Ad code

Latest

6/recent/ticker-posts

SIP म्हणजे काय, SIP मध्ये गुंतवणूक का करावी? Sip चे फायदे काय आहेत what is SIP in marathi

SIP म्हणजे काय? SIP मध्ये गुंतवणूक का करावी? काय आहेत फायदे?


SIP तुम्हाला तुमच्या आवडीच्या Mutual fund मध्ये दरमहा ठराविक रक्कम गुंतवण्याची संधी देते. SIP हे सहसा Equity mutual fund मध्ये सुरू केले जाते.


SIP किंवा Systematic Investment Plan म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही अनेक लोकांकडून SIP बद्दल बोलताना किंवा tv वर व mobile वर ऐकले असेल. तुम्ही तुमच्या मित्रांकडून व इतरांकडून mutual fund बद्दल व SIP बद्दल ऐकले असेल, जर तुम्ही mutual fund मध्ये गुंतवणूक करत असाल किंवा करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला SIP काय असते हे माहीत असणे आवश्यक आहे. जर तुम्हाला SIP म्हणजे काय हे माहीत नसेल, तर आमच्या या पोस्टद्वारे आम्ही तुम्हाला SIP in marathi शी संबंधित सर्व माहितीची ओळख करून देऊ.

SIP काय असते - What is SIP in Mutual funds in Marathi

आपण कमावलेल्या पैश्यांची बचत व्हावी असे प्रत्येकालाच वाटते तसेच बचत करण्याचे अनेक मार्ग ही आहेत, पण याबरोबरच आपण केलेल्या बचतीची शिल्लक वाढवणे हाच खर्‍या अर्थाने बचतीचा मार्ग आहे. खूप लोक आपल्याकडे असलेली शिल्लक बँकेमध्ये फिक्स डिपॉजिट ठेवून त्यावर व्याज मिळवत राहतात. तुम्हीही तुमची बचत केलेली रक्कम FD मध्ये किंवा अश्या अनेक ठिकाणी गुंतवू शकता आणि त्यावर नफा मिळवू शकता. परंतु जर तुम्हाला नियमित आणि संतुलित पैसे मिळवायचे असतील तर आपण बचत केलेली रक्कम SIP ( Systematic Investment Plan ) मध्ये गुंतवली पाहिजे. SIP करून आपण आपले बचतिचे पैसे वाढवत असतोच पण याद्वारे आपल्याला tax मध्येही सूट मिळते. सुरुवातीला लोकांमध्ये SIP बद्दल अनेक गैरसमज होते त्यांनी ते हानिकारक मानले, नंतर लोकांना कळून चुकले की sip मध्ये खूप फायदा आहे. म्हणून आजच्या पोस्ट मध्ये SIP शी संबंधित सर्व महत्वाची माहिती तुमच्याशी शेअर केली आहे.

SIP म्हणजे काय - SIP Meaning In Marathi

SIP म्हणजेच Systematic Investment Plan ही म्युच्युअल फंड मधील गुंतवणूक योजना आहे, SIP चा अर्थ पद्धतशीर गुंतवणूक योजना होय. यामध्ये सर्व पैसे एकत्र न देता दर महिन्याला थोडी थोडी रक्कम म्हणजे 100 पासून पुढे कितीही रक्कम तुम्ही येथे गुंतवू शकता. त्यानंतर सर्व SIP हे म्युच्युअल फंड कंपनी द्वारे उत्कृष्ट आणि अनुभवी फंड मैनेजमेंट टीमच्या मदतीने तुमचे पैसे व्यवस्थापित करतात. आणि शेअर मार्केट मध्ये SIP द्वारे वेगवेगळे स्टॉक गुंतवले जातात, दर महिन्याला पैसे गुंतवल्याने गुंतवणूकदाराला दर महिन्याला वेगवेगळी रक्कम मिळते आणि या युनिट्सचे मूल्य शेअर बाजारातील चढउतारांवर अवलंबून असते, म्हणजे जर market down असेल तर तुम्हाला कमी NAV सह अधिक units मिळतील.

सुरुवातीच्या काळात लोक FD आणि RD करून पैसे जमा करण्याचा सल्ला देत असत, परंतु सध्या SIP हे FD आणि RD पेक्षा आपल्या रकमेवर कितीतरी पट जास्त रिटर्न देते, म्हणूनच काही SIP हे जास्त चर्चेचा विषय बनत आहे. SIP प्लॅनमध्ये तुम्ही तुमचे पैसे कधीही काढू शकता, परंतु FD आणि RD मध्ये असे होत नाही. तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करत असाल व तुमच्याकडे एकरकमी रक्कम नसेल म्हणजे तुम्ही एकाच वेळी सर्व पैसे कंपनीला देऊ इच्चीत नसाल, तर तुम्ही SIP मध्ये दर महिन्याला काही पैसे देऊन MUTUAL FUND मध्ये गुंतवणूक करू शकता.

SIP मध्ये तुम्हाला प्रत्येक महिन्याला तुम्ही भरलेल्या पैशाचे युनिट्स मिळतात, जर कोणत्या महिन्यात मार्केट चा भाव जास्त असेल तर तुम्हाला कमी units मिळतात आणि ज्या महिन्यात मार्केट डाउन असते त्या महिन्यात अधिक युनिट तुम्हाला मिळतात.

SEBI म्हणजे काय? 

SIP कसे काम करते SIP Information in Marathi


जेव्हा तुम्ही SIP मध्ये गुंतवणूक करता तेव्हा तुमचे रिटर्न चे पैसे पुन्हा त्यात गुंतवले जातात. म्हणजेच रिटर्न्स ची संपूर्ण रक्कम फंडात पुन्हा जमा केली जाते. याला कंपाउंडिंग असे म्हणतात आणि याचा फायदा असा होतो की यात तुमचे पैसे अनेक पटींनी वाढतात. म्हणूनच परतावा अनेक पटींनी वाढवण्यासाठी शक्य तितक्या लवकर गुंतवणूक सुरू करणे देखील महत्त्वाचे आहे.

ज्या लोकांना स्टॉक मार्केट आणि म्युच्युअल फंडाविषयी फारच कमी माहिती आहे, त्यांच्यासाठी SIP हा गुंतवणुकीचा एक चांगला पर्याय आहे. SIP मध्ये जमा केलेली रक्कम म्युच्युअल फंडात गुंतवली जाते. तुम्ही जमा केलेल्या पैशाने दर महिन्याला म्युच्युअल फंडाचे काही युनिट्स खरेदी केले जातात. Share market मध्ये शेअरचे मूल्य दिवसेंदिवस वाढत किंवा कमी होत असते. ज्या लोकांना गुंतवणुकीचे चांगले ज्ञान नसते त्यांच्यासाठी mutual fund गुंतवणूक करणे सोयीचे असते कारण कंपनी स्वतः सर्वोत्तम म्युच्युअल फंडात त्यांच्या पैश्याची गुंतवणूक करते.

SIP हे Rupee Cost Averaging वर काम करते. SIP अंतर्गत गुंतवणूकदार म्युच्युअल फंड युनिट्स सरासरी किमतीत खरेदी करतो. चांगली गोष्ट अशी आहे की या सरासरी खर्चामुळे SIP हा गुंतवणुकीचा सर्वात सुरक्षित मार्ग आहे. हे गुंतवणूकदाराला म्युच्युअल फंड जास्त किंमतीत खरेदी करण्यापासून वाचवते. कोणत्याही उत्पादनावर जास्तीत जास्त नफ्यासाठी, ते कमी किंमतीत खरेदी करणे आवश्यक आहे. SIP मध्ये म्युच्युअल फंडाचे units वेगवेगळ्या दराने खरेदी केले जातात. मात्र, ते कधी स्वस्त तर कधी महाग असते. जेव्हा म्युच्युअल फंडाचे युनिट स्वस्त असते तेव्हा गुंतवणूकदाराला म्युच्युअल फंडाचे अधिक युनिट्स मिळतात. परंतु, जेव्हा ते महाग होते, तेव्हा कमी युनिट्स खरेदी करता येतात. SIP मुळे Mutual Fund युनिट्स सरासरी किमतीत खरेदी करणे याला Rupee Cost Averaging म्हणतात. यामुळे गुंतवणूकदाराला शेअर बाजाराची योग्य वेळ पाहावी लागत नाही.

Mutual fund म्हणजे काय? गुंतवणूक कशी करावी

Mutual Fund SIP चे फायदे - Benefits of SIP in Marathi


Sip हा गुंतवणूक करण्याचा एक अतिशय सोपा मार्ग आहे. ही एक अशी योजना आहे ज्याच्या अंतर्गत तुम्ही तुमचे भांडवल तर राखून ठेवू शकता शिवाय त्यावर आवश्यक रक्कम देखील मिळवू शकता. SIP दीर्घकालीन तसेच अल्प मुदतीच्या योजनांमध्ये प्रभावी आहे.
SIP che fayde kay ahet आणि कोणती कारणे आहेत ज्यामुळे सामान्य व्यक्तीने देखील SIP मध्ये गुंतवणूक करून भविष्यात चांगले भांडवल व आपले भविष्य सुरक्षित आणि फायदेशीर बनवू शकतील, तर चला जाणून घेऊया SIP चे फायदे काय आहेत.

  • कमी रकमेमध्ये गुंतवणूक करणे:- SIP मध्ये गुंतवणूक करण्याचा पहिला फायदा म्हणजे तुम्हाला मोठी रक्कम जमा करण्याची गरज नाही, तुम्ही SIP मध्ये थोड्या प्रमाणात गुंतवणूक करू शकता. तुम्ही महिन्याला 100 पासून पुढे कितीही रक्कम SIP मध्ये जमा करू शकता.
  • गुंतवणुकीच्या जोखमीत घट:- SIP मध्ये गुंतवणूक करून, तुम्ही शेअर बाजाराशी संबंधित अनेक प्रकारच्या जोखीम टाळू शकता, आणि एक चांगली म्युच्युअल फंड योजना घेऊन तुम्ही तुमच्या पैशातील गुंतवणुकीचे धोके कमी करू शकता.
  • कर सवलत:- SIP मध्ये गुंतवणुकीचा सर्वात मोठा फायदा असा होऊ शकतो की गुंतवणूक करताना कोणत्याही प्रकारचा कर भरावा लागत नाही.
  • चक्रवाढ परिणामाचा लाभ:- SIP मध्ये चक्रवाढ परिणाम म्हणजे तुम्हाला तुमच्या गुंतवलेल्या पैशावर मिळणाऱ्या व्याजावर व्याज मिळते. कारण जेव्हा तुमच्या पैशावर व्याज दिले जाते, तेव्हा ते व्याजाचे पैसे म्युच्युअल फंडाद्वारे पुन्हा गुंतवले जातात, ज्यामुळे नफा वाढतो आणि गुंतवलेल्या पैशावर कमावलेल्या नफ्यात मोठी वाढ होते.
  • शिस्तबद्ध गुंतवणूक:- जेव्हा तुम्ही एसआयपीमध्ये गुंतवणूक करता, तेव्हा ते तुम्हाला तुमची आणि तुमच्या पैशाची गुंतवणूक करण्यास शिस्त लावते जेणेकरुन तुम्ही लवकर लोभी होऊन कोणत्याही चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक करू नये आणि ही शिस्त तुम्हाला पुढील गुंतवणूक करण्यास अनुमती देते.

SIP मध्ये गुंतवणूक कशी करावी

SIP मध्ये गुंतवणूक सुरू करण्यासाठी, तुम्हाला प्रथम तुमची KYC पूर्ण करावी लागेल. यासाठी तुम्हाला पॅनकार्ड, पत्त्याचा पुरावा, फोटो आणि बँकचे चेकबुक तयार ठेवावे लागेल.
त्यानंतर तुम्ही फंड हाऊसच्या वेबसाइटवर जाल जिथे तुम्हाला SIP द्वारे गुंतवणूक करायची आहे. येथे तुम्हाला तुमचे नाव, जन्मतारीख यासारखी मूलभूत माहिती द्यावी लागेल. पॅन कार्डची सॉफ्टकॉपी, पत्त्याचा पुरावा आणि फोटोही अपलोड करावा लागेल. भारतामध्ये खूप असे fund house आहेत जे गुंतवणुकीसाठी तुमची मदत करतील.
यानंतर व्हेरिफिकेशनसाठी व्हिडिओ कॉलसाठी अपॉइंटमेंट घ्यावी लागेल. व्हिडिओ कॉल व्हेरिफिकेशन दरम्यान, तुम्हाला तुमचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड देखील दाखवावे लागेल.
पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, तुम्ही तुमच्या आवडीची म्युच्युअल फंड निवडा आणि नवीन खाते नोंदणी करण्यासाठी एक अर्ज भरा. येथे सर्व माहिती दिल्यानंतर तुम्हाला तुमची आयडी आणि पासवर्डही निवडावा लागेल. येथे तुम्ही बँक तपशील देखील द्यावे लागतील.
जेव्हा नोंदणी पूर्ण होईल आणि तुम्हाला फंड हाऊसकडून पुष्टीकरण मिळेल, तेव्हा तुम्ही तुमच्या आवडीची म्युच्युअल फंड योजनेत गुंतवणूक करु शकता.

SIP मध्ये किमान किती गुंतवणूक आवश्यक आहे?

SIP चा एक फायदा आहे की तुम्ही तुमची गुंतवणूक फक्त ₹ 500 पासून सुरू करू शकता. तुम्ही तुमच्या उत्पन्नानुसार SIP मध्ये गुंतवणूक करू शकता. काही फंड हाऊसेस फक्त ₹ 100 पासून गुंतवणुकीची सुविधा देतात जे गुंतवणूकदाराला खुपच फायदेशीर असते.

तुम्ही तुमच्या लहानपणापासूनच SIP मध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात करू शकता. तुम्ही यामध्ये जितक्या लवकर गुंतवणूक कराल तितका जास्त फायदा तुम्हाला होईल. जर तुम्ही वयाच्या 25 व्या वर्षी फक्त ₹ 500 ची SIP सुरू केली असेल, तर वयाच्या 60 व्या वर्षी ₹ 32.50 लाख जमा होतील.

निष्कर्ष-
मित्रांनो, जर तुम्ही ही पोस्ट वाचून SIP करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही अगदी बरोबर करणार आहात. तुम्ही जितक्या कमी वयात गुंतवणूक करायला सुरुवात कराल तितकाच तुम्हाला फायदा होईल. तुम्ही विद्यार्थी असलात तरीही एसआयपी कोणत्याही वयात सुरू करता येते. म्हणून, एक चांगला गुंतवणूकदार म्हणून, तुम्ही SIP मध्ये गुंतवणूक सुरू करू शकता.

आज या पोस्ट मधून तुम्ही SIP म्हणजे काय हे जाणून घेतले. तसेच SIP che fayde kaay aahet, SIP kashi karavi याची सर्व माहिती मिळाली असेल. जर तूम्हाला म्युच्युअल फंड किंवा SIP शी संबंधित काही प्रश्न असल्यास, तुम्ही आम्हाला कमेंटद्वारे विचारू शकता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Menu Site