Ad code

Latest

6/recent/ticker-posts

शिवबाचे शिलेदार सरनोबत नेतोजी पालकर यांची माहिती Netaji Palkar information

नेताजी पालकर यांची संपूर्ण माहिती Netaji Palkar Information In Marathi


Netaji Palkar प्रति शिवाजी ( Prati Shivaji ) नेताजी पालकर हे मराठी इतिहासातील खूपच महत्वाचे व्यक्तिमत्व आहे. अतिशय शूर आणि धोरणी असल्यामुळे त्यांना प्रतिशिवाजी म्हणजे दुसरे शिवाजी असे सुद्धा म्हटले जाते.


नेतोजी पालकर Netaji Palakar information in marathi

नेताजी पालकर यांनी अनेक युद्धे गाजवली अफजल खानच्या वधाच्या वेळी अफजल खानाच्या सैन्याला हुसकावून लावण्यात नेताजींचा सिंहाचा वाटा होता. नेताजी पालकर किंवा नेतोजी ( महाराज व मावळे त्यांना नेतोजी म्हणायचे ) यांचे विचार आणि रणनीती शिवाजी महाराजांसारखीच होती.

 शिवाजी महाराज नेताजी पालकर यांना स्वतःची प्रतिकृती समजायचे, त्यांच्या रणनिती, युद्ध कौशल्य पाहून मराठा लोकंच नाही तर मोगलदेखील नेताजी पालकर यांना प्रति शिवाजी महाराज म्हणायला लागले. 


नेताजी पालकरांचे कर्तृत्व असे होते की खुद्द महाराजांनी अफझलच्या भेटीच्यावेळी, स्वतःला काही दगाफटका झाल्यास, पुढे नेतोजींच्या नेतृत्वात आणि जिजाऊसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली 'स्वराज्याचा लढा पुढे चालवण्याचे आदेश दिले होते. 

नेताजी पालकर हे छत्रपती शिवाजी महाराजांचे दीर्घकाळ असलेले सेनापती होते. पण हेच छत्रपती शिवरायांना प्रिय असणारे नेतोजी पालकर यांचा मोघलांचा कुलीखान कसा झाला, हे एक रहस्यच आहे.


अफझलखानाच्या वधानंतर नेतोजींनी थेट विजापूरावरच आक्रमण केले होते. पुढे महाराजांना साथ देत पन्हाळगड मिळवणे, रुस्तम-ए-जमा चा मैदानी युद्धात सपाटून पराभव करणे, शाहिस्तेखानाच्या छाप्यानंतर महाराजांना सुरक्षित राजगडावर आणणे अशा अनेक मोहिमांत मोलाच्या भूमिका नेतोजींनी बजावल्या होत्या.


जेव्हा महाराज पन्हाळगडावर अडकले होते, गडाच्या पायथ्याशी सिद्दी जौहरने संपूर्ण चारही बाजूंनी वेढा दिलेला होता, तेव्हा नेतोजी पालकर दक्षिणेच्या मोहिमेवर होते. जेव्हा त्यांना हे समजले की महाराज असलेल्या पन्हाळ गडावर सिद्धीने वेढा घातलाय तेव्हा आदिलशहाचे लक्ष विचलित करून सिद्दीला परत बोलवायचे त्यांनी प्रयत्न केले होते पण त्यांचे प्रयत्न फसले. 

आदिलशाहाच्या मनात भीती भरवण्याचा प्रयत्न केला की नेताजी पालकर विजापूर काबीज करायला आले आहेत. त्यांच्या या हल्ल्याने आदिलशहा विचलित झाला खरा, पण कदाचित त्याला नेताजी पालकरांचा मनसुबा कळला असावा. म्हणून त्याने सिद्दीला न बोलावता, खवासखानाला पाच हजार सैन्यासह नेताजी पालकर व त्यांच्या सैन्यावर चाल करायला पाठवले. दक्षिणेच्या मोहिमेत पालकरांच सैन्य थकलं होते म्हणून नेतोजींचा येथे पराभव झाला.


पुरंदरच्या तहानंतर त्यांना संभाजी महाराजांच्या वतीने मुघलांची मनसबदारी निभवावी लागली होती. पुरंदर च्या तहानंतर राजांनी औरंगजेब यांच्या भेटीसाठी आग्र्याला जावं लागत होतं, तेव्हा राजे व नेतोजी यांच्यामध्ये चर्चा झाली या चर्चेनंतर, कुठेतरी शिवाजी महाराज आणि नेतोजी यांत वैरमनस्य झाले अशी बातमी गडाबाहेर पसरली. बरेचसे गनिमी सरदार या बतमीनंतर नेतोजींना त्याच्यात सामील करून घेण्यासाठी ते प्रयत्न करू लागले होते. 

एके दिवशी राजे प्रतापगड मोहिमेवर असताना, नेतोजींना काही निवडक सैन्यांसोबत यायचे होते, परंतु नेतोजी जेव्हा पोहोचलो तेव्हा वेळ हाताबाहेर गेली होती, महाराज युद्ध हरले होते. या नंतर दोघांमध्ये वाद झाले ( वाद नाही म्हणता येणार दोघांमध्ये बोलणे झाले) यानंतर राजांनी त्यांना बडतर्फ केले. हि गोष्ट आता वणव्या सारखी पसरली. यानंतर नेतोजी पालकर आदिलशहा शी मिळाले ( असे म्हणतात ही एक योजना होती महाराजांची आणि नेतोजींची ).

अलीआदिलशहा च्या सेनेमध्ये सामील झाल्यावर त्याने नेतोजींना राजगड जिंकण्याचा हुकूम दिला, पण राजगडावर आक्रमण करण्याअगोदर महाराज तिथून निसटले होते. शिवाजी राजेंना पळवून लावण्यात मिर्जा जयसिंग यांनी मदत केली असं समजून आदिलशहा ने त्याला विष पाजून त्याची हत्या केली. आता त्याची नजर नेतोजींवर होती, शिवाजी सुटला आता दुसरा शिवाजी सुटु नये, म्हणून त्याने नेतोजींनी कैद करून घेतले. 

त्याच्यावर दबाव आणण्यासाठी नेतोजींची चुलते यांना अटक करून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्यांचे अतोनात हाल करून पिळदार मिशा काढून टाकण्यात आल्या. दि.२७ मार्च १६६७ रोजी, एका मुल्लाला बोलावून नेतोजींचे जबरदस्तीने धर्मांतर करून त्यांना मुस्लीम बनवलं गेलं. त्यांचे नाव महंमद कुलीखान असे ठेवण्यात आले.

'प्रति शिवाजी' म्हणवल्या गेलेल्या नेतोजींचा प्रवासदेखील छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणेच अनेक वादळांनी भरलेला होता.


नेतोजी पालकर यांचा जन्म Netaji palkar:


नेताजी मूळचे पुणे जिल्ह्यातील शिरुर गावचे. नेताजी पालकर यांचा जन्म रायगड जिल्ह्यातील चौक गावी झाला. नेतोजी जन्माने हिंदू होते. याव्यतिरिक्त असे म्हणतात की नेताजी पालकर हे नात्याने शिवाजी महाराजांची पत्नी पुतळाबाई पालकर भोसले यांचे काका होते. नेताजी 1657 साली हिंदवी स्वराज्याचे दुसरे सरनौबत झाले ते खूपच पराक्रमी होते. नेताजी पालकर हे दीर्घ काळ श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्य सरनौबत होते.

नेताजी पालकरांचा मुस्लिम जातीमध्ये धर्मांतर :

श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा आग्र्‍याहून औरंगजेबाच्या कैदेतून सुटण्यात यशस्वी झाले, तेव्हा शिवाजी सुटला आत्ता प्रतिशिवाजी सुटू नये या विचाराने औरंगजेबान दिनांक 24 ऑक्टोबर 1666 रोजी मिर्झाराजे जयसिंह यांनी नेताजी आणि त्यांचे चुलते कोंडाजी यांना अटक केली.


चार दिवसांच्या अतोनात हाल केल्यानंतर दिनांक 27 मार्च 1667 रोजी नेताजी यांचे जबरदस्तीने धर्मांतर केले गेले. त्यांचे नाव बदलून मुहम्मद कुलीखान असे करण्यात आले. त्यानंतर औरंगजेबाच्या हुकुमाप्रमाणे नेताजी 9 वर्ष्यासाठी काबूल कंदाहाराच्या मोहिमेवर रवाना झाले. 

पण लाहोर जवळ आल्यावर त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण त्यात ते अपयशी ठरले. त्यानंतर कंधार आणि काबूलच्या रणांगणावर त्यांनी मुघलांसाठी बंडखोर पठाणांशी लढा दिला. अशा प्रकारे त्याला औरंगजेबाचा सद्भावना प्राप्त झाला आणि त्याला शिवाजी महाराजांचा प्रदेश जिंकण्यासाठी कमांडर दिलर खानसह दख्खनला पाठवण्यात आले.

तथापि, महाराष्ट्रात प्रवेश केल्यावर, नेताजी महाराजांच्या सैन्यात सामील झाले आणि रायगडावर गेले. अशाप्रकारे, मुघलांच्या कैदेत एक दशकानंतर, नेताजी महाराजांच्या दरबारात हजर झाले आणि त्यांना पुन्हा हिंदूं धर्मात यायची शिवाजी महाराज यांच्याकडे विनंती केली.


नेतोजी पालकर यांचे पुन्हा हिंदू धर्मामध्ये धर्मांतर :


नेताजी पालकर हे शिवाजी महाराजांचे निष्ठावंत सेनापती होते. पण त्यांच्या मर्जी विरुद्ध त्यांचे सक्तीने मुस्लिम धर्मात धर्मांतर करण्यात आले. औरंगजेबाचे नेताजींना अफगाणिस्तानात पाठवले, नेताजींचे नाव बदलले. पण मन त्यांचे मन बदलु शकत नव्हते धर्म बदलला पण राजांवरील निष्ठा, आपल्या मातृभूमी वरील प्रेम अखंड होत. 

राजाकडे परत यावे यासाठी नेताजींनी अनेक वेळा पळून येण्याचा प्रयत्न केला. पण ते अपयशी ठरले मुघल सेनेने त्यांना पळून जाताना पकडले व त्यांची पाठ फुटेपर्यंत त्यांना मारण्यात आले. पण एके दिवशी नेताजी पालकर राजांकडे आले आणि प्रेमाने ते राजांना कडाडून भेटले. नेतोजी यांनी महाराजांकडे स्वधर्मात येण्याची इच्छा व्यक्त केली.  पण जेव्हा ब्राह्मनांना हे समजले तेव्हा त्यांनी नेताजींना स्वधर्मात येण्यास कडाडून विरोध केला पण राजांनी 19 जून 1676 रोजी श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना पुन्हा विधीवत करून हिंदू धर्मामध्ये घेतले.

नेताजी पालकर यांचे लष्करी कारकीर्द

1657 मध्ये माणकोजी दहातोंडे यांच्या मृत्यूनंतर नेतोजी पालकर यांना शिवरायांच्या सेनेचे सरनौबत करण्यात आले. 1645 ते 1665 या काळात शिवाजीच्या उदयाच्या काळात नेताजींना अनेक मोहिमांची जबाबदारी देण्यात आली होती ज्या त्यांनी यशस्वीपणे पूर्ण केल्या. 

इ. स.१६५० साली घोडदळाच्या १ ल्या सरनौबत पदी महाराजांनी "नेतोजीराव पालकर" यांची नियुक्ती केली. पुढे इ. स.१६६६ पर्यंत १६ वर्षे नेताजीराव सरनौबत पदावर होते. महाराजांच्या मृत्यनंतर ते संभाजी महाराज यांच्या सेवेत देखील रुजू होते.

नेताजी पालकर मृत्यू व समाधी :


नेताजी पालकर हे अत्यंत पराक्रमी होते. लोक त्यांना प्रतिशिवाजी असेही म्हणत असत. सरसेनापती सरनोबत हे सैन्याचे सर्वोच्च पदे नेताजींकडे होती. तसेच स्वराज्य निर्मितीतही नेताजींचा सिंहाचा वाटा होता. अशा शूरवीर सेनानीचा मृत्यू अल्पशा आजाराने शिवरायांचा मृत्यू नंतर अवघ्या एकाच वर्षात म्हणजे 1681 साली हदगाव तालुक्यात जिल्हा नांदेड येथे झाला.


नेतोजी पालकर यांची समाधी तामसा गावातील तालुका हदगाव जिल्हा नांदेड ठिकाणी असून ती एका मुस्लिमांच्या शेतात आहे.

महाराज व नेताजी यांचे नाते संबंध:
महाराज व नेताजी नातलग आहेत असे उल्लेख मोगली अखबारातून मिळतो. महाराजांची पत्नी पुतळाबाई राणी साहेब यांचे माहेर पालकर घराण्यातले आहे. महाराजांची एक राजकन्या कमलाबाई हिचे लग्न जानोजी पालकरांशी झाले. छावा नुसार नेताजी पालकर शिवरायांच्या महाराणी सगुणाबाई यांचे सख्खे काका होते.

तुम्हाला आमची ही माहिती सरनोबत नेताजी पालकर यांच्या जीवनाविषयीची थोडक्यात माहिती कशी वाटली, ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व ही माहिती तुमच्या प्रियजांना नक्कीच share करा धन्यवाद.

जय शिवराय

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Menu Site