Ad code

Latest

6/recent/ticker-posts

GPS चे full form - जीपीएसचे पूर्ण रूप काय आहे? - GPS म्हणजे काय


GPS चे full form - जीपीएसचे पूर्ण रूप काय आहे? - GPS म्हणजे काय


नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही स्मार्टफोन वापरात असाल तर तुम्हाला google map बद्दल नक्कीच माहीत असेल. आपण कुठे अनोळख्या ठिकाणी गेलो व तिथला रस्ता माहीत नसेल, किंवा कुठे चुकलो आणि त्या ठिकाणचा रस्ता विसरलात तर तुम्ही गुगल मॅप वापरला असेलच. पण तुम्हाला माहीत आहे का की गुगल मॅपला तुम्ही ज्या ठिकाणी आहात ठिकाणाचे नेमके लोकेशन कसे कळते. तर यासाठी गूगल मॅप वर योग्य ठिकाण शोधण्यासाठी जीपीएस तंत्रज्ञानाचा वापर केला जातो.


आजकाल सर्व इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आणि वाहनांमध्ये देखील GPS चा वापर केला जात आहे. पण तुम्हाला GPS म्हणजे काय हे माहीत आहे का. नसेल तर आज या पोस्टच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला GPS Full Form काय आहे, Gps कसे काम करते Gps म्हणजे काय इत्यादींविषयी सविस्तरपणे सांगणार आहोत. तर ही पोस्ट शेवटपर्यंत नक्की वाचा.

GPS म्हणजे काय हे जाणून घेण्यापूर्वी, GPS चे पूर्ण नाव म्हणजे GPS चे पूर्ण रूप काय आहे ते जाणून घेऊ.

Gps फुल फॉर्म - GPS full form

GPS चे पूर्ण स्वरूप Global Positioning System ( ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम ) आहे ज्याला थोडक्यात GPS म्हणतात.

जीपीएस म्हणजे काय? What is GPS

GPS ही Radio Navigation Satellite System आहे जी कोणत्याही ठिकाणाचे अचूक स्थान शोधण्यासाठी व त्या ठिकाणाची माहिती जाणून घेण्यासाठी वापरली जाते. GPS ची सर्व system उपग्रहाद्वारे चालवली जाते. GPS चा शोध अमेरिकेने 1959 मध्ये लावला होता.

GPS च्या इतिहासाबद्दल जाणून घ्यायचे तर अमेरिकेने 26 एप्रिल 1959 रोजी पहिल्यांदा आपल्या पाणबुडी जहाजाचा मागोवा घेण्यासाठी GPS चा वापर केला होता, त्याच्या यशानंतर अमेरिकेने सर्व सैन्य आणि क्षेपणास्त्रांचे संरक्षण करण्यासाठी आणि ट्रॅक करण्यासाठी GPS चा वापर केला होता. जीपीएसचा वापर प्रभावी असताना 1980 पासून GPS ला सर्वसामान्य नागरिकांसाठीही सुरू करण्यात आला. GPS सुरळीत पणे काम करावे यासाठी पृथ्वीपासून दूर अंतराळ आणि त्याच्या कक्षेत 32 उपग्रह स्थापित केले आहेत. GPS च्या मदतीने ठिकाणासोबतच हवामानाची स्थिती आणि वेळ यांचीही माहिती आपल्याला मिळते.

अमेरीके सोबतच अनेक देशांनीही स्वत:ची GPS सिस्टिम बनवली आहे. कारगिल युद्धानंतर भारताने IRNSS नेव्हिगेशन सिस्टमचा शोध लावला. ही नेव्हिगेशन प्रणाली फक्त भारतातच काम करते. जीपीएस हे एक मोफत नेटवर्क आहे, GPS ला वापरण्यासाठी आपल्याला कोणत्याही प्रकारचे शुल्क द्यावे लागत नाही.

जीपीएसची मूलभूत रचना काय आहे?

GPS चे तीन विभाग आहेत, ज्याला GPS चे Three-block Configuration असेही म्हणतात. जे खालील प्रमाणे आहेत.

1.Space Segment (Satellite / उपग्रह )
2.Control Segment (Ground Stations)
3.User Segment (Receiver/प्राप्तकर्ता)

1. Space Segment – यामध्ये satellites हे कक्षेतून पृथ्वीवर सिग्नल पाठवन्याचे काम करतात हे उपग्रह पृथ्वीभोवती 6 कक्षांमध्ये तैनात आहेत. हे पृथ्वी पासून सुमारे 24,000 किमी उंचीवर आहेत. प्रत्येक कक्षेत 4 उपग्रह आहेत. हे सर्व उपग्रह 12 तासांच्या अंतराने पृथ्वीभोवती फिरतात.

2. Control Segment - हे Satellites चे स्थान निश्चित करण्याचे काम  ग्राउंड स्टेशन रडार करते. तसेच या उपग्रहांमध्ये होणार्‍या कोणत्याही प्रकारची खराबी ओळखण्याचे कामही control segment करते. ग्राउंड स्टेशन्सची मुख्य भूमिका satellites चे  निरीक्षण करणे त्यावरती नियंत्रण ठेवणे आणि त्याची देखभाल करणे हे काम आहे.

3.User Segment - येथे रिसीव्हर्स उपग्रहांद्वारे पाठवलेले सिग्नल प्राप्त करतात आणि त्यांच्यापासून त्यांचे अंतर मोजून ते पृथ्वीवरील त्यांचे स्थान शोधतात.

GPS चा उद्देश काय आहे?

Gps बनवण्यामागचा मुख्य उद्देश म्हणजे कोणत्याही ठिकाणाचे अचूक location जाणून घेणे. सुरुवातीला अमेरिकेने आपल्या पाणबुडी जहाजाचा मागोवा घेण्यासाठी जीपीएस बनवले. मात्र, त्यानंतर बदलत्या काळानुसार GPS मध्ये बरेच बदल करण्यात आले त्यामध्ये हवामान, वेळ आणि मार्गाची माहिती GPS द्वारे आपल्याला मिळते.

GPS चा वापर कश्यासाठी केला जातो
खालील कामांसाठी GPS चा वापर मोठया प्रमानात केला जातो.

1. LOCATION - कोणत्याही ठिकाणाचे अचूक स्थान किंवा स्थिती जाणून घेण्यासाठी GPS चा वापर सर्वत्र व मोठया प्रमाणात केला जातो.

२. Navigation - सध्या जीपीएस प्रणाली खूप विकसित झाली आहे, त्यामुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचे असेल व तेथे जाण्याचा मार्ग माहीत नसेल तर GPS चा वापर केला जातो.

3. Maping - GPS चा वापर आपल्या पृथ्वीचा अचूक नकाशा समजून घेण्यासाठी देखील केला जातो. एखादे ठिकाण किती मोठे आहे त्या ठिकाणी  कसे जावे किती अंतर आहे यासाठीही GPS चा वापर केला जातो.

4. Tracking - आजकाल जीपीएसचा वापर कोणत्याही वस्तू किंवा वस्तूंचा मागोवा घेण्यासाठी किंवा त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी केला जातो.

5. Time - जीपीएसद्वारे अचूक वेळ शोधली जाते.

जीपीएस कुठे वापरला जातो?

इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये
सध्या इलेक्ट्रॉनिक उपकरण सुरक्षित ठेवण्यासाठी जीपीएसचा वापर केला जात असून, त्याच्या मदतीने इलेक्ट्रॉनिक उपकरणाचे नेमके स्थान आणि त्याची हालचाल ओळखता येते.

सैन्यात
क्षेपणास्त्रे, रडार आणि पाणबुडी जहाजांचा मागोवा घेण्यासाठी देशाच्या लष्कराकडून जीपीएसचा वापर केला जातो. अमेरिकेने प्रथमच आपल्या सैन्यासाठी जीपीएसचा शोध लावला.

विमानामध्ये
जगभरातील सर्वच विमाने अचूक स्थान आणि वास्तविक वेळ जाणून घेण्यासाठी GPS वापरतात. याशिवाय, इतर विमानांचा मागोवा घेण्यासाठी देखील GPS चा वापर केला जातो जेणेकरून पायलट विमानाच्या पुढे आणि मागे जाणाऱ्या स्थितीची माहिती घेऊन विमान सुरक्षित ठेवू शकेल.

जहाजामध्ये
Gps चा वापर जहाजांवर कोणत्या ठिकानी जायचे आहे याचा मार्ग शोधण्यासाठी केला जातो. जहाजे केवळ जीपीएसवर अवलंबूनच सुरक्षित प्रवास करतात. जहाजाचे वैमानिक जीपीएस नेव्हिगेशनच्या मदतीने त्यांच्या ठिकाणापर्यंत पोहोचण्यास सक्षम आहेत.

वाहतूक मध्ये
रस्ते वाहतुकीतही जीपीएसचा वापर केला जातो. जीपीएसच्या साहाय्याने कोणत्या रस्त्यावर किती रहदारी आहे याची माहिती मिळते, त्यामुळे बहुतांश वाहनांमध्ये जीपीएस दिलेला असतो.

निष्कर्ष :-

आजच्या पोस्ट मध्ये तुम्हाला  "GPS full form व GPS काय आहे याची सर्व माहिती मिळाली असेल तसेच GPS kase kaam karate याची माहिती मिळाली असेल, या पोस्टच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला GPS बद्दल सर्व माहिती दिलेली आहे आम्हाला आशा आहे की तुम्हाला ही माहिती आवडली असेल जर तुमच्या मनात जीपीएसशी संबंधित इतर माहिती जाणून घ्यायची असेल तर कमेंट करा.

जर तुम्ही या माहितीवर समाधानी असाल, तर तुम्ही ही पोस्ट तुमच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केली पाहिजे जेणेकरून तुमच्या मित्रांनाही GPS म्हणजे काय याची माहिती मिळू शकेल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Menu Site