Ad code

Latest

6/recent/ticker-posts

महाराष्ट्र विधवा पेन्शन योजना २०२३ आताच ऑनलाईन फॉर्म भरा – Apply for Widow Pension Scheme

महाराष्ट्र विधवा पेन्शन योजना २०२३ आताच ऑनलाईन फॉर्म भराविधवा पेंशन योजनेंतर्गत महाराष्ट्र सरकार राज्यातील गरीब विधवा महिलांना राज्य सरकारकडून दरमहा 600 रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. या विधवा पेन्शन योजनेत जर एखाद्या महिलेला एकापेक्षा जास्त अपत्ये असतील तर त्या महिलेला दरमहा 900 रुपये पेन्शन मिळेल.


महाराष्ट्र विधा पेन्शन योजना - Maharashtra Vidha Pension Yojana :-

देशातील विधवा महिलांच्या हितासाठी केंद्र सरकारने विधवा पेन्शन योजना सुरू केली आहे. ही योजना देशातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल, गरीब आणि निराधार विधवा महिलांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. या योजनेंतर्गत ज्या महिला विधवा आहेत अशा महिलांना भारत सरकार पेन्शनच्या स्वरूपात आर्थिक मदत करते, ज्याद्वारे त्या स्वतःची काळजी घेऊ शकतात.

या योजनेसाठी केवळ 18 ते 60 वर्षे वयाच्या विधवा महिलाच अर्ज करू शकतील, याशिवाय ज्या महिलांची मुले मोठी आहेत त्यांना या योजनेचा लाभ मिळू शकतो. तुम्हालाही या योजनेसाठी अर्ज करायचा असेल, तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या राज्याच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करावा लागेल.

आम्ही तुम्हाला विधवा पेन्शन योजनेशी संबंधित इतर माहिती देतो जसे की, विधवा पेन्शन योजनेसाठी अर्ज कसा करायचा, विधवा पेंशन योजना अर्जाची स्थिती कशी पहावी, विधवा पेंशन योजनेशी संबंधित पात्रता काय असेल, विधवा पेंशन योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे काय आहेत. विधवा पेंशन योजनेचा उद्देश काय आहे, विधवा पेंशन योजनेचे फायदे काय आहे, यासंबंधी माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

विधवा पेन्शन योजना 2023 अर्ज कसा करावा


इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा पेन्शन योजनेसाठी तुम्ही आता sjsa.maharashtra.gov.in वर ऑनलाइन अर्ज करू शकता. या विधवा पेन्शन योजनेंतर्गत, 40 ते 65 वर्षे वयोगटातील आणि बीपीएल कुटुंबातील सर्व श्रेणीतील विधवा पात्र आहेत. महाराष्ट्रातील सर्व विधवा महिला इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजनेच्या लाभार्थ्यांना प्रति महिना रु. 600 रक्कम मिळेल.

महाराष्ट्र विधवा पेन्शन योजना 2023

देशातील विविध राज्यांमध्ये विधवा वेतन योजना राबविण्यात येत असून, त्याद्वारे महिलांना पेन्शनची रक्कम दिली जात आहे. प्रत्येक राज्यात सरकारकडून महिलांना वेगवेगळा निधी दिला जातो. या योजनेंतर्गत ज्या महिलांच्या पतीचे निधन झाले आणि त्यानंतर त्यांच्याकडे कमाईचे कोणतेही साधन नाही अशा महिलांना केंद्र व राज्य सरकारकडून आर्थिक रक्कम दिली जाते. 

या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्जदाराकडे आवश्यक कागदपत्रे असणे अत्यंत आवश्यक आहे, ज्याच्या मदतीने केवळ गरिबीत जीवन जगणाऱ्या महिलाच यासाठी अर्ज करू शकतात. विधवा महिलेला मूले असल्यास ती मूले २५ वर्षे पूर्ण होईपर्यंत त्या महिलेला पेन्शन मिळू शकते.


मुले मोठी झाल्यावर व कामाला लागल्यावर महिलेची सर्व जबाबदारी तिच्या मुलांवर येईल, आणि जर एखाद्या महिलेला मुलगी असेल तर सरकार अश्या महिलांना वयाच्या 65 वर्षांपर्यंत पेन्शन देईल. केंद्र व राज्य शासनामार्फत राज्यातील सर्व विधवा महिलांसाठी सामाजिक सुरक्षा पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे, त्यामध्ये त्यांना मासिक आधारावर वेगवेगळ्या स्वरूपात पेन्शनचा लाभ दिला जातो.

 या पेन्शन रकमेतून विधवा महिला तिच्या दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या गरजा पूर्ण करू शकते. योजनेतून मिळालेली मदत रक्कम DBT अंतर्गत लाभार्थी महिलेच्या बँक खात्यात मासिक आणि त्रैमासिक स्वरूपात हस्तांतरित केली जाते.

योजनेचा उद्देश

महाराष्ट्र विधवा पेन्शन योजना सुरू करण्यामागचा उद्देश असा आहे की, ज्या महिलांच्या पतीच्या मृत्यूमुळे ती एकटी पडून निराधार झाली आहे. किंवा तिला आयुष्यभर आर्थिक संकटात राहावे लागत आहे, त्यांच्याकडे कोणीही लक्ष देत नाही त्यांना या योजनेचा लाभ महिलांना मिळणार आहे. या योजनेमुळे त्या स्वावलंबी होऊन बलवान बनू शकतील आणि त्यांना कोणाकडेही झुकावे लागणार नाही.

योजनेचे फायदे.

 1. पतीच्या मृत्यूनंतर कोणत्याही स्त्रीचे पुढचे जीवन बिकट होऊन बसते. तिला कोणाचाही आधार नसतो हे लक्षात घेऊन भारत सरकार व महाराष्ट्र शासनाने विधवा पेंशन योजना राबवली आहे. ज्याचा फायदा विधवा महिलांना मिळणार आहे.
 2. योजनेचे फायदे पुढीलप्रमाणे आहेत.
 3. या योजनेतून विधवा महिलांना दरमहा 600 रुपये इतकी रक्कम मिळणार आहे.
 4. जर एखाद्या विधवा महिलेला एकापेक्षा अधिक मुले असतील, तर त्या महिलेला 900 रुपये इतकी रक्कम मिळणार आहे.
 5. त्या महिलेची मुलांचे वय 25 वर्ष पूर्ण होईपर्यंत योजनेचा लाभ घेता येईल.
 6. जर एखाद्या महिलेला मुलगी असेल तर त्या महिलेला वयाच्या 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत या योजनेचा लाभ घेता येईल.
 7. विधवा पेन्शन योजनेतून मिळणारी पेन्शन सहाय्य रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पाठवली जाते.
 8. या योजनेच्या मदतीने महिला स्वावलंबी आणि सक्षम होतील.

विधवा पेंशन योजनेसाठी लागणारी पात्रता

 • महाराष्ट्र शासनाने या योजनेसाठी काही पात्रता ठेवलेले आहेत. ज्या महिला या योजनेसाठी पात्र ठरतील त्याच या साठी आवेदन करू शकतात.
 • या योजनेसाठी महिला महाराष्ट्रातील रहिवासी पाहिजे.
 • महिलांचे वय 18 ते 65 वयोगटातील असले पाहिजे या वयोगटातीलच विधवा महिला या योजनेसाठी पात्र मानल्या जातील.
 • या योजनेसाठी फक्त विधवा महिलाच अर्ज करू शकतील.
 • विधवा पेन्शन योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे सर्व महत्त्वाची कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
 • कोणत्याही विधवा महिलेने पुन्हा लग्न केल्यास ती या योजनेसाठी अर्ज करू शकत नाही.
 • महिलेचे वार्षिक उत्पन्न 21000 पेक्षा जास्त नसावा.

विधवा पेंशन योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

आवश्यक कागदपत्रे खालीलप्रमाणे आहेत.

 1. आधार कार्ड
 2. रेशन कार्ड
 3. मतदार ओळखपत्र
 4. पतीचे मृत्यू प्रमाणपत्र
 5. बँक खाते
 6. वयाचा दाखला
 7. उत्पन्नाचा दाखला
 8. जातीचा दाखला
 9. पासपोर्ट आकाराचा फोटो
 10. नोंदणीकृत मोबाईल क्रमांक
 11. कायमस्वरूपी वास्तव्याचे प्रमाणपत्र

विधवा पेन्शन योजनेसाठी नोंदणी कशी करावी?

जर तुम्हालाही योजनेशी संबंधित फायदे मिळवायचे असतील, तर तुम्ही या योजने साठी ऑफलाईन अर्ज करू शकता. या साठी तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालय, तहसलिदार तसेच तलाठी कार्यालय या ठिकाणी अर्ज करु शकता. तसेच तुम्ही ऑनलाईन पद्धतीने ही यात नोंदणी करू शकता. तुमच्या राज्यानुसार अधिकृत वेबसाइटवर जाणे आवश्यक आहे. महाराष्ट्र साठी तुम्ही sjsa.maharashtra.gov.in या वेबसाईटवर जाऊन नोंदणी करू शकता.

अश्या प्रकारे तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Menu Site