Ad code

Latest

6/recent/ticker-posts

तानाजी मालुसरे आणि कोंढाणा किल्ला "गड आला पण सिंह गेला" Tanaji Malusare

तानाजी मालुसरे यांचे चरित्र tanaji malusare information in marathi


सुभेदार तानाजी मालुसरे मराठ्यांचा इतिहासात अजरामर झालेले नरवीर, मराठ्यांच्या स्वातंत्र्यलढ्यात तानाजींचा पराक्रम अतुलनीय आहे. त्यांच्या पराक्रमाचे पोवाडे गाताना आजही शाहिरांचे डफ गडाडतात आणि प्रतिभाषाली लेखकांच्या लेखणीला बळ मिळते. आज आपण तानाजी मालुसरे यांच्या वीरगाथेच्या पाऊलखुणा ऐतिहासिक दस्तऐवजातून शोधणार आहोत. तसे तानाजी मालुसरे यांचे गाव उमरठ पण कागदपत्रात त्यांचा उल्लेख गोडोलीचे पाटील म्हणूनही येतो, त्या भागात एक दंतकथा प्रचलित आहे की घरातील भाऊबंदकीमुळे आपल्या पतीच्या निधनानंतर तानाजींच्या मातोश्री गावाच्या बाहेरील गुहेत येऊन राहू लागल्या. त्यांनी मोठ्या जिद्दीने आपल्या मुलांचे संगोपन केले अर्थात या कथेत ऐतिहासिक पुरावा मात्र मिळत नाही स्वराज्य उभारणीच्या काळात तानाजी मालुसरे यांनी शिवाजी महाराजांना सुरुवातीपासून सोबत केलेली दिसून येते. समकालीन कागद पत्र आणि दस्तावेज यातील नोंदणीचा आपण आढावा घेऊन तानाजींची चरित्र कथा जाणून घेवूया.


सुभेदार तानाजी मालुसरे हे छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या मराठा साम्राज्यातील लष्करी नेते होते. 1670 मधील सिंहगडाच्या लढाईतील भूमिका आजही लोकांसाठी प्रेरणादायी ठरते, सिंहगड किंवा कोंढाणा म्हटलं की मनात सर्वात आधी नाव येत ते म्हणजे तानाजी मालुसरे. आपल्या भारतात एकापेक्षा एक शूर योद्धे होऊन गेले ज्यांनी आपल्या देशासाठी आपल्या मातृभूमीसाठी मोठमोठ्या लढाया लढल्या आणि भारताच्या इतिहासाच्या सुवर्ण पानात आपले नाव नोंदवले. आज आपण मराठा साम्राज्याची स्थापना करणारे महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे लष्करी नेते व परममित्र श्री तानाजी मालुसरे यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया तानाजी मालुसरे सारख्या शूर योद्ध्याबद्दल.

तानाजी मालुसरे यांचे प्रारंभिक जीवन Tanaji Malusare information in marathi

वीर योद्धा तानाजी मालुसरे यांचा जन्म इ.स. १६०० मध्ये महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील गोडोली या छोट्या गावात झाला. तानाजींचे वडील सरदार काळोजी आणि आई पार्वतीबाई हिंदू कोळी कुटुंबातील होते. तानाजींचे वडील शहाजी महाराजांच्या सेनेत होते त्यामुळे वडील सरदार होते म्हणून तानाजींनाही लहानपणापासूनच तलवारबाजीची आवड होती, त्यामुळेच लहानपणीच त्यांची आणि छत्रपती शिवाजींची भेट झाली आणि ते त्यांचे परममित्र झाले. 

तानाजी मालुसरे यांच्या शौर्याची दूरवर चर्चा झाली आणि त्यांच्या शौर्यामुळे त्यांना मराठा साम्राज्यात उच्च पदावर मुख्य सुभेदार म्हणून नियुक्त करण्यात आले. तानाजी मालुसरे आणि शिवाजी महाराजांची मैत्री लहानपणापासूनच इतकी घट्ट होती की युद्धात लढायचे झाले तरी दोघेही एकमेकांशिवाय कोणतेही काम करत नव्हते. सुभेदार तानाजी मालुसरे आपले वडील सरदार काळोजी आई पार्वतीबाई भाऊ सरदार सूर्याजी पत्नी सावित्री व मुलगा रायबा मालुसरे सोबत राहत असत.


नरवीर तानाजी मालुसरे यांचे मराठा साम्राज्यात महत्त्वपूर्ण योगदान :-


सुभेदार या नात्याने तानाजी मालूसरेंनी मराठा साम्राज्यात आपले महत्त्वाचे योगदान बजावून आपले समर्पण दाखवले आहे. देशातील परिस्थिती पाहता राजेंनीं व त्यांच्या बाल सवंगड्यांनी लहानपणीच देशाला संपूर्ण स्वराज्य बनवण्याचे व्रत घेतले होते त्यात नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांचाही समावेश होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका शब्दाला जपून त्यांनी कोंढाणा किल्ला जिंकून इतिहासाच्या पानांमध्ये महत्त्वाचे स्थान मिळाले.


कोंढाणा किल्ल्याचा इतिहास Subedar Tanaji Malusare


17 व्या शतकात मुघल आणि मराठा सैन्य भारताचा जास्तीत जास्त भाग ताब्यात घेण्यासाठी दोघांमध्ये युद्धे होत असत. त्यावेळी मराठा साम्राज्याच्या ताब्यात सुमारे 23 महत्त्वाचे आणि प्रचंड किल्ले होते. मुघल साम्राज्याला त्या सर्व किल्ल्यावर आपले वर्चस्व हवे होते. १६६५ मध्ये मुघल सैन्याचा राजपूत सेनापती जयसिंग याने शिवाजी महाराजांना पुरंदरच्या किल्ल्याला वेढा घातला. यानंतर मुघल सैन्याने पुरंदरचा तह झाला या करारानुसार शिवाजी महाराजांना पुरंदर, लोहगड, तुंग, तिकोना आणि कोंढाणा हे किल्ले मुघल साम्राज्याच्या स्वाधीन करायचे असा निर्णय घेण्यात आला.


या सर्व किल्ल्यांमध्ये कोंढाणा ( सिंहगड ) किल्ला सर्वात महत्वाचा होता. कोंढाणा किल्ला संपूर्ण पश्चिम विभागाची राजधानी म्हणून ओळखले जात असे. या किल्ल्यावर ज्याचे वर्चस्व असेल तो संपूर्ण पश्चिम प्रदेशावर राज्य करू शकत होता. म्हणून पुरंदरच्या तहात मुघलांनी कोंढाणा किल्ला आपल्या ताब्यात घेतला.

कोंढाणा किल्ला हा एक प्राचीन डोंगरी किल्ला आहे. सुभेदार तानाजी मालुसरे यांनी किल्ला जिंकल्यावर याचे नाव सिंहगड ठेवण्यात आले. सिंहगड हा ऐतिहासिक किल्ला महाराष्ट्र राज्यात पुणे शहरापासून 30 किलोमीटर अंतरावर नैऋत्य दिशेला आहे. असे म्हणतात की हा किल्ला सुमारे 2000 वर्षांपूर्वी बांधला गेला आहे.

कोंढाणा किल्ला Tanaji Malusare and the Battle of Sinhagad Fort

एकदा राष्ट्रमाता जिजाबाई लाल महालातून कोंढाणा किल्ल्याकडे पाहत होत्या तेव्हा शिवाजी महाराजांनी कसल्या विचारात आहात असे जिजाईंना विचारले. यावर माता जिजाबाई म्हणाल्या की, या गडावर फडकलेला हिरवा झेंडा आपल्या मनाला त्रासदायक ठरत आहे, या किल्ल्यावर पुन्हा एकदा आपला भगवा झेंडा फडकायला हवा असे सांगितले. खरंतर त्या वेळी कोंढाणा किल्ला पुन्हा मिळवणे अतिशय कठीण बाब होती परंतु जिजाईंच्या इच्छेखातर छत्रपती शिवाजी महाराजांनी कोंडाणा किल्ला पुन्हा आपल्या ताब्यात मिळवण्यासाठी योजना आखली. दुसऱ्या दिवशी बैठक बोलवून शिवाजी महाराजांनी सर्व सैनिकांना आपल्या दरबारात बोलावून कोंढाणा किल्ला जिंकण्यासाठीची योजना सांगितली.

त्यावेळी तानाजी मालुसरे यांच्या घरी मात्र वेगळीच तयारी सुरू होती. तानाजी मालुसरे यांच्या मुलाचे म्हणजेच रायबाचे लग्न होते त्यामुळे सर्वत्र लग्नाची तयारी सुरू होती सगळीकडे जल्लोषाचे वातावरण होते. तानाजी मालुसरे छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या कुटुंबियांना आपल्या मुलाच्या लग्नासाठी आमंत्रण देण्यासाठी गेले. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी कोंढाणा किल्ला मोगलांच्या ताब्यातून परत मिळविण्याची जबाबदारी तानाजी मालुसरे यांच्या खांद्यावर सोपवली.

इतकी मोठी जबाबदारी महाराजांनी आपल्या हाती सोपवलेले पाहून तानाजी यांना अतिशय आनंद झाला. त्यांनी कोणताही मागचा पुढचा विचार न करता, कोंढाणा किल्ला जिंकण्यासाठी तयार झाले त्यावेळी शेलार मामा तानाजी मालुसरे यांना म्हणाले आधी आपण रायबाच लगीन उरकून घेऊ आणि मग मोहिमेसाठी निघू. परंतु त्यावर लगेचच तानाजी मालुसरे म्हणाले "आधी लगीन कोंढाण्याचे मग माझ्या रायबाचे" तानाजी मालुसरे यांच्या वीर मुखातून बाहेर पडलेले हे शब्द इतिहासाच्या पानात सोनेरी अक्षरात लिहिले गेले.

कोडना किल्ल्याची रचना अशी होती की त्यावर हल्ला करणे सोपे नव्हते. किल्ल्याच्या आत जाण्यासाठी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागणार होता. ४ फेब्रुवारी १६७० रोजी कोंढाणा किल्ल्यावर चढाई करण्याचे ठरले, त्यावेळी किल्ल्यावर सुमारे 5000 हजार मुघल सैनिक होते. किल्ल्याची सुरक्षा उदयभान राठोड यांच्या हाती होती. उदयभान हा एक हिंदू शासक होता पण सत्तेच्या लालसेमुळे तो मुघलांच्या सोबत सामील झाला. सुभेदार तानाजी मालुसरे आपल्या 342 सैनिकांसह कोंढाण्याच्या पायथ्याला पोहोचले शिवाय यांच्यासोबत त्यांचे भाऊ व शेलार मामा होते रात्रीची वेळ होती त्यामुळे गड गाफील होता. 


गडाच्या पायथ्याशी पोचलो खरे पण गड चढायचा कसा हा प्रश्न सर्वांनाच होता, कारण इतर किल्ल्यापेक्षा कोंढाणा किल्ला सर करणे खूपच अवघड गोष्ट होती. गड सर करण्यासाठी मालूसरेंनी द्रोणागिरीचा कडा निवडला, असे म्हणतात की तानाजींनी आपल्या पाळीव घोरपडीच्या म्हणजेच यशवंतीच्या पोटाला रस्सी बांधून तिला वरती कड्यावर सोडले व त्या रस्सीच्या साहाय्याने कड्यावर चढण्यात यशस्वी झाले.

रात्रीच्या दाट अंधारात त्याने आपल्या सैनिकांसह कोंडाणा किल्ल्याला चारही बाजूंनी वेढा घातला आणि हळूहळू सर्व सैनिक राजवाड्यात शिरले. त्या किल्ल्याची रचना अशी होती की त्यात प्रवेश करणे कोणालाही अवघड होते. पण तानाजीच्या हुशार बुद्धिमत्तेच्या जोरावर त्याने आपल्या संपूर्ण सैन्यासह त्या किल्ल्यावर जोरदार हल्ला चढवला. त्याच्या हल्ल्याने मुघल सैनिकांना क्षणभरही समजण्याची संधी दिली नाही. हा हल्ला कुठून झाला कोणी केला हे समजण्याआधीच मराठा सैन्य मुघल सैन्यावर पूर्णपणे तुटून पडले.

पुण्याच्या दिशेने उघडणाऱ्या दरवाजावर आपले सैन्य असेल म्हणून आधी त्या दिशेने जाऊन त्यांनी पहारेकऱ्यांवर हल्ला चढविला आणि त्यांना संपवत मुख्य दरवाजाकडे जाऊ लागले. गडावर असणाऱ्या सैनिकांना हा हल्ला अनपेक्षित होता. या हल्ल्याने फौज जागी झाली. उदयभान ला तानाजी ने कोंढाणा किल्ल्यावर हल्ला केला आहे हे समजताच वेळ वाया न घालवता आपल्या सैन्याला सावध केले. त्यावेळी सिद्दी हलाल हा गडाचा सरनोबत होता, तानाजी आणि सिद्दी हलाल यांच्यात तुंबळ युद्ध पेटले आणि तानाजिंनी सिद्दी हलाल ला आडवा पाडला.

सुर्याजीच्या नेतृत्वात इतर मराठा सैन्य कल्याण दरवाज्याजवळ दरवाजा उघडण्याची प्रतीक्षा करीत होते, मुघल सैन्याचा सामना करत करत तानाजी कल्याण दरवाज्याकडे सरकत होते. परंतु त्याक्षणीच उदयभानने तानाजींवर हल्ला केला, उदयभान हा बलाढय आणि क्रूर होता. उदयभान एका राक्षसासारखा तानाजीवर तुटून पडत होता तानाजी देखील त्याच्या प्रत्येक हल्ल्याला उलट वार देत होते. उदयभान च्या जोरदार हल्ल्याने तानाजींच्या हातातील ढाल तुटून पडली, तेव्हा तानाजींनी आपल्या डोक्यावरचा फेटा आपल्या डाव्या हातावर बांधून तलवारीचे वार त्यांच्या हातावर घेतले आणि एका हाताने त्यांनी तलवार चालविली. डाव्या हातावर घाव घेत उदयभानाला निपचित पाडूनच स्वतःचे प्राण तानाजींनी सोडले. मात्र त्यांच्यामागुन 'सूर्याजी मालुसरे' आणि 'शेलारमामा' यांनी नेतृत्व करून हा किल्ला काबीज केला. ही घटना ४ फेब्रुवारी, १६७० रोजी घडली.

मृत्यूला सामोरं जातांना सुद्धा तानाजी मालूसरेंनी असंख्य शत्रूंना यमसदनी धाडले व आपल्या मराठा सैन्याला वाट मोकळी करून दिली. तानाजींना पडतांना पाहून ८० वर्षाच्या शेलारमामांनी आपले धैर्य खचू न देता नेतृत्वाची कमान आपल्या हाती घेतली, शत्रूशी लढता लढता कल्याण दरवाज्याजवळ पोहोचत तेथील पहारेकऱ्यांना कापून काढले आणि आपल्या सैन्याकरता त्यांनी तो दरवाजा उघडला.

तानाजी धारातीर्थी पडले हि वार्ता आपल्या सैन्याचा धीर खचू नये याकरता शेलारमामांनी मुद्दाम ही बातमी लपविली. त्यानंतर सूर्याजीने मोगलांचा खात्मा करून कोंढाणा किल्ला ताब्यात घेतला. किल्ला जिंकल्यावर तेथेच असलेल्या गवताच्या गंजी पेटवून सुर्याजींनी पाच तोफांची सलामी दिली. या धडाडत्या तोफा महाराजांच्या कानावर पडल्या आणि गड जिंकल्याचा संकेत मिळाला. अवघ्या एका रात्रीत मराठा सैन्याने कोंढाणा हे स्वराज्याचे मूल्यवान रत्न आपल्या ताब्यात मिळवलं.

देशभरात उत्साह पसरला जेव्हा तानाजींच्या मृत्यूची बाब शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचली तेव्हा ते खूपच दुःखी झाले, ते मोठ्याने म्हणाले "गड आला पण सिंह गेला"

तानाजींच्या स्मरणार्थ त्या किल्ल्याला सिंहगडचा किल्ला म्हणून मान्यता मिळाली. तानाजींच्या शौर्याला त्यांचे बंधू सूर्याजी आणि शेलार मामा यांनी साथ दिली आणि त्यांच्या शौर्याने इतिहासाच्या सुवर्ण पानांमध्येही ते उजळले. कोंढाणा किल्ल्याची ही लढाई जिंकण्यासाठी तानाजीने 5000 मुघल सैनिकांमागे केवळ 342 सैनिक निवडले, ज्यांनी आपले शौर्य दाखवून आपल्या विजयाचा झेंडा फडकवला.

मराठा साम्राज्याचे शूर सैनिक नेहमीच देशासाठी आपले महत्त्वपूर्ण योगदान देत आले आहेत, तानाजी मलेसुर हे त्यापैकी एक होते. तानाजीच्या या शौर्याचे कौतुक करून, शिवाजी महाराजांनी पुणे आणि त्याच्या आसपासच्या भागात त्यांची अनेक प्रतिष्ठा प्रस्थापित केली. जी आजही इतिहासाची सोनेरी पाने उजळून टाकते आणि तिथे राहणाऱ्या लोकांना अभिमानाने आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार देते. तानाजीच्या विजयानंतर पुण्यातील 'वाकडेवाडी' या ठिकाणाचे नामकरण 'नरवीर तानाजी' असे करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली.


असे होते आपले वीर सुभेदार तानाजी मालुसरे ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन कोंढाणा किल्ला जिंकून आपले देश प्रेम व स्वामी निष्ठा दाखवली. असे अनेक वीर मराठी मावळे होते ज्यांनी हिंदू राष्ट्र साठी मुघलांशी लढा दिला व मराठा साम्राज्य प्रस्थापित केले. अश्या अनेक मावळ्यांची व शूर वीरांची माहिती साठी नादमराठी.इन ला भेट द्या.

हर हर महादेव

यात दिलेल्या tanaji malusare information in marathi माहितीमध्ये काही चुकीचे आढळल्यास आपण तत्काळ आम्हाला comment box आणि email लिहून कळवावे तुम्ही दिलेली माहिती योग्य असल्यास आम्ही त्यामध्ये नक्की बदल करू. मित्रानो जर Subhedar Tanaji Malusare Yanchi Mahiti बद्दल तुमच्याकडे अधिक माहिती असेल तर आम्हाला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा. तुम्हाला ही पोस्ट information about tanaji malusare in marathi माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्र मंडळींमध्ये tanaji malusare village name Share करायला विसरू नका धन्यवाद अधिक माहितीसाठी naadmarathi.in ला भेट द्या.
धन्यवाद

जय शिवराय

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Menu Site