Ad code

Latest

6/recent/ticker-posts

APY अटल पेन्शन योजना: अटल पेन्शन योजना काय आहे? संपूर्ण माहिती एका क्लिकवर Atal Pension Yojana

अटल पेन्शन योजना: अटल पेन्शन योजना काय आहे? संपूर्ण माहिती एका क्लिकवर Atal Pension Yojana (APY)


प्रत्येक व्यक्तीला वृद्धापकाळात आपल्या उत्पन्नाची चिंता असते. विशेषत: म्हणजे असंघटित क्षेत्रात काम करणारे देशातील अनेक असे लोक जे temporary काम करतात, मजूर लोक, शेतकरी किंवा ज्यांच्या कडे उपजीविकेकडे कोणतेही चांगले काम नाहीये अशी लोक. अशा लोकांसाठी मोदींनी 2015-16 च्या अर्थसंकल्पात अटल पेन्शन योजना म्हणजेच APY योजना सुरू केली. Atal Pention योजनेत गुंतवणूक केल्याने तुम्हाला निवृत्तीनंतरच्या खर्चासाठी नियमित उत्पन्न मिळते. माहितीनुसार, मार्च 2022 पर्यंत या योजनेअंतर्गत उघडलेल्या एकूण खात्यांची संख्या 4.01 कोटी झाली आहे.


अटल पेन्शन योजना 2023-APY Atal pention yojana kaay aahe

अटल पेन्शन योजना (APY) ही भारतातील सर्व नागरिकांसाठी सरकारद्वारे चालवली जाणारी पेन्शन योजना आहे, जी प्रामुख्याने असंघटित क्षेत्रातील नागरिकांवर केंद्रित आहे. नॅशनल पेन्शन सिस्टीम (NPS) अंतर्गत पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी (PFRDA) द्वारे APY प्रशासित केले जाते. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना रु.1000. ते 5000 रु.च्या दरम्यान किमान मासिक पेन्शन मिळू शकते.

या मध्ये अर्जदार आपल्या सोयीनुसार मासिक पेन्शनची निवड करू शकतात जी 1000, 2000, 3000, 4000 किंवा 5000 रुपये इतकी आहे. जे वयाच्या 60 वर्षांनंतर सुरू होऊ शकते. एखाद्याला मिळणारी पेन्शनची रक्कम ही व्यक्ती ज्या वयात APY मध्ये सामील झाली आहे आणि त्याने दिलेल्या मासिक रकमेशी थेट संबंधित आहे.

अटल पेंशन योजनेंतर्गत अर्ज करणाऱ्या अर्जदाराला दरमहा प्रीमियम जमा करावा लागेल. त्यानंतर अर्जदाराने वयाची 60 वर्षे पूर्ण केल्यानंतर, सरकार अर्जदाराच्या वृद्धापकाळात मासिक पेन्शनच्या स्वरूपात त्याला आर्थिक मदत करेल. अटल पेन्शन योजनेत अर्ज करण्यासाठी, लाभार्थींचे वय १८ ते ४० वर्षे असने गरजेचे आहे तरच ते या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

अटल पेन्शन योजनेचे फायदे

 1. या योजनेत गुंतवणूक केल्यावर तुम्हाला दरमहा 5 हजार रुपये पेन्शन मिळते.
 2. या योजनेत गुंतवणूक केल्यास कर सवलतीचा लाभही मिळतो.
 3. गरीबांना मदत करण्यासाठी भारत सरकारही या योजनेत सहकार्य करते.
 4. ही जोखीम मुक्त योजना आहे.
 5. या योजनेअंतर्गत 18 ते 40 वर्षे वयोगटातील लोक अटल पेन्शन योजनेत त्यांचे नामांकन मिळवू शकतात.
 6. यासाठी अर्जदाराचे बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते असणे आवश्यक आहे.
 7. तुमचे एकच अटल पेन्शन खाते असू शकते.
 8. या योजनेत तुम्ही जितक्या लवकर गुंतवणूक कराल तितका जास्त फायदा तुम्हाला मिळेल.
 9. जर एखादी व्यक्ती वयाच्या 18 व्या वर्षी अटल पेन्शन योजनेत सामील झाली, तर वयाच्या 60 वर्षांनंतर, त्याला दरमहा 5000 रुपये मासिक पेन्शनसाठी प्रति महिना फक्त 210 रुपये जमा करावे लागतील.

सुरक्षित गुंतवणूक

या सरकारी योजनेतील गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित आहे. जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही नोंदणी करू शकता. यासाठी तुमच्याकडे बचत खाते, आधार क्रमांक आणि मोबाइल क्रमांक असणे आवश्यक आहे.


जर एखाद्या व्यक्तीने वयाच्या 18 व्या वर्षी अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक करण्यास सुरुवात केली तर वयाच्या 60 वर्षांनंतर दरमहा 5,000 रुपये पेन्शन मिळू शकते. यासाठी दरमहा केवळ 210 रुपये जमा करावे लागतील, म्हणजेच दररोज 7 रुपये गुंतवावे लागतील. ज्यामध्ये तुम्ही दरमहा ४२ रुपये जमा कराल तर तुम्हाला एक हजार रुपये मासिक पेन्शन मिळेल. 

तसेच 2,000 रुपये पेन्शन मिळवण्यासाठी तुम्हाला 84 रुपये द्यावे लागतील. दुसरीकडे, 3000 रुपये पेन्शनवर 126 रुपये आणि 4000 रुपये मासिक पेन्शनवर 168 रुपये जमा करावे लागतील.

कर लाभ

यामध्ये टॅक्स बेनिफिटही मिळतो. अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक करणाऱ्या लोकांना आयकर कायदा 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंतचा कर लाभही मिळतो. 3.77 कोटी किंवा 89 टक्के NPS सदस्य हे बिगर महानगरांतील आहेत. या योजनेशी संबंधित व्यक्तीचा अकाली मृत्यू झाल्यास, त्याच्या कुटुंबाला लाभ सुरू ठेवण्याचीही तरतूद आहे.

अटल पेन्शन योजना 2023 साठी अर्ज कसा करावा?

प्रधानमंत्री अटल पेन्शन योजनेंतर्गत अर्ज करू इच्छिणाऱ्या व्यक्तीने प्रथम कोणत्याही राष्ट्रीयीकृत बँकेत आपले बचत खाते असणे आवश्यक आहे. तुम्हाला कोणत्याही बँकेत अटल पेंशन योजनेचा फॉर्म मिळेल.


त्यानंतर प्रधानमंत्री अटल पेन्शन योजनेच्या अर्जात मागितलेली सर्व माहिती जसे की आधार कार्ड, मोबाईल क्रमांक इत्यादी भरून तो अर्ज बँक व्यवस्थापकाकडे सबमिट करा. त्यानंतर, तुमच्या सर्व पत्रांची पडताळणी केल्यानंतर, तुमचे बँक खाते अटल पेन्शन योजनेअंतर्गत उघडले जाईल.

अटल पेंशन योजने साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे :-

अटल पेंशन योजने साठी लागणाऱ्या कागदपत्रांची माहिती खाली दिलेली आहे.

 1. अर्जदाराचे बँक खाते आधार कार्डशी लिंक केलेले असावे.
 2. आधार कार्ड
 3. मोबाईल नंबर
 4. पासपोर्ट साइज फोटो
 5. वय प्रमाणपत्र
 6. पत्त्याचा पुरावा

अटल पेन्शन योजनेचे नियम :-

 • या योजनेत फक्त १८ ते ४० वयोगटातील सदस्य अर्ज करू शकतात.
 • वयाच्या ६० वर्षापर्यंत हप्ते जमा करावे लागतील तुम्ही मासिक किंवा वार्षिक हप्ते भरू शकता.
 • 60 वर्षांनंतर दरमहा 1000 ते 5000 पेन्शन तुम्ही निवडलेल्या प्रीमियम नुसार तुमच्या खात्यात जमा होईल.
 • कोणत्याही बँक खात्याद्वारे नोंदणी केली जाऊ शकते
 • तुम्हाला मिळणाऱ्या पेन्शन आणि भरणाऱ्या हप्त्यांची रक्कम देखील तुम्ही कमी जास्त करू शकता.
 • तुम्ही महिन्याच्या कोणत्याही तारखेला पैसे जमा करु शकता.
 • जर तुमचा एखादा हप्ता जमा न झाल्यास तुमचे खाते बंद केले जाणार नाही.
 • तुम्हाला 60 वर्ष पूर्ण व्हायच्या अगोदर ही योजनेतून बाहेर पडू शकता.
 • जर 60 वर्ष पूर्ण व्हायच्या आत खातेदाराचा मृत्यू झाल्यास नॉमिनीला सर्व रक्कम मिळेल.

अटल पेंशन योजनेसाठी कोण अर्ज करू शकत नाही: 

सरकारी नियमानुसार जे लोक आयकर अंतर्गत येतात, सरकारी कर्मचारी आहेत किंवा आधीच ईपीएफ, ईपीएस सारख्या योजनांचा लाभ घेत आहेत, ते अटल पेन्शन योजनेत भाग घेऊ शकत नाहीत. तसेच अनिवासी भारतीय (NRIs) खाते उघडण्यास पात्र ठरणार नाहीत. APY योजनेच्या कार्यकाळात भारतीय नागरिक एनआरआय झाल्यास, खाते बंद केले जाईल आणि संपूर्ण योगदान आणि त्यातून मिळणारे उत्पन्न खातेधारकाला दिले जाईल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Menu Site