Ad code

Latest

6/recent/ticker-posts

दिवाळी साजरी करण्यामागचा या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का Diwali Festival

दिवाळी उत्सवा मागे या आहेत काही खास गोष्टी - दिवाळी का साजरा करतात Diwali Festival


हिंदू धर्मात वर्षभर सण उत्सव एकदम थाटामाटात साजरे केले जातात, प्रत्येक महिन्याला कोणता न कोणता सण समारंभ असतोच तसेच प्रत्येक सणाचे धार्मिक व सामाजिक स्तरावर वेगळे महत्त्व असते. भारतभर व भारताबाहेर असणारे भारतीय दिवाळी हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. हिंदू धर्मात साजऱ्या केल्या जाणाऱ्या सर्व सणात दिवाळी हा सण प्रमुख सण म्हणून ओळखला जातो, दिवाळीच्या सणाला दीप पर्व म्हणजेच दिव्यांचा सण असेही म्हणतात. दिवाळीचा सण हा लहान मुलांना खूप आवडतो लहान मुले त्या दिवशी फटाके फोडतात व त्या दिवसात खूप असे आवडीचे पदार्थ त्यांना खायला मिळतात.दिवाळी का साजरी केली जाते? त्यामागे वेगवेगळ्या कथा आहेत, त्या आपण जानून घेणारच आहोत त्या आधी diwali mhanje kaay हे माहीत करून घेऊ. दिवाळी उत्सवा मागे वेगवेगळ्या परंपरा आहेत. असे म्हटले जाते की 14 वर्षांच्या वनवासानंतर भगवान श्रीराम अयोध्या नगरी परतले तेव्हा त्यांच्या प्रजेने घरे स्वच्छ केली आणि दिवा लावून त्यांचे स्वागत केले.
हिंदुस्थान ही उत्सवांची भूमी आहे. भारतात विविध पंथांचे लोक दर महिन्याला सण साजरे करतात, ते क्वचितच कोणत्याही देशात साजरे केले जातात. दिवाळी हा सनातन धर्माचा सण असून तो वर्षातील सर्वात मोठा सण मानला जातो. हा सण अधर्मावर धर्माचा विजय आणि अंधारावर प्रकाशाचा विजय म्हणून साजरा केला जातो. या सणाशी संबंधित अनेक ऐतिहासिक महत्त्वाच्या कथा आहेत. या सणाच्या तयारीसाठी महिनाभर अगोदरच घरांची साफसफाई, रंगकाम आणि खरेदीची कामे करतात.

दिवाळी म्हणजे काय - Diwali mhanje kaay

दिवाळी हा दिव्यांचा उत्सवाचा सण आहे. हे हिंदू कॅलेंडरनुसार कार्तिक महिन्यात येते आणि सामान्यतः ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान येते. दीपावली हा हिंदू धर्मातील सर्वात महत्वाचा सण मानला जातो, कारण तो अंधारावर प्रकाशाचा विजय दर्शवितो, अज्ञानावर ज्ञानाचा आणि असत्यावर सत्याचा विजय दर्शवितो. दिवाळी दिवशी लोक आपल्या घर भोवती दिवे लावून आधारावर मात करतात, सगळीकडे फटाके व जल्लोष चालू असतो. भारतामध्ये दिवाळीला एक अधिकृत सुट्टी असते, या दिवशी लोक घरामध्ये पूजा करतात व इतरांना भेटवस्तू देतात. तसेच घरामध्ये दिव्यांची आरास लावतात दारासमोर सडा-रांगोळी करून नवीन कपडे आणि फराळ करतात.


दिवाळी सणाचे महत्व

हिंदू धर्मात गणेशोत्सव नंतर दिवाळी हा मोठा सण साजरा केला जातो, दिवाळीची सुरुवात धनत्रयोदशी पासून होते. हिंदू मान्यते नुसार दीपावली हे वाईटाच्या अंधारावर चांगल्या प्रकाशाचे प्रतीक आहे, म्हणूनच दीपावलीच्या दिवशी सगळीकडे दिवे लावन्याची पद्धत आहे. यामुळे अंधार म्हणजे वाईटाचा अंत होतो आणि प्रेम, चांगुलपणा आणि पवित्रता यांनी भरलेले एक अद्भुत वातावरण तयार होते, ज्याद्वारे समाजात सकारात्मक ऊर्जा येते. दिवाळीचा सण सर्वांच्या हृदयाला पवित्रतेच्या प्रकाशाने वातावरण प्रकाशित करतो.

दिवाळीचा सण हा दान आणि क्षमा करण्याचा आहे. या सणामध्ये सर्व लोक मोकळ्यामणाने उत्सव आणि मैत्रीचा गोडवा वाटून घेतात. दिवाळी दरम्यान सगळीकडे आनंदी वातावरण असल्याने मनाला आनंदी आणि ताजे वाटते यामुळे व्यक्तीला आपले मन नैतिकतेमध्ये बदलण्याची प्रेरणा देते. दिवाळी हा भारतातील प्रत्येक कोपऱ्यातील धर्म व जातीतील लोकांना एकत्र आणणारा सण आहे. दिवाळी आपल्या आत नवीन आशेचा व एक चांगला प्रकाश टाकते, दिवाळीचा प्रकाश आपल्या सर्व वाईट इच्छा व वाईट विचार नष्ट करण्यास मदत करतो. आनंद आणि समृद्धीची इच्छा बाळगण्यासाठी दिवाळीपेक्षा आणखी कोणता सण नाही, म्हणून या निमित्ताने दिवाळीच्या दिवसात देवी या लक्ष्मीचीही पूजा केली जाते. दिवाळीबरोबरच दीपदान, धनत्रयोदशी, वसूबारस, पाडवा आणि भाऊबीज असे सणही साजरे केले जातात.

मित्रांनो, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की दिवाळीचा पवित्र सण केवळ भारतातच नाही तर भारताबाहेर ही जल्लोष्यात साजरा केला जातो. दिवाळी हा सण प्रामुख्याने ५ दिवसांचा असतो. ज्याची सुरुवात धनत्रयोदशीपासून होते. दिवाळी मधील या 5 दिवसातील प्रत्येक दिवसाचे एक महत्त्व आहे. त्यामुळे तो मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. जाणून घेऊयात Diwali til Divsanche mahatwa kay aahe.

1. धनत्रयोदशी

दिवाळी सणाची सुरुवात धनत्रयोदशीने होते. या दिवशी धन व ऐश्वर्या ची प्रतीक असलेल्या देवी लक्ष्मी आणि भगवान धन्वंतरी यांची पूजा केली जाते. या दिवशी लोक त्यांच्या दुकानात आणि व्यवसायाच्या ठिकाणी देवी लक्ष्मीची पूजा करतात. सोबतच धनत्रयोदशी दिवशी सोने खरेदी करण्याचे महत्त्व आपल्या हिंदू धर्मग्रंथांमध्येही विस्ताराने सांगितले आहे.

2) नरक चतुर्दशी​ Naraka Chaturdashi

दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे नरक चतुर्दशी. ह्या दिवशी भल्या पहाटे उठून सूर्योदया अगोदरच अंघोळ वगैरे आटोपून तयार होण्याची परंपरा आहे. काही ठिकाणी या दिवशी सकाळी लवकर उठून कारेटे फोडण्याची परंपरा आहे. या दिवशी भगवान श्री कृष्ण यांनी नरकासुराचा वध केला होता. या दिवशी यमराजाची पूजा केली जाते तसेच श्रीकृष्ण व काली पूजा केली जाते.

3. दिवाळी

दिवाळी हा हिंदू सणांपैकी महत्वाचा सण आहे. कार्तिक महिन्यातील अमावास्येला दिवाळी हा सण साजरा केला जातो. हा एकमेव हिंदू सण आहे जो अमावस्येला साजरा केला जातो. या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केल्यास देवी सुख समृद्धी चा आशीर्वाद देते. पौराणिक कथे नुसार भगवान श्री राम यांनी असुरराज रावण याचा वध करून या दिवशी अयोध्येला आले होते, तेव्हा तेथील लोकांनी सर्वत्र दिवे लावून आनंद व्यक्त केला होता. म्हणून दिवाळी दिवशी संपूर्ण भारतातील लोक आपापल्या घरात दिवे लावतात.

4. पाडवा व गोवर्धन पूजा

दिवाळीचा चौथा दिवस हा पाडव्याचा असतो या दिवशी विवाहित जोडपे एकमेकांना छानशी भेटवस्तू देतात. तसेच या दिवशी गोवर्धन पूजा देखील केली जाते या दिवशी लोक भगवान श्रीकृष्णांची गोवर्धन पूजा करतात. गाई बैल आणि म्हशी व बकरी यांना अंघोळ घालून सजवून त्यांना दिवाळीचे मिष्ठान्न खायला देतात.

5. भाऊबीज

भाऊबीज दिवाळी सणाचा शेवटचा दिवस आहे. भाऊ-बहिणीचे नाते दृढ होण्यासाठी आणि भावाच्या दीर्घायुष्यासाठी भाऊबीज हा सण साजरा केला जातो. भाऊबीजच्या दिवशी बहीण आपल्या भावाला घरी बोलावते आणि त्याला ओवाळते त्याला खाऊ घालते आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते.

पौराणिक कथे नुसार असे मानले जाते की एकदा यमराज आपल्या बहीनीला म्हणजे यमुनाजीला भेटण्यासाठी तिच्या घरी गेले होते आणि यमुनाजींनी तिला प्रेमाने जेवायला दिले आणि वचन घेतले की दरवर्षी या दिवशी ते आपल्या बहिणीच्या घरी भोजनासाठी जातील.  तसेच जी ​​बहीण या दिवशी आपल्या भावाला घरी बोलवून ओवाळेल त्याला प्रेमाणे खाऊ घालते तर तिच्या भावाचे आयुष्य दीर्घ होते. तेव्हापासून भाऊ बीज साजरा केला जातो.

दिवाळी का साजरी केली जाते?  Diwali ka sajari kartat

 
दिवाळीच्या सणाशी अनेक पौराणिक कथा आहेत. पण आम्ही तुम्हाला diwali साजरी करण्यामागचा काही पौराणिक कथांबद्दल सांगणार आहोत. ( Diwali sajari karnya magchya goshti ) दीपावलीचा सण खाली नमूद केलेल्या या विशेष पौराणिक समजुतींचे पालन करून साजरा केला जातो. दिवाळीच्या दिवशी लोक लक्ष्मी आणि विघ्नहर्ता गणेशाची पूजा करतात. चला तर मग जाणून घेऊया, दिवाळीचा सण साजरा करण्यामागील खास कारण.

पहिली कथा

रावणाचा वध करून भगवान श्रीराम अयोध्येला परतले.
त्रेतायुगात रावणाचा पराभव करून भगवान श्रीराम जेव्हा सीता मातेला घेऊन अयोध्येला परतले तेव्हा सर्व अयोध्येतील जनतेने आपल्या घरी व आजूबाजूला दिवे लावून त्यांचे स्वागत केले जल्लोष व्यक्त केला. त्यामुळे दिवाळीच्या पाच दिवसांच्या सणामध्ये सर्वच दिवशी सर्व घरांमध्ये दिवे लावले जातात.

दुसरी कथा

भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला
पौराणिक कथेनुसार, देवकीनंदन श्री कृष्णाने दीपावलीच्या एक दिवस आधी म्हणजेच नरक चतुर्दशीच्या दिवशी नरकासुराचा वध केला होता, त्यामुळे सर्व लोकांनी आनंद साजरा केला. या कारणास्तव हा सण दिवाळीच्या एक दिवस आधी साजरा केला जातो.

तिसरी कथा

लक्ष्मी मातेचा जन्मदिवस-
या दिवशी माता लक्ष्मीचा जन्म झाला होता आणि याच दिवशी भगवान विष्णूशी तिचा विवाहही झाला होता. असे म्हटले जाते की दरवर्षी प्रत्येकजण आपापल्या घरी रोषणाई करून या दोघांचा विवाह साजरा करतात.

चौथी कथा

सम्राट विक्रमादित्यचा राज्याभिषेकही कार्तिक महिन्याच्या अमावास्येला झाला. त्यामुळे राज्यातील सर्व जनतेने दीपप्रज्वलन करून आनंद साजरा केला.

पाचवी कथा

भगवान विष्णूंनी वामनाचे रूप धारण केले आणि राजा बळीला दान म्हणून तीन पाऊल जमीन मागितली. भगवान वामनाने आपल्या विशाल रूपातून तिन्ही जगे घेतली आणि राजा बळीवर प्रसन्न होऊन त्याला सुतला राज्य दिले.  सुतळाचे राज्य मिळाल्यावर तिथे उत्सव साजरा केला जायचा, तेव्हापासून दिवाळी सुरू झाली.

दिवाळीचे वैशिष्ट्य

  • असत्यावर सत्याचा, वाईटावर चांगल्याचा, अंधारावर प्रकाशाचा विजयाची आठवण म्हणून दिवाळी हा सण खास साजरा केला जातो.
  • दिवाळीच्या दिवशीच देवी लक्ष्मीची पूजा केली जाते आणि असे मानले जाते की जर एखाद्या व्यक्तीने दिवाळीच्या दिवशी देवी लक्ष्मीची मनोभावे पूजा केली तर त्याच्या घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही.
  • दिवाळीच्या दिवशी लोक एकमेकांना भेटवस्तूंची देवाणघेवाण करतात आणि एकमेकांना गोड खाऊ देतात.
  • दीपावलीच्या दिवशी लोकांचे वागणे चांगले असते आणि लोकांमध्ये प्रेम टिकून राहते त्यामुळे लोक एकमेकांना मिठीही मारतात.
  • मान्यतेनुसार दिवाळीच्या दिवशी फटाके वाजवुन लोक आपला आनंद व्यक्त करतात.

आज आपण काय शिकलो

मला आशा आहे की तुम्हाला या पोस्ट मध्ये दिवाळी का साजरी करतात? याबद्दल संपूर्ण माहिती दिली आणि मला आशा आहे की दिवाळी का आणि कशी साजरी करावी हे तुम्हाला समजले असेल.

तुम्हाला या लेखाबद्दल काही शंका असल्यास किंवा त्यात काही सुधारणा व्हाव्यात असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही यासाठी कमेंट लिहू शकता. तुमच्या या विचारातून आम्हाला काहीतरी शिकण्याची आणि काहीतरी सुधारण्याची संधी मिळेल.

दिवाळी का साजरी करतात ही माझी पोस्ट तुम्हाला आवडली असेल किंवा तुम्हाला त्यातून काही शिकायला मिळाले असेल, तर कृपया तुमचा आनंद आणि उत्सुकता दाखवण्यासाठी ही पोस्ट फेसबुक, ट्विटर इत्यादी सोशल नेटवर्क्सवर शेअर करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Menu Site