Ad code

Latest

6/recent/ticker-posts

Home loan घेत असाल तर या गोष्टी तुम्हाला माहीत हव्यात

गृहकर्ज (Home Loan) घेणार असाल? तर या 8 गोष्टी लक्षात ठेवा!

छोटे का असेना पण स्वत:च्या मालकीचं घर असाव हे अनेकांच्या आयुष्यातील प्रमुख स्वप्न असतं. नवीन घर खरेदी करण्यासाठी किंवा नवीन घर बांधण्यासाठी नेहमीच मोठ्या प्रमाणात पैशांची आवश्यकता असते. त्यामुळे बहुतेक लोक Home Loan घेण्याकडे वळतात, व बँकांकडून किंवा खाजगी finance कंपन्यांकडून कर्ज घ्यावे लागते. जर तुम्ही home loan घेऊन घर खरेदी करण्याचा मार्ग शोधत असाल तर तुम्हाला यासंबंधी काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. येथे आम्ही तुम्हाला अशीच काही माहिती सांगत आहोत ज्या तुम्हाला बँकेकडून गृहकर्ज घेताना लक्षात ठेवल्या पाहिजेत.


स्वताचा संसार सुखी करण्यासाठी स्वतःचे घर प्रत्येकाला हवे असते, आणि घर बांधण्यासाठी नेहमीच मोठ्या रकमेची आवश्यकता असते. स्वतःचे घर घेण्यासाठी Home loan हा आर्थिक मदतीचा एक उत्तम मार्ग आहे. home loan तुम्हाला स्वतःचे स्वप्नातले घर बनवण्याचे स्वप्न पूर्ण करण्यात मदत करू शकते, आणि याचा फायदा असा आहे की होम लोण मध्ये तुम्हाला tax वाचवण्याची ही संधी देते.

पण loan घेण्यापूर्वी तुम्हाला Home loan बाबत काही महत्त्वाच्या गोष्टी माहीत असणे आवश्यक आहे. चला तर मग जाणून घेऊया home loan कसे काढावे, home loan घेताना काय काळजी घ्यावी?

Home loan घेताना या 8 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा.

1). Costs and documentation

Home loan घेण्यासाठी डॉक्युमेंटेशन चेक करणे ही एक महत्त्वाची प्रक्रिया आहे. जी तुमच्या स्वप्नातील घराला अंतिम रूप देण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचणे, आणि त्यामध्ये दिलेली सर्व माहिती समजून घेणे आवश्यक आहे. याबरोबरच मालमत्तेची वास्तविक किंमत किती आहे आणि होणाऱ्या खर्चाची माहिती असणे आवश्यक आहे. नवीन घर बांधण्यासाठी घेत असलेल्या home loan वरती कर, सरकारी शुल्क, नोंदणी शुल्क किंवा इतर काही गोष्टी आहेत ज्यामुळे खर्च 25-30 टक्क्यांनी वाढू शकतो.


2). चांगला CIBIL स्कोअर

कुठलाही loan घेण्यासाठी चांगला CIBIL स्कोअर असणे आवश्यक आहे, उत्तम cibil score हा 750 पेक्षा जास्त असावा. चांगला CIBIL score कर्ज मिळवण्याचा मार्ग सुलभ करतो. CIBIL score कर्जाचा कालावधी लवचिक ठेवण्यास मदत करतो आणि त्याचा व्याजदरावरही परिणाम होतो.

त्यामुळे, जर तुम्ही गृहकर्ज घेण्याचा विचार करत असाल, तर तुमच्याकडे आधीपासून असलेली सर्व कर्जे फेडण्याची आणि तुमचा CIBIL स्कोअर सुधारण्यासाठी शिस्तबद्ध आर्थिक व्यवहार करावेत असे सुचवले जाते.

3). कर्ज नीट समजून घ्या

अनेक वेळा बँक आकर्षक ऑफर देऊन ग्राहकांना loan घेण्यासाठी आकर्षित करते. पण कोणतेही कर्ज घेण्यापूर्वी तुम्हाला कर्ज योजना चांगल्या प्रकारे समजून घेणे महत्त्वाचे आहे.

म्हणजेच कर्ज किती मिळेल, त्यावर व्याज किती असेल, कर्ज फेडण्यासाठी किती वेळ मिळेल, कर्ज घेतल्यावर त्यावर काही वेगळे शुल्क आहेत का, कोणते कमिशन आहे का इ. या सर्व गोष्टी काळजीपूर्वक जाणून घ्या.

4). सर्व कागदपत्रे उपलब्ध आहेत का ते बघा

Home loan साठी अर्ज करताना बँकेकडे किंवा तुम्ही जेथून कर्ज घेणार आहेत तेथे काही कागदपत्रे सादर करणे आवश्यक असते, ज्यामध्ये तुमचा उत्पन्नाचा पुरावा, बँक स्टेटमेंट्स आणि मालमत्तेची कागदपत्रे समाविष्ट आहेत. मालमत्तेची सकारात्मक पडताळणी केल्यानंतरच कर्जाला अंतिम मंजुरी मिळते.


5). आगाऊ पेमेंट

साधारणपणे बँका किंवा कर्ज देणाऱ्या वित्तीय संस्था मालमत्तेच्या मूल्याच्या केवळ ७५ ते ९० टक्के रक्कम कर्ज म्हणून स्वीकारतात, कर्जदाराची पात्रता आणि इतर घटक लक्षात घेऊन. उर्वरित रक्कम कर्जदाराने खरेदीच्या वेळी डाउन पेमेंट म्हणून भरावी लागते.

6). लपविलेले खर्च देखील पहा

Loan घेतल्यावर त्यामध्ये अनेक छुपे खर्च असतात जे तुमच्यासमोर आधी उघड केले जात नाहीत. आणि जेव्हा हे खर्च आपल्याला समजतात तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो.

या छुप्या खर्चामध्ये  legal fees, Technical evaluation fee तसेच Franking charges, Documentation fee, decision fee, notary fee, loan prepayment fee, switch fee इत्यादींचा समावेश असू शकतो. हे शुल्क तुम्हाला महागात पडू शकते. तर loan घेण्याआधी या खर्चाबद्दल पुरेेशी माहिती घ्या

7). EMI व्यवस्थापन

Loan घेतल्यानंतर जर काही कारणाने तुमच्या कमाई कमी झाली म्हणजेच बाजारातील अस्थिरता, आजारपण किंवा इतर कोणत्याही कारणामुळे तुमच्या उत्पन्नात अचानक घट झाल्याने कर्जदाराच्या परतफेड क्षमतेवर परिणाम होऊ शकतो तुमचे कर्ज फेडण्यात काही अडचणी येऊ शकतात. 

त्यामुळे त्याची परतफेड करण्यासाठी कर्ज घेताना आपल्याकडे ‘Plan B’ तयार असणे गरजेचे आहे. परतफेड सुनिश्चित करण्यासाठी काही रक्कम ठेवण्याचा सल्ला दिला जातो, जो किमान 6 महिन्यांचा ईएमआय असावा. ही रक्कम तुम्हाला आपत्कालीन परिस्थितीत मदत करेल आणि तुम्ही कोणाकडूनही नवीन कर्ज न घेता तुमचे कर्ज फेडण्यास सक्षम असाल.

8). कर्जाच्या अटी आणि नियम

गृहकर्ज फायनल करण्यापूर्वी, तुमच्या कर्जाशी संबंधित सर्व नियम आणि अटींशी परिचित असणे अत्यंत आवश्यक आहे. कर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी 'अटी आणि नियम' काळजीपूर्वक वाचा. असे होऊ नये की बँकेच्या मुदत आणि अटी तुमच्यानुसार नाहीत आणि तुम्ही कर्जाच्या गुन्ह्यात अडकून पडाल. 


कर्ज घेतल्यानंतर कोणतीही चूक सुधारण्याची संधी नसते. सर्व नियम आणि अटी आधी जाणून घेणे चांगले होईल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Menu Site