Ad code

Latest

6/recent/ticker-posts

वाढत्या वीज बिलांमुळे कंटाळला असाल तर वापरा या ट्रिक, 50 टक्क्यांपर्यंत होईल बचत Reduce electricity bill

Electricity Bill: वीज बिल कमी करण्यासाठी खास उपाय

या महागाईच्या युगात वाढत्या वीजबिलाने सर्वजण चिंतेत आहेत, हिवाळ्यात वीज बिल कमी येते, तर उन्हाळ्यात वीज बिल जास्त येते. हिवाळ्यामध्ये जर बिल 1000 रुपये येत असेल तर तेच बिल उन्हाळ्यात सुमारे 3 ते 4 हजार येते. तर मित्रांनो सद्या उन्हाळा चालू असल्याने प्रत्येकजण घरामध्ये एसी, फ्रीज, कुलर, वॉशिंग मशिनच्या वाढत्या वापरामुळे आपण उन्हाळ्यात जास्त वीज वापरतो त्यामुळे वीज बिलही भरतो.  परंतु असे काही मार्ग आहेत ज्याचा तुम्ही उपयोग केल्यास तुम्ही तुमचे वीज बिल 30% ते 50% टक्क्यांपर्यंत कमी करू शकता.  चला त्या टिप्सबद्दल जाणून घेऊयात ज्याद्वारे तुम्ही या उन्हाळ्यात तुमचे वीज बिल कमी करू शकता.


जर तुम्हीही जास्त वीज बिलाने हैराण झाला असाल तर या छोट्या पद्धतींचा अवलंब करून तुम्ही वार्षिक हजारो रुपयांची बचत करू शकता.  सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या सुविधा कमी करण्याची गरज नाही.

वीज विभागातील कर्मचाऱ्यांचे असे म्हणणे आहे की वीज यंत्रांचा योग्य वापर केल्यास वीज बिलात कपात होऊ शकते. म्हणजेच वीज बिल कमी करण्यासाठी त्यांनी दिलेल्या उपाययोजना खालीलप्रमाणे आहेत.

वीज बिल कमी करण्यासाठी उपाय 

1) लाइट किंवा बल्बचा गैरवापर करू नका

गरज नसताना घरातील लाईटचा वापर करणे टाळा. असे केल्याने विजेची बचत होइल. वीज बचतीसाठी सर्वोत्तम पर्याय म्हणजे दिवसा फक्त नैसर्गिक प्रकाश वापरा. घरात असताना खिडक्या उघड्या ठेवून सूर्यप्रकाश आत येऊ द्या. तसेच खोलीत हलक्या शेडचे रंग लावल्याने घरात जास्त प्रकाश येतो आणि दिवे लावण्याची गरज कमी असते.

अनेक वेळा बल्ब, ट्यूब लाईट, सीएफएल इत्यादींमध्ये धूळ साचल्याने प्रकाश कमी येतो त्यामुळे वीज दिवे साफ करा. यासह, फिलामेंट बल्बऐवजी, 15 वॅटचा बल्ब म्हणजेच एलईडी वापरा.

2) एअर कण्डीशनर AC देखील सर्वाधिक वीज वापरतो-

उन्हाळ्याबद्दल बोलायचे झाले तर घरातील विजेचा सर्वात मोठा वापर हा एसी वर होतो. एसी हा लोकांच्या जीवनशैलीचा एक भाग बनला आहे, पण उन्हाळ्यात ac चा वापर जास्त असल्याने वीज बिल ही जास्तच येणार. पण AC वापरून ही वीज बिल कमी हवे असेल तर तुम्ही नॉर्मल एसी ऐवजी इन्व्हर्टर एसी वापरू शकता. इन्व्हर्टर एसीची खासियत म्हणजे त्यात दोन पीसीबी असतात, आउटडोअर देखील वेगळ्या पद्धतीने काम करते आणि विजेची बचत देखील करते.


एअर कंडिशनर (AC) द्वारे वापरलेली विद्युत उर्जा तापमानाच्या सेटिंगवर खूप अवलंबून असते.  त्यामुळे जर तुम्ही 18 डिग्री तापमानात एसी चालवलात तर तुमचा एसी 24-25 डिग्री तापमानात चालवण्याच्या तुलनेत तो खूप जास्त वीज वापरेल.

वीज बिल कमी करण्याचे व बचतीचे उपाय 

3) चार्जर काळजीपूर्वक वापरा

गरज नसल्यास मोबाईल, कॅमेरा, लॅपटॉप आणि इतर गोष्टींचे चार्जर अनप्लग करा. अनेक वेळा मोबाईल किंवा लॅपटॉप, mobile किंवा इतर वस्तू चार्ज केल्यानंतर आपण फक्त उपकरण बाहेर काढतो आणि चार्जर तसाच ठेवतो. चार्जर प्लगइन ठेवल्यास विजेचा वापर अधिक होतो आणि वीज बिलही अधिक येते. त्यामुळे चार्जर आवश्यक तेवढाच वापरा, उपकरणे चार्ज झाल्यावर चार्जेर काढून ठेवा. असे केल्याने तुम्ही हजारो रुपयांची बचत करू शकता.

4) वापरात नसताना उपकरणे बंद ठेवा

टीव्ही सारखी उपकरने जी रिमोटद्वारे चालवली जातात, जेव्हा आपण त्यांना रिमोटने बंद करतो, तेव्हा ते पूर्णपणे बंद न होता स्टँडबाय मोडवर जातात. हे स्टँडबाय कॉन्फिगरेशन सुमारे 5% उर्जा वापरते त्यामुळे आपले light bill जास्त येते. त्यामुळे जेव्हा तुम्‍ही डिव्‍हाइसचा दीर्घकाळ वापर करत नसाल, तेव्हा रिमोटवरून स्‍विच-ऑफ करण्‍याऐवजी मेन प्लग बंद करा.

5) सोलर पॅनलचा वापर करा

सोलर पॅनेलचा वापर करून तुम्ही तुमच्या घरातील विज बिल नक्कीच कमी करू शकता. कारण सौरऊर्जेचा वापर करून तुम्ही तुमच्या घरातील जवळपास सर्व काही चालवू शकता. सोलर पॅनल फक्त एकदा घरात बसवून, तुम्ही कोणत्याही खर्चाशिवाय वीज वापरू शकता.

सौर पॅनेल सूर्याच्या किरणांच्या मदतीने चार्ज होतो, फुल्ल चार्ज झाल्यावर  2 दिवस तरी तुमच्या घरातील विजेच्या गरजा पूर्ण करु शकता. सोलर पॅनल चा वापर केल्याने तुमचे वीज बिल नक्कीच खूप कमी प्रमाणात येईल.

6). घराच्या स्वयंपाकघरातील चिमणीचा कमी वापर करा.

घराच्या स्वयंपाकघरात जेवण करताना होणारी उष्णता व धूर बाहेर जाण्यासाठी अनेकदा आपण चिमणी बसवतो. पण त्यामुळे विजेचा खूप मोठया प्रमाणात वापर होतो. जर तुम्हाला वीज वाचवायची असेल, तर घरातील अशा चिमण्या हटवा. आणि त्याच्या जागी एक साधा पंखा लावू शकता, हा फॅन त्या चिमणी पेक्षा कमी ऊर्जा घेईल व आपले वीज बिल कमी प्रमाणात येईल.

7)  एलईडी बल्बचा वापर करा

तुमचे विजेचे बिल जास्त येत असल्यास, तुम्ही विजेचा वापर कमी करणारे एलईडी बल्ब चा वापर करू शकता. असे केल्याने तुम्हाला तुमच्या वीज बिलात मोठा फरक दिसेल. कारण पारंपारिक इनॅन्डेन्सेंट बल्ब व CFL बल्बपेक्षा LED बल्ब कमी ऊर्जा घेते, व प्रकाश खुप जास्त देते यामुळे विजेचा वापर कमी होईल.

काही महत्वाच्या टिप्स :-


तुमच्या घरात ISI सर्टिफिकेट असलेल्या विद्युत वायर आणि फिटिंग्ज वापरा. जुन्या, खराब वायरिंगमुळेही जास्त वीज वापरली जाते आणि त्यामुळे घरात आग लागण्याचाही धोका असतो. घरामधील विद्युत दुरुस्तीचे काम किंवा फिटिंगचे काम फक्त परवानाधारक  इलेक्ट्रिशियनकडूनच करून घ्या. घरात सर्वत्र ऊर्जा कार्यक्षम एलईडी दिवे वापरा.


या लेखात आम्ही सर्व नागरिकांना आणि वाचकांना light bill kami karnyache upay याबद्दल सांगितले आहे. ज्याचा वापर करून जास्त येणाऱ्या वीज बिलाच्या समस्येपासूनही सुटका होऊ शकते. आम्हाला आशा आहे की तुम्हाला हा लेख आवडला असेल, असेल तर तुम्ही या लेखाला तुमच्या social media प्लायफॉर्म वर share करा व आम्हाला कॉमेंट करून हा लेख कसा वाटला ते नक्की कळवा.


लक्ष द्या, वरील उपाय करूनही वीज बिल कमी होत नसेल तर तुमच्या वीज विभागाशी संपर्क साधा आणि मीटर बदलण्याची विनंती करा.  कारण, काही वेळा मीटरमधील बिघाडामुळेदेखी वीज बिल जास्त येते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Menu Site