांना नव्हती. अशा स्थितीत मुकर्रब खानच्या अचानक हल्ल्यामुळे मुघल सैन्य आपल्या अफाट सैन्य बळाने संभाजी महाराज सह कवी कलशलाही ताब्यात घेतले. दोघांनाही तुरुंगात टाकण्यात आले आणि त्यांना वेदांच्या विरोधात इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडण्यात आले.


औरंगजेबाच्या कारकिर्दीचा अधिकृत इतिहासकार मासीर अंबारी आणि काही मराठा स्त्रोतांच्या मते, कैद्यांना साखळदंडाने बांधून अकलूजमध्ये असलेल्या औरंगजेबाच्या छावणीत नेण्यात आले. औरंगजेबने दोघांनाही अंधारकोठडीत टाकण्याचा आदेश दिला. औरंगजेब ने संभाजी महाराजांना सुचवले की जर त्याने आपले संपूर्ण राज्य आणि सर्व किल्ले व संपत्ती औरंगजेबाच्या स्वाधीन केले तर तो संभाजी महाराजांना आपल्या सेवेत रुजू करेल व त्यांचा जीव वाचवेल पण संभाजींनी त्यास नकार दिला. झुकेल तो मराठा कसला 'मोडेन पण वाकणार नाही' असा नारा देत संभाजी महाराजांनी त्यास नकार दिला.

औरंगजेबाने मराठा साम्राज्याचा राजा संभाजी महाराजांवर खूप अत्याचार केले सुमारे ४० दिवसांपर्यंत असह्य यातना सहन करूनही संभाजीराजांनी स्वराज्यनिष्ठा आणि धर्मनिष्ठा सोडली नाही. त्यांच्यावर चाबकाचे फटके दिले दिवस रात्र उपाशी व तहानलेल्या संभाजी राजांवर अनेक प्रकारे त्यांना यातना देत होते. संभाजी महाराजांची तेजस्वी नेत्रकमले काढण्यासाठी गरम गरम लोखंडी सळ्या त्यांच्या डोळ्यात खुपसल्या. कवि कलश यांचेही डोळे काढण्यात आले. एवढे करूनही संभाजी महाराज डगमगले नाहीत. कसे डगमगणार म्हणा वीर शिवाचा छावा होते संभाजी महाराज अश्या भूकट लांडग्यांना थोडेच घाबरणार होते. एवढे करूनही स्वराज्या प्रति त्यांची एकनिष्ठा कायम होती. इस्लाम धर्म स्विकार आणि आम्ही तुला जीवनदान देऊ पण ते झुकले नाहीत व भगवान शंकर यांचे नामस्मरण करू लागले त्यानंतर औरंगजेब च्या आदेशावरून त्यांची तलवारीने जीभ कापण्यात आली. पण जीभ कापूनही संभाजींच्या हृदयातून आणि मनातून देशभक्ती आणि देवभक्ती कधीच वेगळी करू शकत नाही हे औरंगजेब विसरला होता.

संभाजी महाराजांचा मृत्यू

संभाजी अजूनही हसत हसत शिवाची आराधना करत होता त्याचे दोन्ही हातही एक एक करून कापले गेले. आणि हे सर्व त्यांना हळूहळू छळण्यासाठी दररोज त्यांना मारण्यात येत होते. संभाजींच्या मनात अजूनही त्यांचे वडील वीर शिवाजी महाराज यांच्या आठवणी होत्या, ज्या त्यांना प्रत्येक क्षणाला या प्रतिकूल परिस्थितीचा सामना करण्यास प्रवृत्त करत होत्या. शेवटी 11 मार्च 1689 रोजी इंद्रायणी नदीच्या संगमावरील आळंदीजवळच्या तुळापूर येथे त्याचे शीर कापून त्यांची हत्या करण्यात आली. स्वराज्याचा धनी अनंतात विलीन झाला. एवढे अत्याचार करून सुद्धा मराठ्यांचा राजा झुकला नाही. याची सल औरंगजेबाला कायम राहिली. हत्या केल्यानंतर ही त्यांच्या देहाचे मराठ्यांवरही मुघलांचा प्रभाव पडावा म्हणून त्याचे छिन्नविच्छेदन केलेले शीर महाराष्ट्रातील गावांमध्ये चौकाचौकात लोकांसमोर ठेवण्यात आले. तर त्याच्या मृतदेहाचे छोटे तुकडे करून तुळापूरच्या कुत्र्यांना खाऊ घालण्यात आले. पण हे सर्व वीर मराठ्यांवर आपला प्रभाव पाडू शकले नाहीत. शेवटच्या क्षणापर्यंत शिवाचा जप करणाऱ्या शूर राजाच्या या बलिदानामुळे हिंदू मराठ्यांचा आपल्या राजाविषयी आदर वाढला आणि मुघलांबद्दलचा राग वाढला.

संभाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर राजाराम महाराज यांना गादीवर बसवण्यात आले. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांनी पेरून ठेवलेली स्वराज्याची शिकवण पुढेही मराठ्यांनी वाढवत नेली.

अशा स्वराज्यरक्षक वीर संभाजी महाराज यांना @Naadmarathi चा मानाचा मुजरा..!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Menu Site