Ad code

Latest

6/recent/ticker-posts

बाजी प्रभू देशपांडे चरित्र - Biography of Baji Prabhu Deshpande in Marathi

बाजी प्रभू देशपांडे चरित्र - Biography of Baji Prabhu Deshpande in Marathi


शूर वीर बाजी प्रभू देशपांडे


Baji prabhu Deshpande : बाजी प्रभू देशपांडे हे मराठा साम्राज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे एक प्रमुख सेनापती होते. महाराजांना पन्हाळा किल्ल्यावरून चारही बाजुंनी पहारा ठेवलेल्या मुघल सैनिकांना मात देऊन सुखरूप निसटता यावे यासाठी बाजी प्रभू देशपांडे यांची एक महत्त्वाची भूमिका आहे. स्वराज्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणारे ते वीर योद्धा होते तसेच ते शिवाजी महाराजांचे खरे भक्त व हिंदवी स्वराज्याचे स्वप्न मनाशी बाळगणारे मावळे होते.


कोणताही मराठी माणूस व खरा हिंदूसाठी तसेच जगातील प्रत्येकासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाचा अभ्यास थक्क करणारा आहे. 17 व्या शतकात हिंदुस्थानात एक महान आणि शूर योद्धा होते जे अनेक मार्गांनी जेहादी-दहशतवादाचा सामना करण्यासाठी अग्रभागी धावत होते ते म्हणजे श्री छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू धर्मावर संकट बनून आलेल्या मुघल सैन्याला पराभूत करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, पण हे त्यांना एकट्याला शक्य झालं असत का तर हे शक्य झालं त्यांच्या दृढ निश्चयाने व त्यांच्या सोबत असणाऱ्या वीर व एकनिष्ठ असणाऱ्या मावळ्यांमुळे.

शिवाजी महाराजांच्या सैन्यात असे अनेक वीर व साहसी योद्धे होते, ज्यांनी स्वराज्य रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. ज्यांनी त्यांच्या नेत्याच्या म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदेशाला आणि त्यांच्या स्वप्नाला म्हणजे हिंदवी स्वराज (हिंदू राज्य) स्थापनेच्या स्वप्नाला इतर सर्व गोष्टींपेक्षा जास्त महत्त्व दिले होते, आणि ते स्वप्न सत्य करण्यासाठी त्याच्या सेनेमध्ये समाविष्ट होते. त्यांना स्वतःच्या जीवपेक्षा हिंदु राष्ट्राची स्थापना महत्वाची होती. असाच एक विलक्षण वीर व साहसी योद्धा म्हणजे थोर बाजी प्रभू देशपांडे, हे एक शूर होते ज्यानी आपले राजे छत्रपती शिवाजी महाराजांचे प्राण वाचवण्यासाठी निःस्वार्थपणे आपल्या प्राणांची आहुती दिली.


वीर बाजी प्रभू देशपांडे माहिती Baji Prabhu Deshpande introduction

बाजीप्रभू देशपांडे यांचा जन्म चंद्रसैन्य कायस्थ प्रभू या शास्त्री घराण्यात झाला. बाजींचे वडील हृदुस हे मावळचे कुलकर्णी होते ( शिवकाळात कुलकर्णी म्हणजे एक पद होते), लहानपणापासूनच बाजीप्रभू देशपांडे यांच्यात युद्ध कौशल्य होते. त्या काळात भारतात मुघलशाही असल्याने भारतातील प्रत्येक नागरिक खासकरून हिंदू मुघलांच्या जुलूमशाहीने त्रस्त होते. बाजीप्रभू देशपांडे यांना आपल्या देशाची सेवा करायची होती आणि मुघलांच्या अन्यायातुन मुक्ती मिळवायची होती. त्यांचे हे स्वप्न साकार करण्याची संधी शिवाजी महाराजांच्या उदयाने दिली.


छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात येण्यापूर्वी त्यांनी भोरजवळील रोहिडा येथील कृष्णाजी बांदल यांच्या हाताखाली काम केले. शिवाजी महाराजांनी रोहिडा येथे कृष्णाजीचा पराभव करून किल्ला काबीज केल्यानंतर बाजीप्रभूंसह अनेक सेनापती छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये सामील झाले. शिवाजी महाराजांना बाजीप्रभू देशपांडे यांच्यात मातृभूमीवर असलेले प्रखर प्रेम दिसून आले, म्हणून बाजीप्रभूंना कोल्हापूरच्या आसपास दक्षिण महाराष्ट्राची लष्करी कमान सोपवण्यात ली.

 बाजी प्रभुंचे शौर्य पाहून शिवाजी महाराजांनी त्यांना आपल्या सैन्यात उच्च पदावर बसवले. इ.स 1648 ते 1649 पर्यंत त्यांनी महाराजांची बाजू घेतली आणि पुरंदर, कोंढाणा आणि राजापूर हे किल्ले जिंकण्यास मदत केली. बाजी प्रभूंनी रोहिडा किल्ला मजबूत केला त्यासोबतच आजूबाजूला असणारे इतर किल्लेही मजबूत केले. त्यामुळे वीर बाजी प्रभू हे मावळ्यांचे जबरदस्त आणि आवडते सेनापती मानले जात होते. इ.स. १६५५ मध्ये जावळीच्या पुढ्यात बाजीने अथक परिश्रम घेतले आणि दीड वर्षात मावळ्यांचा किल्ला जिंकून किल्ल्यांची डागडुजी केली.

बाजीप्रभू देशपांडे यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली जेव्हा भयभीत सेनापती अफझलखानाला आदिलशाही राजाने शिवाजी महाराजांना ठार मारण्यासाठी आणि नवोदित मराठा राज्याचा नाश करण्यासाठी पाठवले होते. बाजीप्रभू देशपांडे यांनी आपल्यासोबत काही निवडक मराठा योद्धे आणले ज्यात विसाजी मुरांबक यांचा समावेश होता विसाजी मुरंबाक अफझलखानासारखा उंच आणि जाड बांधा असलेला होता. शिवाजी महाराजांनी अफझलखानासोबत द्वंद्वयुद्धाचा सराव विसाजीचा साथीदार म्हणून केला. १० नोव्हेंबर १६५९ रोजी अफझलखानाच्या मृत्यूनंतर बाजी प्रभूंनी जंगलात छावणी करून बसलेल्या आदिलशाही सैन्याचेही मोठ्या कौशल्याने पराभूत केले आणि शिवाजी महाराजांला स्वराज्य विस्तारात मदत केली.


शिवा काशीदचे बलिदान  Shiva Kashid

अफझलखानाच्या वधानंतर छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांनी आदिलशहाच्या बलाढ्य सैन्यावर कहर निर्माण केला आणि त्यांच्या क्रूर गनिम युद्धनीतीने त्यांनाच अथक त्रास दिला. आपल्या तल्लख बुद्धिमत्तेच्या पाठिंब्याने महाराज व त्यांच्या वीर मावळ्यांनी मुघल दहशतवादाचा सामना करत त्या सर्व पीडित हिंदू निरपराधांना व मुस्लिम बांधवांना मदत करत होते. याच दिवसांत शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे पन्हाळा किल्ल्यावर असताना, आदिलशहाच्या जेहादी सैन्याला हे कळले आणि त्यांनी ताबडतोब सेनापती सिद्दी जोहरच्या नेतृत्वाखाली किल्ल्याला चारही बाजूंनी वेढा घातला. हा वेढा अनेक महिने चालला आणि सिद्दी जोहर पन्हाळा किल्ल्यातील जीवनावश्यक साहित्य तोडण्यात व किल्ल्याचे नुकसान करण्यात, आणि त्याद्वारे शिवाजी महाराजांना पकडण्यात यशस्वी होत जात होता. शिवाजी महाराजांना यातून स्वतःला व साथीदारांना सुखरूप व लवकर बाहेर पडायचे होते पण कोणताही मार्ग दिसत नव्हता.

शिवाजी महाराजांचे सेनापती नेताजी पालकरांनी बाहेरून वेढा तोडण्याचा वारंवार प्रयत्न केला पण त्यांचे प्रयत्न निष्फळ गेले. त्यानंतर शिवाजी महाराजांनी मुघल सैनिकांशी अंतिम लढाई देण्याचे ठरवले. पण या आत्मघातकी हल्ल्याऐवजी त्यांनी वेगळी रणनीती अवलंबली. शेवटी एक जोखमीची योजना अंमलात आणली गेली छत्रपती शिवाजी महाराज, बाजी प्रभू देशपांडे आणि आपल्या सैन्याच्या तुकडीसह रात्री वेढा तोडून विशाळगडावर जाण्याचा निर्णय घेतला. पण विजापुरी सैन्याची फसवणूक करने इतके सोपे दिसत नव्हते कारण किल्ल्याला चारही बाजूने विजापुरी सैन्याने घेरले होते, आणि असे असताना तिथून साहजिकच सुटणे खूपच कठीण होते. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी वेढा तोडल्याचे निश्चितच कळणार होते पाठलाग करून ते शिवाजी महाराजांना पकडू शकले असते. म्हणून हे टाळण्यासाठी व छञपती शिवाजी महाराजांना व मावळ्यांना सुखरूपपणे बाहेर पडता यावे यासाठी एक युक्ती लढवण्यात आली ती म्हणजे शिवा काशीद हा व्यवसायाने न्हावी असणारा मावळा याचे शिवाजी महाराजांशी विलक्षण शारीरिक साम्य असलेला, व महाराजांसारखा दिसणारा वीर स्वईच्छेने राजासारखी वेशभूषा करून मुघलांच्या स्वाधीन होऊन त्यांचे लक्ष वेधून घेऊ यासाठी तयार झाला, त्याला स्वताच्या मरणाचीही भीती वाटत नव्हती ठरल्या प्रमाणे सर्व तयार झाले.

सर्वप्रथम, शिवाजी महाराजांनी आपला वकील गोपीनाथपंत बोकील यांना सिद्दी जौहरकडे पाठवले आणि असा संदेश पाठवला की आपण त्याच्याशी करार करण्यास तयार आहोत. सिद्दी जौहर आणि त्याच्या सैन्याला यामुळे थोडासा आराम वाटू लागला, कारण त्यांनी अनेक महिने पन्हाळ गडावर असलेला वेढा संपणार आहे. तरीही सुमारे 10000 आदिलशाही सैनिकांच्या वेढ्यातून बाहेर पडणे अशक्य वाटत होते.

एका वादळी पौर्णिमेच्या रात्री योजनेनुसार बाजी प्रभू आणि शिवाजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली 600 निवडक मावळ्यांची तुकडी निघाली. हे 600 सैनिक दोन गटात विभागले गेले. एक म्हणजे शिवाजी महाराजांशी साम्य असलेला मावळा शिवा काशीद याने नेतृत्व केले, आणि दुसऱ्या तुकडीचे नेतृत्व शिवाजी महाराजांनी केले आणि या गटात शूर बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांचे भाऊ फुलाजी व बांदलचे रायाजी व इतर शूर मराठ्यांचाही समावेश होता.

योजनेनुसार शिवा काशीदने स्वतःला विजापुरी सैनिकांकडून पकडवले आणि विजापुरी छावणीत त्याला शिवाजी महाराज म्हणून परत नेले. याचा मोठा फायदा दुसऱ्या तुकडीला झाला या चकमकीने जाणाऱ्या मराठा सैन्याला काही काळ तिथून लांब जाण्यास मदत केली. सिद्धी जोहरचा हे लक्षात यायला वेळ नाही लागला की ज्याला शिवाजी महाराज म्हणून पकडून आणले आहे, ते खरे छत्रपती महाराज नव्हे तर त्यांच्यासारखाच दिसनारा दुसरा इसम आहे. तेव्हा त्याने रागाच्या भरात शिवा काशीदची तलवारीने हत्या केली. पण मारताना ही शिवा काशीदची चेऱ्यावर एक तेज होत समाधान होत, की त्याने आपल्या प्राणांची आहुती देऊन आपल्या लाडक्या राजाला संकटातून बाहेर काढण्याचे सुख त्याच्या चेहऱ्यावर होत. त्यानंतर सिद्धी जोहरचा जावई सिद्धी मसूद याच्या नेतृत्वाखाली पुन्हा शिवाजी महाराजांचा व मराठा सैन्याचा पाठलाग सुरू केला.

पावनखिंडीची लढाई आणि बाजी प्रभू देशपांडे

5000 हून अधिक मजबूत जिहादी मुगल सैन्याने शिवाजी महाराजांचा पाठलाग सुरू केला, शिवाजी महाराज बाजी प्रभू आणि बांदल सैन्य पन्हाळा गडावरून विशाळगड कडे लागबघिने जात होते. पन्हाळा ते विशालगड एकूण अंतर 65 किलोमीटर पेक्षाही जास्त असेल ते सर्व हे अंतर रात्री व पायी करत होते, कारण घोड्यांवरून जाताना घोड्यांच्या पावलांच्या आवाजाने गणिमांना त्यांचा माग लागला असता. सर्वच मावळे खूप थकले होते त्यांनी या प्रवासात ना काही खाल्ले होते ना आराम केला होता, बाजीप्रभूंना गनीम आपला पाठलाग करत आहेत हे समजताच त्यांनी घोड खिंडीत पोहोचल्यावर शिवाजी महाराजांना त्यांच्या सोबत काही सैन्य पाठवून त्यांना विशाल गडाकडे पाठवले. 

घोडखिंडीत थांबूनच त्या 5000 गणिमांना थांबवता आले असते, कारण घोडखिंडीच्या पुढे माळरान लागत होते आणि तेथे हे गनीम आपल्याला सहज हरवू शकतात हे बाजी प्रभूंना माहीत होते 5000 सैन्या पुढे आपण टीकाव तेथे लागला नसता कारण खुल्या मैदानात 5000 गणिमांना त्यांच्यावर चारही बाजूंनी एकत्र हल्ला केला असता. पण खिंडीमध्ये ते श्यक्य नव्हते तेथे फक्त समोरून दोन किंवा तीघेच जाऊ शकत होते हा मोठा फायदा बाजी प्रभू देशपांडे व बांदल सेनेला झाला.


येथूनच दंतकथेला सुरुवात झाली आणि बाजी प्रभूंनी सुमारे 300 मराठ्यांच्या निवडक तुकड्यासह पाठलाग करणाऱ्या जिहाद्यांना खिंडीत रोखण्यासाठी स्वेच्छेने लढाई करण्याचे ठरवले, त्यांनी मराठा सैन्याचे मनोबल वाढवले व त्यांना लढण्यास प्रोत्साहन दिले. जेणेकरून शिवाजी महाराज विशाळगड किल्ल्याच्या सुरक्षिततेसाठी पुढे जाऊ शकतील. पण या सर्वांना एकट सोडून जाऊ इच्चीत नव्हते पण बाजी प्रभूंच्या विनंती खातीर शिवाजी महाराज जड अंतःकरणाने 300 मराठ्यांच्या उर्वरित तुकडीसह पुढे विशाळगडाकडे निघाले. जो पर्यंत शिवाजी महाराज आणि त्यांचा गट सुरक्षितपणे त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचल्याचे Baji Prabhu Deshpande आणि त्यांच्या मावळ्यांना संकेत म्हणून तीन तोफांचे आवाज येत नाहीत तो पर्यंत खिंड सोडणार नाही असे वचन बाजी प्रभूंनी छत्रपती शिवाजी महाराजांना दिले.

इथे घोड खिंडीत शत्रू आल्यावर शूर वीर मराठे जंगलातील वाघासारखे त्या गणिमाशी लढत होते. हर हर महादेव, छत्रपती शिवाजी महाराज की जय अश्या गर्जना करत प्रत्येक वीर मावळा त्या गनिमंचा काळ बनत होता, आणि त्यांना ही हिम्मत वीर बाजी प्रभू देशपांडे यांच्या मुळे मिळत होती. बाजी प्रभू दोन्ही हातात दांड पट्टा घेऊन त्या गणिमाशी दोन दोन हात करत होते, त्यांचे सर्व शरीर रक्तबंबाळ झाले होते पण आपल्या मातृभूमी साठी ते लढत राहिले. बाजी आणि त्याच्या माणसांची संख्या जास्त नव्हती, हे फक्त 300 आणि गनीम जवळ जवळ 5000 इतके होते जवळजवळ एका मावळ्याला 1 = 20 गनीम लढत होते, जवळ जवळ 8 दहा तास ही लढाई चालू होती. जिहादी उलट अथक होते कारण त्यांनी उन्मादी लाटेनंतर अरुंद खिंडीवर हल्ला केला. पण आघाडीतील बाजी प्रभू हे एका दगडासारखे प्रत्येक हातात एक मोठी आणि जड तलवारी घेऊन जवळजवळ सात आठ गणिमांशी एकावेळेला लढत होते. जिहादींना आत जाण्यापासून रोखण्यासाठी त्यांनी त्याच्या शरीराचा भिंतीसारखा वापर केला. यासाठी त्यानी खरोखरच मोठी किंमत मोजली आणि लवकरच त्याच्या शरीरावर गंभीर जखमा झाल्या होत्या. तोफेच्या गोळ्या ऐकल्याशिवाय बाजी सोडणार नाही ही शप्पत त्यांना आठवत होती व त्यांनी खिंड सोडली नाही.

तिकडे 300 माणसांसह शिवरायांचा विशाळगडाचा प्रवास हा काही सोपा नव्हता. सूर्यराव सुर्वे आणि जसवंतराव दळवी या विजापूर सरदारांनी या किल्ल्याला आधीच वेढा घातला होता. शिवाजी महाराजांना त्यांच्या 300 सैनिकांसह किल्ल्यावर पोहोचण्यासाठी त्यांच्याही दोन हात करून त्यांचा पराभव करावा लागला. इकडे सिद्धी मसूद ला हे वाटत होते की जो पर्यंत बाजी प्रभू जिवंत आहे तो पर्यंत खिंड पार करणे अश्यक्य आहे. त्याने बाजी प्रभूंना मारण्यासाठी एक बंदूक धारी बोलावून घेतला ( तेव्हा इंग्रज भारतात आले होते म्हणून बंदूक असणे साहजिकच आहे ) व बाजी प्रभूंवर गोळी झाडण्यास सांगितली, बंदूक धाऱ्याने गोळी झाडली ती सरळ त्यांच्या छातीत घुसली, गोळी घुसताच बाजी प्रभू जमिनीवर कोसळले त्यांच्या समोर त्यांना मृत्यू दिसत होता. पन जोपर्यंत तोफांचा आवाज ऐकत नाही तो पर्यंत खिंड सोडणार नाही व आपण जर पडून राहिलो तर आपल्या सोबत असणारे मावळे यांचे मनोबल तुटेल मृत्यू समोर होता तरीही अंगातील जेवढी ताकत होती त्या ताकतीने ते गणिमांशी लढत होते.किल्ले विशाळगडाच्या पायथ्याशी शिवाजी महाराजांनी सूर्यराव सुर्वे आणि जसवंतराव दळवी या विजापूर सरदारांशी जोमाने हल्ला केला. बाजी प्रभू आणि त्याच्या बांदल मराठ्यांना आता आपला अनंतकाळ वाटू लागले होते बाजी प्रभू आपल्या होत्या त्या शक्तीने खिंड लढवत होते. तिकडून विशाळगडावरून महाराजांनी तोफांचा धडाका सुरू केला. जवळजवळ पहाट झाली होती आणि बाजी प्रभू अजूनही त्याच्या पायावर उभे होते. जेव्हा तोफांचा आवाज कानावर आला तेव्हा शूरवीर बाजीप्रभू देशपांडे चेहऱ्यावर स्मितहास्य करत हर हर महादेवच्या आणखी एका आरोळ्याने बाजी प्रभूंनी देह सोडला. पण जाताना मराठ्यांच्या इतिहासाचा आणि हिंदू भारताचा सदैव गौरव करत गेले. तेथे बाजी प्रभूंनी छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदवी स्वराज्य टिकवून ठेवण्यास आणि मोठ्या संकटांना तोंड देण्यास सक्षम केले.

घोडखिंडीचे नाव पावनखिंड झाले

बाजींच्या मृत्यूची बातमी कळल्यावर शिवाजी महाराज जड अंत:करणाने होते, बाजी प्रभूंच्या मृत्यूची बातमी ही एक आत्म्याला भिडणारी बातमी होती जी प्रत्येकाच्या मनात आयुष्यभर धरून राहील. छत्रपती शिवाजी महाराजांनी बाजींच्या सन्मानार्थ घोड-खिंडीचे नाव बदलून पावनखिंड असे ठेवले.


बाजीप्रभू देशपांडे यांच्या सोबतच जोमाने लढणाऱ्या बांदल सेनेला छत्रपती शिवाजी महाराजांकडून सन्मानाची तलवार देण्यात आली. पुणे जिल्ह्यातील भोरजवळील कसबे सिंध गावात वसलेल्या बाजी प्रभूंच्या घरी शिवाजी महाराजांनी स्वतः भेट दिली. त्यांच्या मोठ्या मुलाला एका विभागाचे प्रमुख पद देण्यात आले. आणि इतर 7 सुपुत्रांना पालखीचा मान ( दरभारी मान ) देण्यात आला. शहीद संभाजी जाधव यांचा मुलगा धनाजी जाधव याला सैन्यात सामील करण्यात आले. शिवाजी महाराजांनी बाजी प्रभूंच्या कुटुंबाला “मानाचे पहिले पान” हा सन्मान दिला.

बाजीप्रभू देशपांडे आणि शिवबा नाई ( शिवा काशीद ) यांचे बलिदान यावर आजही अनेक पोवाडे गीत गायले जात आहेत. आजही महाराष्ट्रातील अनेक तरुण पन्हाळा ते विशाल गड या किल्ल्यांमधील शिवाजी महाराजांनी घेतलेल्या मार्गावर ट्रेक करताना दिसून येतात. हे अंतर सुमारे 70 किलोमीटर इतके आहे. पवनखिंड (पन्हाळा) ची लढाई महाराष्ट्रातील लोककथा म्हणून अनेक विस्मयकारक प्रस्तुतींमध्ये सांगितली गेली आहे. तसेच यावर मराठी चित्रपट ही निघाला आहे तो ही आवर्जून पहा.

तर ही होती शूरवीर बाजी प्रभू देशपांडे यांच्याबद्दल थोडक्यात माहिती. यामध्ये काही चुका आढळल्या असतील व आमच्याकडून काही लिहायचं राहील असेल तर आम्हाला कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा Naad Marathi तुमच्या प्रश्नाला किंवा कॉमेंट ला नक्कीच प्रतिसाद देईल. जर ही माहिती आवडली असेल तर तुमच्या प्रियजनांना नक्की share करा.
धन्यवाद

हर हर महादेव

Image स्रोत pintrest

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Menu Site