Ad code

Latest

6/recent/ticker-posts

30 रुपयाला तयार होणारा पेपर 5 रुपयाला विकून newspaper वाले पैसे कसे कमवतात

वृत्तपत्रवाले ( Newspaper ) पैसे कसे कमवतात? किती कमाई होते?


Newspaper वाले पैसे कसे कमवतात.


कमी प्रमाणात अशी माणसे असतील ज्यांना वर्तमानपत्र या बद्दल माहिती नसेल. वर्तमानपत्र म्हणजेच newspaper कोणी वाचले नसेल असे क्वचितच माणसे असतील. वृत्तपत्रचा इतिहास हा फार जुना म्हणजेच जेव्हा टीव्ही, इंटरनेट, मोबाईल नव्हते, तेव्हा पासून newspaper वापरात आहेत आणि आजही त्यांचा वापर बातम्या वाचण्यासाठी घडामोडी पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात केला जात आहे.


टीव्ही व मोबाईल यायच्या आधी Newspaper हे बातम्या जाणून घेण्याचे एक महत्वाचे व लोकप्रिय माध्यम होते, पण आज टीव्ही आणि इंटरनेट या सगळ्यामुळे बातम्या सहज पहिल्या जात आहेत. आणि त्यामुळेच newspaper वाचणाऱ्याची आकडेवारी थोड्या प्रमाणात कमी झालेली दिसून येते.

TV आणि Internet मुळे वृत्तपत्रांचे प्रमाण कमी झाले असले तरी बाजारात याची मागणी जास्त आहे. अनेकांना सकाळी चहा पिताना न्यूजपेपर वाचायला आवडतात. काही जणांना प्रवास करतानाही न्युजपेपर वाचायला आवडते. कारण यामुळे आपल्याला घडामोडी तर समजतातच त्यासोबत आपले वाचन देखील उत्तम बनते. पन तुम्हाला हा प्रश्न पडलाय का की एवढा मोठा पेपर आपल्याला 4 आणि 5 रुपयाला कसा मिळत असेल.

तुम्हाला माहित आहे का वर्तमानपत्रातून पैसे कसे कमवले जातात. किंवा newspaper wale paise kase kamavtat. कोणालाही हा प्रश्न विचारला तर कदाचित त्यांचे उत्तर असे असेल की वर्तमानपत्र घेण्यासाठी ग्राहक जे पैसे देतो यातूनच वृत्तपत्रवाले पैसे कमवत असतील.

पण तसे अजिबात नाहीये जो newspaper घेण्यासाठी आपण जे ४ रुपये 5 रुपये देतो. तेवढया पैशात तर वर्तमानपत्र छापण्यासाठी जो कागद लागतो तो कागदपण येत नाही. एक वृत्तपत्र छापण्यासाठी लागणारा खर्च हा जवळपास 25 ते 30 रुपये इतका आहे. सोबत त्याचा ट्रान्सपोर्ट चा खर्च newspaper विकणाऱ्याचे कमिशन हे सर्व पकडून त्याचा खर्च अजून वाढत असेलच पण हे newspaper वाले पेपर आपल्याला 5 ते 6 रुपयाला कसे विकत असतील, त्या newspaper कंपनीला यामध्ये कसे परवडत असेल यातून ते काय कमवत असतील? जर तुम्हाला हे जाणून घ्यायचे असेल की newspaper वाले newspaper मधून पैसे कसे कमवतात.

हे देखील वाचा: ऑनलाइन पैसे कसे कमवायचे? संपूर्ण प्रक्रिया समजून घ्या.


न्युजपेपर वाले पैसे कसे कमवतात? Newspaper vale paise kase kamvtat?


आज बाजारात जर कुठची प्रिंट काढायची झाली तर प्रत्येक  पानांचे 2 नाहीतर 3 रुपये मोजावे लागतात. अश्या परिस्थितीत 8-10 पाने असलेल्या वृत्तपत्र आपल्याला फक्त 5 रुपयात कसे विकत असतील यात त्यांना काय परवडत असेल. ते newspaper वाले पैसे कसे कमवत असतील. हा
प्रश्न पडला असेलच.

इथे मी तुम्हाला सांगू इच्चीतो की newspaper वाल्याचा अर्थ वृत्तपत्र विकणारा असा नसून. ते वृत्तपत्र छापणाऱ्या कंपनीचा असा आहे.

उदा:  प्रहार, पुढारी, मुंबई चौफेर, अमर उजाला, द टाइम्स ऑफ इंडिया, लोकमत इ.

या सर्व newspaper company paise kase kamavtat? येथे तुम्हाला सांगतो की या सर्व कंपन्या जाहिरात करून आपली कमाई करत असतात. त्या वेगवेगळ्या ब्रँड च्या कंपन्याच्या आपल्या वर्तमानपत्रांवर वेगवेगळ्या जाहिराती दाखवून पैसे कमवतात.

तुम्ही newspaper च्या प्रत्येक पानावर अश्या अनेक जाहिराती पहिल्या असतील, असे अनेक फोटो किंवा माहिती पाहिली असेल. ज्याचा बातमी शी काही संबंध नसतो या जाहिरातीमध्ये कोणाच्या वाढदिवसाच्या शुभेछा, कोणत्या नेत्याचा फोटो, गाड्यांची माहिती नवीन प्रॉडक्ट किंवा ब्रँड विषयी माहिती जी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी त्यावर छापलेली असते. अशी सर्व माहिती वर्तमानपत्रात छापून येते या सर्व जाहिराती असतात.

Advertising अश्या प्लॅटफॉर्म वरून प्रसारित केली जाते, जिथून एखाद्या वस्तू किंवा उत्पादनाची माहिती अनेक लोकांपर्यंत जाऊ शकते. त्यामुळेच आपण TV, इंटरनेट व newspaper वर खूप जाहिराती पहायला मिळतात, newspaper वर जाहिराती दाखवण्याचं कारण म्हणजे बरेच लोक वर्तमानपत्र वाचतात. त्यामुळे त्यावर दाखवलेली जाहिरात अनेक लोकांपर्यंत पोहोचते. त्यामुळे वर्तमानपत्रात जाहिरात दिली जाते. ज्यातून न्यूजपेपर वाले भरपूर पैसे कमवतात. म्हणूनच ते आपल्याला एवढा खर्च होऊन आलेला newspaper 4 आणि 5 रुपयाला देतात व त्यावरील advertise चा व प्रॉडक्ट चा प्रसार करतात.

वर्तमानपत्रात जाहिरात करण्यासाठी लागणारा पैसा त्याच्या लोकप्रियतेवर अवलंबून असतो. जाहिरात कोणत्या पानावर द्यायची आहे, जाहिरातीच्या आकारावर देखील त्यांचे पैसे अवलंबून असतात. जाहिरात जितकी मोठी आहे तितके जास्त पैसे खर्च होतील. त्याचबरोबर जर वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर जाहिरात दाखवण्यासाठी जास्त पैसे लागतात. Newspaper वर जाहिराती दाखवण्यासाठी लाखो करोडो रुपये लागतात.

जर तुम्हाला newspaper वर जाहिरात करायची असेल तर तुम्ही त्यांच्या office ला जाऊन रीतसर व तुमच्या बजेट मध्ये जाहिरात करू शकता. तसेच तुम्ही इंटरनेट च्या माध्यमातून ही सहज जाहिरात करू शकता.


निष्कर्ष
मला आशा आहे की तुम्हाला वृत्तपत्रातील लोक पैसे कसे कमवतात याची माहिती आवडली असेल. Newspaper vale paise kase kamavtat या विषयावर खूप संशोधन करून हा लेख तयार करण्यात आला आहे, जेणेकरून वृत्तपत्र इतके स्वस्त कसे आहे याची संपूर्ण माहिती तुम्हाला मिळू शकेल. आपणास विनंती आहे की आपण हा महत्वाचा लेख आपल्या कुटुंबीयांसह, मित्र आणि नातेवाईकांसोबत शेअर करा.
धन्यवाद.

Image credit - Pexels

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Menu Site