Ad code

Latest

6/recent/ticker-posts

10+ WhatsApp Tricks Tips in Marathi ज्या तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे

Best WhatsApp Tricks & Tips In Marathi


जगात अनेक मेसेजिंग Apps आहेत, पण या सगळ्या अँप्समधून Whats app ने आपली वेगळी ओळख कायम ठेवली आहे. जगात क्वचितच अशी  लोक असतील जे whatsapp चा वापर करत नसतील. प्रत्येक व्यक्ती आपल्या स्मार्टफोनमध्ये नक्कीच whatsapp वापरत आहे.


WhatsApp एक लोकप्रिय अँप आहेच शिवाय Meta कंपनी आपल्या वापरकर्त्यांचा अनुभव वाढविण्यासाठी यामध्ये सतत नवीन वैशिष्ट्ये सादर करत आहे. यामध्ये अनेक वैशिष्ट्ये अगदी सामान्य आहेत ज्याचा वापर खूप होतो. या मेसेजिंग अँपमध्ये असे अनेक छुपे फीचर्स आहेत, ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. किंवा बहुतेक लोकांना या वैशिष्ट्यांबद्दल माहिती नाही. आजच्या लेखात मी तुम्हाला या Whatsapp च्या छुपे फीचर्स, टिप्स आणि ट्रिक्सची माहिती सांगणार आहे. चला तर मग त्याच्या काही लपलेल्या वैशिष्ट्यांबद्दल जाणून घेऊया.


1). How to hide whatsapp blue tick?

Whats app मध्ये ब्लू टिक कसा लपवायचा? जेव्हा whatsapp वर एखाद्याचा मेसेज येतो व आलेला msg आपण ओपन करून वाचतो, तेव्हा समोरच्या व्यक्तीला आपण तो msg वाचलेला दिसतो म्हणजे त्या msg वर ब्लू टिक दिसते, अशा परिस्थितीत तुम्हाला ब्लू टिक लपवायची असेल, तर whats app setting मध्ये जाऊन त्याची सेटिंग बदलून blue टिक hide करू शकता. यासाठी तुम्ही खाली दिलेल्या स्टेप्सने ब्लू टिक लपवू शकता.

WhatsApp setting >> Account >> Privacy >> Read Receipts समोरील बटन off करा तुमचे last seen लपवले जाईल.

2). How to Recover Deleted WhatsApp Chats

डिलीट WhatsApp चॅट कसे पहावे? जर समोरच्याने एखादा msg करून delete केला असेल, तर तो msg काय होता याची उत्सुकता आपल्याला असते. जर तुम्हाला whats अँप मध्ये  ( this msg was deleted ) हटवलेल्या चॅट्स रिकव्हर करायच्या असतील, तर तुम्ही खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करून डिलीट केलेल्या चॅट्स वाचू शकता.

फोनमध्ये File manager >> External storage >> Whatsapp >> database >> येथे तुम्हाला 2 पर्याय दिसतील-
msgstore.db.crypt (1 दिवस चॅटिंग फाइल)
msgstore–yyyy..dd..db.crypt (7 दिवस चॅटिंग फाइल)
यातील file select करून तिला टेक्स्ट एडिटरमध्ये उघडून चॅटिंग वाचू शकता.

3). Star or Unstar a Message

बऱ्याच वेळा Whats app ग्रुपवरील किंवा आपल्या मित्रांनी पाठवलेले जोक्स किंवा काही मेसेज आपल्याला खूप आवडतात आणि ते आपल्याला वारंवार हवे असतात. त्यामुळे अशा परिस्थितीत आपण त्या massages ला star करून आपल्या आवडत्या यादीत टाकू शकतो. त्यानंतर जेव्हा जेव्हा आपल्याला त्या msg ची गरज वाटेल तेव्हा आपण तेथून सहज हे msg मिळवू शकतो. Msg ला कसे स्टार करतात यासाठी काही सूचनांचे पालन करा.
Open Whatsapp >> Press and hold Message >> Click on Star icon

4). Voice message इअरपीसद्वारे privately ऐकु शकता.

जेव्हा आपल्याला voice msg येतो व आपण तो play तेव्हा तो मोट्या speaker ने ऐकू येतो. आता तुम्ही तोच msg मोबाईल च्या earpeace मधून ऐकू शकता. तुम्ही फोनवर बोलतात असे ऐकन्यासारखे इअरपीसद्वारे खाजगीरित्या व्हॉइस संदेश देखील ऐकू शकता?
यासाठी तुम्हाला आलेला msg व रेकॉर्ड केलेला voice msg प्ले करून फोन तुमच्या कानाजवळ ठेवावा लागेल, जसे आपण कॉल आल्यावर करतो तसे आणि तो voice msg तुम्हाला इअरपीसद्वारे आपोआप ऐकू येईल.

5). तुम्ही तुमची Chat Conversations email करू शकता.

तुम्ही तुमचे संपूर्ण संभाषण ईमेलद्वारे कोणत्याही contacts बरोबर share करू शकता. यासाठी तुम्हाला

Settings >> Chat >> Chat History वर जावे लागेल. आता "Export chat" चा पर्याय निवडुन तुम्हाला एक्सपोर्ट करायचे असलेले संभाषण निवडा. यानंतर email app  निवडुन आपली chat export करा.

6). एखाद्या व्यक्तीने तुमचा मेसेज कधी वाचला हे तुम्ही जाणून घेऊ शकता.


Whatsapp मधील ब्लू टिक तुम्हाला दाखवते की तुमचा संदेश वाचला गेला आहे. पण तुमचा मेसेज कोणत्या वेळी वाचला गेला हे सांगता येत नाही. यासाठी whatsapp वर एक खास पर्याय देण्यात आला आहे ज्यामुळे तुम्हाला समजते की तुमचा msg कोणत्या वेळी वाचला गेला आहे हे तुम्ही सहजपणे पाहू शकता.


यासाठी तुम्हाला ज्या msg ची माहिती हवी आहे त्या msg ला long press करा त्यानंतर वरच्या बाजूला 3 dot वर क्लिक करून info वर जायचे आहे येथे तुम्हाला त्या msg ची माहिती मिळेल की तो msg कोणत्या time ला बघितला गेला आहे. याचा उपयोग तुम्ही group वरती तुमचा msg कोणी वाचला आणि कोणी वाचला नाही हे देखील तुम्ही जाणून घेऊ शकता.

7). Disable Auto Download Media

जर तुमच्या Whatsapp वरील फोटो, व्हिडिओ, gif आणि ऑडिओ आपोआप डाउनलोड होत असतील, तर याचा अर्थ तुमचा ऑटो डाउनलोड मोड 'ऑन' आहे. त्यामुळे आपला डेटा विनाकारण वाया जातो. तुमचा ऑटो डाउनलोड मोड बंद करण्यासाठी, फक्त या सूचना फॉलो करा.
Setting >> storage and data >> media auto download >> येथे तुम्ही काय auto download ठेवायचे आहे त्याला on किंवा off करून आपला data वाचवू शकता.

8). WhatsApp मध्ये चॅट पिन करा.

जर तुम्ही अनेक whats app ग्रुप्समध्ये ऍड असाल आणि तुम्हाला दररोज खूप मेसेज येत असतील, तर यामुळे तुम्हाला अनेक महत्त्वाच्या लोकांचे मेसेज पाहता येणार नाहीत, या समस्येवर एक उपाय देखील आहे, तुम्ही त्या contacts ला पिन करू शकता.

यामध्ये जास्तीत जास्त 3 चॅट पिन केले जाऊ शकतात, ज्यामुळे तुम्ही ज्या लोकांच्या चॅट पिन केल्या आहेत ते top ला दिसतील म्हणजेच हे देखील खूप चांगले फीचर आहे आणि काही लोकांना अजूनही या whatsapp ट्रिक्सबद्दल माहिती नाही. Pin करण्यासाठी तुम्हाला ज्या numbar ला पिन करायचे आहे त्यावर long press करा आणि नंतर पिन चिन्हावर क्लिक करा.

9) तुमचे massage Bold, Italic and Strikethrough मध्ये लिहा.

तुम्ही अनेकदा पाहिले असेल की Whatsapp मेसेजमधील अनेक शब्द bold, italic आणि Strikethrough फॉरमॅटमध्ये डिझाइन केलेले असतात. विशेषत: असे शब्द शायरी मध्ये अधिक दिसतात. तुम्ही पण या पद्धतीने तुमचे संभाषण आकर्षक बनवू शकता.


यासाठी तुम्हाला कोणताही शब्द किंवा वाक्य ठळक करायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला त्या शब्दाच्या पुढे आणि मागे star (*) चिन्ह लावावे लागेल. उदाहरणार्थ *रोहित*. याप्रमाणे italic करण्यासाठी अंडरस्कोर (_) आणि strikethough करण्यासाठी टिल्ड (~) चिन्ह वापरावे लागेल. दुसरा फॉरमॅट म्हणजे मोनोस्पेस, यासाठी तुम्हाला शब्दाच्या पुढे आणि मागे तीन बॅकटिक ("`) लावावे लागतील.

10). Group मध्ये privately message करा

तुम्ही ग्रुप वर chat करताना group मधील कोणत्याही व्यक्तीला खाजगी msg करू शकता हे अगदी शक्य आहे. तुम्ही खालील स्टेप्स फॉलो करून ग्रुपमधील कोणालाही खाजगी संदेश पाठवू शकता.

सर्व प्रथम ग्रुप चॅटमध्ये कोणत्या व्यक्ती ला private msg करायचा आहे काय massage वर काही सेकंदांसाठी long press करा.
आता उजव्या कोपर्यात 3 डॉट वर क्लिक करा. आणि
Private msg वर क्लिक करून येथे संदेश पाठवा.

11). नंबर सेव्ह न करता कोणालाही whats app मेसेज पाठवा.

Whats app वर कोणत्याही नंबरवर चॅट करायचे असल्यास आधी तो नंबर आपल्या फोनमध्ये सेव्ह करावा लागेल. पण या whats app trick च्या मदतीने तुम्ही नंबर सेव्ह न करता whats app वर मेसेज पाठवू शकता.

त्यासाठी तुम्हाला ब्राउझर उघडन त्यात https://wa.me/91Mobile Number टाइप करून search करावे लागेल. येथे मी shortcut मध्ये सांगितले आहे. तुम्हाला ज्या number बरोबर chat करायचे आहे त्याचा number टाकावा लागेल, तुम्हाला ज्या मोबाईल नंबरशी चॅट करायचे आहे तो नंबर टाका. नंतर पुढील पानावर टॅप टू चॅट नाऊ बटणावर क्लिक करा. यानंतर तुम्हाला तुमच्या फोनच्या WhatsApp वर त्या नंबरवर चॅट करण्यासाठी पाठवले जाईल. जिथे तुम्ही त्या नंबरवर चॅट करू शकता.

निष्कर्ष

मला आशा आहे की तुम्हाला वर नमूद केलेली Whatsapp वर लपलेली वैशिष्ट्ये, टिपा आणि युक्त्या आवडल्या असतील. जर तुम्हाला तुमच्या whats app मध्ये ही वैशिष्ट्ये दिसत नसतील तर तुमचे app अपडेट करा आणि पुन्हा प्रयत्न करा. जर तुम्हाला या विषयाशी संबंधित काही प्रश्न असतील तर तुम्ही खालील कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता.

जर तुम्हाला माझा हा लेख आवडला असेल किंवा काहीतरी नवीन शिकायला मिळाले असेल, तर कृपया ही पोस्ट फेसबुक, व्हॉट्स अॅप, ट्विटर आणि इतर सोशल प्लॅटफॉर्मवर शेअर करा. किंवा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये लिहा. आम्ही तुमच्या प्रतिसादांची वाट पाहत आहोत

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Menu Site