Ad code

Latest

6/recent/ticker-posts

FD म्हणजे काय? Fixed Deposit मध्ये गुंतवणूक कशी करायची आणि FD चे फायदे काय आहेत?

FD म्हणजे काय? Fixed Deposit मध्ये गुंतवणूक कशी करायची आणि FD चे फायदे काय आहेत?

 


आपले भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी बचत करणे खूप महत्वाचे आहे, जसे अन्न, वस्त्र निवारा आपल्याला खूपच आवश्यक असते तसेच पैसा ही आपल्या जीवनाची अत्यावश्यक गरज आहे. बहुतेक लोकांचे ध्येय आपला पैसा वाचवण्याकडे असतो आणि ते पैसे वाचवण्यासाठी विविध पद्धतींचा अवलंब करतात. म्हणूनच पोस्ट कार्यालयाव्यतिरिक्त सरकारी बँका आणि निमसरकारी बँकां तसेच फायनान्स कंपन्या कडून गुंतवणुकीसाठी अनेक प्रकारच्या योजना राबवल्या जात आहेत. आज आम्ही तुम्हाला या लेखाद्वारे FD बद्दल संपूर्ण माहिती देत ​​आहोत, चला तर मग जाणून घेऊया, FD म्हणजे काय, पूर्ण फॉर्म, FD खाते कसे उघडायचे, व्याजदराबद्दल.

FD म्हणजे काय ( F D काय असते )

FD म्हणजेच फिक्स्ड डिपॉझिट ही बचत करण्याचा एक अतिशय सुरक्षित आणि सोपा मार्ग आहे. कुठल्याही बँकेत FD करतानाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे त्यात गुंतवणूक करण्यापूर्वीच तुम्हाला मॅच्युरिटीवर किती नफा मिळेल याची माहिती मिळते. सोप्या शब्दांत सांगायचे तर FD मध्ये गुंतवणूकदारांनी जमा केलेल्या रकमेवर पूर्व-निर्धारित दराने व्याज मिळते. कोणत्याही परिस्थितीत त्यांना निर्धारित रकमेपेक्षा कमी किंवा जास्त रक्कम मिळत नाही.

कोणत्याही बँक किंवा पोस्ट ऑफिसद्वारे मुदत ठेवीमध्ये जमा केलेली रक्कम ठराविक कालावधीपूर्वी काढता येत नाही. Fix diposit मध्ये तुम्ही कमीतकमी 6 महिने ते 10 वर्ष या कालावधीसाठी गुंतवणूक करू शकता. जर एखाद्याला हे पैसे त्या कालावधीच्या आधी काढायचे असतील, तर त्यांना त्याची पूर्व माहिती संबंधित बँक किंवा पोस्ट ऑफिसला द्यावी लागेल. मात्र, यासाठी गुंतवणूकदाराला penalty भरावी लागते.

FD full form काय आहे

FD - Fix Deposit
FD - मुदत ठेव


FD चे पूर्ण नाव Fix Deposit आहे तसेच FD ला मराठीत याला मुदत ठेव असे म्हणतात, परंतु बहुतेक लोक FD म्हणूनच ओळखतात कारण हा शब्द बोलायला आणि लिहायला खूपच सोपा आहे.

Fix Deposit साठी लागणारे Documents

जर तुम्हाला फिक्स डिपॉझिट करायचे असेल, तर त्यासाठी तुम्हाला काही आवश्यक कागदपत्रांची आवश्यकता असेल, त्याद्वारे तुम्ही FD करू शकता, आम्ही तुम्हाला यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत ते सांगत आहोत.
  • Address proof
  • Bank Account
  • Pan card
  • Adhar card
  • रोख रक्कम किंवा चेकची रक्कम एफडी करण्यासाठी
  • पासपोर्ट size फोटो
  • FD form ( bank मध्ये मिळेल)
जर तुम्हाला FD करायची असेल तर तुमच्यासाठी ही सर्व कागदपत्रे असणे अनिवार्य आहे, जर तुमच्याकडे ही कागदपत्रे असतील तर तुम्ही तुमची FD उघडू शकता.

FD कशी करतात - fd account kase kholave? FD kashi karavi

सध्याच्या काळात FD खाते उघडणे खूप सोपे झाले आहे कारण इंटरनेटद्वारे जवळपास सर्व गोष्टी ऑनलाइन केल्या जात आहेत आणि इंटरनेट बँकिंगने बँकिंग क्षेत्रात खूप योगदान दिले आहे. इंटरनेट बँकिंग मुळे Ac ओपन करणे, पैसे काढणे, ATM pin बदलण्यासाठी खूप मदत होते. FD Ac ओपन करण्यासाठी तुम्ही बँकेत जाऊन ऑफलाइन करू शकता, किंवा तुम्ही Online पद्धतीने FD करू शकता.

बँकेत जावून FD करा: - बँकेत जाऊन FD घेणे तुमच्यासाठी अधिक चांगले होईल कारण FD शी संबंधित छोटी-मोठी माहिती बँक कर्मचाऱ्याच्या माध्यमातून सहज समजू शकते, तसेच तुमच्या रकमेवर किती व्याज मिळेल याची माहिती मिळू शकते. जर तुमचे बँकेत saving account किंवा current account असेल तर FD काढणे सोपे होईल, जर तुमचे बँकेत खाते नसेल तर तुम्ही नवीन खाते उघडून FD खाते उघडू शकता.


इंटरनेट बँकिंग द्वारे FD खोला :- जर तुम्हाला घरी बसून FD खाते उघडायचे असेल, तर ज्या बँकेत तुमचे खाते आहे त्या बँकेच्या वेबसाइटवर जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने FD करू शकता.

FD चे किती प्रकार आहेत - Types of Fixed Deposit in marathi

Standard Term Deposit

स्टँडर्ड टर्म डिपॉझिटमध्ये, ठराविक कालावधीसाठी पूर्वनिर्धारित व्याज दराने निधीची गुंतवणूक केली जाते. यामध्ये 7 दिवसांपासून 10 वर्षांपर्यंतचा कालावधी असू शकतो. गुंतवणुकीचा कालावधी आणि व्याजदर ज्या वित्तीय संस्थेमध्ये गुंतवणूक केली जात आहे त्यावर अवलंबून असते.

Senior Citizens Fixed Deposit

बँका आणि NBFC इतर गुंतवणूकदारांच्या तुलनेत 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना मुदत ठेवींवर जास्त व्याज देतात. तसेच मुदत ठेवींमधून ज्येष्ठ नागरिकांनी मिळवलेले व्याजवर कोणत्याही प्रकारचे tax लागत नाहीत.

Recurring Fixed Deposit

आवर्ती ठेव हा देखील एक प्रकारचा fix deposit आहे, ज्यामध्ये मासिक किंवा त्रैमासिक सारख्या निश्चित कालावधीसाठी पैसे जमा केले जातात. यामध्ये व्याजदर आधीच ठरलेला असतो. मॅच्युरिटी कालावधी पूर्ण झाल्यावर ठेवलेल्या रकमेसह त्यावरील व्याज आपल्याला मिळते.

Corporate Fixed Deposit

काही कॉर्पोरेट संस्था देखील FD जमा करतात त्या बँका आणि NBFC पेक्षा जास्त व्याजदर आपल्याला देतात, परंतु कॉर्पोरेट Fix Deposit मध्ये जास्त जोखीम असते. जर एखादी कंपनी दिवाळखोरीत निघाली तर जमा केलेले पैसे परत मिळतील याची गॅरंटी नसते.

NRI Fix Deposit

जर तुम्ही परदेशी चलनात कमाई करत असाल तर NRI Fix Deposit हा एक चांगला पर्याय आहे. परदेशी चलनात चढ-उतार होत असतात, परंतु NRI FD चा सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे यामध्ये व्याजासह संपूर्ण रक्कम करमुक्त असते.

FD चे फायदे Benefits of Fix Deposit in marathi

Fix Deposit चे तुम्हाला बरेच फायदे मिळतात, ज्यामुळे तुम्ही निश्चितपणे bank मध्ये किंवा पोस्ट ऑफिस मध्ये FD करु शकता. Fix Deposit मध्ये पैसे गुंतवणे खूप सोपे असते, आणि त्यात पैसे गमावण्याचा कोणताही धोका नसतो सोबतच तुम्हाला चांगले रिटर्न पण मिळतात. येथे मी तुम्हाला मुदत ठेवीच्या काही फायद्यांबद्दल सांगणार आहे जे खूप फायदेशीर आहेत आणि तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे.

जोखीममुक्त गुंतवणूक: एफडीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्हाला गुंतवणुकीच्या अगदी सुरुवातीलाच सांगितले जाते की तुम्हाला मॅच्युरिटीवर किती पैसे मिळतील. यामध्ये काही कमी जास्त होत नाही व यामध्ये कोणताही धोका नाही.

कर सवलत: तुम्ही टॅक्स सेव्हिंग एफडीमध्ये 5 वर्षांसाठी गुंतवणूक केल्याने तुम्हाला tax वर सूट मिळते. तुम्हाला जमा केलेल्या मूळ रकमेवर व त्यावरील व्याजावर कोणत्याही प्रकारचा कर भरावा लागणार नाही.

FD वर कर्ज मिळु शकते : जर काही अडचणीत तुम्हाला पैश्याची गरज असल्यास तुम्ही Fix Deposit वर कर्ज घेऊ शकता. तुम्ही तुमच्या सोयीनुसार पैसे देऊ शकता.

लिक्विडिटी : भांडवलाची सुरक्षितता आणि व्याजाचा निश्चित दर याशिवाय, FD मध्ये तरलता देखील येते. तुम्ही तुमच्या गरजेच्या वेळी ते कधीही फोडता येतात किंवा भाजता येतात. तुमची इच्छा असल्यास, तुम्ही मुदतपूर्ती होईपर्यंत FD चालू ठेवू शकता. मॅच्युरिटी कालावधीपूर्वीही ते रिडीम केले जाऊ शकते.

FD तोडल्यावरही मिळणार व्याज : तुम्हाला कर्ज घ्यायचे नसेल तर तुम्ही कधीही बँकेत जाऊन एफडी तोडू शकता. तुम्ही ठराविक कालावधीनंतर FD तोडल्यास बँक तुम्हाला मूळ रकमेवर व्याज देखील देतात. साधारणपणे, तुम्ही ४५ दिवसांपूर्वी fix diposit तोडल्यास तुम्हाला तुमच्या मूळ रकमेवर व्याज मिळत नाही.

या लेखात आम्ही तुम्हाला FD full form kay ahe तसेच fix deposit kay aste, Fix Deposit kashi karavi, fd che fayde kaay kahet याबद्दल माहिती दिली आहे, आम्ही आशा करतो की तुम्हाला Fix Deposit बद्दल दिलेली माहिती नक्कीच आवडली असेल, जर तुम्हाला या ब्लॉग च्या द्वारे दिलेली माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांसह शेअर करा. व आमच्या naadmarathi.in या फेसबुक page ला फोल्लोव व like करा. जर तुम्हाला या संबंधी कोणतेही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही आम्हाला कमेंट देखील करू शकता.

धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Menu Site